माझी आई आमच्या लहानपणी थंडीत हा पदार्थ हमखास करायची. निदान २-३ वेळा तरी व्हायचाच व्हायचा. हिवाळ्यातली निवांत अशी रविवारची गारेगार सकाळ.... स्वयंपाकघराच्या दारातून येणार्या कोवळ्या उन्हात किंवा त्या दाराबाहेरच असलेल्या पायर्यांवर आईबाबांबरोबर बसून बोटांनी हायहुय करत चाटून खालेल्ल्या गरमागरम ठुलीची आठवण तशीच गोडगोड राहिलेय. गेली कित्येक वर्षे मी ठुली केली नव्हती कारण माझ्याशिवाय तिला घरात कोणी वाली नाही. पण मागच्या महिन्यात महिन्याभराकरता म्हणून धाकटी बहिण अमेरीकेहून आली होती. त्या निमित्ताने आई-बाबाही इथेच होते. सो, मौका भी था और दस्तुर भी! लगेच ठुलीचा बेत आखला गेला. तिचीच कॄती माबोकरांबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून हा खटाटोप.
लागणारा वेळ :
३ दिवस (दचकू नका. ही ठरवून करण्याची गोष्ट आहे.)
लागणारे जिन्नस :
गहू, गूळ, दूध, तूप, जायफळ
लागणारी विशेष उपकरणी :
बारीक जाळीची मोठी गाळणी अथवा चाळणी, जाड बुडाचे भांडे
प्रमाण :
साधारण २ माणसांकरता एक वाटी गहू
गूळ चवीनुसार (किसून)
एक कप दूध
एक टेबलस्पून तूप
जायफळ पावडर
क्रमवार कॄती :
ठुली करण्याच्या तीन दिवस अगोदर गहू स्वच्छ धुऊन भिजत घालावेत. हे पाणी रोज बदलत जावे म्हणजे गहू फर्मेंट होणार नाहीत. रविवारी ठुली करायची तर गुरूवारी सकाळी भिजत घालावेत.
तिसर्या दिवशी रात्री ते पाणी काढून टाकून ताज्या पाण्यात मिक्सरवर अगदी बारीक वाटावेत. पाणी जितके लागेल तितके घालावे. नंतर हे पाणी काढूनच टाकायचे असते. वाटलेले मिक्श्चर बारीक जाळीच्या मोठ्या गाळणीतून/चाळणीतून गाळून घ्यावे. खाली येते ते गव्हाचे सत्त्व. हाताने पिळून वरचा चोथा पुन्हा मिक्सरमधून काढावा कारण यात बरंच सत्त्व राहिलेलं असतं. पुन्हा गाळावे. असे तीन-चार वेळा करावे लागते. शेवटी हाताला अगदी भुसा लागायला लागतो. तो टाकून द्यावा.
खाली उरलेले सत्त्व+पाणी भांड्यात रात्रभर झाकून ठेऊन द्यावे. सकाळी हलक्या हाताने झाकण उचलून वरचे पाणी काढून टाकावे. खालचा साका म्हणजे गव्हाचे सत्त्व हा आपल्या ठुलीचा बेस. त्यात दूध, गूळ, जायफळ घालून एकजीव करावे. जाड बुडाच्या भांड्याला तुपाचा सढळ हात लावून त्यात हे मिश्रण घालावे आणि गॅसवर ठेवावे. सतत ढवळत रहावे. सुरवातीला गॅस मध्यम ठेवला तरी चालेल पण जरा हे मिश्रण जड वाटायला लागले की लगेच गॅस बारीक करावा. लगेचच ठुली घट्ट व्हायला सुरवात होते. सगळा द्रवपदार्थ घट्ट झालेला पाहताच, भांड्याखाली तवा ठेऊन आणि वर झाकण ठेऊन, त्यावर वजन ठेऊन एक वाफ आणावी. एक-दोन मिनिटे पुरतात. पण लक्ष ठेऊन असावे, पटकन खालून करपण्याची शक्यता असते. खुप छान हलका सोनेरी रंग येतो.
ठुलीची कन्सिस्टन्सी साधारण घट्ट जेली सारखी असते - थुलथुलीत .... म्हणून ठुली. ही गरमागरम ठुली काचेच्या बशीत घालावी आणि चमच्याचे वगैरे सोपस्कार न ठेवता डायरेक्ट बोटांनी बाजूबाजूनी चाटून खावी.
अधिक टिपा:
१. हेच सत्त्व अशाच प्रकारे काढून त्यात मीठ घालून शिजवून कुरडया करतात.
२. एकावेळी जास्त करून दूध, गूळ, जायफळ मिसळून तयार बॅटर फ्रीजमध्ये ठेवता येते. ८-१० दिवस तरी काही होत नाही. (त्यापेक्षा जास्त ठेवण्याची वेळ येत नाही कारण तोवर पुन्हा आपल्याला ठुली खाण्याची हुक्की येतेच. विशेष म्हणजे तयार पीठ आहे म्हणून...)
माहितीचा स्त्रोत :
आई. आईचा माहितीचा स्त्रोत तिची आई .... हे असे बरेच पिढ्या मागे जाण्याचा संभव आहे. आई सांगते त्यानुसार त्यांच्याकडे थंडीत दर रविवारी ठुली होत असे. म्हणजे आजी तर पाट्यावर भिजलेले गहू वाटत असे. ते सुध्दा ८ जणांच्या कुटुंबाकरता.
http://vadanikavalgheta.blogs
http://vadanikavalgheta.blogspot.com/2010/03/celebrating-three-years-of-... >>
गव्हाचा चिक कसा करायचा आणि त्याचा व्हिडीओ
गोडाच्या चिकाच्या वड्या कराय्ची मम्मी पूर्वी. तो बदामहलवा असतो ना तशी लागते ती वडी. वेफर्स करताना ते गार पाण्यात टाकतात. त्याचे पण स्टार्च खाली साठते. त्यापासून पण असाच गोडाचा प्रकार करायची मम्मी पूर्वी.
हा चिक फॅन खाली आणि १ दिवस
हा चिक फॅन खाली आणि १ दिवस उन्हात वाळवुन रेफ्रिजेरेट करता येतो. मी मुलासाठी करते. ६-८ महिने पण टिकतो. (अर्थात जर जास्त वापरला नाहि तर). प्रवासात न्यायला चांगला. Air-tight डब्यात गरम भरुन नेला तर २-३ तासांनि मुलांना भरवायला तयार. पण तुप सढळ हस्ते टाकावे लागते.
आजच सकाळी मोनालीपी च्या
आजच सकाळी मोनालीपी च्या गव्हाच्या सत्त्वाची ठुली केली. छान झाली. अगदी वरच्या पध्दतीनं केलेल्या ठुलीची चव नाही वाटली मला. पण जर पहिल्यांदाच खात असतील तर नक्कीच आवडेल.
रेडीमेड गहु सत्त्वानं केल्यामुळे भलतीच सोपी झाली की.
मामी, किती दुधात किती सत्त्व
मामी, किती दुधात किती सत्त्व घातलंस?
मंजू, अंदाजे. तरी साधारण
मंजू, अंदाजे. तरी साधारण जितकं सत्त्व घेऊ त्याच्या दुप्पटीपेक्षा थोडं अधिक बास होईल.
मामी काल खाल्ली नाष्ट्याला
मामी काल खाल्ली नाष्ट्याला ठुली. अहाहा, खुपच छान पदार्थाची ओळ्ख करुन दिलीस.
"ठुली" असे सर्च केल्यावर सापदत नाहीये
अहाहा .... मस्त लागते थुली/
अहाहा .... मस्त लागते थुली/ ठुली. आई करते कधी कधी.
वर्षा, धन्यवाद. "ठुली" असे
वर्षा, धन्यवाद.
"ठुली" असे सर्च केल्यावर सापदत नाहीये >>>> पाकृ सार्वजनिक नव्हती म्हणून असेल कदाचित. आता केलीये.
Aamachi aai karayachi
Aamachi aai karayachi nachanichi thuli. Nachani patyavar vatun gheun karayachi. Mastach lagayachi.
आमच्याकडे या पदार्थाला
आमच्याकडे या पदार्थाला 'सत्तू' म्हणतात. गव्हाचे, तांदळाचे, नाचणीचे करतात. फक्त हे मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या ताटावर थापून वड्या पाडल्या जातात.
अरेच्चा खरंच की. अजूनही
अरेच्चा खरंच की. अजूनही शोध मध्ये येत नाहीये हा धागा. का बरं?
ठुली सर्च केल्यास येत नाही पण
ठुली सर्च केल्यास येत नाही पण नुसते गव्हाचे सत्त्व असे सर्च केल्यास फक्त हीच रेसिपी दिसतेय
. रेसिपीचे नांव गव्हाचे सत्त्व ( ठुली ) असं करून बघ. ठुली स्वतंत्र शब्द असला तर बहुतेक सर्चमध्ये येईल.
संपदा काही उपयोग नाही. मलाही
संपदा काही उपयोग नाही. मलाही तसं वाटलं म्हणून मी शीर्षक बदललंय पण....
'गव्हाचे सत्त्व' आणि 'ठुली'
'गव्हाचे सत्त्व' आणि 'ठुली' दोन्ही प्रकारे सर्चमध्ये येते आहे पाकृ..
मंजूडी, हो की गं. आता येतेय.
मंजूडी, हो की गं. आता येतेय. आधी नव्हती येत.
मामी तुमचा पदार्थ छानच आहे.
मामी तुमचा पदार्थ छानच आहे. अन माला तुमचे लिहीणे पण आवडले.त्या आठवणी किती छान असतातना? अगदि तुम्ही म्हणालात तशा कोवळया उना सारख्या.
Pages