जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

Submitted by मी मुक्ता.. on 9 January, 2011 - 23:18

पहिलाच प्रयत्न आहे.. सांभाळून घ्या.. corrections and suggestions most welcome.. Happy
मुद्दाम गेल्या आठवड्यामधलं सोपं वाटलेलं वृत्त निवडलंय..
-----------------------------------------------------------------------------------

खोटे तुझे उमाळे, भुलण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...

माझे म्हणू असे मी, कोणी न राहिलेले
गणती फुका सुखाची, करण्यात अर्थ नाही...

झाले कुठे जरासे आसू स्वतंत्र माझे
झाले हसेच त्यांचे, रडण्यात अर्थ नाही..

सांभाळले जरी मी, विरलेच व्योम अंती,
आता तयात तारे, विणण्यात अर्थ नाही..

उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..

सांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे
खोट्या दिशा कि भाग्यच्?, पुसण्यात अर्थ नाही...

मृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने
आता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..

-----------------------------------------------------------------------------------
मूळ गझल इथे पहा..
http://merakuchhsaman.blogspot.com/

गुलमोहर: 

पहिला प्रयत्न लक्षात घेता... फार चांगली गझल मेकुसा.... Happy

सांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे
खोट्या दिशा कि भाग्य, पुसण्यात अर्थ नाही

इथे दुसर्‍या ओळीत वृत्त चुकले आहे.

खोट्या दिशा कि भाग्यच्?,पुसण्यात अर्थ नाही ............ असे केल्यास ठीक होईल.

पुलेशु. Happy

सहमत आहे, तसेच शेवटच्या शेरात 'देण्यात' हा काफियाही चुकलेला आहे.

मेरा कुछ सामान,

खूपच सुंदर गझल, पहिले चार शेर अधिक आवडले.

धन्यवाद !

-';बेफिकीर'!

धन्यवाद डॉक.. .. Happy आपल्या सुचनेनुसार बदल करते...

@बिफिकीर..
धन्यवाद... Happy
काफिया चुकलाय का खरच? मला वाटल की, "ण्यात" च्या आधी दीर्घ अक्षर पाहिजे, म्हणुन मी तस लिहिल.. ह्म्म्म... अजुन वाचाव लागेल गझलेविषयी...

http://merakuchhsaman.blogspot.com/

मेरा कुछ सामान,

दोन लघुंऐवजी एक गुरू चालतो ते मात्रपुर्तीसाठी! पण अलामत मेन्टेन करायला हवी!

धन्यवाद व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

पहिलाच प्रयत्न 'देण्यात'चा एक अपवाद वगळता technically जमलाय...

उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..
शेर आवडला... Happy
शुभेच्छा!

उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..>>> हा शेर मस्त!! अभिनंदन!

कळलं नाही.

.मृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने
आता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..

यातील 'देण्यात' विषयीच म्हटले होते.