बर्याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.
या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३
===========================
नंद्याने या धाग्यावरच्या ज्या पोस्टींमध्ये चीजांचे दुवे आहेत अशा पोस्टी शोधून काढलेली ही यादी -
यापुढे ही यादी अपडेट करत राहू.
पान ३:
लट उलझी सुलझा जा बालम-झिला खान (विलायत अली खाँ साहेबांची मुलगी)
दोन-तीन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विषयक ब्लॉग्ज
गुलाम अली खांच्या आणि बशीर अली माही : जंगल भैरवी (म्हणजेच सिंध भैरवी का?) - नैना मोरे तरस गये आजा बलम परदेसी रे
बडे गुलाम अली खां : राग भैरवी - बाजूबंद खुल खुल जाए
भुवनेश कोमकलीच्या आवाजात सावरे ऐजय्यो
राग केदार : पिहरवा घर आओ. - बागेश्री
पान ४:
पंडित छन्नुलाल मिश्र (होरी) - खेलैं मसाने में होरी दिगंबर खेले मसाने में होरी
रचना : परवीन शाकिर, स्वर : बल्किस खानुम गोरी करत सिंगार
गिरीजादेवी : दादरा - गंगा-रेती में बंगला छबा मोरी राजा आवै लहर जमुने की
पान ५ :
रंग जीन डारो
काफी - अभिषेकी बुवांच्या आवाजात - काफीतली चीज.
राग देस - मालिनी राजूरकरांची होरी
पान ६ :
अबदुल करीम खाँच्या आवाजात - जमुना के तीर
पान ७ :
बेगम अख्तर : दादरा - ओ बेदर्दी सपने में आजा
जोहराबाई आग्रेवाली - कोयलिया कूक सुना दे
गिरिजादेवी : भैरवी ठुमरी - नाहक लाए गवनवा
चंद्रकंस - १,
पान ८ :
चंद्रकंस - २
काही दुर्मिळ चीजा
किशोरीताईंच्या आवाजात - गौड मल्हार
दाद यांची पोस्ट
गणपती भटांचा हंसध्वनी
बेगम अख्तर - पपीहा धीरे धीरे बोल
पान ९ :
यमन - ए री आली पिया बिन - लता मंगेशकर
पान १० :
नुसरत फतेह अली खां (उस्ताद रशीद खां यांच्या आवाजातही) : मिश्र काफी - किरपा करो महाराज मोइनुद्दीन
मारवा- (हे शब्द आहेत वसंतरावांच्या मारव्याचे) मदमाती चली चमकत दामनीसी |
श्री रागामधली द्रुत त्रितालामधली ही बंदिश कुमाजींनी अत्यंत भावदर्शी गायली आहे.
इतना तो करना स्वामी, जब प्रान तन से निकले -- शौनक अभिषेकींनी गायलेल
इतना तो करना स्वामी अभिषेकी बुवांच्या आवाजात
* * * * *
पान ११:
D V Paluskar : तिलककामोद
तिलककामोद मधील 'सूर संगत रागविद्या' अश्विनी भिडे-देशपांडे ह्यांच्या आवाजातील
कबीराची सुंदर रचना....पं कुमार गंधर्वांच्या सुवर्णकंठातून ऐकली आहे.
डी व्ही पलुस्कर - कोमल रिषभ आसावरी
पं. रामाश्रेय झा यांची एक सुंदर रागमाला शुभा मुद्गलांच्या आवाजात
उस्ताद रशीद खां : भैरवी - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पान १२:
गुणकली
आचार्य गोस्वामी गोकुलोत्सव : गुजरी तोडी - मन के पंछी भये बावरे
संजीवच्या आवाजात हंसध्वनी इथे ऐका
रशीदखाँची यमनातली - 'आओ आओ आओ बलमा' पण अप्रतिम आहे.
राग तिलंग : ठुमरी सजन तुम काहे को नेहा लगाये
मालिनी राजूरकर - भैरवी फुल गेंदवा अब ना मारो
शोभा गुर्टू : विभासआ जा रे मीत पिहरवा
राग देसः संजीव अभ्यंकर - नैनन मे छबि छायी सजनी |
पान १३:
निर्मला देवी व लक्ष्मी शंकर यांच्या आवाजात : नैना मोरे तरस गये री श्याम
सविता देवी ( सिध्देश्वरी देवींच्या सुकन्या) यांच्या आवाजातील ही ठुमरी पड गैली नैहरवा में दाग धुमिल भइली चुनरिया
डॉ. अनिता सेन यांच्या आवाजातील चैती माणिक हमरो
बोल गुणिदास यांचे, म्हणजेच पं. जगन्नाथबुवा पुरोहित - 'आई शपथ' सिनेमातली एक सुंदर बंदिश.
गोरख कल्याण -संजीव अभ्यंकर
निर्मला देवी / निर्मला अरुण पहाडी - ठुमरी
पान १४:
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या आवाजात राग : मिश्र तिलक कामोद
ठुमरी : सैंय्या जी बैरन रतियां
राग : इराणी भैरवी
कबीराचे पंडित कुमार गंधर्व व श्रीमती वसुंधरा कोमकली यांच्या आवाजातील निर्गुणी भजन
आशाताईंच्या आवाजात मीराबाईंचं भजन
भीमसेन जोशींचा एक मस्त दुर्गा
मुनावर अली खान यांच्या आवाजात ठुमरी : राग - पहाडी, दादरा
पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या आवाजात राग बिहारी
संजीव अभ्यंकर राग : जौनपुरी
अश्विनी भिडे-देशपांडेंचा एक मस्त यमन
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी यांची जुगलबंदी : कजरी
रशीद खाँ यांच्या आवाजात ही ठुमरी : निस्सार हुसैन खाँ यांच्या आवाजात : राग : मिश्र पिलू
पं. कुमार गंधर्व ह्यांच्या आवाजात : राग भूपाली, तीनताल
पं कुमार गंधर्वांनी गायलेली अजून एक बंदिश : राग : नंद, तीनताल
हे मीराबाईंचे भजन भीमसेनजींच्या आवाजात : राग : पटदीप
पान १५:
एरी मोरी आली पिया घर आए.
गिरिजादेवींच्या आवाजात : राग मालकंस
अण्णांच्या आवाजात बाबूल मोरा
केसरिया बालम आवो नीं
संजीव अभ्यंकर - ऋतुरागरंग= बसंत, मल्हार, रागमाला
शोभा गुर्टूंनी गायलेलं केसरिया बालम ,
रंग रंगीला बदरा मोरा उस्ताद रशीद खाँ ,यात्रा अल्बम ,
कहूँ कैसे सखी मोहे लाज लगे उस्ताद रशीद खाँ , मिश्र मल्हार , ''नैना पिया से'' अल्बम ,
होरी गिरिजादेवींच्या आवाजात ,
जोगिया मेरे घर आये पं राजन साजन मिश्रा.. राग ललत ,
भैरव ,
राम निरंजन न्यारा रे पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
माया महाठगिनी हम जानी पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
तोडीमधलं 'तू है मेरा प्रेमदेवता' ,
कुमार गंधर्वांशी गप्पा ,
पान १६:
चैती बरवा कलापिनी कोमकली यांच्या आवाजात ,
झिनी चदरिया कलापिनी कोमकली यांच्या आवाजात,
उस्ताद आमीर खाँ साहेबांच्या आवाजात राग ललत ,
नैहरवा हम का न भावे, न भावे रे संत कबीरांची कुमार गंधर्वांच्या स्वरातील एक अजून निर्गुणी रचना ,
गगन की ओट निशाना है जगजीत सिंग यांच्या आवाजात संत कबीराची ही एक निर्गुणी रचना ,
गले बिच सेली मधे 'सेली' चा काय अर्थ असावा ,
बैरी जा बैरी जा जा जा जा बैरी जा शोभा गुर्टू ,
कुमार गंधर्वांच्या आवाजात - कबीराचे 'कौन ठगवा नगरिया' हे निर्गुणी भजन
पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात ही भैरवी - बांट चलत नयी चुनरी रंग डारी
पं अजय पोहनकरांच्या आवाजात राग बागेश्री - सखी मन लागे ना
जगजीत सिंग यांच्या आवाजात -दीनन दु:ख हरन देव संतन हितकारी
साजन मिश्रांच्या आवाजात - जागिये रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले
पं राजन साजन मिश्रा - ए जननी मैं न जिऊं बिन राम
पान १७:
उस्ताद नासिरुद्दीन सामी यांच्या आवाजात - राग तोडी : अब मोरी नैय्या पार करोगे
अजय चक्रवर्तींची एक भैरवी-याद पिया की आये
याद पिया की आए :
अजय चक्रवर्तींची, वडाली बंधूंची, बडे गुलाम अलीं, कौशिकी चक्रवर्ती, शोभा गुर्टूं , मीराबाई की मल्हार पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात , दयाघनाची मूळ बंदिश रसूलिल्लाह
स्वाती कानेटकर , रंग ना डालो श्यामजी
कलापिनी कोमकली : राग सोहनी , झीनी चदरिया
कलापिनी कोमकलींचंच हे निर्गुणी भजन , झीनी चदरिया मूळ भजनाचे शब्द
सुने री मैंने निर्बलके बल राम
डी एस पलुस्करबुवांच्या आवाजात सूरदासांची ही अजरामर रचना ,
पं भीमसेन जोशींच्या आवाजात : राजस सुकुमार
रसूलिल्लाह
मूळ हृदयनाथ मंगेशकर, लताताईंच्या आवाज , सांझ भयी घर आवो
सिध्देश्वरी देवी , लगन बिन जागे ना निर्मोही
भजन कबीराचं आहे. राग : हंसध्वनी, केहरवा ताल. आर्या , संजीव, लगन बिन जागे ना
अश्विनी भिडे देशपांडेंच्या आवाजात , वही जाओ जाओ जाओ बलम
मालिनीताई राजूरकर, मिया की तोडी : लंगर कंकरिया जी न मारो
पद्मावती शाळिग्राम, पं भीमसेन जोशीं, भीमसेनजी आणि उस्ताद रशीद खाँ , राग : देशकार/ देसकार : हूँ तो तोरे कारन जागी
उस्ताद रशीद खाँ , पं मल्लिकार्जुन मन्सूर , राग : बसंत : पिया संग खेलूँ खेलूँ होरी
उस्ताद रशीद खाँ , उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ , आज आये शाम मोहन
गणपती भट , सुनता है गुरू ग्यानी राहुल देशपांडे
पान १८:
सुनता है गुरु ग्यानी' चे शब्द आणि कुमार गंधर्वांच्या आवाजातील दुवा - सुनता है गुरु ग्यानी -
डी व्ही पलुस्कर बुवांच्या आवाजात तुलसीदासाचं सुंदर भजन - कहां के पथिक कहां कीन्हो है गवनवा
- भोला मन जाने आणि अवधुता कुदरत की गत न्यारी
अजय चक्रवर्तींचा काफी - जा रे जा रे जा रे जा कोयलिया
पं. कुमार गंधर्वांचा राग गौरी बसंत - आज फेरिले / पेरिले गोरी
गुरू नानकांची शबद रचना (गायक पं. राजन साजन मिश्रा) - जगत में झूठी देखी प्रीत
- अवधूता कुदरत की गत न्यारी
विदूषी प्रभा अत्रे- यमन - विलंबित- मन तू गा रे हरीनाम, द्रुत- लागी लागी रे हरीसंग
कजरी - शोभा गुर्टू - तरसत जियरा हमार नैहर
उस्ताद रशीद खाँ : राग पिलू - अब मान जाओ सैंय्या
पं अजय चक्रवर्ती व कौशिकी चक्रवर्ती - वैष्णव जन तो तेने कहिये
पं. भीमसेन जोशी : छाया मल्हार - बदरिया बरसन लागी उमड घुमड कर (गिरे)
पं. भीमसेन जोशी - बीत गये दिन भजन बिना रे
पं. भीमसेन जोशी : राग तोडी - ए री माई आज शुभ मंगल गावो
एम एस सुब्बलक्ष्मी, वाणी जयराम, लता मंगेशकर - श्याम मने चाकर राखो जी चाकर रहसूं बाग लगासूं
गंगूबाई हंगल - मिया की मल्हार - कहे लाडली लाड लडायी बरखा ऋत
पं. भीमसेन जोशी - मिया की मल्हार - करीम नाम तेरो
पान १९:
बडे गुलाम अली खाँ साहेबांची देसी रागातली चीज - जा रे कागा जा
बदर-उझ-नझम आणि कमर-उझ-नझम यांच्या आवाजातजमुना के तीर
पं भीमसेन जोशीं : राग भीमपलासी - ब्रिज में धूम मचावे कान्हा
संजीव अभ्यंकरः पूरिया कल्याण - विलंबित - अंधियारा कर दो उजाला, द्रुत - दिन रैन कछु न सुहावे
शौनक अभिषेकी - शिव तांडव स्तोत्र
अश्विनी भिडे-देशपांडे : राग मधुवंती - शिव आद मध अंत बलवंत जोगी
उस्ताद रशीद खाँ : राग बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगरा/डा प्रीतम प्यारे
पाकीस्तानी गायीका नयारा नुर
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - पायलिया झनकार मोरी
पं.जसराज भजन
उस्ताद रशीद खाँ : बिहागआली री अलबेली सुंदर नार
पं कुमार गंधर्व : मियां की मल्हार - विलंबित एकताल- करीम नाम तेरो, मध्यलय तीनताल - बोल रे पपैहरा
पं अजय चक्रवर्ती - जमुना के तीर
अश्विनी भिडे-देशपांडें (मीराबाईंचं भजन) - मेरे राणाजी, मैं गोविन्द-गूण गाना
डी व्ही पलुस्कर (कबीराचे भजन)भजो रे भैया राम गोविंद हरी
डी व्ही पलुस्कर, मुनावर अली खाँपग घुँगरू बांध मीरा नाची रे
उस्ताद रशीद खाँ : राग हंसध्वनीलागी लगन पती सखी संग
पान २० :
शोभा गुर्टू - सुनो सुनो सुनो रे दयाल म्हारी अरजी
माणिक वर्मा - जमुना के तीर
फतेह अली खान - पिया नही आए आए सखी
उस्ताद बडे गुलाम अली खाँ, मुनावर अली खाँ (मुघले आझम चित्रपटातील) : सोहिनी - प्रेम जोगन बन के
पं कुमार गंधर्व : शिवमत भैरव - अरी एरी माई मै
पं अजय पोहनकर - दरबारी कानडा - किन बैरन कान भरे
उस्ताद फतेह अली खान : राग : दरबारी कानडा - नैन सो नैन मिलाये रख लीजो
उस्ताद नजाकत अली - सलामत अली खाँ, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब, बिल्किस खान्नुम - अनोखा लाडला ए मा
पं जसराज - अनोखा लाडला
कुमार गंधर्व - भैरव - ऋत आयी बोले मोरा रे
कुमार गंधर्व - कबीराची निर्गुणी रचना - उड जायेगा हंस अकेला
* * * * *
पान २१ :
उस्ताद सलामत अली खान : भैरवी ठुमरी - शापमोचन कलियन संग करता रंगरलियाँ
पं जसराज, उस्ताद रशीद खाँ - जा जा रे जा (ओ) कागवा
मालिनी राजूरकर : टप्पा काफी; ताल : पंजाबी (पश्तो) - माधो मुकुंद मुरारी
मालिनीताई राजूरकर - राग काफी - चांडो चांडो छैला मोरी बैय्यां
पं राजन साजन मिश्रा - राग अडाना - तान कपतान (कप्तान) कहां गयो
आरती अंकलीकर टिकेकर, सावनी शेंडे, आरती नायक, जानकी अय्यर (''सावली'' चित्रपटातील) - साँवरियां घर नही आये, घनन घनन घन गरजत आये, सुर जन सो मिला दे मैं को
शुभा मुद्गल : संत कबीर यांचे एक भजन - दुलहनी गावहु मंगलचार
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - खुश रहे सनम मोरा
उस्ताद रशीद खाँ : राग छायानट - झनन झनन झन नन नन नन नन
कुमार गंधर्वांवरील एक डॉक्युमेंट्री - कोई सुनता है - जर्नी वुईथ कुमार अॅन्ड कबीर
उस्ताद रशीद खाँ - राग देस - नादान जियरा गुम गयो रे
उस्ताद शाहिद परवेझ (सतार) व उस्ताद रशीद खाँ - करम कर दीजे ख्वाजा
श्रुती सडोलीकर : कुंभनदासांची रचना : हवेली संगीत - सखी बूँद अचानक लागी
श्रुती सडोलीकर - राग पटदीप - होरी खेलत बहार
पं छन्नुलाल मिश्रा - चैती - सेजियां से सैंया रूठ गईलो हो रामा
गिरिजा देवी - बरसन लागी बदरिया, रुमझूमके
पान २२ :
गिरिजा देवीं - बनारसी दादरा - दीवाना किये श्याम क्या जादू डारा
पं. डी व्ही पलुस्कर - अखियाँ हरीदर्शन की प्यासी
उस्ताद रशीद खाँ : भैरवी - मीराबाईंचं सुंदर भजन - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पं अजय चक्रवर्ती - राग कलावती - मेरा मन हार रसमत
उस्ताद रशीद खाँ - दरस देओ बलमा मोरा
पं डी व्ही पलुस्कर - राग विभास / बिभास - कैस कुमरवा जायल हमरा
अश्विनी भिडे देशपांडे : राग जौनपुरी - पायल बाजन लागी रे मोरी
पंडित भीमसेन जोशी : राग केदार - सावन की बूँदनियाँ बरसत घनघोर
पंडित भीमसेन जोशी : भैरवी - बोले ना वो हमसे पिया संग
पंडित भीमसेन जोशी : केदार (विलंबित) - सोहे लराई माई बनरा जाने आवन ऋतु
पंडित भीमसेन जोशी - राग : यमन कल्याण - काहे सखी कैसे की करीये(विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया
पान २३ :
उस्ताद रशीद खाँ - राग : चारूकेशी - पलक न लागी मोरी गुइयां
शुभा मुद्गल - मीराबाईचं हे भजन - बंसीवारा आज्यो म्हारे देस
बडे गुलाम अली खान/भीमसेन जोशी/लता मंगेशकर/मुनावर अली खान/फरीदा खान्नुम - बाजुबंद खुल खुल जा
बडे गुलाम अली खाँ - राग : मेघ - मोरे मंदर अब आओ साजन
सलामत अली खान - ठुमरी राग : पहाडी - तोरे नैनोंने जादू किया मोरे सांवरियाँ
सिप्रा बोस - दादरा राग : पहाडी - चले जै हो बेदर्दा हम रोए मरी है
किशोरी आमोणकर - ठुमरी राग : पहाडी - सावन की ऋतु आयी री सजनीया
पं भीमसेन जोशी/सुब्बलक्ष्मी - संत पुरंदरदासांचे प्रसिध्द कानडी भजन - भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
पंडित भीमसेन जोशी / पं जसराज - राग : मधुवंती - काहे मान करो सखी री अब
अश्विनी भिडे देशपांडे - सूरदासांचं भजन - सुंदर वदन सुख सदन श्याम को निरख नयन मन ठाग्यो
पं कुमार गंधर्व - राग मालावती - मंगल दिन आज बन्ना घर आयो
गिरिजा देवी - कजरी - पिया नही आये काली बदरिया बरसे
गिरिजा देवी - झूला - सिया संग झूले बगिया में राम ललना
गिरिजा देवी - होरी - रंग डारूंगी नन्द के लालन पे
कलापिनी कोमकली - चैती - पतिया न भेजे हो रामा
पं भीमसेन जोशी - मीराबाईंचं भजन - चलो मन गंगा-जमुना तीर
वसंतराव देशपांडे/भुवनेश कोमकली/राहुल देशपांडे - दादरा - जमुना किनारे मेरो गाँव ऐ जैय्यो साँवरे
पान २४ :
कैवल्यकुमार गुरव- यमन - सोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन मे(विलंबित), रे पिहरवा तोहे घरवा जाने ना दूंगी(द्रुत)
झोहराबाई आग्रेवाली - खमाज मधील बंदिश / झिला - कोयलिया कूंक सुनादे/सुनाये
पं छन्नुलाल मिश्र - होरी - बरजोरी करो ना मोसे होली में
पं छन्नुलाल मिश्र - होरी - कन्हैया घर चलो गुईयां आज खेलैं होरी
पं भीमसेन जोशी - रघुवर तुम को मेरी लाज
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली - सूरदासांचे भजन - नैन घट घट तन एक घरी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - साहब है रंगरेज चुनरी मोरी रंग डारी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - अवधू मेरा मन मतवारा
गौहर जान/रसूलन बाई/शाहिदा परवीन - दादरा (राग गारा) - आन बान जिया में लागी, प्यारी चित चोर
पं भीमसेन जोशी - राग श्याम कल्याण / पूरिया कल्याण - आज सो बना बन आयो री
उ.रशीद खाँ - राग हंसध्वनी - भज मन नित हरी को नाम (विलंबित), लागी लगन(द्रुत)
पं. सत्यशील देशपांडे : राग चारुकेशी - सुंदर सूरजनवा ठाडो री माई
पं भीमसेन जोशी/अहमद हुसैन महम्मद हुसैन - संत मीराबाईंचे भजन - तुम बिन मोरी कौन खबर ले
उस्ताद अमीर खान - राग चारुकेशी - लाज रखो तुम मोरी गुसाईयां
पं. रघुनंदन पणशीकर :ठुमरी- राग धनाश्री - कटत ना बैरन रैन
पं. कुमार गंधर्व/डॉ. वसंतराव देशपांडे - भैरवी ठुमरी - ना मारो भर पिचकारी जा मे तोपे वारी
उस्ताद रशीद खाँ - राग चारुकेशी - प्रेम बाजे मोरी पायलिया
उस्ताद अमीर खाँ साहेब/उस्ताद रशीद खाँ : राग मारवा - गुरू बिन ग्यान नहीं पावे
उस्ताद अमीर खाँ साहेब/पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग मारवा - पिया मोरे आनत देस गैलवा(विलंबित), पिया बिन जियरा निकसो जात(द्रुत)
पान २५ :
पं भीमसेन जोशी : राग मारवा - बंगरी मोरी मुरक गयी छांडोना बैंय्यां
पं कुमार गंधर्व : राग मालकंस - आये हो जी अजरी रात यही रहियो जी(विलंबित), फूल बेहाग ये बना(द्रुत)
गणपती भट : राग कलावती - सपनोंमें आया पिहरवा
पं कुमार गंधर्व- मालकंस - कैसो निकोला गो मा, आनंद मना आज आनंद मना, छब तेरी छब तेरी
पं जसराज : राग गुर्जरी तोडी - चलो सखी सौतन के घर जइये(विलंबित), बरस उघर गयो मेहा(द्रुत)
पं जसराज : राग भटियार - कोइ नहीं है अपना
पं डी व्ही पलुस्कर : राग देसी - नैय्या मोरी भयी पुरानी, सांची कहत है अदारंग यह(द्रुत)
पं.जसराज - अहीर भैरव - मोहन मधुर आज
पं कुमार गंधर्व : संत कबीरदासाची निर्गुणी रचना - हिरना समझ बूझ बन चरना
पंडित जसराज : अहिर भैरव - रसिया म्हारा आवो जी मेरे द्वार
पं जसराज : राग मुलतानी - सखी कान्हा बिन कछु सूझत नाहीं
उस्ताद मुनावर अली खान : राग गुर्जरी तोडी - भर डारूँगी रंग सों
उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब : राग गुर्जरी तोडी - भोर भयी तोरी बांट तकत पिया
पं कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीराचे निर्गुणी भजन - सखिया, वा घर सबसे न्यारा
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी - बिन पिया निंदियां न आये हो रामा
शोभा गुर्टू -ठुमरी : राग पिलू - होरी खेलन कैसे जाऊं
शोभा गुर्टू -ठुमरी : राग मिश्र भैरवी - नैय्या पडी मझधार
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी : शिवरंजनी - दगा देके ना परदेसवा सिधारे
मालिनीताई राजूरकर : भैरवी भजन - रूप अरुपी रंगरंगीला बिना अगन उजियारा
कुमार गंधर्व - कबीरांचे निर्गुणी भजन - अवधूता कुदरत की गत न्यारी
पान २६ :
शुभा जोशी : ठुमरी - भोर भइ ना आये पिया
अनिता सेन : ठुमरी / होरी - मोरी भीगी रेशम चुनर हो
पं अजय चक्रवर्ती : ठुमरी - दामिनी दमके जियरा लरजे
पं. भीमसेन जोशी : राग अभोगी - ए री चरण धर आयो
पं अजय चक्रवर्ती : कजरी - निंबुवा तले डोला रख दे मुसाफिर
उस्ताद फतेह अली खान : राग जौनपुरी - आली मोरी लगन लागी
पंडित जसराज : अहिर भैरव - आज तो आनंद आनंद
पं. फिरोझ दस्तुर/चंद्रशेखर वझे/अब्दुल करीम खान : राग सरपरदा बिलावल - गोपाला मोरी करुणा क्यूं न आवै गोपाल
जगदीश प्रसाद, सलामत अली खान - चंचल नार दुधारी कटरिया... रे राम
शोभा गुर्टू : ठुमरी - मिश्र तिलक कामोद - चंचल नार चतर हठधर्मी
शोभा गुर्टू : कजरी - सजणा बांट निरखता हारी
पं मल्लिकार्जुन मन्सूर, डॉ. बालमुरली कृष्णन् : बसवण्णांचे कानडी भाषेतील सुमधुर वचन - कळ बेडा कोल बेडा हुसियनुडियलु बेडा
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग : ललितागौरी - प्रीतम सैंय्या दरस दिखा जा
मोगूबाई कुर्डीकर : सावनी कल्याण - देव देव सत संग श्रीरंग भवदंग
डॉ. वसंतराव देशपांडे : मारु बिहाग - उन ही से जाय कहो मोरे मन की बिथा; मै पतिया लिख भेजू (द्रुत- तीनताल)
पं अजय चक्रवर्ती : मारु बिहाग - तरपत रैना दिना
पं अजय चक्रवर्ती : यमन - चंद्रमा ललाट पर सोहे भुजंग गर; किनारे किनारे किनारे दरिया- कश्ती बांधो रे
पंडित विष्णु दिगंबर पलुस्करबुवांवरील फिल्म्स डिव्हिजनचा - माहितीपट
शोभा गुर्टू : दादरा, मिश्र सारंग - पतझड आयी सखियां
पान २७ :
कृष्णा नी बेगने बारो - कृष्णा नी बेगने बारो
कौशिकी चक्रवर्ती : राग मिश्र तिलंग - मैं तो साँवर के रंग राची
पं भीमसेन जोशी व डॉ. बालमुरलीकृष्णन् : राग दरबारी - जुगलबंदी : नाथ हरे जगन्नाथ हरे
पं भीमसेन जोशी : वृंदावनी सारंग / ब्रिंदावनी सारंग - तुम रब तुम साहिब ; जाऊं मैं तोपे बलिहारी
मालिनी राजूरकर : राग विभास - पिया तुम वहीं जाओ ; बैरन ननदियाँ लागी दराद
उस्ताद आमिर खाँ - मोरे पिया ना बोले बतियाँ
फरीदा खानुम : राग शंकरा - झूलना झुला दे आयी ऋत सावन की
गिरिजा देवी : राग भैरवी - नयन की मत मारो तलवरिया
शशांक मक्तेदार : राग यमन - ननदी के बचनवा सहे न जात
पं. भीमसेन जोशी : राग खमाजी भटियार / झिंझोटी - महादेव देव पार्वतीपते त्रिशूलधारी शंभो
बेगम अख्तर : ठुमरी - ननदिया काहे मारे बोल
पान २८ :
उस्ताद रशीद खान/पं भीमसेन जोशी/गंगूबाई हानगल : राग अभोगी - चरण धर आयो मो पर दया करो
उस्ताद रशीद खान : बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगडा1
अजय चक्रवर्ती : राग अभोगी - कासे कहू दुखवा मै कैसे कहू ; लगन मोरी लागी श्यामबदनसो
अश्विनी भिडे देशपांडे : राग गारा - बदरिया बरसे रे सैंय्या, झुला धीरे झूल रे बदरिया
सलामत व नजाकत अली खान : राग अभोगी कानडा - लागी लगन मोहे पिया की ; तुम बिन मोहे पल(कल) नाही जावे
पं भीमसेन जोशी : राग बागेश्री कानडा - गोरे गोरे मुख पर बेसर सोहे
गंगूबाई हनगल : राग चंद्रकंस - कब घर आयो ओ पिया
गंगूबाई हनगल : राग बागेश्री - मान मनावे मेरी माने ; ऋतु बसंत तुम अपने उमंग सो
सुमधुर वाद्यसंगीत व गायनाच्या क्लिप्स आहेत तिथे - http://sarod.free.fr/
डॉ. सोमा घोष : राग कलावती - दरसन दीजो ओ श्याम (विलंबित) बोलन लागी कोयलिया (द्रुत)
अश्विनी भिडे-देशपांडे : राग काफी कानडा - लायी रे मद पिया (विलंबित) व कान्हा कुँवर के करपल्लव (द्रुत)
डी व्ही पलुसकर : राग बहार - कैसी निकसी चांदनी
पान २९ :
उस्ताद रशीद खान : राग जोग - साजन मोरे घर आये
वीणा सहस्रबुद्धे : राग शुध्द सारंग - अब मोरी बात मान ले पिहर
डॉ. प्रभा अत्रे : राग बागेश्री - जा रे जा बदरा तू जा
पं. जसराज : राग बिहाग भजन - किशोरी तोरे चरणन की रज पाऊँ
पं. जसराज (साथीला संजीव अभ्यंकर) : राग भैरव - मेरो अल्लाह मेहरबान
पं जसराज : राग चारुकेशी - लागेला मोरा मन
मालिनी राजूरकर : राग भोपाली - नू मन जोबन मान
शुभा मुद्गल : राग मारु बिहाग - मन ले गयो सांवरा
शुभा मुद्गल : राग नटभैरव - तन मन वारू रे तोपे मोरे पिहरवा
पं. नारायणराव व्यास : राग भैरव - जागो बृज/ ब्रिज राज कुंवर
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग यमनी बिलावल - आली रे कितवे गये लोगवा
पं. भीमसेन जोशी : राग सूर मल्हार - बादरवा बरसन लागी
पान ३० :
उस्ताद रशीद खान : राग अल्हैया बिलावल - सुमिरन भज मन नाम राम को
उस्ताद सलामत अली व नजाकत अली खान : राग जयजयवंती - आयो रे मोरा लालन घरवा
अमानत अली खाँ व फतेह अली खाँ : राग भोपाली - बाजे छुन छुन तेरे घुँगरू
फतेह अली खान : राग भूपाली - लागी रे नैन तुमसे पिया मोरे
उस्ताद अमानत अली, फतेह अली खान : राग मालकंस - प्यार नही है सुर से जिसको
मोगूबाई कुर्डीकर : राग बिहाग बहार - फिर आयी लौट बहारें
गंगूबाई हनगल : राग देशकार - अमिला मदमाती बोलो जी
वीणा सहस्रबुद्धे : मालकंस - दुर्गे भवानी
पं. भीमसेन जोशी : राग मालकंस - (विलंबित एकताल) पग लागन दे महाराज कुँवरा (द्रुत तीनताल) रंग रलिया करत सौतन के संग
पं. कुमार गंधर्व : मीराबाई भजन कजरी - म्हारा ओलगिया घर आया जी
संजीव अभ्यंकर : राग भटियार - (विलंबित) उचट गयी निंदिया मोरी व (द्रुत) पिया मिलन को जाऊं सखी री आज
प्रभा अत्रे/परवीन सुलताना : राग खमाज ठुमरी - कौन गली गयो श्याम
उस्ताद रशीद खान, हिरा देवी मिश्रा : देस ठुमरी - मोरा सैंया बुलावे आधी रात
शोभा गुर्टू : भैरवी ठुमरी (पंजाबी अंग) - छोड गया राम साजन मेरा
उस्ताद बरकत अली खान : राग पिलू ठुमरी - भजन : तुम राधे बनो श्याम
बडे गुलाम अली खाँ : ठुमरी खमाज - पानिया भरन कैसे जाऊं री
पान ३१:
पं मल्लिकार्जुन मन्सूर : सुघराई कानडा - पिया बनजारा बनज सुहाने
सूरश्री केसरबाई केरकर : राग गौड मल्हार - मानन करी रे गोरी
उस्ताद सलामत अली खान : राग मियां की मल्हार - जल रस बूँदन बरसे ('जलसा-घर' चित्रपट)
शोभा गुर्टू : दादरा - छाई घटा घन घोर
मिताली बॅनर्जी भौमिक : कजरी - सजनी छाई घटा घनघोर
बशीर अली माही : राग पिलू ठुमरी - तुम हो गरीब नवाझ दाता
बिदुर मलिक : भैरवी ठुमरी - बँसिया न तेरो कन्हैय्या मोरा
एम. एस. सुब्बलक्ष्मी : मीराबाई भजन - बसो मोरे नैनन में नंदलाल
पं अजय चक्रवर्ती : राग हमीर - मदवा पिया हे
डॉ. बालमुरलीकृष्णन् व पं. अजय चक्रवर्ती जुगलबंदी : राग हंसध्वनी - गायति वनमाली १
बशीर अली माही : खमाज ठुमरी - ना जा पी परदेस बालम
पं अजय चक्रवर्ती : राग रागेश्री, खमाज थाट - (विलंबित) सब सुख देवो मोरे करतार, (द्रुत) बेगुन को गुनवंत दाता
बडे गुलाम अली खान : राग पहाडी - हरी ॐ तत्सत्
पं. मलिक : राग भैरव : ध्रुपद - लंबोदर गज आनन गिरिजासुत
पं. डी. व्ही. पलुसकर/पं. भीमसेन जोशी : तुलसीदास भजन - भज मन राम चरण सुखदायी
उस्ताद रशीद खान : राग मियां की मल्हार - आये बदरा बरसन
पं. भीमसेन जोशी : मियां की मल्हार - मोहम्मद शाह रंगीले बालम
अनुराधा कुबेर : राग भिन्न षड्ज - बैरी बदरा
बिदुर मलिक : भैरवी दादरा - सखियन संग रार करत
शुभा मुद्गल : कबीर भजन - हँमारे राँम रहीम करीमा केसो
शुभा मुद्गल : बनारसी दादरा - सुंदर सारी मोरी
उमाकांत व रमाकांत गुंदेचा : ध्रुपद - एकदंत गजबदन बिनायक (तानसेन रचित)
पंडित जसराज- राग शंकरा - (विलंबित) शिव शंकर महादेव आदिपुरुष अनादि महेश्वर, (द्रुत) विभूषितानङ्गरिपूत्तमङ्गा
शोभा गुर्टू व गिरिजा देवी जुगलबंदी : दादरा - लागी बयरिया में सो गयी
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - सब रस बरसे नयनवा
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - शाम भई बिन शाम
पं भीमसेन जोशी : कबीर भजन - बीत गये दिन भजन बिना रे
पान ३२:
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सीरीज) - आवो आवो नगरिया हमारी रे
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली : मीरा भजन - सखी मोरी नींद नसानी हो
बेगम अख्तर : खमाज दादरा पूर्वी - जरा धीरे से बोलो कोई सुन लेगा
पं. डी व्ही पलुसकर : तुलसीदास भजन - जानकीनाथ सहाय करे जब
सिद्धेश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - अरे गुईयां दरवाजवा
पं. दिनकर कैकिणी : राग परज - सखी मैं क्यों गइ जमुना पानी
गिरिजा देवी/उस्ताद रशीद खान : दादरा - दीवाना किए श्याम क्या जादू डारा
===========================
या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३
नितिनचंद्र, कधी काळी
नितिनचंद्र,
कधी काळी दुरदर्शनरच्या एका कार्येक्रमात पं. ह्रदयनाथांनी " गणराज रंगी नाचतो " हे गाणे एका चिजेवरुन शांता शेळके यांना लिहायला सांगीतले; असे सांगितले. कोणाला महित आहे क ती चीज ?
>>>>>
सावन की रुत घोर (गणराज रंगी नाचतो)
बदरा कारे (पायी घागर्या करिती रुण्झुण)
भिगे मोरा आचरा ..... (नाद स्वर्गी पोचतो)
अशी काहीशी होती.
प्यारे, स्केल बदलणे म्हणजे
प्यारे, स्केल बदलणे म्हणजे ग्रह्-भेद्/मूर्छना.
बर, मित्रांनो .. ४-६ दिवस मी सुट्टीवर आहे . धागा असाच चालू ठेवा.. माहिती मिळते आहे.. I'm Lovin it ..
षडजं - दुव्यांबद्दल आणि
षडजं - दुव्यांबद्दल आणि चंद्रकंसाच्या माहितीबद्दल खूप धन्यवाद. (रात्री घरून ऐकेन)
गुर्जींनाही विचारते चंद्रकंसाबद्दल. काही नवीन कळले तर टाकेन.
मालकंस आणि रात्रीच्या प्रहराबद्दल अगदी अगदी.
मालकंस एकेकाळी बारा महिने तेरा काळ ऐकला होता एवढा आवडायचा.
जामोप्या- मस्त माहिती.
चैतन्य- फाईल पाठवाल का? प्रयत्न करेन.
गजानन- मोरा आहे? तालात जरा कोंबावेच लागेलना. म्युझिक रुम चा दुवा तुझ्या विपुत टाकते.
लक्ष्मी शंकर यांच्या आवाजातील
लक्ष्मी शंकर यांच्या आवाजातील हे गाणे
(अपूर्ण)
राग देस :
बीत जात बरखा रितु सजन नही आए ए री ए री...
बिजुरी चमक जिया डरावे
नयन मोर पपीहा बोलत पिहू पिहू करे पुकार
उनके जोबन बिरहा सतावे ऐसी पिया दुख देरी
@ रैना, नक्की पाठवेन
@ रैना,
नक्की पाठवेन फाईल.
ई-पत्ता देता का? किंवा इथे तशी एम्पी३ पोस्ट करायची सोय आहे का?
मूर्च्छनेबद्दल एक किस्सा:
समर्थ रामदासांकडे एक अहंमन्य गायक आला होता म्हणे. त्याने स्वत;ची खूप बढाई मारत, समर्थांसमोर गायन सादर केले.
त्याचा अहंकार समर्थांनी ओळखला, आणि मूर्च्छना-पद्धतीने गायन केले आणि त्या गायकाला खरोखर मूर्च्छित केले.
(मूर्च्छना ह्या नावाचा मूर्च्छा येण्याशी खरोखरीच संबंध आहे का ते माहिती नाही. पण हा किस्सा समर्थ-चरित्रात वाचला होता.)
:समोर अंथरलेल्या सतरंजीवर,
:समोर अंथरलेल्या सतरंजीवर, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून, कान आणि डोळे उघडे ठेवून, आपला नसलेल्या प्रांतातीलची अमृतकण मुखी पडतायत का पहात ठीय्या लावून बसलेली आणखी एक गुणी बाहुली:
आश्विनी के धन्स गं. मी ही हा धागा वाचतेय, काय प्रतिसादू प्रश्न पडत... काही तरी सहभाग हवाच आपला असं वाटत असताना तुझा प्रतिसाद भावला, आपला वातला. मग केली जरा कॉपी
" नीर भरन कैसे जाऊ सजनी अब
डगर चलत मोसे करत रार अब ||
ऐसो चंचल चपल हट नटखट मान
तन काहू की बात बिनती करत मै तो
गईरी हार अब | " - तिलक कामोद
यातले रार म्हणजे काय ?
@ अवल रार म्हणजे कदाचित लाड
@ अवल
रार म्हणजे कदाचित लाड असं असावं.
('ल'काराचा आणी 'ड' काराचाही 'र' होतो बर्याच चिजांमध्ये)
म्हणजे मी रस्त्याने जाताना हा माझ्याशी लाड (लाडीगोडी/छेड ह्या अर्थाने) करतो/ माझी छेड काढतो असा अर्थ असावा.
आरती- रार म्हणजे तक्रार मधील
आरती-
रार म्हणजे तक्रार मधील रार. चांगला जुंपलेला वाद. 'काहे को रार मचायी' वगैरे चिक्कार बंदिंशींमध्ये आढळुन येते.
चैतन्य, रैना धन्स. इतक्या
चैतन्य, रैना धन्स.
इतक्या लगेच सांगितलं म्हणून खुप खुप धन्स
मी गेले अनेक दिवस ही लिंक
मी गेले अनेक दिवस ही लिंक शोधत होते. बर्याच वर्षांपूर्वी ह्या प्राध्यापकांनी एका साईटवर अपलोड केलेल्या काही दुर्मिळ चीजा मी डाऊनलोड केल्या होत्या. बहुधा इथे सर्व कलेक्शन उपलब्ध आहे : http://moutal.eu/indian-music.html
त्यातील संकलन बरेच दिसत आहे. मी ऐकायला सुरुवात केली आहे, तुम्हीही आनंद घ्या!
काहे को रार मचायी >>> हो आणि
काहे को रार मचायी >>> हो आणि बहुदा ह्या रार करणे वरुन आपल्या राडा करणे चा उगम आहे असेही आत्ताच लक्षात आले.
http://www.esnips.com वर भरपुर कलेक्शन आहे.
मस्त चाललय. रैना, छानच अर्थ
मस्त चाललय. रैना, छानच अर्थ सांगितलास.
मस्त धागा. बरीच नवीन माहिती
मस्त धागा. बरीच नवीन माहिती मिळाली.
राग - गौड मल्हार. किशोरीताईंच्या आवाजात आहे. ऐकल्यावर काही मिनिटे ट्रान्समध्ये जातात.
(जशी ऐकली तशी, चूभूद्याघ्या)
मन न करिये गोरी
तुम्हरे कारण आयो मेहा
हारी हारी भूमी पर
बरसों री आये
नई नार नयो निहार (?)
बरखा बैरी भयो, सजनिया
जाने ना देत मोहे पी की नगरिया
गरज गरज बरसे बदरिया
चमकन लागी पापी बिजुरिया
यावर एक सुंदर मुक्तक इथे :
http://nileshgadre.blogspot.com/2007/04/blog-post_21.html
अरुंधती- टेरिफिक लिंक आहे गं
अरुंधती- टेरिफिक लिंक आहे गं ती. उड्या मारल्या मी अक्षरश: थँक्यु. थँक्यु.
अब्दुल करिम खाँचे केवढे कलेक्शन आहे.
षडज- अरुंधतीने दिलेल्या लिंकवरचा अमीरखाँचा चंद्रकंसातला तराना ऐक प्लीज.
रच्याकने तरान्यातील शब्दांनाही काही एक भाव/ किंमत असते ते फक्त काहीच गायकांच्या सादरीकरणात जाणवते. बाकी पब्लिक अक्षरश : जीव खाऊन तराना गातात.
राज- तो गौडमल्हार छान आहे ना, पण समहाऊ दिव्य नाहीये (त्यांच्याच भूप सारखा). की मलाच असे वाटते ?
ते शब्द असे आहेत
मान न करिये गोरी
तुम्हरे कारन आयो नेहा
हरी हरी भूमी पर
बरसो री आये
नयी नार , नयो नेहा ( हे पुन्ह ऐकावे लागेल. नॉट शुअर)
रैना, दुरूस्त्यांबद्दल
रैना, दुरूस्त्यांबद्दल आभार.
ती चौथी ओळ म्हणजे त्रास आहे, किती वेळा ऐकली तरी नीट कळतच नाही.
किशोरीताईंचा हंसध्वनी ऐका...
किशोरीताईंचा हंसध्वनी ऐका... ७० मिनिटे एकच राग... आणि तो सुद्धा ओडव-ओडव... माझ्याकडे कॅसेट आहे... नेट वर सापडलाच तर दुवा देतोच...
चंद्रकंस बद्दल ठोस माहिती आजोबांना विचारुन टाकतो..
रैना, माझी अवस्था ती साईट
रैना, माझी अवस्था ती साईट पाहिल्यावर अगदी तुझ्यासारखीच झाली होती! त्या प्राध्यापकांचे नावच आठवत नव्हते, फक्त बनारस हिंदू विद्यापीठाचा संदर्भ आठवत होता. काल जेव्हा ती साईट सापडली तेव्हा काय आनंद झाला म्हणून सांगू!!! त्याच साईटवर सापडलेली व ऐकलेली ही रचना :
बेगम अख्तर यांच्या आवाजातील खमाज दादरा/ ठुमरी? :
तुम जाओ जाओ मोसे न बोलो सौतन के संग रहो ....
अब होत भोर (/ प्रात) आये हो द्वारे कौन यह दुःख सहे ...
मान न करिये गोरी तुम्हरे कारन
मान न करिये गोरी
तुम्हरे कारन आयो नेहा
हरी हरी भूमी पर
बरसो री आये
नयी नार , नयो नेहा
>>>> दुसर्या ओळीत मेहा आहे तर शेवटच्या ओळीत नेहा आहे.
सह्ही बाफ आहे हा!! एक से एक
सह्ही बाफ आहे हा!!
एक से एक बंदिशी लिहील्यात सगळ्यांनी. ...
घायल हिरनिया चंद्रकंस वाटत
घायल हिरनिया चंद्रकंस वाटत नाही... सरगम मध्ये प रे आहे.
चंद्रकंस मध्ये शुद्ध रिस्शभ
चंद्रकंस मध्ये शुद्ध रिस्शभ लावायची प्द्धत आहे... या डोळ्यांची दोन पाखरे ऐकलेत तर त्यात ' असा कुठेही
जगती' मध्ये शुद्ध रे आहे..
> दुसर्या ओळीत मेहा आहे तर
> दुसर्या ओळीत मेहा आहे तर शेवटच्या ओळीत नेहा आहे.
दुरूस्त्यांबद्दल आभार.
अरुंधती, आय हाय. ती साईट
अरुंधती, आय हाय. ती साईट म्हणजे खजिना आहे खजिना... किती धन्यवाद देऊ?
चंद्रकौस - प्रचलित चंद्रकौसमधे रिषभ, पंचम नाहीत. प्रचलित अशासाठी म्हटलं की, जेव्हा एखाद्या रागाची एक विशिष्टं व्याख्या सर्वसाधारणपणे ऐकिवात येते ती प्रचलित. काळाच्या ओघात काही रागांच्या वेगळ्या व्याख्या/किंवा प्रोफाईल गायले न गेल्याने वाहून गेल्यात. ग्रंथांमधे त्या रागांच्या इतर व्याख्या दिल्या जातात पण ते आम गायले/वाजवले/शिकवले गेले नाहीत तर?
त्या अर्थाने चंद्रकौसमधे प, रे नाहीत. ह्यात मुख्यं स्वर (वादी) निषाद आणि त्याला जोड म्हणून (संवादी) गंधार.
जामोप्या, तो रिषभ ही भावगीतात घेतलेली सूट आहे.
रात्रीच्या दुसर्या प्रहरीचा हा राग. तबल्याचे, नाचाचे अनेक लहरे (एकच धून जी तालाचं आवर्तन दाखवत रहाते. जेणेकरून ऐकणार्यांना तबल्याच्या कोलांट्या उड्यांना "तालाचा" संदर्भ रहातो.) ह्या रागात आहेत.
किशोरीताईंचा भूप ही आपण त्यात हरवून जाण्याची चीज आहे. पाच स्वरांच्या ह्या रागाची त्यांची मांडणी म्हणजे पंचभूतातून उभं झालेल्या जगाईतकी विस्मयकारक. गाण्याचा, रागाचा, सुरांचा "विचार" म्हणजे काय ते इथे कळतं. नुस्ता स्वर नव्हे, नुस्तं त्याचं त्या रागातलं अस्तित्वं नव्हे, नुस्ता तो राग नव्हे, नुस्ती बंदिश नव्हे, नुस्ता त्या सादरीकरणाचा नव्हे..... तर ह्या सगळ्या सगळ्याचा एक-एक करून आणि समग्रंही विचार.... चिंतन!!!
त्यांची मल्हार मलिका अशा काय्शाशा नावाची एक सिडी होती माझ्याकडे. दारूण निराशा. खूप विस्कळित वाटलं होतं ते काम. पण माझ्या गुरुजींनी मला एक गोष्टं "बजावली" होती. कोणत्याही कलाकाराचा एक कार्यक्रम, एक सादरीकरण अनुभवून स्टँप मारायचा नाही. किंवा एकदा ऐकूनही नाही. तितकं "साक्षी" आपलं ऐकणं नसतं. पुन्हा काही काळाने ऐकल्यावर त्यातलं सौदर्यं दिसतं (किंवा नाहीही). आपण अनुभवण्यात "मोठे" झालेले असतो
असो...
बेगम अख्तर यांच्या आवाजात
बेगम अख्तर यांच्या आवाजात (आकाशवाणी संगीत व्हॉल्यूम १ अल्बममध्ये उपलब्ध)
लिंक : http://mio.to/9.1W
सावन
राग : मिश्र तिलंग, ताल : केहरवा
पपीहा धीरे धीरे बोल
पीहू पीहू करके अमृत रसमें
मीठा जहर ना घोल
अमृत रसमें पीहू पीहू करके
मीठा जहर ना घोल
दुसर्या ओळीत मेहा आहे तर
दुसर्या ओळीत मेहा आहे तर शेवटच्या ओळीत नेहा आहे. >> येस्स मामी. पुन्हा ऐकुन मलाही तसेच वाटते आहे. शिवाय तसे अर्थवाही वाटते आहे.
दाद- लै भारी पोस्ट. थँक्यु. अपुनका हिम्मत नै हो रैला था, लेकिन हेच म्हणणेका था.
त्यांचा भुपाली ऐकला की अक्षरश : वेड लागायची पाळी येते. त्या मानाने गौडमल्हार म्हणजे ऑल्सो रॅन.
वाह वा दाद...! खूप मस्त
वाह वा दाद...! खूप मस्त पोस्ट.
तुमचे गुरुजी म्हणतात ते अगदी शिरोधार्य आहे.
गणपती भटांचा हंसध्वनी ऐकलाय का तुम्ही? खूप अप्रतिम आहे.
त्याची विलंबित रूपक तालातली चीज अप्रतिम आहे. बोल काहीसे असे आहेत.
लाई रे तन तलवार |
मत कर गुमान, छांड दे अभिमान |
सरस्वती पायो ना,
हीन जो हिया मे धार, (हे शब्द नीट समजत नाहीत.. जसे ऐकले ते लिहिले आहेत)
नादसागर अपरंपार |
आणि द्रुत तीनतालातल्या चिजेचे बोल आहेत.
गुणियन मे गाये बजाये,
सब मिल के पथ पाये |
गुणियन मे सब गुणवंत
सप्तसुरन दिखलाये |
http://www.youtube.com/watch?v=urq-rWHJ5Og
चंद्रकंस शुद्ध रिस्शभ : मला
चंद्रकंस शुद्ध रिस्शभ : मला तरी आमचे सर म्हणाले होते की ती भावगीतातील सवलत नाही, तसे अपवादात्मक केले तर चालते..
व्वा! आत्ता पाहिला हा धागा!
व्वा! आत्ता पाहिला हा धागा! मस्तच!
मला नेहेमी मुलतानीतला ख्याल गाताना बरसानेकी नार म्हणाजे काय हा प्रश्न पडायचा..पण सरांनी नंतर सांगितलं की बरसाना गावची राधा होती.
गोकुल गाँव ..गावका छोरा रे
बरसानेकी नार रे
असा ख्याल होता तो.
रैना , मी त्या साईट वर
रैना ,
मी त्या साईट वर चंद्रकंस ऐकला नाहीये ... पण माझ्याकडे आमिर खां साहेबांचं पाउण तासाचं एक रेकॉर्डिंग आहे.. त्यात तराना आहे... मी तो ऐकलय .. ह्या साईट वर ऐकेन आज..
दाद,
किशोरी ताईंचा भूप अफाटच असतो.. किशोरी ताईंची अशी पुष्कळ recordings की ज्यातून कळत की रागांचा, सुरांचा विचार म्हणजे काय.. त्यांची सुरेख कारागिरी, कलात्मक दृष्टीकोन हा बराच मोठा विषय आहे ...आणि हा लिहिण्यापेक्षा अनुभूतीचा विषय जास्त आहे .. स्वरार्थरमणी वाचल्यावर लक्षात येतेच की त्यांनी किती विचार केलाय ह्या गोष्टीचा... आणि दुसरं म्हणजे तुम्ही जसे म्हणलात काही वेळा आपला अपेक्षाभंग होतो.. त्याबाबतीत सांगायचं म्हणाला तर.. हे सगळ्याच कलाकारांच्या बाबतीत असतं.. शास्त्रीय गायन-वादन हा sponteneous performance असल्याने त्यात वैविध्य असतं.. आणि कधी एखादी डिश जशी बिघडते तसा एखादा कार्यक्रम बिघडतो.. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत असतं..
दाद,
ह्यात मुख्यं स्वर (वादी) निषाद आणि त्याला जोड म्हणून (संवादी) गंधार>> http://www.swarganga.org/raaga_details.php?raagid=374 इथे वादी संवादी म-सा सांगितलाय .. माल्कांसाप्रमाणे.. कन्फर्म करा प्लीज..
चान्द्रकांसाच्या बाबतीत बरंच बोलण चाललंय त्यामुळे मी जी recordings ऐकलीत त्या अनुषंगाने आणि थोडे लिहितो .. थोडंसं तांत्रिक होतंय पण ह्या पोस्ट पुरतं चालवून घ्या .. आणि मी जे लिहितोय ते मोठ्या जाणकाराकडून कन्फर्म करा.. बरोबर आहे का नाही ते
चंद्र कंसात शुध्द निषाद योग्य पध्धतीने लावणे अतिशय आवश्यक आहे ..
मालकंस च्या
g M g-S
अश्या स्वरावली मध्य शक्यतो निषादाचा समावेश करून स्वरावली खालील पध्धतीने संपवली जाते.. निषाद थोडा दीर्घ लावला जातो ..
g M g-S N S
G-S ही मींड समजावी.. निषाद मन्द्रातील आहे..
कधी कधी g N S असाही प्रयोग ऐकल्यागत वाटतो ... S M वगैरे ऐकलय पण ते मालाकन्सातकांसात पण असतं .. बाकीच्या चलनात मालकंस चा प्रभाव जाणवतो..
शिवाय शक्य त्या स्वरावली मध्ये निषादाचा समावेश करून तो मालकांसापासून वेगळा ठेवायचा प्रयत्न असतोच.. मी ते खालील उदाहरणात सांगतोय..
मी जे चंद्र-कंस दिलेले त्याच्या अनुषंगानेच बोलतो..
वसंतरावांच्या चंद्र-कंसात २:१४ ते २:२१ ऐका .. ज्यावेळी मुखड्याला सुरुवात होये.. षड्जावर येताना निषाद लावून (२:१८ ते २:२०) मग सम घेतली आहे.. हा explicit निषादाचा प्रयोग मला अतिशय महत्वाचा वाटतो..
आमिर खां साहेबांच्या बढतीत किंवा मी दिलेल्या निखीलजींच्या आलापात (४:०० ते ५:११) मिनिटात थोडे ऐका... हे जाणवेल की धैवतावर येताना सुध्धा धैवाताकडे निशादावरून येण्याचा प्रयत्न आहे.. किंवा निषादाचा touch द्यायचा प्रयत्न आहेच ... आमिर खां साहेबांचा तराना, कुमार गंधर्वांचा चान्द्रकौंस ह्यातही जाणवेल .. निषाद कशा पद्धतीने लावला आहे..
फार तांत्रिक पीळ झाला... .. माफी असावी.. शास्त्रीय संगीत आकाशागत अनंत आहे.. मी आधी म्हणल्याप्रमाणे हा लिखाणापेक्षा अनुभूतीचा विषय जास्त आहे... शेवटी रागाच्या भाव-विश्वात रमता येणेच जास्त महत्वाचे..
षड्जपंचम, चांगलं लिहिलंत.
षड्जपंचम, चांगलं लिहिलंत. (आता हे वाचल्यावर मला तुम्ही लिहिलेल्या जागा ऐकून निदान ओळखता तरी येतायत का ते बघतो. तेवढं कळलं तरी मला आनंद होईल.)
सारंगातली एक बंदिश -
बन्सी वट जमुना तट
निरखत बनवारी
अत सुगंध मंद मंद
चलत पवन प्यारे
चंद्रवदन श्याम रसिक
मुकुटचंद्र शीतल सत
चंद्रमुखी प्रिय शरद
चांदणी उजियारी
यातले वट, बनवारी शब्द (आणि म्हणून एकूणच बंदिशीचा अर्थ) कळले नाहीत. प्रश्नचिन्हाच्या जागचा शब्द आता आठवत नाही. (मुद्दाम आठवायला लागल्यावर असेच होते.)
Pages