ब्लॉगमधील चित्रपटांच्या गुणांची उलथापालथ
पुस्तकं वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो म्हणुन कधिकधी चित्रपट पाहतो. बरेचसे चित्रपट सुमार असतात म्हणुन विचारुन, गुण तपासुन मगच पाहतो. तरीही काहीकाही आवडत नाहीत. इतका वेळ घालवलाच आहे तर आपणही वाईट चित्रपटांबद्दल लोकांना सावध करावे म्हणुन व चांगल्यांची थोडी तारीफ करावी म्हणुन चित्रपटांना गुण देऊन माझ्या संकेतस्थळावर काही पाने भरतो. पण तुमच्याशी मी खोटे नाही बोलणार - अजुन एक अंतस्थ हेतु आहे. मी कोणते चित्रपट पाहिले हे विसरून जातो म्हणुन खरेतर हा लिहुन ठेवायचा खटाटोप - पुन्हा चुकुन तोच चित्रपट पाहु नये म्हणुन. त्यामुळे अनेकदा अगदी थोडक्यात लिहितो. आणि पुन्हा कथानकही तर reveal करायचे नसते.
गेली काही वर्षे हे सुरु आहे. चांगले १७० झाले आहेत. चित्रपटांच्या नावाबरोबर त्याचे साल व गूण असे मथळ्यात देतो. वेगवेगळे गुण असलेले चित्रपट एका मागोमाग दिसतात (पाहिले असतील त्या क्रमाने). मला ते गुणांनुसार एकत्र करायचे होते. त्याकरता प्रत्येक ब्लॉगपोस्टचे XML मिळवायचे, मथळा वेगळा करायचा, त्यातील मी दिलेले गुण वेगळे करुन त्यावर sort करायचे.
त्याकरता API वापरायचा. प्रत्येक ब्लॉगचा एक 'आकडा' असतो. नवीन पोस्ट करतो तेंव्हा त्याच्या URL मध्ये तो आकडा दिसतो. माझ्या ब्लॉगचा आकडा आहे ३१४८७५८८. तो आकडा वापरुन XML असे मिळवता येते (wget किंवा curl वापरुन):
wget http://www.blogger.com/feeds/31487588/posts/default
यानी सगळे XML मिळत नाही. शेवटच्या ठरावीक entries दिसतात.
सगळ्या entries मिळवायच्या असल्यास:
wget http://www.blogger.com/feeds/31487588/posts/default?max-results=20000
(किंवा कोणताही भलामोठा आकडा).
दोन तारखांमधील मिळवायचे असल्यास:
wget http://www.blogger.com/feeds/31487588/posts/default?published-min=2008-0...
विशिष्ट लेबल्स असलेले XML (उदा. action) मिळवायचे असल्यास:
wget http://www.blogger.com/feeds/31487588/posts/default/-/action/
ब्लॉग entries बसल्याबसल्या (म्हणजे प्रोग्रामद्वारे) बदलता देखील येतात. पण त्या उचापती अजुन केलेल्या नाहीत.
XML मिळवल्यावर हवे तसे parse करता येते. मी एक ढोबळ perl प्रोग्राम लिहुन केले.
यातुन गुणांप्रमाणे sort केलेल्या entries या दुव्यावर सापडतील:
http://www.astro.caltech.edu/~aam/movies.html
वाटल्यास पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या reviews बद्दल अभिप्राय लिहा.
सही दिसतेय साईट आशिष डीटेल
सही दिसतेय साईट आशिष डीटेल बघून सांगतो.
तारे जमीन पर पासून सुरुवात
तारे जमीन पर पासून सुरुवात केली आहे. परीक्षण चांगले आहे. थोडे त्रोटक आहे. संगीत फार चांगले आहे या सिनेमाचे. त्या बद्दलही लिहीता येइल. शिवाय ते incurable आहे.
प्रत्येक परीक्षण खालील पॅरामिटर्स वर करत येइल.
कथावस्तू, संगीत, अॅ़क्टिंग, ट्रीटमेंट, आर्ट म्हणजे सर्व डिपार्टमेंट कव्हर होतील. अजूनही तुमच्या द्रुष्टीने महत्त्वाची सिनेमाची अंगे लिहीता येतील.
@फारेन्ड, ठीक @अश्विनी, अनेक
@फारेन्ड, ठीक
@अश्विनी, अनेक परिक्षणे जरा जास्तच त्रोटक वाटु शकतात. अनेकदा केवळ होलिस्टीकली लिहिल्या जाते. नट-नट्यांच्या, दिग्दर्शकांच्या वगैरे नावं नसतातच (त्या मुळे unbiased मात्र शक्यतो असतात).
ते क्युरेबल नाही, पण ओव्हरकम होऊ शकते असे म्हंटले आहे - वेगळा अर्थ ध्वनीत होत असेल तर शब्द बदलायला हवे.
तसेही माझे reviews हे मुखडे म्हणुनच जास्त शोभतील. आशा आहे की ब्लॉग अॅक्सेस बद्दलच्या माहितीचा लोकांना उपयोग होईल.
ब-याच संज्ञा आजच वाचल्या. खर
ब-याच संज्ञा आजच वाचल्या. खर तर यातल काही कळत आही. पण हा उपक्रम अभिनव आहे त्याबद्दल अभिनंदन.. ब्लॉग पाहीन सावकाश.
हो परीक्षणे मलाही त्रोटक
हो परीक्षणे मलाही त्रोटक वाटली बरीच. काही काही ठिकाणी रेटिंग एवढे कमी का आहे ते एखाद्या वाक्यावरून जाणवते पण जरा सविस्तर आवडले असते.
परीक्षणे वाचली नाहीत. पण
परीक्षणे वाचली नाहीत. पण ब्लॉग बूकमार्क केला आहे. लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद
हो परीक्षणे मलाही त्रोटक वाटली बरीच. >>> फारेंडाला अनुमोदन. अर्थात मी फक्त पहिली दोन वाचली.
समान गुण असलेले चित्रपट
समान गुण असलेले चित्रपट प्रसुतीवर्षाप्रमाणे आता तक्तीकृत केले आहेत.