कैक

जरासा हुंदका

Submitted by शांतिनाथ वाघमोडे on 16 January, 2011 - 16:52

अन् जरासा हुंदका मी
आत आत दाबला,
खाक झाल्या कैक रात्री
आज डोळा लागला.
ना कुणीही चौकशीला
दार माझे शोधले,
हुंदके ऐकून माझे
ना कुणीही जागला.
जागताना एक कळले
जागणे नाही बरे,
ना तसाही झोपण्याला
अर्थ काही लाभला.
गीत माझे आज ओल्या
पापणीने गायले,
सूर तोही काळजाला
खोल खोल कापला.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कैक