वाटले होते... !
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
33
तुझे खोटे बहाणे लाघवी का भासले होते?
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते..
जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...
विषय:
प्रकार:
शेअर करा
>>नको शोधूस शब्दांतून ओलावा
>>नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
सुंदर
आवडली.
संपूर्ण गझलच सुंदर जमलीये
संपूर्ण गझलच सुंदर जमलीये शैलजाताई.
दर्दी एकदम.
प्रेषितांच्या >> या अर्थ काय?
प्रेषितांच्या >> या अर्थ काय?
गझल खूप आवडली..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा शैलू क्या बात है!! >>जराही
वा शैलू क्या बात है!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते>> हे लय आवड्या.
अरे वा! लगेच प्रतिसाद आले?
अरे वा! लगेच प्रतिसाद आले? मस्त वाटलं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षिणा, प्रेषित = savior ह्या अर्थी.
सुरेख!
सुरेख!
छान!!
छान!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छाने नको शोधूस शब्दांतून
छाने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते>>>> !!!!!
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त गं
मस्त गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उत्तम गझल.... मतला अतिशय
उत्तम गझल....
मतला अतिशय ओघवता आलेला आहे.
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
हा शेर अगदी भिडला....
पुलेशु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
युगांच्या सोबतीचा अंत होतां,
युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...>>> आवडले..
मस्त
मस्त
मस्त गझल, मतला, झरे आणि मक्ता
मस्त गझल,
मतला, झरे आणि मक्ता फार आवडला
गुलमोहोरात न टाकता इकडे का बर?
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी शक्यतो कवितेच्या वाटेला
मी शक्यतो कवितेच्या वाटेला जात नाही कारण त्यातलं फारसं कळत नाही. पण ही आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख्च ! >>>नको शोधूस
सुरेख्च !
मस्त आवडली !
>>>नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होत<<< मस्त !
मला माहिती नव्हतं तू कविताही करतेस ते
धन्यवाद लोकहो. मनापासून
धन्यवाद लोकहो. मनापासून आभार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्यामली, सगळं जे काय बरं वाइट ते इथेच लिहिते की. रंगीबेरंगीवर.
अप्रतिम ! [ "गजाली" हा मालवणी
अप्रतिम !
]
[ "गजाली" हा मालवणी शब्द " गझल"वरून आला असं माझ्या एका भाषापंडित मित्राचं म्हणणं खरं असावं असं आत्ता मला वाटतंय !
मस्त ! युगांच्या सोबतीचा अंत
मस्त !
युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...
हे खास
गझल, मतला हे काही कळत
गझल, मतला हे काही कळत नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण जे काही लिहीलेस ते अ प्र ति म !! मस्तच
जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते >>
हे खासच...
मस्तच. खुप आवडली
मस्तच. खुप आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जराही वाव नाही राहिलेला
जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते
किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
मस्त.
भाऊकाका, मेधा, यो, कविता,
भाऊकाका, मेधा, यो, कविता, मुटे तुमचे सार्यांचे धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>"गजाली" हा मालवणी शब्द " गझल"वरून आला >>
शैलजा खूप खूप मस्त लिवलस.
शैलजा खूप खूप मस्त लिवलस. माका फार आवडली.
क्या बात है ! जियो...
क्या बात है ! जियो...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचून छान वाटलं. अजून लिहा.
वाचून छान वाटलं. अजून लिहा.
?
?
<<युगांच्या सोबतीचा अंत
<<युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,>> शैलु.. ह्रुदस्पर्शी खुप छान लिवलस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शैलजा.......मस्त
शैलजा.......मस्त ...........आवडली गजल!
Pages