Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00
झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या.
या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सगळ्यात सुरेखा पुणेकरची
मला सगळ्यात सुरेखा पुणेकरची अदाकारी आवडली, तिच्या सारकीए ग्रेस कुणालाच नाहीये माझेहि अनुमोदन.
आताच्या काळातील सुलोचनाबाई म्हटले तर बिघड्णार नाही.
ते "शीला की जवानी" असंच आहे>> आश्विनीचा पीजे फुकट गेला
>>नाही नाही ते शीला केजवानी असं आहे>> खरच की काय?
माझी पुस्ती... ते शीला केजवानी जयजयवंती मधे आहे की काय?
येत्या गणपती उत्सवात पुष्कर ला कंपेअरर म्हणून जाम डिमांड येणार ... काय्च्या कै बोल्तो राव.
एलिमिनेशन क्रम अंदाजः १.
एलिमिनेशन क्रम अंदाजः
१. गिरिजा ओक - स्थुलपणामुळे अजिबात मुवमेंट करत नाही.
२. सोनाली खरे - हिला एंट्री कशी मिळाली हे कोडेच आहे.
३. सुरेखा पुणेकर - तमाशाप्रधान मधे तरबेज पण इतर प्रकारांचे काय?
४. आरती सोळंकी - नो कमेंट.
---------------------------------------------------------------
५. स्मिता तांबे -
६. नेहा पेंडसे
७.नेहा जोशी
मृण्मयी देशपांडे आणि उर्मिला कानिटकर मधे टफ आहे ठरवणे.
(अपवाद: नाच सोडुन इतर कुठला) निकष लावल्यास वरील क्रम अर्थहीन आहे ).
हे घ्या, गिरीजा ओक खूप बोजड
हे घ्या,
गिरीजा ओक खूप बोजड वाटतेय नाचताना,
http://www.youtube.com/watch?v=qjAgTEESmoA
ह्या बाकीच्या,
http://www.youtube.com/results?search_query=ekapeksha+ek+apsara+aali&aq=f
विश्वामित्र पकवतो .....
विश्वामित्र पकवतो ..... डोक्यात जातो! लहान होता तोवरच ठीक होता. त्याच्याबरोबर एक मेषपात्र पण आणुन ठेवलय परिक्षकात . काय लाडं लाडं बोलतं ... काय मुरकतं... ! असो. आपल्याला काय, आपण अप्सरा बघाच्या.
बाकी कार्यक्रम तद्दन फालतु !
( एकंदरीत , रीअॅलिटी शोजमधे सारेगम ने गाणी , एका पेक्षा , तसच इतर अवॉर्ड शोजनी रेकॉर्ड डान्स आणि मायबोलीने कविता ह्या विषयाचा कंटाळा आणलाय )
ती मयुर वैद्य>>>> हा नमुना
ती मयुर वैद्य>>>> हा नमुना बोलतो तेव्हा एकच प्रतिक्रिया येते, यॉक!, बॉबी डार्लिंगच्या कॅटेगरीतला वाटतो. बर बोलताना शब्द देखिल असे वापरतो कि परिक्षक नव्हे तर निरीक्षक म्हणुन बसलाय.
महागुरू सचिन...... कुठल्याही प्रोग्राम मधे होस्ट म्हणुन आवतरताच साडे-तिन मिनटांच्या आत आयडीयाची कल्पना या व्यक्तीला सुचलीच पाहीजे
सुरेखा पुणेकर......... सचिन तेंडूलकर गल्ली क्रिकेट खेळायला आल्यासारख वाटतय
इथली चर्चा वाचून काल काही
इथली चर्चा वाचून काल काही जणींचे परफॉर्मन्सेस पाहिले यु-ट्युबवर. एकंदरीत पर्व बघायला मजा येईल असं वाटलं. उर्मिला कानेटकर ( तिचे आडनाव कानेटकर आहे कानिटकर नाही ) ची गाण्याची निवड नाही आवडली. अशा गाण्यांत कितीही छान नॄत्य केले तरी दुसर्या कुणी क्लासी गाणे निवडले की परिणाम पुसला जातो. गिरिजा ओकला एवढ्या छान कमेंटस का दिल्या समजलं नाही. नेहा जोशी म्हणजे मराठीतील प्रिती झिंटा आहे की एकदम ( गालावरच्या खळ्या ) ! अवघाचि संसारमध्ये तिला पाहिल्याचे आठवतेय पण इतकं छान नॄत्य करत असेल असं बिलकूल वाटलं नव्हतं. विशेषतः तिच्या भावमुद्रा तर फारच आवडल्या. तिचा इंट्रोचा व्हिडियोही आवडला. 'अप्सरा आली' गाण्यात सगळ्यांना एकत्र बघायलाही मस्त वाटले.
नियमित पाहायला हवेत आता एपिसोडस.
रच्याकने, watchindia.tv वर झी मराठी यायला लागले का परत ? कुणाकडे अपडेट असेल तर द्या प्लीज.
वॉव ! हा कार्यक्रम मी पाहिलाच
वॉव ! हा कार्यक्रम मी पाहिलाच नाहीये. मनःस्विनी धन्स गं लिंकांबद्दल.
मागे स्वप्निलच्या राधा ही बावरी या गाण्यावर उर्निला अन मृण्मयी नाचल्या होत्या, ते आठवलं. उर्मिलावरची नजर अगदी हटत नव्हती. फार सुंदर नाचली होती ती. अन बांधाही छान आहे नाचाच्या दृष्टीने तिचा. मृ जरा जाडी वाटते, नाचताना....
आता बाकीचे एपिसोड आठवणीने बघिन धन्स निंबुडा, तुझ्यामुळे कळला हा कार्यक्रम रच्याकने तुझी बारशी संपली का
अगो, येते झी मराठी आता
अगो, येते झी मराठी आता watchindia.tv वर..
मृण्मयी देशपांडे आणि उर्मिला
मृण्मयी देशपांडे आणि उर्मिला कानिटकर मधे टफ आहे ठरवणे. >>> अगदी अगदी..
कंसातल्यासाठी >> अनुमोदन रे नतद्रष्टा..
हा धागा वाचुन तुनळीवर शोधुन
हा धागा वाचुन तुनळीवर शोधुन पाहीलं सगळ्या अप्सरांना..मॄन्मयी जाम आवडली.
नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी) 'जस्सी'फेम मोना सिंगच्या पावलावर पाउल ठेवुन इमेज चेंज करायलाच प्रवेश घेतल्यासारखे वाटले.
स्मिता तांबे ...
स्मिता तांबे ...
' ना मानोंगे तो दूंगी तोहे
' ना मानोंगे तो दूंगी तोहे गाली रे' वर कोणी डान्स केला परवा ?
किती ती ओव्हर एक्स्प्रेशन्स.. फारच डोक्यात गेली ती बाई..स्वतः वर जाम खुष होती ती आणि जजेस किती स्तुति करत होते तिची!
चॅनल बदलल् तिला पाहून आणि ते जजेस , पुष्कर इ. लोकं पाहून !
उर्मिला कानिटकर आहे माहित नवह्तं, तिचा डान्स बघ़ण्या पुरतं लावलं पाहिजे ए.पे.ए , बाकी बायका ओळखीच्या नाहीत!
दीपांजली नव्यानेच झी मराठी
दीपांजली नव्यानेच झी मराठी पहात आहेस वाटते कारण या सगळ्या झीच्या हिरविणी आहेत .
र च्या क ने ती नेहा जोशी आहे.पूर्वी गाजलेल्या अहासंची साईड हिरवीण ..तेव्हा डोक्याला जास्त ताण ने देता संच्याह्यामा आणि संचाह्यामा -त्यावर आमची टिपणी ऐका या दोन्ही बीबी वर येत जा म्हणजे असे भाबडे प्रश्न पडणार नाहीत.
ए, उर्मिला माझी मैत्रिण आहे
ए, उर्मिला माझी मैत्रिण आहे हां.
स्वप्ना_तुषार, ही दुनिया
स्वप्ना_तुषार, ही दुनिया भाबडिच आहे. र्.च्या. क. ने. आरती सोलंकीला का आणली असावी. तज्ञांनी खुलासा द्यावा. स्वप्ना_तुषार,स्वप्ना_राज इ.
मला तर हे ही एक प्रकारे, स्त्रिच्या जाडी इ. वरुन मनोरंजन आसेच वाटले.
मुग्धानंद , जाडीवरून मनोरंजन
मुग्धानंद , जाडीवरून मनोरंजन काय हे? मुळात हा रिअॅलिटी शो आहे त्यामुळे त्यांना वास्तव दाखवण्यावरच जास्त भर द्यावा लागतो. अन आरती सोलंकी यांना का आणलं असावं याचं कारण इतर जाड लोकांसाठी आशावाद निर्माण करायचा असेल.
नाद्खुळा, मला तर तो बिभत्स
नाद्खुळा, मला तर तो बिभत्स रसाचा अविष्कार वाटतो
>>आरती सोलंकीला का आणली
>>आरती सोलंकीला का आणली असावी
झीने आपल्याच प्रोग्राममधल्या हिरविणी आणल्यात असा आरोप होऊ नये म्हणून तोंडी लावायला आणलं असावं. कारण फक्त त्यांच्या प्रोग्रामच्या हिरविणीच असत्या तर "रडूबाई आली" असं नाव ठेवायला लागलं असतं प्रोग्रामचं.
चालुद्यात तुमचं, अप्सरा अन
चालुद्यात तुमचं, अप्सरा अन त्यांचा नाच बघून डोळ्याचं पारणं फिटतय ना मग बस झालं. प्रत्येकीच्या एंट्रीला शिट्ट्या वाजवून एकच गाणं म्हणायचं.. "कुण्या गावाचं आलं पाखरू, खुदुखुदु हसतय गालात" ..
मुग्धानंद मला वाटतं
मुग्धानंद मला वाटतं महाग्रूच्या प्रोग्रामला द्रुष्ट लागू नये म्हणूनच अप्सरांच्या रांगेत आरती सोळंकीला बसवले असेल...
मुग्धानंद मला वाटतं
मुग्धानंद मला वाटतं महाग्रूच्या प्रोग्रामला द्रुष्ट लागू नये म्हणूनच अप्सरांच्या रांगेत आरती सोळंकीला बसवले असेल...
आरती जाड असली तरी नाचली
आरती जाड असली तरी नाचली चांगली. तिच्या स्टेप्स मला तरी बीभत्स वगैरे वाटल्या नाहीत.
प्रतिध्वनी
प्रतिध्वनी
प्राचीला अनुमोदन. एकापेक्षा
प्राचीला अनुमोदन.
एकापेक्षा एक मधल्या मागच्या एका पर्वात आणखी एक चांगलाच जाड माणूस (मुलगा?) नाचला होता. (नाव आठवत नाही) तो काही राऊंड्स पुढेही गेला होता.
आणि मयुर वैद्य तर परिक्षक आहे.
कोण आहे हा मयुर वाघ. जरा
कोण आहे हा मयुर वाघ. जरा कोणीतरी सांगा.
रिमा, चुकून वाघीणीचं नाव
रिमा, चुकून वाघीणीचं नाव लिहिलं गेलं.. वाघ नाही वैद्य.
तो महागुरु अश्या अविर्भावात
तो महागुरु अश्या अविर्भावात उपदेश करत असतो की ते बघुन सकाळी सकाळी वेगवेगळ्या वाहिन्यांवरुन प्रवचन करणार्या तमाम बापू आणि साध्वी लोकांना हमखास काँप्लेक्स येईल
>>स्व.रा. किटू गिडवानी
>>स्व.रा. किटू गिडवानी विसरलीस.
अम्या मला एक क्ष्ण वाटलं किट्टू गिडवाणी गेली की काय ???
आम्ही तर महाग्रु ला रेडकर म्हणतो.. स्वतःचीच लाल कायम ...
अप्सरा आली वरचा ग्रूप पफोमन्स
अप्सरा आली वरचा ग्रूप पफोमन्स (महाग्रूचं विंग्रजी)
http://www.youtube.com/watch?v=04XszgDTLa4
त्या सचिनला रेडकर हे नाव अगदीच सार्थ आहे.
आणि हा पुक्या श्रोत्री तर उगाचच बोर करतो.
(एक डाव धोबी पछाड मधलं काम सोडलं तर अजाबात आवडत न्हाय त्यो)
हा महाग्रू गुप्ते च्या शो मधे
हा महाग्रू गुप्ते च्या शो मधे चांगलं मराठी बोलला की म्हंजी येतंय ह्यास्नी मर्हाटी कशाला बा उगाच श्टाईल मारतंय कोन जाने..
Pages