श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Submitted by webmaster on 26 January, 2009 - 22:30

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज

यापूर्वीचे हितगुज इथे पहा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रविवारी २१ डिसेंबर २००८ या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा समाधीदिन होता. आयुष्यात एकदा तरी श्रीमहाराजांच्या गोंदवले येथे होणार्‍या समाधीउत्सवात सहभागी व्हावे अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. यावर्षी गोंदवल्यास जाऊन उत्सवात सहभागी व्हायचे असे खूप दिवसांपासून ठरविले होते. परंतु शेवटच्या क्षणी काही व्यक्तिगत कारणामुळे सर्व योजना रद्द करावी लागली. मनातून थोडे वाईट वाटत होते.

अचानक माझ्या एका नातेवाईकाने एक वेगळा पर्याय सुचविला. त्यांनी अशी माहिती दिली की पुण्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावर लिकते राम मंदिर आहे. हे मंदिर श्रीमहाराजांनी स्थापन केलेले आहे. त्या मंदिरात दरवर्षी पुण्यातील भक्त श्रीमहाराजांचा समाधी उत्सव साजरा करतात. तिथे तुला पहाटे जाऊन श्रीमहाराजांच्या समाधीउत्सवात सहभागी होता येईल. हे समजल्यावर मनातून आनंद झाला. श्रीमहाराजांनीच मला ही माहिती देण्याची माझ्या नातेवाईकाला बुद्धी दिली असे मला वाटले.

रविवारी पहाटे गजर लावून २ वाजता उठलो. चटकन सर्व आवरून घरातल्या देवांची व श्रीमहाराजांच्या तसबीरीची पूजा केली व घरातल्या इतर काही जणांबरोबर लिकते राम मंदिरात पावणेचारच्या सुमारास पोहोचलो. श्रीमहाराजांच्या समाधीची वेळ पहाटे ५:५५ अशी आहे.

लिकते राम मंदिर जुन्या पद्धतीचे असून अतिशय सुंदर आहे. सुमारे १००० स्क्वेअर फुटाच्या दिवाणाखान्यामध्ये एका बाजूला श्रीराम, श्रीलक्ष्मण, श्रीसीता व श्री हनुमानाच्या मूर्ती आहेत. बरोबर विरूद्ध बाजूला श्रीमहाराजांची ५-६ फूट उंचीची एक तसबीर आहे. भिंतींवर श्रीमहाराज व इतर देवांच्या काही तसबिरी आहेत. मंदिरात प्रवेश केल्याकेल्या तिथे अतिशय पावित्र्य जाणवले. ज्या ठिकाणी परमेश्वराची नित्य भक्ती होते व जिथे नियमित भजन्-कीर्तन्-नामस्मरण होते अशा सर्व ठिकाणी मनाला पावित्र्य जाणविते व अंतर्यामी सूक्ष्म असा आनंद होतो.

४ वाजल्यानंतर अनेक भक्त जमा झाले. त्या मंदिरात कमीतकमी १५० भक्त बसले होते. शिवाय बाहेरही अनेक भक्त उभे होते. बरोबर ४:३० वाजता सर्वांनी श्रीमहाराजांचा जयघोष केला व एका भक्ताने निरनिराळ्या देवांच्या काकड आरत्या व भूपाळ्या म्हणायला सुरवात केली. इतर सर्व भक्त त्याच्यामागून म्हणत होते. भल्या पहाटेची प्रसन्न वेळ, आजूबाजूची शांतता, मंदिरातील पावित्र्य व परमेश्वराची स्तुती याने सर्व वातावरण भारून गेले होते.

५:१५ वाजता काकड आरती संपवून सर्व भक्त काही काळ नामस्मरण करू लागले. बरोबर ५:३० वाजता सर्वांनी नामस्मरण थांबविले. त्यानंतर एका भक्ताने श्री महाराजांच्या चरित्रातील त्यांच्या अखेरच्या दिवसांतील घटनांचे वर्णन वाचायला सुरवात केली. तो भक्त त्या वाचनाशी इतका एकरूप झाला होता की मध्येच त्याला एकदम भरून आले. काही क्षणातच स्वत:ला सावरून श्री महाराजांच्या समाधीपर्यंत पूर्ण वर्णन वाचून काढले.

आता ५:५० झाले होते. सर्व भक्तांनी "श्रीराम", "श्रीराम" असा जयघोष सुरू केला. जयघोष सुरू झाल्यावर माझे मन अतिशय भारावून गेले होते. श्री महाराज श्रीरामांच्या भेटीस कायमचे निघाले असून सर्व भक्त श्रीरामांचा जयघोष करून त्यांना निरोप देत आहेत असे मला मनोमन वाटले.

बरोबर ५:५५ ला सर्व भक्तांनी श्रीमहाराजांचा जयघोष केला. १९१३ साली याच दिवशी याच वेळी श्रीमहाराजांनी महासमाधी घेतली होती.

नंतर ७ वाजेपर्यंत पंचपदी होऊन कार्यक्रम संपला. श्री महाराजांच्या कृपेने ती पहाट अतिशय आनंदात गेली व आयुष्यात प्रथमच श्रीमहाराजांच्या समाधीउत्सवाचा आनंद घेता आला.

लेखात उल्लेख झालेले लिकते राम मंदिर नक्की कुठे आहे (पत्ता) सांगाल का?
अनुभव छान लिहिला आहे.

मला वाटतं असंच एक मंदिर मालाडला पण आहे...

श्रीराम
*
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर - "माझं एक स्वप्न आहे की, एक दिवस माझी चार छोटी मुलं अशा राष्ट्रांत राहतील की जिथे कातडीच्या रंगावरुन नाही तर शीलसंपदेवरुन त्यांची पारख केली जाईल."

लिकते श्रीराम मंदिर लक्ष्मी रस्त्यावर शगुनच्या चौकामध्ये बँक ऑफ इंडिया तसेच डागा ब्रदर्स या दुकानाच्या बरोबर समोर आहे. ते खाजगी मंदिर असल्यामुळे काही विशेष प्रसंग वगळता ते इतर वेळी इतरांसाठी बंद असावे.

आज माघ शु. द्वादशी. महाराजान्चा जन्मदिवस. नाशिक मधील त्यान्च्या भक्तपरिवाराने इथे त्यान्चे सुरेख मन्दिर बान्धले आहे. त्या मन्दिराचा वर्धापनदिनदेखिल आजच असतो. त्यानिमित्ताने तिन दिवस उत्सव साजरा केला जातो. कधि नाशिकमध्ये आल्यास जरुर मन्दिरात जाऊन यावे. मी आपला लेख आज वाचला, अन्यथा आपनास उत्सवाचि पुर्वसुचना दिली असती. ||श्रीराम समर्थ||

सतीश, माहितीबद्दल खूप धन्यवाद.
सुरेख वर्णन केलयत. बरं वाटलं.. वाचता वाचता अनुभवलं. आम्हाला ही तुम्ही हा आनंद दिलात त्याबद्दल तुमचे आभार.

Shri Maharaj Murti in Yellow metal is made by Reknown Shilpakar : Shri. Bhau Sathe, Kalyan.

It is available for Display till 22nd March 09, Sunday at Dombivali

This will be moved to Indore.

To see Shree’s statue pls. Visit following site at Dombivali.

Shilpalay

Plot No. A-132,MIDC_Phase-1

Dombivali (E) - 421201

0251 6513394

मालाड पश्चिमेला स्टेशन च्या आगदी जवळ श्रीराम चिन्तन या इमारतीत आहे श्री गोन्दवलेकर महाराजान्चा मठ्.(मोन्जीनीज च्या वर).
श्रीराम जयराम जय जय राम.

जय श्रीराम,
मी आपला लेख आत्ताच वाचला,अतिशय छान वर्नन तुम्हि केलेले आहे,त्याबद्दल धन्यावाद.
जय श्रीराम.

||श्रीराम जय राम जय जय राम||
हा धागा सुरू करावा असे मला खूप दिवसांपासून वाटत होते.सुरू केल्याबद्दल धन्यवाद्.आज गुरूपोर्णिमा आहे.सकाळपासून गोंदवल्याची खूप आठ्वण येत आहे.
पुण्यात दर रविवारी श्री. महाराजांची आरती होते.तो अनुभव अवर्णनीय आहे.जमेल त्याने एकदा तरी घ्याच्.पहाटे ५ वाजता जवळपास १००-१५० मंडलीमिळून भजन्-आरती असा कार्यक्रम करतात.
नेने घाट येथे महाराजांचा एक मठ आहे.
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

शुक्रवार ११ डिसेंबर २००९ या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा समाधीदिन आहे. ज्यांना श्रीमहाराजांच्या गोंदवले येथे होणार्‍या समाधीउत्सवात सहभागी होणे जमणार नाही, ते पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील लिकते राम मंदिरात साजर्‍या होणार्‍या समाधीउत्सवात सहभागी होऊ शकतील.या मंदिरात दरवर्षी पुण्यातील भक्त श्रीमहाराजांचा समाधी उत्सव साजरा करतात. श्रीमहाराजांच्या समाधीची वेळ पहाटे ५:५५ अशी आहे. या मंदिरात पहाटे ४:३० ते ७:०० या वेळात काकडआरती (पहाटे ५:५५ ला समाधीउत्सव) आयोजित केलेली आहे. या दिवशी खूप गर्दी होते (३०० हून अधिक भक्त येतात), त्यामुळे ४ - ४:१५ पर्यंत मन्दिरात यावे. लिकते श्रीराम मंदिर लक्ष्मी रस्त्यावर शगुनच्या चौकामध्ये बँक ऑफ इंडिया तसेच डागा ब्रदर्स या दुकानाच्या बरोबर समोर आहे. मागील वर्षी झालेल्या उत्सवाचे वर्णन मी वर दिले आहे. मित्रमंडळ चौकाकडून पर्वतीकडे जाणार्‍या रस्त्यावर देखील श्रीब्रह्मचैतन्य मठ आहे. तिथे देखील समाधी उत्सव पहाटे साजरा केला जातो.

बे एरिया मध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ग्रुप दर महिन्यातुन एका रविवारी सन्ध्याकाळी ५ ते ८ भेटतो.

५:३० ते ६:३० रामनाम
६:३० ते ७ आरती, पदे, प्रवचन
७:३० ते ८ प्रसाद

या वर्षी समाधीदिना निमित्त शनिवारी १२ डिसेंबर ला सँन होजे येथे कार्यक्रम आहे.

contact:
Renuka Inamdar
510-676-6832
Renuka@OwnSweetHome.net

खालील संकेतस्थळावर श्री महाराजांची काही नेहमी पाहण्यात न येणारी प्रकाशचित्रे आहेत.

http://www.flickr.com/photos/29575084@N04/sets/72157606756414074/show/?no_back=1

|| श्रीराम जयराम जयजयराम ||

""श्रीराम जय राम जय जय राम"!
"अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय"!
या वर्षी ३० डिसेंबर २०१० ला महाराजांची पुण्यतिथी आहे. त्याचप्रमाणे २६ डिसेंबर २०१० पर्वती पायथा येथील मठात सदगुरू श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पादुकांवर ' श्रीरामपाठाच्या सहस्र अवर्तनाने ' महाअभिषेक करण्याचा संकल्प केला आहे. ज्या भक्तांना भाग घ्यायचा असेल त्यांनी मठातील वहीत आपले नाव व फोन नंबर लिहून आपण भाग घेत असल्याचे कळवावे. असे मठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मठाचा पत्ता : श्री ब्रम्हचैतन्य आश्रम, श्रीराम महाराजांचा मठ, ५०४/२, पर्वती पायथा पुणे.

परवाच आम्ही सर्व कुटुंबिय गोंदवल्याला महाराजांच्या मठात जाऊन आलो. अतिशय शांत, स्वच्छ असा मठ व आजूबाजूचे वातावरण खूपच आवडले. कुठेही पैसे वगैरे मागत नव्हते, हे अजूनच आवडले. थोडक्यात, भक्तीच्या, देवाच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा करत नाहीत.

तेथील प्रसादाचे जेवण साधे पण, अतिशय रुचकर होते.

पुन्हा जायला कधी मिळते, पाहू. Happy

मि पुढ्च्या सोमवारी गोंदवल्याला जात आहे.सकाळी पुण्यातुन किति वाजता नीघावे.

||श्रीराम जय राम जय जय राम||
पुण्यतिथीला जाणे ह्यावर्षी जमणार नाही...ह्या दिवसात हटकून तिथल्या वातावरणाची आठवण होते...बघूयात श्री.महाराज दर्शनाचा योग आणतात.

>>> मि पुढ्च्या सोमवारी गोंदवल्याला जात आहे.सकाळी पुण्यातुन किति वाजता नीघावे.

गोंदवल्याला जाण्यासाठी २ मार्ग आहेत.

(१) स्वारगेटपासून पुणे-सातारा रस्त्याने सातार्‍यापर्यंत जाऊन उड्डाणपुलाखालुन डाव्या हाताला वळून पुसेगाव-कोरेगाव च्या दिशेने जावे. एकूण अंतर अंदाजे १६५ किमी आहे. मध्ये अजिबात न थांबता गेल्यास अंदाजे साडेतीन तास लागतील. सातार्‍यापर्यंत ४ लेनचा हायवे आहे. त्यामुळे वेगात जाता येते. पण वाटेतल्या २ टोलनाक्यावर १०-१५ मिनिटे जातील. सातार्‍यानंतरचा रस्ता फारसा चांगला नाही.

(२) स्वारगेटपासून पुणे-सोलापूर रस्त्याने हडपसर - दिवेघाट - सासवड - जेजुरी - नीरा - फलटण - दहिवडी - गोंदवले. एकूण अंतर अंदाजे १५५ किमी आहे. मध्ये अजिबात न थांबता गेल्यास अंदाजे साडेतीन तास लागतील. हा रस्ता फारसा चांगला नाही.

६ वाजता निघाल्यास १० वाजेपर्यंत पोहोचता येईल. उत्सवाची गर्दी असल्यामुळे समाधीच्या दर्शनास वेळ लागेल. १२ वाजता आरती व नंतर प्रसाद असल्याने १० पर्यंत पोहोचल्यास श्री महाराजांच्या समाधीचे व श्रीराम मंदीरात व्यवस्थित दर्शन घेता येईल.

|| श्रीराम जयराम जयजयराम ||

लक्ष्मी रोडवरील लिकते राम मंदीरात दरवर्षी श्री महाराजांचा महासमाधीउत्सव पहाटे ४:३० ते ७ या वेळेत साजरा केला जातो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर सहभागी व्हावे.

सातार्‍यानंतरचा रस्ता इतकाही वाईट नाही वाटला मास्तुरे. आत्ता ह्या मागच्याच रविवारी (१९ तारखेला) पहिल्या मार्गाने गेलो होतो.

श्रीराम जय राम जय कय राम!!!
रविवारी २६.१२.१० रोजी पद्मावति-पुणे येथील महाराजांच्या मठात रामपाठाची सहस्र आवर्तने झाली. साधारण ८० ते ९० भक्त हजर होते.
प्रथम प्रत्येक भक्ताला रामपाठाची एक एक प्रत दिली होती. नंतर दुध, दही, तूप, मध, साखर, आमरस, ऊसाचा रस, संत्र्/मोसंब्याचा रस, सात नद्यांचे पाणी, गंगा, कापूर व तुळस या प्रतेकाचा एक एक अभिषेक श्री. गोंदवलेकर महाराज व श्री. श्रीराम महाराज यांच्या पादुकांवर करण्यात आला. नंतर प्रत्येक भक्ताने दुधाचा अभिषेक केला. त्यानंतर गेल्या वर्षी पाडव्याला केलेला साडेतीन कोटी जपाचा संकल्प पूर्ण झाला, त्याची समाप्ति,(प्रत्यक्षात ५ कोटींपेक्षाही जास्त झाला.)व नवीन साडेतीन कोटी जपाचा संकल्प करण्यात आला. पादुकांची पूजा करण्यात आली. तेथील एका जेष्ठ भक्ताने 'श्रीराम जय राम जय जय राम' हा मंत्र म्हणून जप केला, व सर्वांनी त्यांच्यामागोमाग या मंत्राचा जप केला. नंतर आरती झाली व सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.

Pages