Submitted by पुरंदरे शशांक on 6 January, 2011 - 00:00
वस्त्रातच स्वतःला पहातो जन्मापासून
"वस्त्र"च मी ओळख घेतली विना पारखून निरखून
किती तलम, किती सुंदर, वीण नाजुक किती छान
रंग कुठला का असो मला याचा खूप अभिमान
डोळ्यात तेल घालून वस्त्र ठेवी जपून
जरा कुठे उसवताच घेतो लगेच शिवून
आयुष्यभर वागवताना भार मुळीच होत नाही
लक्तरं-चिंध्या झाल्यावरही अभिमान सुटता सुटत नाही
वस्त्रच अखेर ते, कधीतरी विरणार...फाटणार...
विसरुन जाउन हे वास्तव मी रडणार, ओरडणार...
मोह पडतो या वस्त्राचा सोडता सोडवत नाही
अखेरीला थकून म्हणतो वस्त्र आता सोसवत नाही
पण तोपर्यंत उशीर खूप झालेला
वस्त्रविचारातच मी अगदी जखडलेला
नको नको म्हणतानाच वस्त्रात पुरा गुरफटलेला
महानिद्रेतही वस्त्र-स्वप्नात रमलेला ....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
... छान शशांक, शरीररूपी
... छान शशांक,
शरीररूपी वस्त्राचा मोह सुटणं कठीणच.
कारण त्याच वस्त्राच्या माध्यमातून आपण जीवन जगतो.
मोह पडतो या वस्त्राचा सोडता
मोह पडतो या वस्त्राचा सोडता सोडवत नाही
अखेरीला थकून म्हणतो वस्त्र आता सोसवत नाही
शशांक -मस्त आवडली.!!
छान. शशांक, बोरकरी समाधी लागु
छान. शशांक, बोरकरी समाधी लागु दे पुन्हा कधीतरी.
छान!
छान!
मनःपूर्वक धन्यवाद सर्व
मनःपूर्वक धन्यवाद सर्व रसिकहो.....
वेगळा विषय. वेगळी कविता.
वेगळा विषय. वेगळी कविता.
मुटेजींना
मुटेजींना अनुमोदन...
गदीमांच्या "कपड्यांसाठी करीशी नाटक तीन प्रवेशांचे" ह्याची आठवण झाली
मुटेजी, विजयजी, नमस्कार, असाच
मुटेजी, विजयजी,
नमस्कार, असाच प्रेमभाव असू द्या.
अगदी चदरिया झीनी रे झीनी ची
अगदी चदरिया झीनी रे झीनी ची आठवण झाली.
धन्यवाद शुमा
धन्यवाद शुमा