साधी सोपी रोजच्या वापरातील इंग्रजी भाषा

Submitted by रैना on 15 January, 2011 - 13:48

रोजच्या व्यवहारातील इंग्रजी साक्षरता या दृष्टीने आपण काही सल्ला देऊ शकाल?

काय हवे आहे.
कल्पना करा की भारतातील प्रौढ आणि प्राथमिक शिक्षण झालेल्या व्यक्तिला इंग्रजी शिकवायचे आहे. ते पुस्तकी नको. रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द हवे. अगदी बेसिक चालेल. मग अ‍ॅडव्हान्स्डबाबत विचार करु.
इंग्रजी मराठीतून शिकवायचे आहे.

काय शिकवावे आणि कसे (मेथड) या दोन्ही बाबत कृपया लिहा.

सध्या एवढेच जमले आहे.
शब्दसंपदा : - २ अक्षरी शब्द, ३ अक्षरी शब्द, ४ अक्षरी शब्द शिकवून उच्चाराप्रमाणे त्याचे स्पेलिंग कसे येते हे शिकवणे. (Phonetics)
म्हणजे cat, bat, hat, mat, pat मग gate, plate, slate असे..
- मग अगदी सोप्या पण व्यवहारिक उपयोगाचा गोष्टी रचून लिहून द्यायचा इरादा आहे.
- मग रस्त्यांवरील पाट्यांवरील ईंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थं यावर काम करायचा इरादा आहे.
- विद्यार्थ्याची कुवत पाहून अव्यवहार्य पण क्रमिक अभ्यासक्रमात असलेले शब्द गाळायचे. उदा- urn, daisy वगैरे. जे काही शिकवू ते शब्द उपयोगी आणि सोपे हवेत, नाहीतर विद्यार्थी कंटाळतात.

व्याकरण
- अगदी ढोबळ व्याकरण (रेन अँड मार्टिन नाही. तसेही ते अगदीच छळवादी आहे. :फिदी:)
- त्यातही बोलीभाषेतील वाक्येच्या वाक्ये आधी शिकवणे आणि अशी शंभरएक वाक्य झाली की त्यामागील व्याकरण समजावणे.

रॅपिडेक्स वगैरे चाळले. ते नाही पटले. आणि तसाही त्याचा फोकस वेगळा आहे असे वाटले.

http://www.insightin.com/esl/1000.php इथे सर्वात जास्त वापरल्या जाणारे इंग्रजी शब्द आहेत. त्यातले पहिले १००० मला तरी ठिक वाटत आहेत. तुमचे मत सांगा.

(त.टी. - प्लीज स्तुत्य उपक्रम वगैरे लिहुन लाजवू नका. त्यात स्तुत्य काहीही नाही. नेटाने प्रयत्न केल्यास कोणालातरी मदत होऊ शकते. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक व्यक्तिचा अधिकार आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद क्षिप्रा, नानबा, स्वाती२, चिमण, अरुंधती, लिंबू, रुनी
आज अजिबात व्यवस्थित लिहायला वेळ मिळायला नाही. उद्या लिहीते. Happy
लीडस साठी मनःपूर्वक धन्यवाद.

क्षिप्रा- तो कंटेंट उपयुक्त आणि पुरेसा सोपा वाटतो आहे. उद्या लिहीते सविस्तर.

रैना,सर्वांचे पोस्ट्स वाचले.. सर्वांनी चांगल्या टिप्स सांगितल्यात. मी इन्डोनेशियाला अ‍ॅडल्ट्स करता इन्ग्लिश कन्वरसेशन क्लासेस चालवत असे. तेंव्हा मीही अल्फाबेट्स ची ओळख न देता कोलोक्विअल संभाषणापासून सुरुवात केली होती. अगदी गुडमॉर्निंग पासून सी यू टुमॉरो सार्खी बेसिक वाक्यं, मग रोजच्या वापरातले शब्द, वेळ सांगणे, दर आठवड्याला ( कारण क्लास फक्त शनिवारी असायचा) ५ नवीन शब्द/वाक्यं इन्ट्रोड्यूस करायचे शिवाय आधी शिकलेल्या शब्दांची पुन्हा पुन्हा (आपण न कंटाळता Proud )उजळणी करायची,शेवटी हळूहळू कामापुरतं ग्रामर इन्ट्रोड्यूस केलं. वर्षं,दोन वर्षात शिकण्यात इन्टरेस्ट असलेल्या लोकांना चांगलं बोलता येऊ लागलं.
तेंव्हा शाळेतून ९वीच्या कोरिअन विद्यार्थ्यांना ESL शिकवतांनापण हीच मेथड वापरली.

वर्षू नील, नेमका मुद्दा हे हा,
अहो आमची मातृभाषा देखिल, आधी आम्ही बोलायला शिकतो, मग नन्तर लिहायला!
पण काही बोलताच येत नस्ताना एबीसीडी पासुन ग्रामरपर्यन्त अक्षरओळख माथी मारल्यावर नन्तर बोलता येणे अवघड होत जाते. तेव्हा कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यास शिकवताना, बोलता येणे-शब्दसन्ग्रह-वाक्यरचना यास प्राधान्य देऊन, आवड निर्माण झाल्यावर थोड्या काळानन्तर अक्षरओळख दिली तर ती जास्त प्रभावी ठरेल असे वाटते! Happy

वर्षु Lol
जपान आठवले. तिथे हापिसातील एका जपानी बाईला 'अमेरिकन नवरा मिळवायला लागेल' तितपत(च) इंग्रजी संभाषण शिकायचे होते. मला अमेरिकन नवरा मिळवायला इंग्रजीची काय पूर्वतयारी करावी लागते तेच माहित नव्हते. पण डेटिंग साठी इंग्रजी हा एक महान विनोदी विषय आहे.

५ नवीन शब्द/वाक्यं इन्ट्रोड्यूस करायचे शिवाय आधी शिकलेल्या शब्दांची पुन्हा पुन्हा (आपण न कंटाळता )उजळणी करायची>> हे पटले.

रैना Lol
'अमेरिकन नवरा मिळवायला लागेल' तितपत(च) इंग्रजी ... Rofl Rofl
अजून या विषयावर माझं संशोधन/प्रयोग चालू आहेत.. थाय्,कोरिअन्स,इन्डोनेशिअन्सना इग्लिश शिकवायला तितकसं भारी पडलं नाय्..पण आता चायनीजना शिकवताना अक्षरशः नाकी नऊ येतात.,. त्यांना न,ल,र आणी जोडाक्षरांचा उच्चार काही केल्या जमत नाही.. खैर वो फिर कभी.. आता विषयांतर होतयसं वाटतंय Happy

सगळ्यांच्या पोस्ट्स वाचून विचारांती मी संभाषणाची मात्रा भरपूर वाढवायची पण लिहीणेवाचणे सोडायचे नाही असे ठरवले आहे. हे जरा बहुदुधी/आखुडशिंगी होते आहे. पण सध्या मला हेच शक्य आहे. काहीमहिन्यांनंतर जरा कुठे काही गोडी लागली आहे आणि शब्द शब्द जोडुन वाचता येतो आहे आणि त्यात तिला खूप आनंद होतो आहे. ते आता केवळ सरावाअभावी मागे पडु नये असे वाटते आहे.
म्हणजे पूर्वतयारी मला वाढवावी लागेल. पण दॅट शुड वर्क.
Thanks a million for all the leads.

CLR ची साईट आवडली. धन्यवाद चिमण. ती पुस्तकं चांगली वाटतायेत. ती मिळवण्याचा प्रयत्न करते.आभारी आहे.

आमचे जपानीचे सर (रैना, सर :- आशुतोष Happy ) आम्हाला मराठी/इंग्रजीमधूनही अर्थ समजावून सांगायचे. समजायला सोपं जाऊ शकतं..
पण, जास्तीत जास्त वेळ ते आमच्याशी जपानीमधूनच बोलायचे. सुरुवातीला मराठी/इंग्रजीतुन, मग हळूहळू कमी करत फक्त जपानीमधे आलं सगळं..
बाकी रोजच्या वापरातली वाक्यं सारखीसारखी म्हणायला सांगायचे.
आमच्या ग्रुपमधले मित्रही उत्साहाने सतत सराव करायचो. त्यामुळे खुप फायदा झाला. त्यामुळे सातत्य आणि सराव करा यासाठी सरांनी प्रोत्साहन देणे(मागे लागणे!) गरजेचे आहे.

>कोलोक्विअल
आईग्गं! कस्लं नॉस्टॅल्जिक! आमचे सरही सारखं, तुम्हाला लँग्वेजचा 'फील' आला पाहिजे. त्यासाठी 'कोलोक्विअल' जॅपनीज शिकायला हवं.

मस्त धागा आहे रच्याक Wink

बेसिक करिक्युलम
numbers
colours
days
months
family - relationships
friends
ourselves
house/kitchen
office
shop
hospital
time
body parts

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

याला पूर्ण अनुमोदन. ते झाले की पुढची लेवल रिलेटेड वर्डची.

पाचवी ते सातवी लेवलला रिलेटेड वर्ड साम्गा. असे प्रश्न असतात. उदा. स्काय ... मग याला बर्ड, ब्ल्यू, क्लाउड, रेन...... अगदी गॉड, स्टार, प्लॅनेट काहीही चालेल. असे वीस तीस शब्द भराभर लिहिता आले पाहिजेत.

मीनव्हाइल, साधा वर्तमान आणि चालू वर्तमान काळ शिकवा. हे दोनच काळ आले तरी बोलता येऊ शकते. ७०% वाक्ये याच दोन काळात असतात. उरलेली भूतकालातील वाक्ये. भविष्यकाळ त्यामानाने अगदी नगण्यच वापरला जातो.

मग रिलेटेड शब्द जोडून वाक्ये तयार करणे.

ते वर कोणी लिहिले आहे तसे मिन्ग्लिश, हिन्ग्लिश, इ. चा उपयोग होणार नाही का ?
म्हणजे सरळ देवनागरीमधे शब्द, वाक्ये लिहून द्यायची.
उदा. आय अ‍ॅम स्टडिन्ग इन्ग्लिश लॅन्ग्वेज, इ.
वाक्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स बनवायचे आणि सांगायचे की या पॅटर्न मधे फक्त वेगवेगळे शब्द टाकून वापरत जा.
उदा. आय अ‍ॅम स्टडिन्ग हिस्टरी, इ.
जपानी शिकताना अगदी सुरूवातीला मी हा मार्ग वापरला होता स्वतःसाठी.

रूनी पॉटर यांच्या मताशी सहमत.
लिहिता वाचाता येत नसली तरी , लहान मुले बोली भाषा ऐकून ऐकुन आणि बोलून बोलून पाच वर्षांची होईतोवर बर्‍यापैकी शिकतात हे आपण अनुभवतोच.

अहो आमची मातृभाषा देखिल, आधी आम्ही बोलायला शिकतो, मग नन्तर लिहायला

>>
अहो ती २४ तास कानीकपाळी ऐकू येते म्हणून. जे ऐकू येते तेच बोलता येते. इंगलंडमधील अशिक्शीत माणसेही अस्खलित इंग्रजी बोलतात Proud

Happy

Pages