वाटले होते... !

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तुझे खोटे बहाणे लाघवी का भासले होते?
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते..

जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते

नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते

किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?

युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...

विषय: 
प्रकार: 

वा शैलू क्या बात है!!
>>जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते>> हे लय आवड्या. Happy

उत्तम गझल....

मतला अतिशय ओघवता आलेला आहे.

नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते

हा शेर अगदी भिडला....

पुलेशु. Happy

मस्त

छान Happy

सुरेख्च !
>>>नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होत<<< मस्त !
मला माहिती नव्हतं तू कविताही करतेस ते Happy मस्त आवडली !

धन्यवाद लोकहो. मनापासून आभार.
श्यामली, सगळं जे काय बरं वाइट ते इथेच लिहिते की. रंगीबेरंगीवर. Happy

अप्रतिम !
[ "गजाली" हा मालवणी शब्द " गझल"वरून आला असं माझ्या एका भाषापंडित मित्राचं म्हणणं खरं असावं असं आत्ता मला वाटतंय ! Wink ]

गझल, मतला हे काही कळत नाही..
पण जे काही लिहीलेस ते अ प्र ति म !! मस्तच Happy

जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते

नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते >>
हे खासच... Happy

जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते

किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?

मस्त.

भाऊकाका, मेधा, यो, कविता, मुटे तुमचे सार्‍यांचे धन्यवाद. Happy
>>"गजाली" हा मालवणी शब्द " गझल"वरून आला >> Happy

?

<<युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,>> शैलु.. ह्रुदस्पर्शी खुप छान लिवलस. Happy

Pages

Back to top