मायबोली बाईक ट्रेक

Submitted by विनय भिडे on 5 January, 2011 - 03:45
ठिकाण/पत्ता: 
दापोली

५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अ‍ॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..

मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
४ ) गिरीविहार
५ ) तोषा

पुणे :- बाईक १ ) मल्ली
२ ) सुकी
३ ) सुकी अजुन एक
४ )सम्या

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 4, 2011 - 18:00 to Monday, February 7, 2011 - 08:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हव्या असतील तर काही टीप्स देऊ शकतो....
माझ्याकडे एक नकाशापण आहे....>>>>>>नेकी और पूछ पूछ.
आशु तुझी मदत हवीच आहे रे. रूट/नकाशा इथे अपडेट कर.

आता महामार्गावरुन (क्र. १७) बाईक चालवायचा आत्मविश्वास नाही राहीला.....
अजुन चार जण नॉन बाईकवाले असतील (अन पेट्रोलखर्च शेअर करणार असतील) Happy तर इत्तर बाईकवाल्यांबरोबर गाडीने जाता येईल.....

मला माहिती नाही तुमच्यापैकी कुणी बाईकवरून कोकण ट्रीप केली असेल तर..त्यांना माझ्या टीप्स अगदीच बाळबोध वाटतील...
१. बाईक - डबलसीट जाणार असाल तर गाडी किमान १५०सीसी ची असणे जास्त चांगले. कोकणातले रस्त्यांचे चढ-उतार सगळ्यांना माहीती आहेतच. बाईकची सगळी कागदपत्रे (पीयूसी सकट) बरोबर असणे अत्यावश्यक...वाटेत हायवेला चेकींग होते अनेकदा...
२. गाडीवरील दोघांच्या दोन सॅक करण्यापेक्षा दोघात एक सॅक केलेली जास्त सोयीची ठरते. जरी वजन जास्त वाटले तरी पीलीयन रायडर (मागे बसलेला) ती सॅक कॅरीयरवर टेकवून आरामात बसू शकतो. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे चालविणाऱ्याच्या खांद्यावर लोड येत नाही. आणि लॉँग ड्राईव्हला ते खूप महत्वाचे ठरते.
३. सुवर्णदुर्गला जाण्यासाठी फार खटपट करावी लागते. बोटवाले सहसा तयार होत नाहीत आणि झालेच तर जास्त रक्कम मागतात. शक्य तितक्या ठिकाणी घासाघीस करावी. अगदीच अडून बसले तरच रक्कम टिकवावी. बाकी फत्तेदुर्ग, कनकदुर्ग आणि गोवा किल्ला पाहण्यासाठी दोन तास पुरेसे होतात.
४. हर्णेवरून दापोलीला मुक्काम करण्याऐवजी केळशीत जाणे जास्त सोयीचे ठरेल. कारण दुसरे दिवशी केळशीला जाण्यासाठी पुन्हा हर्णेलाच यावे लागणार आहे. अर्थात दापोलीला फुकट सोय होत असेल राहण्याची तरच तो ऑप्शन चांगला आहे. अन्यथा रात्रीच्या मुक्कामाला केळशीइतके सुंदर ठिकाण नाही. जेवायची सोयपण चांगली आहे.
बाणकोटवरून मुरूड-जंजिऱ्याला जाताना हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर बघू शकता. पण माझ्या अंदाजाने तुम्ही दुपारीच या भागातून जाल तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन काय उपयोग नाही. पण हरिहरेश्वरला भेट द्यायला विसरू नका. तिथला प्रदक्षिणा मार्ग फारच सुंदर आहे.

हा नकाशा प्रमाणात नाहीये पण त्यात किमी दिलेले आहेत त्यावरून अंतराचा अंदाज येईल. आम्हाला या नकाशाचा फार उपयोग झाला. तसा तुम्हालाही होवो.

आंतरजालावर मिळालेला अजून एक नकाशा

मुरुड गावाच्या बाहेर, एक छोटी टेकडी आहे त्यावर दत्ताचे देऊळ आहे, अवश्य जा रे तिथे, वरुन मुरुड गावाचे आणि पद्मदूर्गाचे छान दर्शन होते.

माझ्या बाईकसाठी ड्रायव्हर म्हणून कोण बुक होतय. Wink Proud

दिनेशदा, जरूर जाऊ. जल्ला इंद्र्या तुला काय झालं थोबाड लाल करायला?

वा !! विनय मस्त योजना आहे पण आता नाही जमायचे
बाईक वर जाणार म्हणजे मस्त धमाल करणार तुम्ही
मजा करा लोकहो

अम्या, मी नेऊ का तुझी बाईक? तू मला आपल्या वाडीतून बाहेर आणून दे, मग मी बघते कशी चालवायची ते. Rofl पण माझ्या मागे बसायची कुणीच हिम्मत करणार नाही.

पण माझ्या मागे बसायची कुणीच हिम्मत करणार नाही.
>>
मी बसेन तुझ्या मागे. तु मला झाशीच्या राणीसारखं ओढणीने बांधुन ठेव.

मज्जा करणारेत लोक्स म्हणजे.

सगळे कोकण भटकंतीच्याच टिप्स देतायत. कुणाला बाईक चालवायच्या टिप्स हव्या आहेत का? तर मला भेटा अथवा लिहा. भयंकर रस्त्यांवरून बाईक कशी चालवायची त्याचे योग्य मार्गदर्शन मिळेल Proud

लले Rofl

जल्ला बीबी नेहमीप्रमाणे भरकटला का काय ?:फिदी:

आशु धन्स माहितीकरता Happy

सुक्या माहिती जमा करुन ठेव रे..

गिरी गाडी नको बाईकची मजाच वेगळी रे...अम्या ची घेउ बाईक हाकानाका

बाईकचा काउंट असा
१ माझी
२ मल्ली
३ सुकी
बाकी ?????

माझ्याकडुन बाईक (Splendour Plus) मिळेल, पण चालवणारा कुणी आहे का? Happy
आणि हो माझा एक मित्र तय्यार आहे, त्याने कालच मायबोलीचे सदस्यत्व घेतले आहे आणि त्याच्याकडे बाईक आहे. चालेल का?

विन्या माहिती जमा केली आहे रे. योग्याने रुट मॅप तुला मेल केला कि लगेच अपडेट करून टाक.
बहुतेक माझ्याकडून २ बाईक्स अन ३ लोक्स असतील. ज्याच्याकडे बाईक नाही अन चालवता पण येत नाही असा एक माणूस अ‍ॅडजस्ट होईल.

केळशीला रहायची व्यवस्था करणारेस मल्ल्या? कुणी केळशीतून हाकलायची व्यवस्था नाही ना करत आहे बघ हा ! Light 1

बादवे, चिपळूणला रहायचं असेल तर मामेभावाला विचारुन बघते. त्याचं दुमजली घर रिकामंच असतं. खाली बाईका पार्क करायला व्यवस्थित स्टिल्टही आहे.

सगळ्यांनी आम्ही सफरीला निघाल्यावर फोन चालू ठेवा. जसे हॉल्ट ठरतील तसे कॉल करू. आता चिपळून पुढे अश्वीनी असं नोट केलं आहे. अक्षी अन अलिबाग साठी - समीर अन विन्या , आंजर्ल्यासाठी - इंद्रा, केळशी - साठी मल्ली पुरे. बाकी कोणी नको.

कोकाण मध्ये बाईक वरुन मी दोन वेळा महाड, प्रतापगड, मुरुड-जंजीरा, दिवेआगार, हरिहरेश्वर, श्रिवर्धन, पोलादपुर ही गावे फिरलोय. दिवेआगार-हरिहरेश्वर नि श्रिवर्धन यांना जोडनारे रस्ते त्या वेळेस खराबे होते. ताम्हीनी घाट ते मानगाव हा रस्ताही खराब होता. रात्री ड्राईव्ह करन्या सारखा नाहीय. आत्ताची परीस्थिती कोणी सांगेल का ? Uhoh

मल्ल्या आपण जर रात्री ड्राईव्ह करायचं ठरलं तर ताम्हीनी मानगाव रस्त्याचा ऑप्शन ठिक नाहीये. त्यापेक्षा आपण खोपोली मार्गे जाऊ शकतो. केव्हाही निघालो तरी काही प्रॉब्लेम नाही. दिवे आगार, हरिहरेश्वर नि श्रिवर्धन रस्ते माझ्या माहितीप्रमाणे रुंदीकरण केलेले नाहीयेत पण चांगल्या स्थितीत आहेत. सुनिल तटकर्‍यांनी तेवढी व्यवस्था करून ठेवली आहे.

Pages