Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00
झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या.
या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निंबुडा, ती उर्मिला कानिटकर
निंबुडा, ती उर्मिला कानिटकर आहे, मेघना नव्हे
>> २) मेघना कानिटकर (असंभव ची
>> २) मेघना कानिटकर (असंभव ची शुभ्रा) <<
हिचं नाव काहितरी वेगळं होतं का आधी? आडनाव तेच आहे.
>> ५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी) <<
प्रोमोज मध्ये हिचा एक नाच दाखवत होते कुठल्यातरी आयट्म सॉंगवर.... अतिशय चिप वाटला.
मस्तच! निंबे..! या ८नंबरच्या
मस्तच! निंबे..! या ८नंबरच्या नेहाने राधेचे नृत्य खुप छान केले विशेषतः त्यावरची तिघा जजेस ची टिप्पणी!!
नेहा जोशी.
नेहा जोशी.
गिरीजा कसली सुंदर दिसतेय
गिरीजा कसली सुंदर दिसतेय !!
मृणमयी ही छान आहे ...
पण सचिन का नाहिये.....
पण सचिन का नाहिये..... कुणाला माहिते ?
किट्टु सचिन आहे की.........
किट्टु सचिन आहे की......... कालचा भाग पुर्ण पाहीला नाही का?
मला सगळ्यात सुरेखा पुणेकरची
मला सगळ्यात सुरेखा पुणेकरची अदाकारी आवडली, तिच्या सारकीए ग्रेस कुणालाच नाहीये
किट्टु | 31 December, 2010 -
किट्टु | 31 December, 2010 - 01:30 नवीन
पण सचिन का नाहिये..... कुणाला माहिते
..>
तो साऊथ अफ्रिकेच्या ३ र्या टेस्ट चा सराव करत असेल ना !!!
<<पण सचिन का नाहिये.....
<<पण सचिन का नाहिये..... कुणाला माहिते ?>> कालच्या अॅपिसोड मध्ये सर्वात शेवटी महागुरू सचिन आलेला...
अप्सरा बघायला कोणाल आवडणार
अप्सरा बघायला कोणाल आवडणार नाही???
पण समोर तो विश्वामित्र बसलेला असतो ना... फार पकवतो बुवा...
:
:हाहा::D :
निंबुडा, ती उर्मिला कानिटकर
निंबुडा, ती उर्मिला कानिटकर आहे, मेघना नव्हे >>
अरे हो खरंच की.
का कुणास ठाऊक तिचं नाव मेघनाच वाटतं कायम मला.
मी वर बदल करते.
नेहाने राधेचे नृत्य खुप छान
नेहाने राधेचे नृत्य खुप छान केले >>> अनुमोदन. चेहर्यावरचे भाव अप्रतिम सादर केले.
एपिसोड वाईज गाणी पण नमूद करुयात का?? आय मीन कोणी कोणी कोणत्या गाण्यावर परफॉर्म केले ते???
मला सगळ्यात सुरेखा पुणेकरची अदाकारी आवडली, >>> मला तर फार नाटकी हावभाव वाटले. संथ चालती या मालिका वर नीधप ने सुरेखा ची तारीफ केली होती म्हणून आवर्जून पाहिला तिचा परफॉर्मन्स. पण खूप काही हटके आणि बहारदार नाही वाटला. तिचं गाणं रेकॉर्डेड होतं की कुणी मागे खरोखरीच गात होतं?? ओरिजिनल वाटत नव्हतं ते! मागे एका पेक्षा एक च्या अशाच एका सेलेब्रिटी पर्वा मध्ये याच गाण्यावर बहुदा अमृता खानविलकर ने नृत्य सादर केले होते. ते कालपेक्षा सरस वाटले.
पण अर्थात कालचा एपिसोड म्हणजे केवळ introduction होते. त्यामुळे सगळ्यांनीच कॉम्पिटिशन च्या भावनेने डान्स केला नसणार. पुढे पुढे रंग भरत जाईल तशी टिप्पणी करता येईल.
<< संथ चालती या मालिका वर
<< संथ चालती या मालिका वर नीधप ने सुरेखा ची तारीफ केली होती >>
घाईत वाचलं तेव्हा वातलं संथ वाहते कृष्णामाई वर सुरेखा पुणेकरांनी कस काय बुवा नृत्य केलं परत वाचल तेव्हा लक्षात आलं
समोर तो विश्वामित्र बसलेला
समोर तो विश्वामित्र बसलेला असतो ना... फार पकवतो बुवा... >>>>>>नीलला मोदक
काल एपिसोडच्या शेवटी "अप्सरा
काल एपिसोडच्या शेवटी "अप्सरा आली.." या गाण्यावर सर्व जणींनी एकत्र परफॉर्म केलं. मी ते मिसलं.
कसं झालं ते गाणं??? ऑनलाईन कुठे बघता येईल का??
<<पण समोर तो विश्वामित्र
<<पण समोर तो विश्वामित्र बसलेला असतो ना... फार पकवतो बुवा... >> हे मात्र खर...
खरच सचिन खूप पकवतो. मुळात
खरच सचिन खूप पकवतो. मुळात त्याला महागुरु म्हणणंच मला पटत नाही. पण केवळ त्याच्या बडबडीमुळे तो कार्यक्रम बघु नये असं वाटत रहातं.
समोर तो विश्वामित्र बसलेला
समोर तो विश्वामित्र बसलेला असतो ना... फार पकवतो बुवा...>>> म्हणुन नाही मी पण हा कार्यक्रम
घाईत वाचलं तेव्हा वातलं संथ वाहते कृष्णामाई वर सुरेखा पुणेकरांनी कस काय बुवा नृत्य केलं >>> अम्या..सेम पिंच रे..मला पण तसंच वाटलं
>>मला तर फार नाटकी हावभाव
>>मला तर फार नाटकी हावभाव वाटले.>> माझे मोदक... मला पण विशेष नाही आवडलं तिचे. त्यापेक्षा बाकीच्याच सरस नाचत होत्या.
रच्याकने पूर्ण भागात आता सुरेखा पुणेकर फक्त लावणीच करणार का?
>>समोर तो विश्वामित्र बसलेला असतो ना... फार पकवतो बुवा>>
रच्याकने पूर्ण भागात आता
रच्याकने पूर्ण भागात आता सुरेखा पुणेकर फक्त लावणीच करणार का? >>>>> मलाही तसच वाटतयं.
निंबुडा शेवटचा परफॉर्मन्स
निंबुडा शेवटचा परफॉर्मन्स सुंदर झाला...नाहिम्हणता गिरीजाचं पोट सुटल्याचं स्पष्ट जाणवत होतं...
तो महाग्रू लहान मुलं गॅदरींग मधे एखादी नाट्य छटा सादर करावी तसं पाठ केलेलं पण(स्वतः ला ) न कळणारं मराठी बोलत असतो........
<<तो महाग्रू लहान मुलं
<<तो महाग्रू लहान मुलं गॅदरींग मधे एखादी नाट्य छटा सादर करावी तसं पाठ केलेलं पण(स्वतः ला ) न कळणारं मराठी बोलत असतो........<< अगदी अगदी ! एखाद्या परप्रांतीयासारखे मराठी उच्चार आहेत त्याचे.
<<नाहिम्हणता गिरीजाचं पोट सुटल्याचं स्पष्ट जाणवत होतं...<< खरय! प्रोमोज मधे तिचेच नृत्य आधी दाखवत होते. आणि बयाचा चेहरा सोडला तर बाकी अवयव प्रपोर्शनेट नाहीत हे प्रकर्षाने जाणवतं !!
गिरिजा नक्कीच थोराड
गिरिजा नक्कीच थोराड आहे.
मृण्मयी गोड आहे.
स्मिता तांबे एरवी अॅक्टींगला ठिक आहे. पण कालच्या डान्सच्या वेळचे तिचे हावभाव खास नाही वाटले.
उर्मिला कानिटकर - ही पण गोड आहे. कथ्थक मध्ये पारंगत आहे. आई शप्पथ मधला तिचा एका शास्त्रीय गाण्यावर केलेला डान्स पहा. अप्रतिम नाचलीये त्यात ती!
नेहा पेंडसे - ही साऊथमधून उठून डायरेक्ट इथे आलीये. मराठीपणाचा छाप हिच्यात कुठेच दिसत नाही. साऊथच्या वजनदार नायिकांमध्ये उठून दिसते.
नेहा जोशी - ही इतका सुंदर डान्स करत असेल असे वाटले नव्हते. तिच्या खळ्या जाम गोड वाटल्या काल.
सोनाली खरे - माधुरीच्या "हमको आजकल है इंतझार...." या गाण्याची इतकी वाट आजवर कुणी लावली नसेल. अंगच लवत नव्हतं तिचं.
मस्त मजा करा सगळे.. मृण्मयी
मस्त मजा करा सगळे..
मृण्मयी जोशीला वोट करा प्लीज... खुपते तिथे मधे तिची मुलाखत पाहीली. मृण्मयी ग्रेटच आहे. नेहा खडूस वाटली. स्मिता तांबे तर अजिबात नाही आवडली.
गिरीजा ओकला पण वोट करा नक्की.
आरती सोळंकीचं नाव बघून उत्सुकता वाढलीय, कसा परफॉर्मन्स देणार बघायला पाहीजे.
यू ट्यूब वर अपलोड होतीलच सगळे परफॉर्मन्सेस...!
हॅपी न्यू इयर ..२०११!!
मृण्मयी जोशीला वोट करा सगळे.
मृण्मयी जोशीला वोट करा सगळे. << ती जोशी नाही देशपांडे आहे असो नावात काय आहे ? पण वोट करायला जोशी शोधायला गेलो तर मिळणार नाही म्हणून सांइतले
हा कारेक्रम कुठे आणि किती
हा कारेक्रम कुठे आणि किती वाजता दाखवतात म्हणे???
मृण्मयी देशपांडे.. तेच
मृण्मयी देशपांडे..
तेच म्हणायचं होतं
नेहा जोशी बद्दल विचार करताना तसं झालं
सॉरी !!!
हा कारेक्रम कुठे आणि किती
हा कारेक्रम कुठे आणि किती वाजता दाखवतात म्हणे??? >>>
मामी, जी टिवी वर बुध-गुरु रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी महागुरु अवतरतात.
ए, कोणीतरी त्या बोबड्या पुष्कर श्रोत्रीवरही टिप्पणी लिहा रे.
Pages