अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरिल लोकांचे स्नेहसंमेलन

Submitted by क्ष... on 22 December, 2010 - 16:27
ठिकाण/पत्ता: 
माझे घर - पत्ता नाव नोंदणी केलेल्यांना येत्या वीकेंडला पाथवणेत येईल.

महागुरुंच्या घरी गटग (१०-१०-१०) झाले तेव्हा जानेवारीमधे सर्व पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे संमेलन करावे असा बुट निघाला होता. बर्‍याच लोकांना मार्टिन ल्युथर किंग दिनाची सुट्टी असते म्हणुन मग त्या लंब सप्ताहांताला हा कार्यक्रमम ठेवावा असे लोकांनी सांगितल्यावरुन १५-१७ जानेवारी या तारखा निवडल्या आहेत.

पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे स्नेहसंमेलन असले तरी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण Happy

माहितीचा स्रोत: 
मायबोली
तारीख/वेळ: 
रविवार, January 16, 2011 - 14:30 to 21:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण येणार, काय आणणार आणि प्रत्येक घरातुन किती डोकी ते अपडेट करा म्हणजे बाकीची व्यवस्था करायला बरे. आमच्या पोळ्या सप्लायरबाईला ३-४ दिवस अगोदर सांगावे लागते.

प्रविणपा , थोडावेळासाठी यायला पण जमणार नाही का?

उशीरा उत्तर दिल्याबद्दल दिलगीर आहे.
मी आणि मुकुल बे एरिया मधे असू त्या विकेंडला.. आम्ही दोघे येऊ Happy
मी काहीतरी डिश करून आणीन...:)
आत्ताच काय कुक करणार ते सांगत नाही, कारण सगळंच १५ तारखेच्या Steelers- Ravens च्या NFL playoff गेम च्या निकालावर अवलंबून आहे ! Happy

आरती, काहीही आणले नाही तरी चालेल. मुकुलची पण भेट होईल यावेळी.

जान्हवी, रश्मी, मनाली, सशल - काय ठरतेय तुमचे?

सध्याचा काऊंट -
नंद्या (१)
महागुरू (२+१) - पोळ्यांचा बंदोबस्त
सुयोग (२+२) - सूप/सार
पेशवा (१) -
सायलीमी (२+२) - भाजी
राखी. (२+२) - बटाटेवडे
मीपुणेकर (२) - गोडाचे काहितरी
मिनोती (२) - आळू/पालकचे गरगटे, कोशिंबीर, भात.
आरती (२)
नंदन (१)

अजुन कोणी विसरले का?

एकूण १५ मोठे, ७ लहान.

केप्या तू नक्की कामाकरता आला आहेस का गटगंसाठी>>>> अर्थातच गटगसाठी. पण दोन गटगं मध्ये बराच काळ असल्याने तो कंटाळा येऊ नये म्हणून कामही करणारे. Wink

गटग ला येणारी मंडळी कुणाकडे सुनिता देशपांड्यांचं 'आहे मनोहर तरी' पुस्तक आहे का?
असेल तरं मला हवं होतं काही दिवस.

पॉटलकसाठी मी काय आणू? तयार डेझर्ट्स किंवा तत्सम काही आणू शकेन.
@मीपुणेकर - माझ्याकडे बहुतेक असावं 'आहे मनोहर तरी'. शोधून सांगतो.

नंदन, त्यापेक्षा चिप्स आणि सालसा किंवा तत्सम काहीतरी आण Happy गोडाचे मीपुणेकर आणते आहे आणि कदाचीत पेशवे पण आणतील.

आजचे गटग खुपच छान झाले. नंदन, नंद्या आणि 'पार्ल्यातील पुणेकर’ ह्यांच्या उपस्थितीने अजुन मजा आली. (योडाच्या दहशतीमुळे काही मायबोलीकर थोडे शांत असावेत)
उद्यापासुन बे एरीयावर सनसनाटी आकडे पहायला विसरु नका !

गटगची सर्व व्यवस्था केल्याबद्दल मिनोती आणि संजय यांना धन्यवाद !

अजुन एक .. मिनोतीच्या ब्लॉगची दखल सामनाच्या उत्सव पुरवणीने घेतली आहे. आवर्जुन भेट द्यावी अश्या निवडक ब्लॉग्सच्या यादीत पहिल्याक्रमांकावर तिच्या ब्लॉगचे नाव आहे.
http://www.saamana.com/2011/January/15/Link/FULORA9.HTM

खरचं, आजच्या जीटीजी ला प्रचंड धमाल आली Happy
१२ वाजल्यापासून अखंड गप्पा, हास्यकल्लोळ चालूच होता, आम्ही ७ वाजता निघालो पण तरीही मिनोती च्या घरी जीटीजी सुरुच होता Happy
मिनोती आणि संजय ने अगदी छान व्यवस्था केली होती.
जीटीजी ची ठळक क्षणचित्रे:
१> मिनोतीच्या बागेतलं योडा जीटीजी
२>ते संपत असतानाच अवतीर्ण झालेले 'पार्ल्यातील पुणेकर' आणि त्यांनी दिवसभर केलेली तुफान फटकेबाजी
३>सूप,बटाटेवडे, चिप्स साल्सा, कैरीची डाळ, तिळगूळ, मिक्स भाजी, चवळी उसळ, पोळ्या, भात, पालकाची पातळ भाजी, आंबा कुल्फी असे चवीष्ट जेवण.
४>पेशव्यांची अखंड चोफेर बॅटींग.
५>नंद्या यांची 'मदत समीती' दिवसभर कार्यरत

बाकी डीटेल वृ. पेशवे किंवा राखी लिहितीलच ( हि लापी समजा) Wink

काल एकूण ५ जीटीजी झाली -
१. योडा जीटीजी
२. स्पोर्ट्स जीटीजी
३. घरची बाग जीटीजी
४. आधून मधून संयुक्ता जीटीजी!!
५. मग आम्हासारख्या सामान्य लोकांचे असामान्य जीटीजी!!!

लोकहो, खरचच काल मज्जा आली. रात्री झोपताना लक्षात आले कधी नव्हे ते बोलताना तोंड दुखत होते :))

काल माझे गिनीपिग्स होऊनही (की म्हणूनच) बेकरी आज पेटली आहे ... Wink

अभिनंदन, मिनोती. गटग एकदम एन्जॉय केलं. सगळ्यांना प्रथमच भेटलो असलो, तरी तसं जाणवलं नाही गप्पा मारताना. (फक्त नंदन असा उल्लेख कानी आला की सुरुवातीला जरा गोंधळायला व्हायचं Proud ).

पॅट्स हरल्यामुळे अजून मजा आली. बाकी वरच्या गटगंच्या यादीत चहा-बिस्कीट गटगही अ‍ॅडवता येईल की Wink

Pages