रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे

Submitted by जिप्सी on 21 December, 2010 - 00:46

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्व निर्मित केवळ नंदनवन
– कवी माधव

"कोकण" – महाराष्ट्राच्या कोंदणातील हिरवागार पाचू. समोर पसरलेला निळाभोर आणि शांत समुद्रकिनारा, आकाशाशी स्पर्धा करणार्‍या उंचच उंच नारळपोफळींच्या बागा, हिरव्यागार झाडांमधुन धावणारी लालचुटुक मातीची वाट, आंबा, फणस, काजू इ, रानमेवा, कौलारू चिरेबंदी घरे, वडे सागुती असा फक्कड बेत, प्रेमळ कोकणी माणूस हे सगळे रसायन एकत्र केले कि तयार होते "कोकण". भगवान परशुरामने वसवलेल्या याच कोकणातील एक भाग म्हणजे "रत्नागिरी" जिल्हा. आंबे-फणस, नारळ-पोफळींच्या बागांनी समृद्ध रत्नागिरीला अप्रतिम असे निसर्गसौंदर्य बहाल केले आहे. याच रत्ननगरीचा एक हा एक फेरफटका.
रत्नागिरी भटकंतीची सुरुवात आपण श्रीगणेशाच्या दर्शनाने करूया.

=================================================
=================================================
गणपतीपुळे – मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला "पुळ्याचा गणपती" असेही म्हणतात. समोर पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेले हे सुंदर गुलाबी मंदिर पर्यटनाबरोबर तीर्थाटनाचाही आनंद देते.

=================================================

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९
प्रदक्षिणा मार्ग
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारा
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

=================================================
=================================================
गणेशगुळे – गणपतीचे हे स्थान पावस या गावापासुन साधारण २-३ किमी अंतरावर एका डोंगरावर वसले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिळा असल्याने हे द्वार बंद केले गेले आणि त्या शिळेलाच श्रीगणेश मानून तिची पूजा केली जाते. अलिकडेच या शिळेवर श्रीगणेशाकृती प्रकट झाली असल्याणे "गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला आणि पुन्हा प्रकट झाला" असे मानले जाते.
रत्नागिरी-पावस अंतर साधारण १८-२० किमी
पावस-गणेशगुळे अंतर साधारण २-३ किमी
=================================================
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

=================================================
=================================================
भंडारपुळे – "आरेवारे" या गावाजवळ खाडीवर पूल झाल्याने रत्नागिरीहुन गणपतीपुळ्याला जाणारा मार्ग हा भंडारपुळे गावातुन जातो. या गावाला अतिशय सुंदर आणि रमणीय समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याहुन रत्नागिरीला जाताना डोंगरावरून समुद्रकिनार्‍याचे विलोभनीय दृष्य दिसते. या गावातील बहुतेक लोक घरी गणपती आणत नाहीत. गणपतीपुळ्याचा गणपती हेच या गावचे मुख्य दैवत आहे. गणपतीपुळे ते भंडारपुळे अंतर साधारण २ किमी आहे.
=================================================
प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

योगेश,
ने. अ. फो.

प्रचि १, २, ३, ४ फारच आवडली.

२ वर्षापुर्वी गणपतीपुळ्याला जाउन आलो होतो.... त्याची आठवण करुन दिलीस....

छान..

सुंदर.

छान प्रचि. मी गणपतीपुळ्याला एम आय डि सी मधे ४/४ दिवस वास्तव्य केले आहे. तिथूनही समुद्राचे छान दर्शन होते. त्या डोंगरावरील झाडे कुणी तोडत नाहीत, म्हणून तो तसा हिरवागार राहिलाय. तिथे जाताना जो रस्ता लागतो, त्या रस्त्यावर दोन्हीबाजूंना पावसाळ्यानंतर खुप रानफूले उगवतात.
गणेशचतुर्थीला सर्वांना गाभार्‍यात मुक्त प्रवेश मिळतो.
पुळ्याचा समुद्र मात्र धोकादायक आहे. किनार्‍यापासून थोड्याच अंतरावर तो खूप खोल आहे. अननुभवी लोकांनी त्या पाण्यात शक्यतो जाऊ नये.

मस्त.. ३ वर्षांपूर्वी (लग्न झाल्यानंतर काही महिन्यात :)) मी गेलो होतो तेंव्हा मंदिर नुकतच सजवले होते...

फोटो सही..!!!

मस्त..

सुंदर फोटो..

मी जुन्या आणि नव्या दोन्ही मंदिरात जाऊन आलेय आणि मंदिरातले जेवणही प्रसाद म्हणुन जेवलेय... Happy

मस्त फोटोज् योग्या... लय भारी...
कोकणात जायचे आहे रे एकदा... तुझे फोटोज् बघुन ती ईच्छा आणखिनच प्रबळ होते.

सर्वच प्रकाशचित्रे, जबरदस्त. सुरवातही छान केलीस रे योग्या.. Happy

कोकणात जायचे आहे रे एकदा... तुझे फोटोज् बघुन ती ईच्छा आणखिनच प्रबळ होते. >> चंदन जाऊन ये रे लवकर. नील अन योग्याला झब्बू देता येईल Wink

गणेशगुळे अन भंडारपुळे बद्दल पहिल्यांदाच वाचलं अन पाहिलंसुद्धा. Happy

गणपती पुळ्याचे फोटो खुपच छान,
मी पण दोन तीन वेळा गेलोय गणपतीपुळ्याला,एकदा तर मुक्कामी होतो,पहाटे ४:०० वाजता उठून गणपतीला अभिषेक केला होता.
इतर फोटो सुध्दा मस्त........

माझ्या माहेरचे फोटो!!! Happy

आवडलेच! खरं तर पुळ्याला जाणं होत नाही जास्त, पावसलाच जाणं होतं, पण तरी फोटो बघून आता जावंसं वाटतंय.

पुढचे फोटो कुठले असतील? Happy क्रमशः टाकलयत ना!!

प्रज्ञा, पराग धन्स Happy

पुढचे फोटो कुठले असतील?>>>प्रज्ञा, पुढचे फोटो मार्लेश्वर Happy
हेदवीच्या देवळाचे असतील तर टाक रे>>>>हेदवी, वेळणेश्वरचे आहेत फोटो. हेदवीच्या किनारा माझा आवडता. Happy

मस्तच , मी ही आत्ताच जाऊन आले , गणपती मंदीर व तेथील समुद्र किनारा खरंच खुप सुंदर आणि अप्रतिम आहे.

मस्त फोटोज..

>>>>मी गणपतीपुळ्याला एम आय डि सी मधे ४/४ दिवस वास्तव्य केले आहे
दिनेशदा, तुम्हाला एम्टीडिसी म्हणायचे आहे का? Happy

Pages