Submitted by शांतिनाथ वाघमोडे on 16 January, 2011 - 16:52
अन् जरासा हुंदका मी
आत आत दाबला,
खाक झाल्या कैक रात्री
आज डोळा लागला.
ना कुणीही चौकशीला
दार माझे शोधले,
हुंदके ऐकून माझे
ना कुणीही जागला.
जागताना एक कळले
जागणे नाही बरे,
ना तसाही झोपण्याला
अर्थ काही लाभला.
गीत माझे आज ओल्या
पापणीने गायले,
सूर तोही काळजाला
खोल खोल कापला.
गुलमोहर:
शेअर करा
विषण्णता, वैफल्य इ. भाव
विषण्णता, वैफल्य इ. भाव कवितेतून व्यवस्थित प्रकट झालेत.