शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय COEP

Submitted by अजय on 20 December, 2008 - 01:13

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय COEP मधले मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आक्टोबर मधे मा़जी विद्यार्थ्यांचं संमेलन होतं. मी गेलो होतो , खूप छान वाटलं. पण पुण्यात असूनही पुण्यातले फार थोडे जण आले होते. बहुतेक बाहेरचे होते.
सध्याच्या विद्यार्थ्याना विशेष कार्यक्रम असला की गणवेष घालावा लागतो हे ऐकून अचंबित झालो.

काय सांगता ?!! गणवेष... बाप रे !
शांपु (शा.अ.म.पु.) बदलले तरी बीसी मात्र तसेच आहे ही मोठी आनंदाची गोष्ट Happy

    ***
    उसके दुश्मन हैं बहुत
    आदमी अच्छा होगा

    २००२ सालापासून गणवेष सक्तीचा करण्यात आला. आठवड्यातून तीन दिवस आणि परीक्षेच्या वेळी तो सक्तीचा होता. गेल्या वर्षीपर्यंततरी असं होतं. हल्ली माहित नाही.

    अजय : फक्त सणासमारंभांनाच नाही, तर दर सोमवारी टाय (भारतातल्या हवामानात?! कहर!!) वगैरे गणवेश असतो. येडपटपणा आहे!
    मध्यंतरी घाटोळ आडनावाच्या एका प्राचार्यांच्या कारकीर्दीत हा तुघलकी उपक्रम आरंभला.
    कॉलेजात जाऊन छान वाटतंच. पण तरीही शनिवारी दुपारी बोट क्लबावर जश्या क्विझ क्लब, बुद्धिबळाचा कट्टा, रिगाटा/मॅगझिन/आर्ट सर्कल वगैरे मंडळींच्या हंगामाबरहुकूम ऍक्टिव्हिट्या दिसायच्या तेवढं आता राहिलं नाही. परीक्षा नसतात, तेव्हा वर्दळ असते.. पण मुळात परीक्षाच आता वाढल्यात - २ मिडटर्म आणि टर्मिनल.. प्रत्येक सेमिस्टरीत!

    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

    नमस्कार Happy
    मी COEP ची २००५ ची paas-out आहे.....
    कॉलेजमधे नविन कँटीन उघडले आहे..... इलेक्ट्रीकल विभागाच्या बाजूला....
    त्यामुळे आत २ कँटीन झाले आहेत.... पण बीसी ची सर कशाला नाही....
    मला अ़जून ही तिथल्या उत्तप्पा सँडवीच ची चव आठवते.... Happy

    अरे तो घाटोळ अजूनही आहे की काय ?! या घाटोळला बीसीचे कोण ते मॅनेजर त्यांच्या खांद्यावर हात टाकून (शाळेत असताना आपण जायचो तसे) बीसीवर चालताना बघून मी धन्य झालो होतो ! त्याने कोणाशी मैत्री करावी हा मुद्दा नाही, पण त्या मैत्रीचे 'या प्रकारचे' जाहीर प्रदर्शन मला झेपलेच नव्हते.
    डोमी चांगलाच म्हणायचा मग ! तो एकतर शैक्षणिकदृष्ट्या वरच्या दर्जाचा होता आणि त्याच्या पदाचा आब राखून होता. (डोमी आणि आमचे होड कोडगिरेसुद्धा चांगले मित्र होते Happy पण ते नाही दिसले असे कधी.) असो.

      ***
      उसके दुश्मन हैं बहुत
      आदमी अच्छा होगा

      व्वा !! उत्तप्पा सँडविच... अहाहा ! काय आठवण करून दिलीस !! जाणे भाग आहे आता.

        ***
        उसके दुश्मन हैं बहुत
        आदमी अच्छा होगा

        अरे, डोमी आणि कोडगिरे हे नातलग होते. कोडगिरे सरांची बायको म्हणजे डोमकुंडवार सरांची बहिण.
        COEPच्या इतिहासात mech to meta अशी उडी मारणारे कोडगिरे एकमेव.

        ओह येस ! त्यांचं नातं आहे हे मी विसरलोच होतो.

          ***
          उसके दुश्मन हैं बहुत
          आदमी अच्छा होगा

          अगदी अगदी रे स्लार्ट्या! Lol
          त्यांच्या कारकीर्दीतच सीओईपी अभिमत संस्था झाली. पण त्यांना बहुधा सगळ्यांवरच स्वतःचा ठसा उमटवायचा होता.. त्यामुळे तेव्हा शतकांपेक्षा जास्त काळ वाढत गेलेलं ब्रँडनाव टाकून "पीआयईटी" असं नवं नाव धरावंसं वाटलं (त्यांनी ही नवी संस्था पुण्यातून उचलून दौलताबादेसही नेली असती!). त्याला लोकांनी विरोध करून नाव परतवून घ्यायला लावलं. पण विद्यार्थ्यांच्या गळ्याला बसलेले टायांचे फास अजून कोणी सोडवले नाहीत. Proud
          सोनाली, २००५ म्हणजे तू बहुधा सजल चव्हाण वगैरेंना ओळखत असशील.

          आयला! डोमी-कोडगिर्‍यांचं नातंय हे मला माहीत नव्हतं.
          उत्तप्पा सँडविचांप्रमाणेच आज शनिवार असल्याने बीसीवरच्या गोल भज्यांची आठवण होतेय. Happy

          -------------------------------------------
          हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

          "पीआयईटी" ह्या नावामागचं कारण म्हणजे एक खूप जुना कायदा (म्हणे !). स्वायत्त तांत्रिक संस्थांमधे ते Institute असं काहीतरी असावंच लागायचं म्हणे (आठवा Indian Institue of Technology). COEP परत करण्यासाठी केंव्हातरी लोकसभेत एक विधेयक आणून तो कायदा बदलावा लागला का त्याची अंमलबजावणी ऐच्छीक केली असे मी ऐकून आहे.

          अस नाही आहे.
          Technology असायला पाहिजे.

          इथे इतके सग्ले सी ओ इ पी चे लोक पाहून छान वातले.

          मी इथे अमेरिकेत नविनच.याच वर्शी आलो.

          सध्याचे नाव पीआयइटीझ (PIET's) कॉलेज ऑफ इंजिनिअरींग असे काहीसे आहे.... म्हणजे नावात अजूनहि COEP आहे....

          त्या कोडगिर्‍यांच्या मेटॅलर्जीच्या पुस्तकाचा मी फॅन होतो... भारी आहे ते पुस्तक... Happy

          डॉ. अशोक घाटोळ मी अमरावतीच्या शा. अ. म. मधे शिकत असताना आमचे प्राचार्य होते. आम्हाला त्यांनी दोन तीन विषय पण शिकवलेत आणि माझे तर शेवटच्या वर्षाचे प्रोजेक्ट गाईड पण तेच होते. खूपच कडक मनुष्य. कधीपण पहावं तर फक्त ओरडणे माहिती. पण या व्यक्तीच्या दोन छटा मी पाहिल्या आहेत. कारण ते माझे गाईड होते म्हणून आम्ही त्यांच्या घरी पण जायचो. आम्ही त्यांना नाना पाटेकर म्हणून बोलायचो. घरी ते खूपच शांत वागायचे. फक्त कॉलेजमधेच तेवढे कडक्-धडक असायचेत. त्यांची दोन मुले, आई खूप प्रेमळ आहेत.

          त्यांचा एक मजेशीर स्वभाव म्हणजे बाहेर जर आपण तास सुरू असताना दिसलो तर ते विचारायचे तू कुणाचा मुलगा/तू कुणाची मुलगी? त्यावेळी ते आमचे H. O. D. होते म्हणून त्यांना अपेक्षित असायचे की हो आम्ही तुमचीचं मुले Happy

          खूप छान रे मित्रान्नो.....
          मी २००४ चा धातूशास्त्राचा पास आऊट... कोडगिरे, घाटोळ, बी.सी., बाबू, केन्टीन, मेटॅलर्जी आणि बाकीच्या शाखा... छान वाटल..

          "पीआयईटी" चा हट्ट घाटोळ सरान्चा होता हे सर्व मान्य आहे. मी तर असे ही ऐकले आहे की, COEP चा पीआयईटी झाल्यानन्तर (खास लोकाग्रहास्तव!) पुन्हा COEP करण्यात आल....

          (आव्व्व्व्वाज कुणाचा ................... सी ओ इ पी चा..............)

          सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा..... Happy

          >>त्यांची दोन मुले, आई खूप प्रेमळ आहेत.
          त्यांना तुमच्याबद्दल सहानुभूती वाटत असणार! Proud
          >>त्यांना अपेक्षित असायचे की हो आम्ही तुमचीचं मुले
          फिया भरायच्या वेळीही तसं उत्तर अपेक्षित असायचं का? Wink

          -------------------------------------------
          हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

          नमस्कार सी.ओ.ई.पी. रसिकहो,
          येत्या शुक्रवारी, दि. १३ मार्च रोजी आपल्या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात, विख्यात निसर्गनिरीक्षक
          श्री. किरण पुरंदरे यांचा "रानगुंफ़ी" हा अत्यंत सुंदर, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सी.ओ.ई.पी. वाद-विवाद व वक्तृत्व मंडळातर्फ़े आयोजित केला आहे.
          हा कार्यक्रम सर्व रसिकजनांसाठी खुला आहे.*
          वेळ- दुपारी १२.३० वाजता
          स्थळ - सी.ओ.ई.पी. ऑडिटोरीअम
          या कार्यक्रमासाठी तुम्हाला हार्दिक निमंत्रण!!!

          ३० वर्षांनी पुरूषोत्तम करंडक जिंकल्या बद्दल सी ओ इ पी च्या आजी व माजी विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन. वैभव तत्ववादी व आश्विनी शहा यांना अभिनयाचा पुरस्कारही मिळाला. त्यांचेही अभिनंदन.

          >>३० वर्षांनी पुरूषोत्तम करंडक जिंकल्या बद्दल
          यामुळे जास्त कौतुक वाटतं! अभिनंदन! वैभव तत्त्ववाद्याला माझ्या आठवणीप्रमाणे दोन वर्षांपूर्वी फिरोदिया करंडकातही अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं.

          बरोबर आहे...पुरुषोत्तम कधीच मिळाल्याचं ऐकल नव्हतं...खूप आनंद झाला ती बातमी ऐकुन...आम्ही असताना फिरोदिया मिळाला होता इन १९९१-९२. तो खुपच छान अनुभव होता....

          अरे वा...
          माबो वर येऊन ३ वर्षे झाली... इथे पहिल्यांदाच येतोय... मी - २००६, comp passout.. Debating group चा सक्रिय मेंबर...

          संकल्प द्रविड - विपू वाचणे..