एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाग्रुंनी सुपुंच्या लावणीवर काही बोलण म्हणजे रणवीर कपुरने अमिताभला अ‍ॅक्टींगचे धडे देण्यासारख आहे. Lol
सचिन रेडकर लै भारी विंग्रजी बोलतो मधेच कुठुन तरी अन्नु मलिकचे शेर गालिबच्या नावावर खपवतो.

स्वतःचीच लाल कायम ...>>>>>>>>>>>>> आमच्या कडे माझा नवरा आणि सासरे हे वाक्य नेहमी म्हणतात महाग्रुच्या बाबत...... मी टाईपल नव्हत इतकच...........

पुष्कर श्रोत्री बोलतो तेव्हा नुकतीच तळून टमटमीत फुगलेली पुरी कढईबाहेर काढल्या काढल्या बोट लावून फोडली तर कसे वाटेल तसे वाटते. फॉफ फॉफ फॉफ फॉफ!!!!

हा कार्यक्रम मी चोरून पाहतो एका अप्सरेसाठी...
तिचं नाव आहे... Blush

तिचं नाव आहे...!!
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,,
,
,
,
,
,
,
,
,
,
,,
,
,
,
,
,
,
,,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,,
मयूर वैद्य ...................!!!
इश्श Blush

इथे त्या मयूर वैद्यचं नाव इतक्या वेळा वाचून उत्सुकता चाळवली गेली आणि शेवटी बघितलं काय प्रकर्णं आहे ते..
अशक्य आहे!
पण या मनुष्यविशेषाचा नृत्याविष्कार बघायचा योग माझ्या नशिबी होता. म्हणजे प्रत्यक्ष नाही हां, टीव्हीवरच. बरा वाटला होता तेव्हा. पण तेव्हाही एक भा.प्र. होताच, की कथ्थक करणार्‍या पुरुषाने स्त्रीसारखं लाडेलाडे बोललंच पहिजे का...किंवा नॉर्मल पुरुषासारखं बोलता येत नाही का मग?

सुदैवाने सवाईमधे अनुज मिश्रांचा कार्यक्रम बघता आला म्हणून बरं!

पण बाहेर एकूणच कोणी म्हाग्रुन्ना विचारत नाही असं दिसतंय...म्हणूनच इतक्या गॅप नंतरही (माझ्या माहितीप्रमाणे) पुन्हा एकदा हा खेळ मांडावासा वाटला त्यांना!

या बया, मी उद्याची उत्कंठतेणे वाटुली बघत आहे ... हे असे प्रचंड मनोहारी प्रक्रण आतापर्यंत न बघण्याचे घोर पातक माझ्या हातून झाले आहे, त्याबद्दल म्हाग्रू - सचिन पिळ'घाल'कर - यांचे सगळे डायलॉक मी दोन्दोन्दा बघणार म्हणते.... त्यांचा तो बोटॉक्स घेऊन घेऊन सदासर्वदा आश्चर्यचकीत दिसणारा मुखडा आणि त्या मुखातून पाझरणारी ती फेफरं आणणारी भाषणं मला उद्या ऐकायला मिळ्णार!!!!!!!

परवाचा एपिसोड पुन्हा पाहिला तो/ती मयुर वैद्य दोघींच्या मध्ये बसला/ली होता/ती.
त्यावर पुष्कर रावांनी विचारले तू मध्ये बसला अहेस कसं वाटतंय तुला? फुलवा म्हणाली तो मुलगा अहे ना म्हणून आज मध्ये बसलाय ...आम्ही रोटेशन ठेवणार आहोत मध्ये बसण्याचं त्यावर म.वै. म्हणाला/ली हो या दोघी एकमेकांत रोटेत होतील ...म्हणजे याला आपली "मधली" जागा किती प्रिय आहे ते पहा .....

अरे अरे!!! हे काय... इतकं काय त्या मयूर वैद्यला टारगेट बनवून हसताय??? हसण्यासाठी दुसरी एखादी निर्भेळ गोष्ट सापडली नाही का तुम्हाला? निसर्गाने त्याला 'तसं' बनवलंय, त्यात त्याचा काय दोष??? चुकून त्याच्या वाचनात ही वरची चर्चा आली तर त्याला किती वाईट वाटेल, याचा विचार केलाय का कुणी? दुसर्‍यांच्या शारिरिक व्यंगावर हसणारे तुम्ही सगळे मानसिक आजारी आहात!!!!

निसर्गाने त्याला 'तसं' बनवलंय

मला नाही वाटत. तो तसा झालाय..
टीव्हीवर दिसनारे स्त्रियांचे केशरचनाकार ( चांगलं नाव कमवलेले ), नृत्यदिग्दर्शक हे नेहमी असेच असतात. ते शारीरीक व्यंग म्हणून असावेत असं नाही वाटत. स्त्रियांच्यातच राहील्याने त्या लकबी आत्मसात केल्याने चारचौघात हसं होतं इतकंच. कुणाच्या व्यंगावर हसण्याइतका क्रूरपणा इथल्या सदस्यात आहे असं वाटत नाही.

लांडग्यांच्या कळपात राहील्याने त्यांच्याच सारखा झालेल्या एका मुलाची गोष्ट आठवली सहजच..

( हे देवा !! काय गोष्ट पण आठवली.. आता खातोय मार Wink )

Light 1 घ्या

कालचा एपिसोड जेवण करताकरता बघितला. (ब्रेकमधे माझी बरीच काम होतात) नेहमीप्रमाणे इकडुन तिकडुन ढापुन चावुन चोथा झालेली मेंटॉर्सचा कॉन्सेप्ट रेडकरांनी सरप्राईज म्हणुन गळ्यात मारला.
एकंदरीत कालचा आढावा -

नेहा पेंडसे - काशी - आयड्याची कल्पना मधल्या लावणीवर विकतचे हावभाव घेवुन नाचली तेव्हा महागुरुंना व्हायब्रंट पणा कमी का असावा असे वाटले कुणास ठाऊक?? मला तरी ती कुठेही अती अंगावर आल्यासारखी वाटली नाही. Lol

सुपुबै - सुरेखा पुणेकर - निगाहें मिलानेको जी चाहता है - अहाहा - यांना लावणी सोडुन काहीतरी करता येत हेच बघायच होत आणि त्यांनी ते साध्यही करुन दाखवल. पण तोंड उघडल की परत एकदा तमाशाप्रधान चित्रपट बघतोय असच वाटल.

नेहा जोशी - ना जाने कहासे आई है - श्रीदेवीला कॉप्लेक्स आला असेल Proud (अ‍ॅटलिस्ट त्या मयुर वैद्यला श्रीदेवी खुsssssssssssप आवडते या वाक्याने तर नक्कीच)

स्मिता तांबे - ही काय नाचली यापेक्षा सचिन तिला आज स्मिता तांबे नाही अप्सराच नाचली म्हणाला तेव्हा खुप एंटर्टेनमेंट झाली.

एकंदरीत ओके झाला एपिसोड ते महाग्रुंचे शेर आणि पुष्करचा तोचतोच चोंबडेपणा सोडला तर

फारच सुमार दर्जा वाटला काल सगळ्याच डान्सेस चा, कोरिओग्राफीही सामान्य आणि त्या सो कॉल्ड अप्सरा(!) अति सामान्य !
सगळ्यांचे कॉस्च्युम्स अत्यंत लो बजेट !
त्या सुरेखाबाई पण नाही आवडल्या, लावणीच करतायेत असं वाटत होतं, मुजर्‍याची नजाकत मुळीच दिसली नाही !
बाप रे, कोण ती भयानक बाई होती ' रस्तेमे वो खडा था' वर नाचणारी (?)
नुसते डोळे वेड्या सारखे वटारणे म्हणजे श्रीदेवी सारखं अ‍ॅक्टिंग करणे वाटत होतं बहुदा तिला आणि त्या जजेस ना !
असो, बिचार्‍या श्रीदेवीच्या च्या डान्सेस च्या वाटेला कोणी न जावो अशी प्रार्थना !!

दिपांजलीला अनुमोदन. काल पहिल्यांदाच एकापेक्षा एक हा कार्यक्रम पाहिला. सर्वांचे नाच अतिसंथ वाटले. सुरेखा पुणेकर आणि पुष्कर यांच्यातला संवाद म्हणजे कहरच होता. परत हा कार्यक्रम पाहणार नाही.

मलाही पुणेकरबाई काय भारी वगैरे वाटल्या नाहीत. पण लावणी सोडून इतर काही करत आहेत, ते स्वागतार्ह. त्यांना स्वतःला त्या बाजातून बाहेर पडायचं असं म्हणतात, तर ते पुष्करबरोबरचे चीप संवाद कशासाठी? Uhoh

बाकी नाचही ठीकठीकच. डीजे तुला ती नेहा जोशी अजिबात आवडत नाही ना? Proud पण पहिल्या आठवड्यातला तिचा नाच 'ना मानोगो तो..'वर छान झाला होता.. विशेषतः शेवट सुरेख केला होता तिने.

सर्वांना अनुमोदन, तो वैद्य तर जाम डोक्यात जातो..... त्यात तो पुष्कर म्हणजे कहरचा कहर.....

दोन-तीन मोजक्याच सो कॉल्ड अप्सरांचा डान्स बरा वाटतो पहायला....

आणि <<<<<सुरेखा पुणेकर आणि पुष्कर यांच्यातला संवाद म्हणजे कहरच होता.>>>>>> खुप खुप अनुमोदन
सुरेखा पुणेकर नेहमी लावणीच्याच विश्वात असतात वाट्त, त्यामुळेच कदाचित असे संवाद होत असतात पण हा लावण्यांचा कार्यक्रम नाही एक डान्स शो आहे कोणीतरी समजवा रे (सुरेखा पुणेकरांच्या चाहत्यांनी माफ करा मला आणि त्यांना पण)

हा कार्यक्रम पाहताना आठवलं की एक-दोन वर्षांपूर्वी ई टिव्हीवर एक प्रोग्राम लागायचा 'हल्ला बोल' म्हणून. त्याची संकल्पना अशीच होती. जजेस म्हणून सोनाली कुलकर्णी (दोघी फेम) आणि म. वै. सारखाच कोणितरी येत असे. त्यात मराट्।ई सिरियल-चित्रपटातल्या तारका होत्या (नावे आणि चेहरे आठवत नाहित). मला वाटते एक भयानक अशी दिसणारी अभिनेत्रि (मला वाटते ती चार दिवस सासूचे मध्ये येते) त्यात जिंकली होती.

काल पहिल्यांदाच पाहिला अप्सरा कार्यक्रम. भयानक. महागुरु आणि पुष्करचे बोलणे सहन करावे लागते Sad
फुलवाची बोलायची पद्धत आवडली. पुणेकरांचे नृत्य पहायला मिळाले नाही, पण स्मिता तांबेचे पाहिले. ती अप्सरेसारखी नाचते???? आणि कोणाचे नाच पाहिले का ते आठवत नाहीये.. Sad

किती भयानक कार्यक्रम.. Sad मृण्मयीचे नृत्य पहायचे आहे. ते कधी असणार? झलक मधे गिरिजा ओक, पिवळ्या रंगाच्या कपड्यांत नृत्य (?) करताना पाहून येल्लो येल्लो, डर्टी फेल्लो असे जोरात ओरडावेसे वाटले! जराही नजाकत नाही नाचण्यामध्ये.. IMO.

ई-टीव्हीवरच्या कार्यक्रमात युजे... म्हणजेच उमेश जाधव नावाचा महान प्राणी होता. आणि महेश 'डॅम इट' कोठारे पण होते... त्यांनीच प्रोड्युस केला होता कार्यक्रम... एका पेक्षा एका ला टक्कर म्हणून... पण लईच टुकार झाला होता....

त्या महाग्रुंना कोणीतरी खास पेशल शालजोडीतलेच हाणले पाहिजेत.. त्याशिवाय धड बोलताच येणार नाही त्यांना..

गुब्बे,

नेहा जोशी - ना जाने कहासे आई है - >>>
या गाण्यावर नाही काही नाचली नेहा जोशी. "रस्ते मे वो खडा था...." यावर श्रीदेवीची भ्रष्ट नक्कल करत नाचली ती बया. मुळात या गाण्यावर उठून दिसेल असा काय परफॉर्मन्स देणार.

मला एक भा.प्र. आहे. या प्रकारच्या डान्स शोज् मध्ये कुणी कुठल्या गाण्यावर डान्सायचं ते कोण ठरवतात?? महाग्रू, त्या डान्सर्स स्वतःच की कोरीओग्राफर्स??? Uhoh

सुरेखा पुणेकरांचे वय आता दिसून येते. मुजरा प्रकारातही लावणी म्हटल्यासारखी जबड्याची हालचाल बघवली नाही. पुष्कर बरोबर चे त्यांचे चीप संवाद उबग आणतात.

नेहा पेंडसेचा आयडीयाची कल्पना मधल्या "अवं, बघंल कुणीतरी आम्ही नाई जा!" या लावणीवरचा नाच त्यातल्या त्यात आवडला. पण ती लावणी गाणारी भसाड्या आवाजाची गायिका कोण आहे??? भाग्यलक्ष्मीच्या शीर्षक गीताची गायिकाच की काय?? Uhoh

नेहमीप्रमाणे इकडुन तिकडुन ढापुन चावुन चोथा झालेली मेंटॉर्सचा कॉन्सेप्ट रेडकरांनी सरप्राईज म्हणुन गळ्यात मारला. >>> अनुमोदन. आणि हे लोक काय पब्लिकला उल्ली समजतात की काय??? मला तर वाटतंय की आधीच सगळं सेटिंग झालेलं आहे की कुणा कोरीओग्राफरला कोणती अप्सरा मिळणार. आपल्यासमोर उगीचच चिठ्ठीचं नाटक! समजा ३ पेक्षा जास्त अप्सरांनी एकाच मेंटॉरची चिठ्ठी काढली तर!!! याचा काहीच खुलासा केला नाही कालच्या घोषणेत!

Pages

Back to top