येळकोट येळकोट जय मल्हार!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
37
जय मल्हार..! प्रसंगाची डिटेल
जय मल्हार..!
प्रसंगाची डिटेल दिली असती तर बरं वाट्लं असतं.
तळी भरतायेत का जागरण गोंधळाची
तळी भरतायेत का जागरण गोंधळाची दिवटी पूजा आहे?
तळी भरत असतील ते उभं राहून तळी भरत नाहीत. घोंगडीवर बसून भंडार्-खोबर्याची अन तांबं पितळांने मढवलेल्या देवाच्या समोर भरली जाते. कधी कधी 'वांगेसट' म्हणजे बाजरीची भाकरी , वांग्याची भाजी , वरण - भात आणि मेथीची भाजीचा नैवेद्य असतो. डोक्यावर टोपी किंवा रुमाल असावाच लागतो.
अन जागरण गोंधळाची पाचपावली असेल तर नवरदेव , जागरण गोंधळ कड्या-साखळी अन त्याच्या खांद्यावर घोंगडी लागतेच.
सदानंदाच्या नावानं चांगभरल, येळकोट येळकोट जय मल्हार, राज्या सर्ज्याच्या नावानं चांगभलं. !
सदानंदाच्या नावानं चांगभरल
सदानंदाच्या नावानं चांगभरल >>
मला वाटतं ते "सदानंदाचा विजय असो" असे आहे
म्हमईकर आहो ते सदानंदाचा
म्हमईकर आहो ते सदानंदाचा येळकोट असंच आहे. मल्हारी मार्तंड म्हणजे उभ्या महाराष्ट्राचं कुळदैवत. सोमवतीच्या पिवळ्या भंडाराचा तो उत्सव काही अजबच आहे. तिथे देवाची तलवार उचलायला सरसवणारे तरूण मल्ल, नव्या विवाहीत जोड्या , अन संबळ - तुनतुन्याचं रांगडं संगीत असा सोहळा कुठेच पहायला मिळणार नाही.
मी जाऊन आलो आहे जेजुरी ला,
मी जाऊन आलो आहे जेजुरी ला, खंडोबा हे आमचं कुळदैवत आहे.
सदानंदाच्या नावानं चांगभरल,
सदानंदाच्या नावानं चांगभरल, येळकोट येळकोट जय मल्हार, राज्या सर्ज्याच्या नावानं चांगभलं. !>> नादखुळा सगळं पाठ
श्यामली, पाठ असायला काय झालं.
श्यामली, पाठ असायला काय झालं. तरूण वयात बर्याच सोमवती अमावस्येला ( सोमवारी येणार्या ) मल्हारवारी व्हायची आमची. सोमवतीला देव कर्हेवर अंघोळीला जातात अशी अख्यायिका होती. त्यावेळेस देवाच्या दागिन्यांचा अन घुंगराचा आवाज येतो असं सुद्धा बोलायचे लोक. पूर्वी जेजूरी मल्हारगडाच्या आधी देव कडेपठारावर रहायचा असंही बोललं जातं.
गडाला नवूलाख पायरी.. आहो जेजूरी हो जेजूरी !
एवढच काय.. पण एक गम्मतीशीर गोष्ट म्हणजे.. यन्ना रासकला रजनीकांत सुद्धा मूळचा जेजूरीच्या परीसरातच जन्मलेला आहे.
हा फोटो चंपा षष्ठीची(वांगे
हा फोटो चंपा षष्ठीची(वांगे सट) तळी भरतानाचा आहे.
आधी घरात घोंगड्यावर बसूनच तळी भरतात मग घरा बाहेर जाऊन उभ्याने तळी भरतात. दोन्ही वेळेस भंडारा उधळतात. भरीत रोडग्याचा नैवद्य असतो त्या दिवशी.
५ जण हवेत म्हणून भावाने त्याचे मित्र गोळा करून आणले होते. त्यांच्याकडेही टोप्या नव्हत्या अन घरात माझ्याकडे पण.
फोटो टाकायचे प्रयोजन म्हणजे माझ दिड वर्षाचं पिल्लू पण मन लावून तळी भरत होतं.
धन्यवाद नलिनी. खरोखर पिल्लू
धन्यवाद नलिनी.
खरोखर पिल्लू मन लावून तळी भरतयं... !
होहो! आमच्या ऊर्जाने पण
होहो! आमच्या ऊर्जाने पण यावेळी तळी भरली.
तळी भंडारा केल्यावर खुप
तळी भंडारा केल्यावर खुप प्रसन्न वाटत. मी दोन वेळा केला आहे.
ह्या तळी भंडार्याची माहीती आली असती तर छान वाटल असत अजुन.
जय मल्हार
जय मल्हार
जागू तळी भंडार्याची माहीती
जागू तळी भंडार्याची माहीती एखादा गोंधळी कथेनुसार सांगू शकतो. जेजूरीला गेल्यावर देवाची कथा एकदा जरू ऐकावी. मल्हारवारी सार्थकी लागल्यासारखं वाटेल.
नादखुळा, काही दिवसापूर्वी
नादखुळा, काही दिवसापूर्वी घरी तळी भरण्याचा प्रसंग होता. त्यावेळी म्हणायची ललकारी काही पूर्ण आठवत नव्हती. माझा आस्तिक मुलगा ते काम करतो. याबाबत आमची मते विरोधी आहेत. लहानपणी गावाकडे ही ललकारी मला कधीही स्पष्टपणे ऐकू आलेली नाही. मात्र नगर भागात जी आहे त्यापेक्षा जेजुरी पुणे परिसरात वेगळी आहे. येळकोट हा शब्द आमच्याकडे नाही. तो मी प्रथम चित्रपटगीते अथवा रेडिओवरच्या गाण्यातच ऐकला. त्यादिवशी गावाकडे , अथवा गावातून माय्ग्रेट झालेले लोक याना फोन करून विचारले पण सम्पूर्ण कोणीही सांगू शकले नाही. नन्तर यू ट्यूबवर पाहिले त्यात काही तळ्या भरलेल्या होत्या पण त्या फारच शहरी स्टाईलच्या होत्या. एक ब्राम्हण कुटुम्बाचीही दिसली ते जरा आश्चर्यकारक वाटले. कारण खन्डोबा हा देव ब्राम्हण कुटुम्बात पुजला जात नाही शिवाय त्याला मांसाहारी नैवेद्य चालतो. साधारणतः ब्राम्हण कुटुम्बात 'सात्विक' देवतांची पूजा होते. असो.
मला असे ऐकू यायचे
सदानदाचा येळ गुडबे
चिन्तामण भैरोबाचे चांग भले,..
यापुढेही काहीतरी आहे.
मात्र तळी भरल्यानन्तर बाहेर जाऊन भन्डार उधळायचा असतो. याबाबत खुलासा व्हावा...
तळी भरणे म्हणजे काय, ओटी
तळी भरणे म्हणजे काय, ओटी भरण्यासारखेच का?
तळी भरणे म्हणजे काय, ओटी
तळी भरणे म्हणजे काय, ओटी भरण्यासारखेच का?
हा विनोद नाही असे समजून सांगतो, तो आरतीसारखा प्रकार असतो...
धन्यवाद. मी कधी देवाचे जागरण
धन्यवाद. मी कधी देवाचे जागरण किंवा एकदर पुजा पाठ प्रकार फारसे पाहीलेले नाहीत त्यामुळे याबद्दल कल्पना नव्हती.
एक ब्राम्हण कुटुम्बाचीही
एक ब्राम्हण कुटुम्बाचीही दिसली ते जरा आश्चर्यकारक वाटले. कारण खन्डोबा हा देव ब्राम्हण कुटुम्बात पुजला जात नाही >>>> असं नाहिये हो, ब-याच ब्राह्मणांच कुलदैवत असतो खंडोबा. फक्त मांसाहारी नैवेद्य केला जात नाही एवढाच फरक असतो. आमच्याकडे(माहेरी) तर खंडोबाचं नवरात्रसुद्धा असतं.
सदानंदाचा येळकोट!
सदानंदाचा येळकोट!
तळी भंडार आगडदुम नगारा
तळी भंडार
आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी
निळा घोडा पावमें तोडा
मस्तकी तुरा बेंबी हिरा
अंगावर शाल सदाही लाल
म्हाळसा सुंदरी आरती करी
देव ओवाळी नाना परी
खोबर्याचा कुटका भंडाराचा भडका
सदानंदाचा येळकोट
हरहर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदीचा उदो उदो
भैरोबाचं चांग भले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महराज की जय
येळकोट येळकोट जय मल्हार
येस नलिनी हे बरोबर
येस नलिनी हे बरोबर वाटतेय...
शांडिल्य भारी दिसतोय फोटोत...
माझ्या आतेसासूबाईकडे पण
माझ्या आतेसासूबाईकडे पण खंडोबाचे नवरात्र असते. ती मंडळी कर्हाडे आहेत. आमच्याकडे तळी भरतात पण नैवेद्य मांसाहारी नसतो मात्र कुलदेवीचा(एकविरा देवी) नैवेद्य मांसाहारी असतो.
रॉबीनहूड, धन्यवाद! बहुतेक
रॉबीनहूड, धन्यवाद!
बहुतेक धनगर लोकांचा नैवद्य मांसाहारी असावा, खंडोबा त्यांचं पण कुलदैवत आहे.
तसा 'भरीत रोडग्याचा' आणि 'भाजी भाकरीचा' नैवद्य खंडोबाला प्रिय.
वाघ्या अन मुरळी तुमच्याकडे पुरणपोळी असो वा पंच पकवान, तुमच्या घरी ते भाजी भाकरीच खाणार.(मी खूप ठीकाणी पाहिलय.)
खंडोबाची दुसरी बायको बानू
खंडोबाची दुसरी बायको बानू धनगर होती ना?
बाणाई ही बाणासूर कन्या. पण
बाणाई ही बाणासूर कन्या. पण जेव्हा ती मार्तंडाशी विवाह व्हावा म्हणून वनात तपाला बसली होती तेव्हा एका मेंढपाळानं तिच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतली होती, म्हणून तो तिचा धर्म पिता.
जेव्हा मल्हारी मार्तंड तिच्याशी लग्न करायचे कबुल करतात तेव्हा ती धनगर लोकांना सोबत घेण्याची विनंती करते, कारण त्यांनी तिच्यावर माया केलेली असते.
यळकोट यळकोट जय
यळकोट यळकोट जय मल्हार
सदानंदाचा विजय असो.
मस्त माहीती आहे , तळी
मस्त माहीती आहे ,
तळी भरल्यावर आंबील देतात ना ? माझ्य मते तळी भरल्यावर मांसाहारी नैवद्य कधीच नसतो.
नलीनलिनी,तू बरोबरच लिहिलं
नलीनलिनी,तू बरोबरच लिहिलं आहेस पण पुढचे अजून ४-५ ओळी असतात... याच प्रकारच्या.
छान फोटो आहे की !
छान फोटो आहे की !
सदानंदाच्या नावानं चांगभरल
सदानंदाच्या नावानं चांगभरल >>
मला वाटतं ते "सदानंदाचा विजय असो" असे आहे >>>
वरील वाक्य "सदानंदाचा येळकोट" , "येळकोट येळकोट जयमल्हार" असे म्हणतात..
येळ म्हणजे सात हा कन्नड शब्द आहे तर कोट म्हणजे कोटी
सात कोटी वेळा जयजयकार असा त्याचा अर्थ..
रजनीकांतचे मूळ गाव मावडी कडेपठार जेजुरी पासून १२ कि. मी. आहे.
Pages