गव्हाचे सत्त्व - ठुली
Submitted by मामी on 30 December, 2010 - 12:32
माझी आई आमच्या लहानपणी थंडीत हा पदार्थ हमखास करायची. निदान २-३ वेळा तरी व्हायचाच व्हायचा. हिवाळ्यातली निवांत अशी रविवारची गारेगार सकाळ.... स्वयंपाकघराच्या दारातून येणार्या कोवळ्या उन्हात किंवा त्या दाराबाहेरच असलेल्या पायर्यांवर आईबाबांबरोबर बसून बोटांनी हायहुय करत चाटून खालेल्ल्या गरमागरम ठुलीची आठवण तशीच गोडगोड राहिलेय. गेली कित्येक वर्षे मी ठुली केली नव्हती कारण माझ्याशिवाय तिला घरात कोणी वाली नाही. पण मागच्या महिन्यात महिन्याभराकरता म्हणून धाकटी बहिण अमेरीकेहून आली होती. त्या निमित्ताने आई-बाबाही इथेच होते. सो, मौका भी था और दस्तुर भी! लगेच ठुलीचा बेत आखला गेला.
विषय: