इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
ह्म्म गोव्यात असेल तर
ह्म्म गोव्यात असेल तर मिळवायचे प्रयत्न करेन. रच्याकने गोव्यात नर्सरी वगैरे नसते काय झाडांची? मी एवढे गोवा फिरले नाहीये पण पणजीत तरी कुठे दिसली नाही. गोव्यात माझ्या ओळखीचे कोणीच नाही
पणजी मडगाव रस्त्यावर नर्सरी
पणजी मडगाव रस्त्यावर नर्सरी बघितल्यासारखी वाटतेय. काही मायबोलीकर आहेत तिथे (ज्योति कामत ) त्यांच्याकडे चौकशी करता येईल.
कला अकादमी, महावीर उद्यानात पण चौकशी करता येईल. तिथे कूंड्यांमधे रोपे बघितली होती.
साधना, मी त्या वेगळ्या
साधना, मी त्या वेगळ्या हिरव्या फूलांचा उल्लेख केलाय त्या झाडाला मराठीत सुगंधी अशोक म्हणतात. गोव्यातल्या दूधसागर धबधब्याकडे जाताना जो शेवटचा वाहनतळ आहे, तिथे एक फूलणारे झाड आहे याचे. शास्त्रीय नाव रात्री लिहितो.
तसा आसुपाल पण हिरव्या फूलांनी बहरतो, पण त्या दाट पर्णसंभारात ती फूले नीट दिसत नाहीत. आणि त्यांना सुगंधही नसतो.
जागू, तूमच्याकडे कधी सुरणाला फूल आलेले बघितले आहे का ? हे फूल स्वतंत्रपणे थेट जमिनीतूनच उगवते. दोन फूट लांबीच्या दांड्यावर हे दहा इंच उंच आणि आठ इंच घेराचे फूल असते. रंगाने किरमिजी असते पण याला प्रचंड दुर्गंधी असते. मी एकदाच लहानपणी हे फूल मालवणला बघितले होते. अगदी मळमळून यावे, असा दुर्गंध असतो याला.
दिनेश, गोव्याला पुढच्या
दिनेश, गोव्याला पुढच्या वर्षी जायचा बेत आहे. जायच्या आधी तुम्हाला सल्ला विचारेनच. तुम्ही गोव्यात किनारे सोडुन इतर गोष्टीही आहेत असे नेहमी सांगता, मी किनारे पाहिलेत खुप, एकदा किना-यावर गेले की सगळे संपलेच. मग निघता येणारच नाही. त्याआधी इतर गोष्टी पाहुन घेईन.
मी दुधसागरला गेले होते पण आजुबाजुचे फारसे पाहता आले नाही... पुढच्या वेळेस बघेन.
सुरणाच्या फुलाचा उल्लेख वाचुन जगातले सगळ्यात मोठे फुल म्हणुन इंडोनेशीया, ऑस्ट्रेलिया का तिकडच्याच कुठल्यातरी देशातल्या फुलाचा उल्लेख होते ते आठवले. आता एवढ्या मोठ्या फुलाला दुर्गंधी का येते? त्याचे परागीभवन करण्यासाठी कुठल्या भयानक किड्याला आमंत्रण असते ते?
साधने, हि दुर्गंधी साधारणतः
साधने, हि दुर्गंधी साधारणतः कुजलेल्या मांसासारखी असते. त्यामुळे ते खाद्य असलेले उडते किडे आकर्षिले जातात.
ते इंडोनेशियातले फूल बरेच
ते इंडोनेशियातले फूल बरेच मोठे असते. तीन फूट व्यास आणि मधला दांडोरा सहा फूट उंच असतो. यासाठी पण काहि खास माश्यांचीच नेमणूक झालेली असते. त्याचाही रंग असाच असतो. अटेंबरो साहेबांनी चक्क त्या फूलांत कॅमेरा ठेवून चित्रीकरण केलेय.
समुद्रातील खडकांवर उगवणारे पण असेच एक फूल असते. ते मेलेल्या प्राण्यांच्या मांसाच्या रंगाचीच नव्हे तर त्यावरच्या केसांची, तुटक्या अवयवांची, हाडांची पण नक्कल करते.
आणि हो गोव्याला, स्पाईस गार्डन मधे पण बरीच झाडे बघायला मिळतील, (वेलची, लवंग, जायफळ, व्हॅनिला, मिरी, ऑल स्पाईस, करमळ, बिमली, वेगळा अनंत, लेमनग्रास अशी बरीच.)
दिनेशदा आमच्याइथे आहे सुरण
दिनेशदा आमच्याइथे आहे सुरण ह्या सुरणाचे फुल थेट जमिनीतुन उगवते. असुदे ने म्हटल्याप्रमाणे अगदी मांस सडल्यासारखा वास येतो. माश्याही ह्या फुलाभोवति घिरट्या घालत असतात. ३-४ दिवस हा वास तसाच टिकुन असतो त्यामुळे अस वाटत की काहीतरी कुठेतरी मरुन पडले आहे.
दिनेशदा तुम्ही म्हटलेल्या तोरणांचा उल्लेख माझ्या सा.बांच्या बोलण्यात येतो. मी अजुन पाहीली नाहीत पण.
अळूची फळे आमच्याकडे विकायला येतात. अळूच्या फळांवरुन एक किस्सा आठवला आहे पण बराच मोठा असल्याने तो नंतर लिहेन. अगदी नैसर्गिक अविस्मरणीय किस्सा आहे माझ्यासाठी.
साधनातै एरंडाच्या झाडा बाबत
साधनातै एरंडाच्या झाडा बाबत महितीसाठी आभार्...मला वाट्तं पाहीलं असेल झाड पण तेच का? माहीत नाही... औषधि उपयोग होतो त्याचा असे ऐकले होते.
जागू, परत फूल फूलले तर त्याचा
जागू, परत फूल फूलले तर त्याचा फोटो काढून ठेवणार ना ? दुर्मिळ आहे ते फूल.
तोरणं पुर्वी मुंबईत पण मिळायची. अजूनही ठाणा, बोरिवली, डोंबिवली ला मिळत असतील. केसात माळायची पांढरी करवंद असतात, माहित आहेत का ? अगदी तशीच दिसतात. माझ्याकडे असेल फोटो कदाचित.
दिनेशदा नक्की फोटो काढेन परत
दिनेशदा नक्की फोटो काढेन परत आले की.
आमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्याला एक गुरांचा दवाखाना होता. त्याच्या बाजुला ते डोक्यात माळण्याचे करवंदाचे झाड होते. आम्ही शाळेत जाताना नेहमी पहायचो. काही मैत्रीणी तोडूनही आणायच्या. पण त्याचा रंग गुलाबी पांढरट होता. आकार लांबट आणि मोठ्या द्राक्षा एवढा. ती करवंदे खायचो पण आम्ही पण इतकी आंबट नव्हती.
तोरणांचा फोटो मिळाला तर टाका.
मला वाट्तं पाहीलं असेल झाड पण
मला वाट्तं पाहीलं असेल झाड पण तेच का
टाकते फोटो त्याचा. मग लक्षात येईल तुमच्या. सर्वत्र साधारण लहान झुडपे दिसतात एरंडाची पण माझ्याइथे त्याचे मोठे झालेले झाडही आहे. कालच परत एकदा पाहुन खात्री केली. आज/उद्या फोटो काढते.
साधना तु लेखन करत जा ग.
साधना तु लेखन करत जा ग. तुझ्या उपमा चांगल्या असतात.
पुर्ण अनुमोदन !
हिरवी फूले येणार्या सुगंधी
हिरवी फूले येणार्या सुगंधी अशोकाचे शास्त्रीय नाव. Polyalthia fragrans.
बर्फाखालीच उमलणार्या जांभळ्या फूलांचे नाव अल्पाईन स्नोबेल.
इंडोनेशियातल्या प्रचंड मोठ्या पण दुर्गंधी येणार्या फूलाचे नाव Titan Arum
अशी शास्त्रीय नावे माहित असली तर नेटवर फोटो शोधणे सोपे जाते. मराठी नावाने फारच कमी वेबपेजेस सापडतात. (कधी कधी तर माझेच जूने लेख सापडतात !!! )
रविवार, ९ जानेवारीला दिनेश
रविवार, ९ जानेवारीला दिनेश भारतात येताहेत एक दिवसासाठी. सकाळी ११ वाजता राणीबागेत भेटण्याचा प्लॅन आहे. ज्यांना जमेल त्यांनी माझ्या विपुत कळवा.
अरेरे.... दिनेशदांना
अरेरे.... दिनेशदांना भेटण्याची फार इच्छा आहे... पण ९ आणि १० जानेवारीस अमरावतीला ''गझलोत्सव-२०११'' मध्ये व्यग्र असल्याने येता येणार नाही.
हा धागा बघायचा राहून गेला
हा धागा बघायचा राहून गेला होता. माहितीचा खजिनाच आहे इथे. सावकाशीने वाचेन .
माझ्या लहानपणी तोरणं खूप खाल्येत मी. आई घरी सुरण लावायची त्यामुळे सुरणाचे फूलही पाहिलय. त्या काळी हे सगळं नेहमीचेच होते त्यामुळे त्याचे फारसे अप्रुप वाटले नाही. आता फक्त आठवणी उरल्यात.
साधनाताई मलाही "दिनेशदा"
साधनाताई मलाही "दिनेशदा" यांना भेट्ण्याचि तीव्र इच्छा आहे, त्यांचा माबो वर अखंडित माहीति स्त्रोत चालुच असतो, वेगवेगळ्या विषयांवर बरीच माहीति त्यांच्या जवळ असते.
पण मी सध्या दुबईत आहे...कधीतरी भेटेनच...., ते जेव्हा इथे येतील किंवा मी तेथे असेन.
एरंडाचं प्रचि द्यायला विसरु नका....प्लिज
दिनेशदा,तुमच्या अभ्यासपूर्ण
दिनेशदा,तुमच्या अभ्यासपूर्ण माहिती मुळे आमच्याही ज्ञानात भर पडत आहे. प्रत्येक विषयाची सखोल माहिती तुमच्यामुळे आम्हाला मिळते.धन्यवाद.
साधना काटेसावरी बद्दल
साधना काटेसावरी बद्दल धन्यवाद
दिनेश, हेच तोरण म्हणत होतात
दिनेश, हेच तोरण म्हणत होतात ना तुम्ही? हे कासला दिसले होते मला. त्याची चटणी पण खायला मिळाली (पण चव नाही आवडली फारशी)
तोरणा मी कधीच बघितली नाहीत.
तोरणा मी कधीच बघितली नाहीत. माधव फोटोबद्दल धन्यवाद.
नाहि माधव हि नाहीत तोरणं. (मी
नाहि माधव हि नाहीत तोरणं. (मी फ़ोटो शोधायला आळस केला काल)
करवंदा एवढीच असतात आकाराने.
ती नुसतीच पिठूळ गोड लागतात. चव साधारण बकुळफळांसारखीच, पण जास्त गोड असतात.
तशी ती नाजूक असतात, झाडावरुन काढली कि थोड्याच वेळात खराब व्हायला लागतात.
दिनेश मी फोटोत दिलेल्या
दिनेश मी फोटोत दिलेल्या झाडाचे शास्त्रीय नाव Dioscorea Pentaphylla असे आहे. ठाण्याला कोपीनेश्वराच्या रस्त्यावर कातकरी बायका हा प्रकार घेउन येतात (साधारण गणपतीच्या काही दिवस आधी) त्यांनी पण मला याचे नाव तोरणं किंवा माऊ असे सांगितले होते. तुम्ही म्हणताय ते पण तोरण बघावेच लागेल आता.
गोव्याला, स्पाईस गार्डन मधे
गोव्याला, स्पाईस गार्डन मधे पण बरीच झाडे बघायला मिळतील>> मी काढले आहे फोटू आता उद्या टाकते.
टोपली कारवी आणि या वर्षी
टोपली कारवी
आणि या वर्षी फुलायचे नाहिये हा नियम विसरलेले एक झाड (कारवी दर ७ वर्षांनी फुलते)
दिनेशदा, तुम्हाला येव्हढी
दिनेशदा, तुम्हाला येव्हढी माहिती कशी काय? खरचं धन्यवाद!!!!!!!!!! तुमच्यामुळे फारच माहिती मिळते.
माधव, कारवीचा फोटो भारी.
माधव, कारवीचा फोटो भारी.
हो...भारीच...... एक क्लोजअप
हो...भारीच...... एक क्लोजअप पण हवा
प्रज्ञा १२३, माझा १७.१२.१०(४)
प्रज्ञा १२३, माझा १७.१२.१०(४) चा प्रतिसाद वाचलास नाही का? त्यात आपल्या बालपणीच्या काही आठवणी लिहील्या आहेत.
--पण पांगार्याच्या बिया आणि त्यांचे चटके अजूनही आठवतायत. (दिलेले आणि घेतलेले.) तसेच शेवरीचा कापूसही आठवतो.
--तसेच आपल्याकडे एक पपनस (पोपनस) नावाच झाड होत ते आठवतय का तुला? संत्र /मोसंब या जातीतील होत.
--लाल गुंजांचही झाड होत. काय छान दिसायच्या त्या? अंडाकॄती आकार, पाऊण भाग लाल आणि पाव भाग काळा. त्यात पण छोटयाशा डोळ्याचा आकार. आताही २ गुंजा माझ्याकडे आहेत.
--भुई चाफ्याचा वास व फूल दोन्ही मस्तच.
--काजूच्या रुजलेल्या बियाची आठवण(द्विदल)येते. चव अजूनही तोंडात आहे.
--कवठी चाफ्याच्या फुलांची तर लयलूट होती.
बापरे सगळया आठवणी लिहायच्या म्हटल्या तर वेळ अपुरा पडेल.
चातक आणखी क्लोजअप नाहिये. सतत
चातक आणखी क्लोजअप नाहिये. सतत वहाणार्या वार्यामुळे एवढचं जमलं. हा फोटो पण ३ प्रयत्नानंतर जमला तो पण फुलाखाली एका मित्राने हात धरला होता - ते जास्त हलू नये म्हणून. दिसतोय ना फोटोत.
Pages