Submitted by चैतन्य दीक्षित on 23 December, 2010 - 22:46
ओळखी पुसल्याच नव्हत्या एकमेकांच्या, म्हणूनच,
ओळखी पुसल्या, तरीही शांत दोघे आज आपण ॥
नांव होते परिचयाचे, होत होते बोलणेही
... आज काळाच्या तलावी, त्या तरंगांचे न कंकण ॥
नागमोडी रानवाटा, पाखरे गेली उडोनी,
बांधले नव्हतेच घरट्याला कधी चाहूलतोरण ॥
भरदुपारी येत गेले मेघ काळे, चिंब पाउस-
-अन् उसासे खिन्न, आले त्या मिठीला पोरकेपण ॥
संधिकाली आजही येतात विस्कटले तराणे,
ओळखीचा स्वर, म्हणूनच ऐकतो गंधाळले क्षण ॥
ओळखीचे फक्त आता ओंजळीतिल चांदणे हे,
चंद्र पुनवेचा निसटला, आणि अंधारात अंगण ॥
ओळखी पुसल्यात साऱ्या, हे कधी विसरू नये मी,
म्हणुन आहे अंतरी, त्या विस्मृतीचे एक गोंदण ॥
- चैतन्य
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ओळखी पुसल्यात साऱ्या, हे कधी
ओळखी पुसल्यात साऱ्या, हे कधी विसरू नये मी,
म्हणुन आहे अंतरी, त्या विस्मृतीचे एक गोंदण ॥
सुंदर!!!
सुंदर कविता.
सुंदर कविता.
छान, आवडणीय !
छान, आवडणीय !
शेवटच्या ओळी फार आवडल्या.
शेवटच्या ओळी फार आवडल्या.
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार!
"ओळखीचे फक्त आता ओंजळीतिल
"ओळखीचे फक्त आता ओंजळीतिल चांदणे हे,
चंद्र पुनवेचा निसटला, आणि अंधारात अंगण ॥"
.... छान
चैतन्य, संधिकाली आजही येतात
चैतन्य,
संधिकाली आजही येतात विस्कटले तराणे,
ओळखीचा स्वर, म्हणूनच ऐकतो गंधाळले क्षण ॥
ओळखीचे फक्त आता ओंजळीतिल चांदणे हे,
चंद्र पुनवेचा निसटला, आणि अंधारात अंगण ॥
-- खुपच छान जमले आहे. पुलेशु
ओळखी पुसल्यात साऱ्या, हे कधी
ओळखी पुसल्यात साऱ्या, हे कधी विसरू नये मी,
म्हणुन आहे अंतरी, त्या विस्मृतीचे एक गोंदण
>>>
मस्त !!
कित्ती जुनी आहे ही कविता !
फार दिवसांनी ऐकली ! मजा आली !!
जय हो !!
होय पंत...! जुनी आहे खूप
होय पंत...!
जुनी आहे खूप कविता...
आत कुठे तरी बसलीये रुतून..