येळकोट येळकोट जय मल्हार!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

येळकोट येळकोट जय मल्हार!
elkot [800x600].jpg

शब्दखुणा: 

ठकु,
वरील वाक्य "सदानंदाचा येळकोट" , "येळकोट येळकोट जयमल्हार" असे म्हणतात.. >>

मला असं वाटतं प्रत्येक भाविक आपल्या परीने तो / ती जे ऐकले असील त्याप्रमाणे उदघोष करतो, शेवटी "भक्तिभाव" महत्वाचा Happy

येळ म्हणजे सात हा कन्नड शब्द आहे तर कोट म्हणजे कोटी. >>>
ही छान माहिती दिली तुम्ही. Happy

हरहर महादेव........ चिंतामणी मोरया ............
आनंदीचा उदे उदे ......भैरोबाचा चांगभले .....
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ........
येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......
अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका .........भांडाराचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
येळकोट येळकोट जयमल्हार........

ज्योतिबाच्या नांवानं 'चांगभले' आणि सदानंदाचा येळकोट!! येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हटले जाते!

Pages