केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी रोज शाम्पू करते कारण रात्री झोपायला जाण्या आधी सुळसुळीत असणारे केस सकाळी मात्र एकदम कोरडे वाटतात.

माझेही सेम असेच होते. बहुतेक झोपेत मी लोळते Happy

लहान मुलांसाठी Johnson shampoo वा तेल पण वापरू नये,त्याने त्वचा अजुन कोरडी होते >> असे एका केस कापणारिने मला सांगितले होते, कारण माझ्या मुलीच्या फक्त टाळुवर खुप कोंडा असायचा. तेव्हा मी ताबडतोप तो शांपु बंद केला व दुसरा सुरु केला. जादु झाल्यासारखा कोंडा थांबला. सध्या होल्फुड्स मधला organic shampoo वापरते. भारतात ब्राह्मी-आवळा तेल मिळते ते मस्त आहे.

मैत्रिणींनो, भारतात कोणते mild shampoo मिळतात? ते डव्ह भयंकर प्रकार आहे. फार रसायने असतात त्यात.

धन्यवाद आशुडी,
करुन बघते तु सान्गीतलेले उपाय.

मी रोज शाम्पू करायला लागले कारण शाम्पू नाही केले तर केस एकदम frizzy दिसतात Happy

३-४ वर्षांच्या मुलीच्या डोक्यात ऊवा न होण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? शाळेतून निरोप आहे की काळजी घ्या, एका मुलीच्या डोक्यात झाल्या आहेत म्हणे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी हवाय उपाय. काही घरी करता येण्यासारखा आहे का?

डोक्याला डोके भिडे जेथे उवांना साम्राज्य मिळे तेथे Wink

थोडे दिवस मैत्रिणींच्या गळ्यात गळे घालू नकोस असं सांगा मुलीला Happy

Happy
धन्यवाद सिंडरेला.

हा उपाय तर त्या टीचरनी आणि मैत्रिणीनेही सांगितलाय, पण शाळेत सांगितलंय की preventive म्हणून काहीतरी उपाय करा. Lysil चा शांपू वगैरे....पण डायरेक्ट शांपू च्या ऐवजी काही घरच्या घरी जमेल असं आहे का?

प्रज्ञा साध्या तेलात कापुर घालुन ठेव. त्याचा छान वासही येतो. कापराने म्हणे उवा निघुन जातात. (हि ऐकीव माहीती आहे)

साध्या तेलात कापुर घालुन ठेव. त्याचा छान वासही येतो. कापराने म्हणे उवा निघुन जातात. (हि ऐकीव माहीती आहे) >>
मी आत्ता हेच लिहायला आले होते Happy

preventive म्हणून काहीतरी उपाय >> म्हणजे वरचेवर फणीने केस विंचरुन उवा नाहीत न हे बघणे.

थंडीतल्या कोंड्यावर काय उपाय? एरवी किंचितही कोंडा झाला तर नारळाच्या दुधाने जातो. पण गेल्या महिन्यात नारळाचं दुध लावायचा प्रयत्न केला तर ते दुध थिजल्यासारखं झालं होतं. नीट लावलं गेलं नाही, आणि मुख्य म्हणजे कोंडाही कमी झाला नाही.
आता तर थंडी इतकी आहे की, डोक्याला काहीही लावून (अगदी दही/ लिंबूसुद्धा) ठेवायची इच्छा होत नाही. त्यातनं सर्दी खोकला आहेच. पण थंडी मध्ये कोरडेपणामूळे खूप कोंडा झालाय. चक्क भुवयांमध्ये पण स्कीन कोरडी होवून कोंड्यासदृश्य काहीतरी दिसतं. रोज बदाम तेल चोळतेय भुवयांना पण त्याचाही उपयोग होत नाहीये.
काहीतरी उपाय सुचवा केसांसाठी आणि भुवयांसाठीही.

ते रामदेवबाबांचे दिव्य केशतेल कसे आहे?
माझ्या नवर्‍याची त्वचा अती ड्राय आहे. केसातही अती कोंडा होतो. ते रामदेव बाबांचे तेजसतेल + मोहरीचे तेल (सरसो) मिसळून लावायला सांगितले तिथे गेलो तेव्हा. अल्पना तुझ्याइथे पतंजली क्लिनिक (बाबांचे) तर त्यांना जाउन विचार. ते सांगतात.

अल्पना, जमेल तेव्हा तिळाचे तेल, एरंडेल तेल एकत्र करुन गरम तेलाने मालिश कर. जेव्हा केस धुवायचे असतील तेव्हा बादलीभर पाण्यात साधारण एक चमचा मध टाकुन त्याने धुव. नंतर साध्या पाण्याने धुवायचे. भुवयांना लोणी + मधाने मालिश कर. तसेच खाण्यातपण लोवी, तुपाचा वापर जास्त कर. थंडि असल्यामुळे पाणी कमी प्यायले जाते, त्यामुळेहि कोरडेपणा येतो. पुरेसे पाणी प्यायची सवय लावुन घे.

मध moisturizer म्हणुन काम करत. आधी मधाच्या पाण्याने आंघोळ करुन नंतर लगेच साध पाणी घ्यायचे. ह्याने आद्रता टिकुन रहायला मदत होते.

तसेच कडुलिंबाची पाने तीळाच्या तेलात टाकुन ते तेल चांगले उकळवायचे. पानं कुरकुरीत होवून काळी व्हायला हवीत. मग हे तेल हवे तेवढे गरम करुन सगळ्या अंगाला फासायचे, अगदी केसांनासुध्दा. केसहि चांगले होतात आणि त्वचाहि. सध्या मी हेच करतेय. खुप फऱक पडलाय.

प्रज्ञा, खोबरेल तेलात कापराची वडी विरघळवून केसांना लावून ठेवायचा उपाय जालिम आहे, ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड सिन्स यर्स.... Wink

बाकी, अति उवा झाल्यास एक scarab म्हणून औषध मिळतं ते तेलाबरोबरीने लावायचं केसांना, आणि दुसर्‍या दिवशी धुवून टाकायचे केस, थोडेसे वाळले की फणीने विंचरायचे. लगेच फरक पडतो. त्याचा वासही सिसह्य आहे, lycil सारखा नाहीये. Happy

अल्पना, स्काल्प कोरडा पडणार नाही ह्याची काळजी घे. तीळाच्या तेलाचा खूपच उपयोग होतो. नसेल, तर साध्या खोबरेल तेलापासून सुरूवात कर. स्काल्पला हलकी मालिश करून झोपत जा. बाकी, जास्त पाणी पीणे, लोणी-तूप खाणे यास अनुमोदन.

तीळाचं नाहीये तेल. जवळपास कुठे मिळतही नाही. पण खोबरेल तेल, बदाम रोगन आणि सरसो तेल (इइइइ होतं पण पर्याय नाही) हे आलटून पालटून मिक्स करुन वापरतेय. कधी तेल लावल्याने केस चिप्प तर इतर वेळी टोपी घातल्याने चिप्प असंच चाललय सध्या. कंटाळा आला थंडीचा आणि थंड वार्‍याचा.

नारळाचं दूध थिजलं तर थोडं कोमट करून मग लाव ना. आणि ते रात्री झोपायच्या आधी नाही लावायचं.
रात्री तेल आणि सकाळी अंघोळीच्या आधी नारळाचं दूध.
भिवया आणि चेहर्‍यासाठी साय लावून बघ. किंवा निरसं दूध.

आणि थंडीपुरता शांपू बंद करून टाक. किंवा बेबी शांपू वापर.
भरपूर तेल असेल तेव्हाच शांपू नाहीतर एरवी आधी जास्वंद जेल चा मसाज आणि मग सरळ शिकेकाईचं उकळलेलं पाणी(हवंतर काही द्रव्य घाल त्यात) असं कर.

कधी केलं नाही. पण नारळाच्या दुधामधे जो तेलाचा अंश असतो तो तेवढा नसणार असं वाटतंय. करून बघ. माझ्यामते उपाय नाही झाला तरी अपाय नक्कीच होणार नाही.

Pages