मायबोली बाईक ट्रेक

Submitted by विनय भिडे on 5 January, 2011 - 03:45
ठिकाण/पत्ता: 
दापोली

५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अ‍ॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..

मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
४ ) गिरीविहार
५ ) तोषा

पुणे :- बाईक १ ) मल्ली
२ ) सुकी
३ ) सुकी अजुन एक
४ )सम्या

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 4, 2011 - 18:00 to Monday, February 7, 2011 - 08:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विन्या बाईकचा प्रोब्लेम नाही.... फक्त मला तुमच्यासारखी वेगात चालवता येणार नाही...
माझ्याकडे कावासाकी-बजाज वारा १२५ आहे.... चालेल का?

गिरी, हुडीबाबा म्हणत चालवायची मग पळते आपोआप.
त्याच्यावर गिरी बसला की "चलती तो नै.. उडीबाबा उडीबाबा बोलरेला है" म्हणावं लागेल. Proud

सगळे नकाशेच नकाशे दिसताय्त..
पर्‍या म्हणतो ते बरोबर वाटत मलाहि, दिवसाउजेडी प्रवास करावा हायवेवरून..
माझी पण आहे रे बाईक विन्या.

आपण पाण्यातून बाईक चालवायच्यात?
पुढचा प्रवास बाईकला खांद्यावर घेउन कर्नारेस की बाईक (क वाचा) तुझ्यावर बसुन.... ?

आता बाकिच्या सोंगांचं काय?
ते सविस्तर टाकेन नंतर, पण आधी तारखांचं काय ? Uhoh खुप जणांना ७ जमत नाही, २ दिवसात उरकता येईल असं पाहावं लागेल.

ज्यांना ७ जमत नसेल ते परत जातील हाकानाका ?
हे बरोबर नै.. Angry
(दुसरा मुद्दा म्हंजे, त्यांच्या मागच्या पॅसेंजर्ला आहे तिथुन आहे तसं बळं बळं परतावं लागेल मग... Proud )

इन्द्र्या मेल्या तु तर येत नाहियेस नी निषेध कसला नोंदवतोस ?
मला ७ ला आक्षीला जाण मस्ट आहे रे...:अरेरे: मी एकटा जाईन त्यात काय ?

मायबोली ट्रेकर्स फारच उत्साहात दिसतायेत. मायबोलीकरांच्या ह्या कोकणसफरील्या ह्या खुळ्याच्या शुभेच्छा. केळशीला भेटण्याचा प्रयत्न करतो. सेकंड इनिंगच्या मुड मधे असेल मी तेव्हा भेटल्यावर राडा घालणे टाळा. Proud

लोक्स रात्री प्रवास करण्याचे टाळा शक्यतो. हायवेवर आणि कोकणातल्या रस्त्यांवरही....फारच वाईट अनुभव...
बाकी बाईक जास्त आणि माणसे कमी हा चांगला रेशो आहे. देव न करो पण काही अडचण आली तर हाताशी चांगली बाईक असणे कधीपण बेस्ट.

विनयजी,
यायची इच्छा आहे,पण ५ ,६ ,७ ला रजा काढुन याव लागणार, एक दिवस कमी करता येईल का ?

आशु,
माझ्या सीडी१०० ला हा प्रवास पेलेल का ?
ताशी ७० वर जाण्यास बंदी आहे म्हणून !
Happy

Pages