मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्ती चित्रपटातील स्मिता पाटील च्या तोंडी असलेलं "हमने सनम को खत लिखा ...खत में लिखा"
हे गाणं....( ने वर जास्त जोर दिलाय की उच्चार वेगळा केलाय Uhoh )त्यामुळे मी लहानपणी असं म्हणायचे:

हम नये सनम को
खत लिखा...
खत मे लिखा, ए दिलरुबा ...

आणि मग ही 'नये' का म्हणत असेल असा विचार करायचे!!! Proud

Biggrin

मागे चोप्रांचा "मुझसे दोस्ती करोगी" नावाचा पडेल चित्रपट येवून गेला. त्यात एक गाणं होतं..

अनदेखी अनजानी सी पगली सी दिवानी सी
जाने वो कैसी होगी रे

मी ते असं ऐकायचो..

अंधेकी अनजानी सी पगली सी दिवानी सी
जाने वो कैसी होगी रे..

अलिकडेच आलेलं,पाहिलेलं 'शीला की जवानी' हे गाणं ...
मी काल्-परवापर्यंत ..'शीला की जपानी' असचं आहे का ? असं म्हणत होतो ..
Lol

शाळेत असताना काही गाण्यांची अशी अफलातून माळ ऐकली होती की आजही मूळ गाण्यांपेक्षा ते विडंबनच जास्त लक्षात आहे -

"रुप तेरा चार आणा,
प्यार मेरा आठ आणा,
पिक्चर देखा याराना,
उसमे था एक गाना -

हरी ओम हरी
रेखा मरी,
जितेंद्र रोया
रात भर ना सोया,
सुबह उठकर गाना गाया -

सौ साल पेहले
देवानंद जवान था
गधेपे सवार था,
आजभी है और
कलभी रहेगा -

ये सुनकर देवानंद बोला -

कचरे के डिब्बे मे तुझको बिठाकर
उसपे मै प्लास्टीक का ढक्कन लगाकर,
रखूँगा संडास के पास
आयेगा घाणेरडा वास..."

(टीपः या विडंबनाचे मूळ कर्ते ठाऊक नाहीत. जसे ऐकले व जसे आठवते तसे लिहिले आहे.)

४-५ दिवसांपूर्वी मला "मेरा पिया मोसे बोलत नाही" गुणगुणताना ऐकून माझा भाऊ म्हणाला "ते ’मोसे’ आहे होय? मी ’मूसे’ असं ऐकत होतो" Happy

"सौ साल पेहले" चं हे विडंबन आमच्या शाळेतही मशहूर होतं.

गुलझार चे "जिहाले मस्किन मुकअन बरन्जिश बहोर हिजरा बेतारा दिल है सुनाइ देती है किसकी धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है"

मी बेतारा दिल ऐवजी "बेचारा दिल है" म्हणायचे!
मला तर अजुनही ह्या गाण्याचे सुरुवातिचे शब्द नक्की माहित नाहीयेत आणि अर्थ सुद्धा !
-म र वा

मरवा जिहाले मस्की हे 'मला चुकीची ऐकू आलेली गाणी'चेह सरताज आहे. सुरुवातीपासून वाचलेत, तर कुणाकुणाला काय काय ऐकू आले ते कळेल!

"फलक तक चल साथ मेरे फलक तक चल साथ चल" (टशन मधले बहुतेक) वय वर्ष ५ असे म्हणते :
"लटपट चल साथ मेरे लटपट चल साथ चल"!! Lol

गुलझार चे "जिहाले मस्किन मुकअन बरन्जिश बहोर हिजरा बेतारा दिल है सुनाइ देती है किसकी धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है"

मी बेतारा दिल ऐवजी "बेचारा दिल है" म्हणायचे!
मला तर अजुनही ह्या गाण्याचे सुरुवातिचे शब्द नक्की माहित नाहीयेत आणि अर्थ सुद्धा !
>>>

बाप्रे, आता परत नक्को प्लीजच! आधीच या गाण्यावर इतका उहापोह झाला आहे. Uhoh

कुणीतरी स्वतंत्र धागा देखील काढलाय ना या धाग्यावर. त्या गाण्याचे अ‍ॅक्च्युअल शब्द आणि अर्थ स्पष्ट करणारा. मरवा ला कुणीतरी लिंक देऊन तिकडे रीडायरेक्ट करा प्लीज. Happy

"जिहाले मस्किन मुकअन बरन्जिश बहोर हिजरा बेतारा दिल है सुनाइ देती है किसकी धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है"

हे मी अजुनही
"जिहाले मश्जिद मुकुन बरंदीश बहारे हिजरा मे सारा दिल है,
सुनाई देती है जिसकी धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है"
असं म्हणतो.. Uhoh

रचक्याने.... "जिहाले मस्किन मुकअन बरन्जिश बहोर हिजरा बेतारा दिल है" याचा अर्थ काय आहे ? Proud

सगळ्या बेचार्‍या दिलांसाठी (पुन्हा?) एकदा :
जिहाले मिस्कीं मकुन बरंजिश
बहाले हिजराँ बेचारा दिल है
सुनाई देती है जिसकी धडकन
तुम्हारा दिल या हमारा दिल है

http://wiki.answers.com/Q/What_is_the_meaning_of_the_lyrics_of_the_song_...
इथे सांगितला गेलेला अर्थ
Means: Iss gareeb/laachaar(miskeen) dil ko jab dekho(zihaal), to gusse se (ba-ranjish) nahin(maqun),
iss bechare dil ko haal-hi-mein/recently(ba-haal) apne mehboob se judai(hijr) ka gham mila hei
This is written by Gulzar, inspired by Hazrat Amir Khosro's poet written in Persian + BrijBhasha...
zihaal-e-miskeen makun taghafful, duraaye naina banaaye batiyaan. .

नवीन निश्चल चं एक गाणं आहे.

तुम जो मिल गये हो,
तो ये लगता है
ये जहान मिल गया |

मी ते असं म्हणायचो
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है
ये जहान छोड दू Happy

नवीन निश्चल चं एक गाणं आहे.

तुम जो मिल गये हो,
तो ये लगता है
ये जहान मिल गया |

मी ते असं म्हणायचो
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है
ये जहान छोड दू Happy

आशाताईंचं भक्तिगीत सकाळी रेडिओवर लागतं.... विटू (मला हा शब्द नीट लिहिता नाही येत) माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा...

त्यात मधे एक ओळ आहे.. जनी म्हणे गोपाळा, मागे भक्तांचा सोहळा

ते मला वाटायचं.. जनी म्हणे गोपाळा, मागे भक्तांचा कोथळा (???????)

जुन्या माबॉवर कदाचित लिहीलं होतं नी हे, पण आज परत आठवलं म्हणून
लाल दुपट्टा खो गया रे मेरा हवा के झोकेसे
मुझको पियाने बेच दिया हाय रे धोखेसे Proud

हिमेशचं "पार्टनर" मधलं गाणं
तुझे याद करके मुझे चैन आवे..
मेरी जानिया वें..
कोला लाका वेल्लारी...

वॉकमॅन मधुन ऐकण्याआधी ही ओळ मला अशी ऐकुयायची
तुझे याद करके मुझे चैन आवे..
मेरी जानिया वें..
सोना लाखो में लाई...
Happy

कोला लाका वेल्लारी...चा कुणि अर्थबोध देउ शकतो का??

ता रा रम पम मधले ते "तुम्ही तुम हो निगाहों मे..... " (bring it on....) वाल्या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी (ज्यावर जावेद जाफ्री असह्य डान्स करतो Wink ) मला अशा ऐकू येतात.

चिका चिका चिका
लेट्स पचिका गर्ल
एक तो बॉडी ये तो
कोवन मेटका
लेट्स पचिका गर्ल

Uhoh

काय आहेत त्या ओळी नक्की.

याच गाण्यातलं bring it on, bring it on पन मला आधी कायम "चिकी बॉम्ब", "चिकी बॉम्ब" असं ऐकू यायचं. Proud कुणीतरी सांगितलं की bring it on आहे. Rofl

"लेट्स पचिका गर्ल" हे "दॅटस माय चिका गर्ल" असं मला ऐकू येतं. "कोवन मेटका" हे "कोइन्व्हेन्टर" असं ऐकू येतं Happy

लेट्स पचिका गर्ल" हे "दॅटस माय चिका गर्ल" असं मला ऐकू येतं.
>>
आणी मला हीच ओळ, 'मॅस्मची का घर' अशी ऐकु यायची.

Pages