४ बटाटे मध्यम आकाराचे..
२ सिमला मिरची..
अर्धी वाटी तुप..
१ चमचा आले-लसुण पेस्ट..
१ मध्यम आकाराचा कांदा सालासकट गॅस वर भाजुन घ्यावा..
भाजलेला कांदा+६ काजु यांची मिक्सर मधे पेस्ट करुन घ्यावी..
२ चमचे भरडलेले धणे..
४ लाल सुक्या मिरच्या..
३ टोमॅटो ची प्युरी..
१ चमचा कसुरी मेथी..
मीठ चवीनुसार..
१. बटाटया ची साले काढुन त्याच्या प्रत्येकी ८ फोडी करा..
२ सिमला मिरची च्या बिया काढुन मोठे तुकडे करावे..
३.गरम तुपात बटाटे तळुन घ्या. नंतर मिरच्या १ मिनिट च तळुन घ्याव्या..
४आता उरलेल्या तुपात भरडलेले धणे,लाल मिरच्यांचे तुकडे परतुन घ्यावे..
५.लगेच च आले-लसुण पेस्ट्,टोंमॅटो-प्युरी घालुन तुप सुटे पर्यन्त परतावे..
६.आता कांदा-काजु पेस्ट परतावी. तळलेला.बटाटा व मिरची घालावी..
७.चवीप्रमाणे मीठ्,कसुरी मेथी घालुन घालुन पुन्हा एकदा छान परतावे.
गरम पोळी/ लहान गाकरासारखी कडक रोटी[तुप लावुन]/पराठ्या बरोबर वाढावी..
वा छान प्रकार सुलेखा. काही
वा छान प्रकार सुलेखा. काही खास भोपाळी / इंदौरी प्रकार पण माहीत असतील ना ?
व्वा.. टेस्टी वाटली वाचून
व्वा.. टेस्टी वाटली वाचून
कांदा काळा होइस्तोवर भाजायचा
कांदा काळा होइस्तोवर भाजायचा का?? आणि वाटतांना काळं झालेलं काढून टाकायचं ना??
रोचीन, कांदा भाजला कि फक्त
रोचीन, कांदा भाजला कि फक्त वरची साल काळी होते (इतपतच भाजायचा ) आणि ती अर्थात काढायची, पण त्यातला थोडासा भाग वाटताना राहिला तरी चालतो. त्याने छान फ्लेवर येतो (आपला बार्बेक्यू फ्लेवर !!)
एक छोटासा तरी ......फोटो
एक छोटासा तरी ......फोटो द्यायचा ना.......!
मस्त पाककृती. चवदार वाटतेय.
मस्त पाककृती. चवदार वाटतेय. करून बघायला हवी.
कांद्या चे साल काळे
कांद्या चे साल काळे होइपर्यन्त भाजायचा..साल काढुन २-३ तुकडे करुन काजुबरोबर वाटायचा..
कांदा भाजुन घेतला कि गोडसर चवीचा होतो..
वांग्याचे भरीत करताना वांग भाजताना त्यात सुरीने ४-५ जागी भोक करुन ४-५ लसुण पाकळ्या व ३-४ लवंगा भरुन वांग भाजायचे त्यात असाच कांदा भाजुन चिरुन फोडणीत टाकायचा..बाकी कृती नेहमीप्रमाणे..वेगळी चव येते..
फोटो ची सोय नाही त्यामुळे एकाही पाकृ.सोबत फोटो देता येणार नाही..
खास माळव्याच्या [म.प्र.] पाकृ. नक्किच लिहीन पण फोटो नसणार..
खास पाकृ आहे! मध्यप्रदेशातील
खास पाकृ आहे!
मध्यप्रदेशातील रोटीसदृश "टिक्कड" पाकृच्या प्रतीक्षेत आहे!
गॅसच्या शेगडीवर खापर ठेवून त्यावर करता येईल असे वाटते.
ठिक आहे सुलेखातै....... "खास
ठिक आहे सुलेखातै....... "खास माळव्याच्या [म.प्र.] पाकृ"........येउद्या
पण कधितरी "खास" फोटोसाठी "खास" प्रयत्न करा ओ....
दिनेशदा, सुलेखाताई, धन्यवाद
दिनेशदा, सुलेखाताई, धन्यवाद !! आता करुन बघीन!!
सुंदर भाजी!!! अजिबात मसालेदार
सुंदर भाजी!!! अजिबात मसालेदार नाही आणि भाजलेल्या कांद्याचा स्वाद एकदम मस्त. मी छोटे बटाटे घातले होते.
वॉव! छन रेसिपी मंजु... एकदम
वॉव! छन रेसिपी
मंजु... एकदम यम्मी दिसत्येय भाजी... येऊ का जेवायला... इथेच आहे मुलुंदमधे मी
अर्रे.. ये की लाजो खरंच मस्त
अर्रे.. ये की लाजो खरंच मस्त झाली होती भाजी.
धन्यवाद सुलेखा. फार छान
धन्यवाद सुलेखा. फार छान झाली.
मंजू- तुझा फोटो खंग्री होता म्हणून करायला अजून स्फुर्ती मिळाली.
माझा फोटो खंग्री???
माझा फोटो खंग्री???
प्रियदर्शनी ,रेना भाजी करुन
प्रियदर्शनी ,रेना भाजी करुन पाहिली आणि आवडली ना..मंजुडी फोटो एकदम मस्त आहे..टेम्टींग आहे..त्याबद्दल मनापासुन धन्यवाद..
मी केली ही भाजी.. जबरी झाली.
मी केली ही भाजी.. जबरी झाली. फक्त बटाटे तळण्याऐवजी उकडून घेतले.
पण मंजू, टोमॅटो प्युरीमुळे रंग लाल आला होता माझ्या भाजीला. तुझ्या भाजीचा हा रंग कशामुळे आला?
मस्तच. प्रिंट काढून घेते.
मस्तच. प्रिंट काढून घेते.
काय सुंदर दिसतेय ही भाजी !
काय सुंदर दिसतेय ही भाजी ! मस्त तूप सुटलंय. तोंपासु :लाळेरं लावून बसलेली बाहुली:
मी धने, लाल सुक्या मिरच्या
मी धने, लाल सुक्या मिरच्या भाजून मिक्सर मधून बारीक पूड करून घेतले, त्यात टोमेटो, आलं लसूण घालून अगदी पेस्ट करून घेतली. भाजलेला कांदा आणि काजूची पेस्ट वेगळी करून घेतली.
मी पण आज रात्री करणार ही
मी पण आज रात्री करणार ही भाजी.
सुलेखा, छान झाले आलू तुमच्या
सुलेखा, छान झाले आलू तुमच्या रेसिपीने. हा फोटो.
आर्च्,भाजीच्या फोटो [रंगा ]
आर्च्,भाजीच्या फोटो [रंगा ] वरुन भाजी मस्त चवदार झाल्याचे कळते आहे..
अत्ताच केली ही भाजी. रंग
अत्ताच केली ही भाजी. रंग अप्रतीम आलाय पण बहुदा भाजक्या कांद्याने घात केलाय.चव कडवट लागतेय. पुढल्या वेळी थोडा परतून मिक्सर मधून काढून बघेन.
परवा करायचा विचार आहे. पण
परवा करायचा विचार आहे.
पण कांदा न भाजता नुस्ती पेस्ट केली तर नाही का चालणार? खुप फरक पडेल का टेस्ट मध्ये?
सीमा, हो! माझ्या मते या
सीमा, हो! माझ्या मते या भाजीची चव कांद्याच्या भाजलेपणातच आहे
फोटोंमधे ग्रेव्ही सारखी
फोटोंमधे ग्रेव्ही सारखी दिस्तेय, पाणि घालयचेय का?
बटाटे उकडलेले घ्यायचे की
बटाटे उकडलेले घ्यायचे की कच्चेच?
बटाटे कच्चे घ्यायचे
बटाटे कच्चे घ्यायचे आहेत.तुपात तळले कि ते शिजल्यागत च होतात.
कांदा सालासकट गॅस वर भाजायचा आहे. कांद्याचे साल भाजले गेले कि चिमट्याने फिरवत रहायचे.अगदी काळा करायचा नाही.पण एखाद दुसरा डाग चालेल. कांदा भाजुन घेतल्याने चवीत फरक पडतो.भाजीला रस हवा असेल तर थोडेसे पाणी घालावे.पण रस दाटसर च हवा.
सीमा बर्याच लोकांसाठी करायची
सीमा बर्याच लोकांसाठी करायची असेल तर आधी प्रायोगीक तत्वावर करून बघ. ईथले आणी देशातले कांदे वेगळे पडतात. मी विडालिया स्वीट अनियन वापरला होता. पातेलंभर भाजी अक्षरशः टाकून द्यावी लागली. अजून चुटपुट लागली आहे.
Pages