पहिलाच प्रयत्न आहे.. सांभाळून घ्या.. corrections and suggestions most welcome..
मुद्दाम गेल्या आठवड्यामधलं सोपं वाटलेलं वृत्त निवडलंय..
-----------------------------------------------------------------------------------
खोटे तुझे उमाळे, भुलण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...
माझे म्हणू असे मी, कोणी न राहिलेले
गणती फुका सुखाची, करण्यात अर्थ नाही...
झाले कुठे जरासे आसू स्वतंत्र माझे
झाले हसेच त्यांचे, रडण्यात अर्थ नाही..
सांभाळले जरी मी, विरलेच व्योम अंती,
आता तयात तारे, विणण्यात अर्थ नाही..
उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..
सांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे
खोट्या दिशा कि भाग्यच्?, पुसण्यात अर्थ नाही...
मृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने
आता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..
-----------------------------------------------------------------------------------
मूळ गझल इथे पहा..
http://merakuchhsaman.blogspot.com/
पहिला प्रयत्न लक्षात घेता...
पहिला प्रयत्न लक्षात घेता... फार चांगली गझल मेकुसा....
सांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे
खोट्या दिशा कि भाग्य, पुसण्यात अर्थ नाही
इथे दुसर्या ओळीत वृत्त चुकले आहे.
खोट्या दिशा कि भाग्यच्?,पुसण्यात अर्थ नाही ............ असे केल्यास ठीक होईल.
पुलेशु.
सहमत आहे, तसेच शेवटच्या शेरात
सहमत आहे, तसेच शेवटच्या शेरात 'देण्यात' हा काफियाही चुकलेला आहे.
मेरा कुछ सामान,
खूपच सुंदर गझल, पहिले चार शेर अधिक आवडले.
धन्यवाद !
-';बेफिकीर'!
धन्यवाद डॉक.. .. आपल्या
धन्यवाद डॉक.. .. आपल्या सुचनेनुसार बदल करते...
@बिफिकीर..
धन्यवाद...
काफिया चुकलाय का खरच? मला वाटल की, "ण्यात" च्या आधी दीर्घ अक्षर पाहिजे, म्हणुन मी तस लिहिल.. ह्म्म्म... अजुन वाचाव लागेल गझलेविषयी...
http://merakuchhsaman.blogspot.com/
मेरा कुछ सामान, दोन लघुंऐवजी
मेरा कुछ सामान,
दोन लघुंऐवजी एक गुरू चालतो ते मात्रपुर्तीसाठी! पण अलामत मेन्टेन करायला हवी!
धन्यवाद व शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
सर्वच शेर दमदार आहेत. व्याकरण
सर्वच शेर दमदार आहेत.
व्याकरण तेवढे बघून घ्या.
पुलेशू.
@बेफिकीर... खूप आभार.. असे
@बेफिकीर...
खूप आभार.. असे बारकावे कोणीतरी सांगावेच लागतात.. वाचून नाही कळत...
http://merakuchhsaman.blogspot.com/
@गंगाधर मुटे, कळलं नाही...
@गंगाधर मुटे,
कळलं नाही...
http://merakuchhsaman.blogspot.com/
पहिलाच प्रयत्न 'देण्यात'चा एक
पहिलाच प्रयत्न 'देण्यात'चा एक अपवाद वगळता technically जमलाय...
उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..
शेर आवडला...
शुभेच्छा!
@आनंदयात्री, धन्यवाद..
@आनंदयात्री,
धन्यवाद..
http://merakuchhsaman.blogspot.com/
उरली न ती खुमारी,
उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..>>> हा शेर मस्त!! अभिनंदन!
@विजय दिनकर पाटील, आभार...
@विजय दिनकर पाटील,
आभार...
http://merakuchhsaman.blogspot.com/
कळलं नाही. .मृत्यू दिला
कळलं नाही.
.मृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने
आता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..
यातील 'देण्यात' विषयीच म्हटले होते.
wokay..
wokay..
http://merakuchhsaman.blogspot.com/