तोरणा ते राजगड भटकंती

Submitted by MallinathK on 12 January, 2011 - 02:46
ठिकाण/पत्ता: 
तोरणा ते राजगड भटकंती तारीख : २२-२३ जानेवारी, २०११ .

खुप दिवसापासुन या ट्रेक बद्दल नुसती चर्चा चालु आहे. गिरीविहारच्या पोस्ट वरुन (पुन्हा एकदा आणि) शेवटी २२-२३ तारीख फायनल केलंय. इछुकांनी नाव नोंदणी करा.

जमलेल्या टाळक्यांवरुन ट्रेकचा प्लॅन इथेच दिला जाईल.

टिप : अनुभवी लोकांनी मार्गदर्शन पर पोस्टी टाकाव्यात. Proud

मुंबईकर :

१] इंद्रधनुष्य
२] गिरीविहार
३] रोहित ..एक मावळा
४] विनय भिडे
५] बाजीराव

पुणेकर :

१] मल्लिनाथ

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, January 21, 2011 - 18:30 to रविवार, January 23, 2011 - 09:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वारगेट वरून वेल्हासाठी ६.१५ला पहिली आणि ७.३० दुसरी एस्टी आहे >>>>
स्वारगेट वरुन सकाळी स्वारगेट - घिसर अशी सकाळी ६.०० ला एस्टी आहे व ती वेल्हा मार्गे जाते. सकाळी हि एस्टी प्रथम रेल्वे स्टेशनला टपाल कलेक्ट करायला जाते व परत स्वारगेटला येउन घिसर वेल्ह्याकडे जाते. २२ ला विकांत असल्याने एस्टी बरोबर स्टेशनला गेलेले उत्तम...... आम्ही तसेच केले होते आणी परत स्वारगेटला आल्यावर राजगडला जाणार्‍यांची तुडुंब गर्दी बघुन बरोबर केले असेच वाटले :)......

शुक्रवारी रात्री राजगड चढून मग तोरण्याला जाणार असाल तर मी येईल...फक्त राजगडपर्यंत...तिथून उतरून पुन्हा पुण्याला वापीस जाईन...
असा काही प्लॅन आहे का

स्वारगेट वरुन सकाळी स्वारगेट - घिसर अशी सकाळी ६.०० ला एस्टी आहे>>>
आमच्या तोरणा ते रायगड ट्रेकची सुरूवात ज्या एसटीने झाली होती आणि आम्च्या सॅक्सकडे बघून ज्यातल्या कंडक्टरने "आयला पैसे देऊन वर जीवाला त्रास" अशी सार्थ comment केली होती ती हीच साडेसहाची एसटी. वेल्ह्याला ही साडेआठ-नऊपर्यंत जाते.

जिप्स्या काय झालं परत, जरा नावाला जाग की, नाव 'जिप्सी' पण एकाही भटकंतीला येत नाहीस....>>>गिरी, भटकंती चालुच आहे रे Happy आणि आमचा (ऑफिसचे मित्र) २२/२३ चा प्लान आधीच झाला होता. Sad

फक्त राजगडपर्यंत...तिथून उतरून पुन्हा पुण्याला वापीस जाईन...>>> आशु, आमचा प्लान वेगळा आहे, आम्ही तोरणा चढुन मग मागे राजगडला येणार आहोत.

माझं तळ्यात मळ्यात आहे. Sad मला शनिवारी सुट्टी मिळत नाहीये.रवीवारी सकाळी कुठे गाठता येणासारखा प्लॅन असेल तर मी तय्यार आहे.

सुक्या, रविवारी सकाळी आम्ही तोरण्यापासुन राजगडकडे चालण्यास सुरुवात करु, तु कुठे गाठ्णार आम्हाला... त्या पेक्षा बघ शनिवारी सुट्टी मिळते का ते?:-)

जिप्सी, कुठला प्लान आहे?

शिष्या बाजीरावा.... नाही रे जमणार मला... शनिवार आणि रविवार लेक्चर असतात रे... आणि अध्ये-मध्ये कुठे तुम्हाला गाठणंही शक्य नाही... तोरणा-राजगड अजूनही गरूडाच्या घरट्यासारखे दुर्गम आहेत... Happy

बाकी दगड कुठे आहे?? तो काय आयत्यावेळी येणार का??

मुंबईकरानु शुक्रवारी रातच्याला निघाव लागल...
तवा लाल डबा किंवा आगिनगाडीच्या पुण्याला जाण्याच्या वेळा काढाव्या लागतील ना..
अन शनिवारी जेवणाच्या सोईचे काय करायचे...???

नाही रे जमणार मला... शनिवार आणि रविवार लेक्चर असतात रे.>>>>> Sad
मला वाटतं गुरुंनादेखील लेक्चर बंग कसे याचे लेक्चर द्यायला हवेत.>>>> Wink

यो, Lol

तुम्हा सर्वांना ट्रेकसाठी शुभेच्छा!!!!! Happy

जिप्सी, कुठला प्लान आहे?>>>>गिरी अरे ऑफिसमधले आम्ही १०-१२ जण पुन्हा एकदा राजमाचीला चाललो आहे. बाईक ट्रेक Happy
आपण जिथे राहिलो होतो, त्यांच्याकडेच उतरणार आहोत. २२ ला सकाळी निघायचे आणि २३ ला संध्याकाळपर्यंत परतायचे असा दोन दिवसाचा प्लान आहे. Happy

जल्ला मी पुण्यातुन एकटाच येतोय... ?>>>> मल्ली जल्ला तु एकटा असलास तरी आम्ही तुझी साथ सोडणार नाही... तुम्हाला घेण्यासाठी महाराज स्वतः जातीने आपल्या २१व्या शतकातील रथासह उपस्थित राहतील....

तुम्ही तोरणा ते राजगड केलात का? मग कदाचीत मी भेटलो असेन... संजीवनी माचीला तुम्ही ताक पिलेत का (~१०:३० सकाळी)? आम्ही दोघेजण आलो होतो... नंतर खाली गुंजवणे लाही भेटलो (~३:००pm).... मी गुंजवणे दरवाज्यातून उतरलो खाली.

संजीवनी माचीला तुम्ही ताक पिलेत का (~१०:३० सकाळी)? >>> आम्ही ९.३० ला अळु दरवाजाने संजिवनी माची चढलो... ताकवाला आमच्या सोबतच होता. गुंजवणे ४ वाजता उतरलो... तू 'टोपीधारी यो'ला नाही का ओळखलेस?

सुवेळा हॉटेल मध्ये जेवलात का?
यो ला पाहील्याचे आठवत नाही... कदाचीत "त्या" नजरेने पाहीले नाही म्हणून असेल Happy
मला ईतक्या सकाळ सकाळ तोरण्यावरुन आल्याचे आश्च्रर्य वाटले होते....कोणीतरी म्हटल्याचे आठवते की वाटेतच झोपला होतात म्हणुन..

पद्मावती माचीवर झुणका भाकर खाल्ले...
वाटेतच झोपला होतात म्हणुन... >>> खरयं... लवकरच 'यो'चा रसरशीत वृत्तांत येईल... तेव्हा वाच काय काय Light 1 लावले ते Happy

अरेरे.. मला तोरणा ते राजगड ट्रेकमध्ये नोंदणी करायची राहुन गेली होती.. आता काय करु..>>>>>काढलेले सगळे फोटो आणि लिहिलेला सगळा वृतांत डिलीट कर Angry Wink

Pages