You are here: मुख्यपृष्ठ/निसर्गाच्या गप्पा (बंद केलेला धागा)
निसर्गाच्या गप्पा (बंद केलेला धागा)
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 November, 2010 - 04:51
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
ह्या हॉर्नबिल सदृश्य पक्षी मी बर्याचदा आमच्या कडे पाहिलाय.... करावे येथील ग्रीन झोन आणि पारसिक हील वर..... अगदी असाच नाही पण रंग जरा डल असलेला पक्षी. आम्ही त्याला ताशा म्हणतो,कारण तो जेव्हा ओरडतो,तेव्हा टण-टण असा आवाज येतो.
Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 07:28
जागु तु हे वाहते पान केलेय्स माहिती वाहुन जाणार....
नविन गप्पांचे पान उघडले की ते वाहते होते. गप्पा मारायच्यात पण त्या वाहायला नको असतिल तर लेखनाचा धागा उघडायला हवा. आता तु लेखनाचा धागा उघडुन इथले तिथे नेऊन चिकटवु शकतेस.
साधना त्या लांब शेपटीच्या पक्षाला अप्सरा असा पण शब्द आहे. कोतवाल अनेकदा रस्त्याशेजारी विजेचा तारांवर बसलेला दिसतो. त्याची शेपटी उलट्या वाय सारखी असते. तो खूप जिगरबाज पक्षी असतो, आणी त्याच्यापेक्षा मोठ्या पक्षालाही हुसकून लावू शकतो. त्याचे घरटे ज्या झाडावर असेल, त्याच्या सोबतीने बाकीचे छोटे पक्षी सुरक्षित राहतात (म्हणून तो कोतवाल)
हॉर्नबील ला धनेश असाच शब्द आहे. त्याच्या बोजड चोचीचा त्याला त्रास होत नाही. डोक्यावरच्या भागाचा, त्याला दिशा शोधण्यासाठी उपयोग होतो, असे वाचले होते. मालवणला खूप दिसतात ते.
त्याची जीवननिष्ठा खरेच वाखाणण्यासारखी असते, एका ढोलीत तो घरटे करतो. मादी आत जाते आणि मग त्या ढोलीचे तोंड चिखलाने बंद केले जाते, निव्वळ चोच बाहेर येईल एवढीच फट ठेवतात, आत अडचण होऊ नये म्हणून मादी आपली पिसे काढून टाकते. मग पिल्ले मोठी होईपर्यंत मादी आणि पिल्लाना अन्न आणून द्यायचे काम एकट्या नराचे असते, त्यात पण त्या सर्वांना चौफेर आहार मिळेल असे तो बघतो. आहारात कोवळी पाने, उंबराची फळे, वटांगळे, छोटे सरडे असे सगळेच असते. पिल्ले मोठी झाली कि मादी ढोलीचे तोंड उघडून बाहेर येते ( या सर्वाचे सुंदर चित्रण ब्यूटीफूल पीपल या चित्रपटात आहे )
या पक्षाला भिवया असतात (असा तो एकमेव) असे वाचले होते. सिंगापूरला तो हाताळला पण होता मी.
या मोठ्या चोचीचा वापर तो कौशल्याने करतो पूर्वी कर्नाळ्याला होता तो पिंजर्यात, बाहेरून टाकलेला दाणा वा कुरमूरा पण तो अलगद पकडायचा.
दिनेशदा,
वाह ! सुंदर !
तुमचा अभ्यास्,निरीक्षण ..लाजवाब !
मग पिल्ले मोठी होईपर्यंत मादी आणि पिल्लाना अन्न आणून द्यायचे काम एकट्या नराचे असते, त्यात पण त्या सर्वांना चौफेर आहार मिळेल असे तो बघतो
पक्षी,प्राणी देखील असा धर्म पाळतात पण माणुस नावाच्या प्राण्याचा काही भरवसा नाही !
कोतवाल अनेकदा रस्त्याशेजारी विजेचा तारांवर बसलेला दिसतो. त्याची शेपटी उलट्या वाय सारखी असते.
येस्स्स. हे उलट्या वायवाले कोतवाल मुंबईत भरपुर आहेत. जागु तुलाही दिसतील. चिमणीपेक्षा थोडा मोठा, पण कबुतरापेक्षा लहान असा हा पक्षी आहे. त्याच्याबद्दल वाचलेय की त्याला इतर पक्ष्यांचे आवाजही काढता येतात. ही सगळी करामत वापरुन तो लहान पक्ष्यांचे रक्षण करतो आणि म्हणुन माणसाने त्याला कोतवाल नाव दिले. अर्थात माणसातल्या कोतवालाने आता ही कामगिरी सोडलीय. रक्षण करण्याचे सोडुन तो भक्षण करण्याच्या मागे लागलाय
अनिल, माणसाला देवाने स्पेशल यासाठीच तर बनवलेय... आता देव आहे की नाही माहित नाही, पण ज्याने कोणी हा अफाट, गुढ त्याचवेळी अतिशय योजकता वापरुन, अगदी लहानातल्या लहान भागाचाही उपयोग करुन घेणारा निसर्ग बनवलाय त्या निसर्गाला शक्य तितके लवकर, शक्य तितका बिनडोकपणा वापरुन कसे संपवायचे याच्याच मागे मानव लागलाय... बहुतेक देवाला (किंवा जो कोणी असेल त्याला) त्याने बनवलेल्या निसर्गाचा कंटाळा आला की तो मानवाची निर्मिती करतो. मानव लगेच निसर्गाच्या मागे हात धुवून लागतो आणि निसर्गाला संपवतो. त्याला संपवता संपवता तोही स्वतः संपतो. मग देव परत नविन निसर्ग बनवायला मोकळा. मग आळस झटकुन लागायचे कामाला परत.
अनिल २ नं चा पक्षी आमच्याकडे येतो. धन्स फोटोसाठी.
पण अनिल ही पाने उडून जातील प्लिज ह्यापुढे खालच्या लिंकवर सगळी माहीती टाका. वरची सुद्धा टाका नाहीतर उडून जाईल. आता ह्या धाग्याचे नावच बदलते मी. http://www.maayboli.com/node/21676#comment-1061853
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 December, 2010 - 05:10
जयु धनेश असेल पण अजुन काहीतरी
जयु धनेश असेल पण अजुन काहीतरी एकदा लोकसत्ता मध्ये वाचल होत.
मला २ झाडां विशयी माहीती हवी
मला २ झाडां विशयी माहीती हवी आहे ...
१] अफु
२] गांजा
माझ्या माहीती प्रमाणे अफु खसखशीच्या झाडापासुन बनवतात..
अन गांजा भांगेच्या झाडा पासुन ?
ही झाडे कोणाला नकळत घरच्या अंगणात लावता येतील काय ?
जयु मी आत्ता गुगल मध्ये सर्च
जयु मी आत्ता गुगल मध्ये सर्च केल. त्यात हॉर्नबिल वेगळेच आहेत. साधारण असाच पक्षी आहे पण तपकिरी रंगाचा. मी फोटोच टाकेन परवा जाउदे.
हो,गुगलवरचे रंगीत आहेत.पण
हो,गुगलवरचे रंगीत आहेत.पण आपल्याकडे बहुतेक राखाडीच दिसतात.

ह्या हॉर्नबिल सदृश्य पक्षी मी
ह्या हॉर्नबिल सदृश्य पक्षी मी बर्याचदा आमच्या कडे पाहिलाय.... करावे येथील ग्रीन झोन आणि पारसिक हील वर..... अगदी असाच नाही पण रंग जरा डल असलेला पक्षी. आम्ही त्याला ताशा म्हणतो,कारण तो जेव्हा ओरडतो,तेव्हा टण-टण असा आवाज येतो.
मीही हॉर्नबिल पाहिले आहेत,
मीही हॉर्नबिल पाहिले आहेत, सगळॅ राखाडी. फक्त फोटोत रंगित दिसतात.
डोक्टर वरचा फोटो तुम्ही काढलाय काय??? बेलापुरच्या पारसिक हिलवर जाऊन शोधते आता याला.
नाही नाही..... हा जालावरचा
नाही नाही..... हा जालावरचा फोटो आहे... मी पाहिलेला याच्याशी साधर्म्य दाखवणारा होता.... फक्त रंग इतके ठळक नव्हते. पारसिक हिलवर मी ५/६ तरी पाहिलेयत.
जागु तु हे वाहते पान केलेय्स
जागु तु हे वाहते पान केलेय्स माहिती वाहुन जाणार....
नविन गप्पांचे पान उघडले की ते वाहते होते. गप्पा मारायच्यात पण त्या वाहायला नको असतिल तर लेखनाचा धागा उघडायला हवा. आता तु लेखनाचा धागा उघडुन इथले तिथे नेऊन चिकटवु शकतेस.
बिचारा पक्षी... काय ते चोचिवर
बिचारा पक्षी... काय ते चोचिवर अगडबंब अजुन एक शिंग
साधना त्या लांब शेपटीच्या
साधना त्या लांब शेपटीच्या पक्षाला अप्सरा असा पण शब्द आहे. कोतवाल अनेकदा रस्त्याशेजारी विजेचा तारांवर बसलेला दिसतो. त्याची शेपटी उलट्या वाय सारखी असते. तो खूप जिगरबाज पक्षी असतो, आणी त्याच्यापेक्षा मोठ्या पक्षालाही हुसकून लावू शकतो. त्याचे घरटे ज्या झाडावर असेल, त्याच्या सोबतीने बाकीचे छोटे पक्षी सुरक्षित राहतात (म्हणून तो कोतवाल)
हॉर्नबील ला धनेश असाच शब्द आहे. त्याच्या बोजड चोचीचा त्याला त्रास होत नाही. डोक्यावरच्या भागाचा, त्याला दिशा शोधण्यासाठी उपयोग होतो, असे वाचले होते. मालवणला खूप दिसतात ते.
त्याची जीवननिष्ठा खरेच वाखाणण्यासारखी असते, एका ढोलीत तो घरटे करतो. मादी आत जाते आणि मग त्या ढोलीचे तोंड चिखलाने बंद केले जाते, निव्वळ चोच बाहेर येईल एवढीच फट ठेवतात, आत अडचण होऊ नये म्हणून मादी आपली पिसे काढून टाकते. मग पिल्ले मोठी होईपर्यंत मादी आणि पिल्लाना अन्न आणून द्यायचे काम एकट्या नराचे असते, त्यात पण त्या सर्वांना चौफेर आहार मिळेल असे तो बघतो. आहारात कोवळी पाने, उंबराची फळे, वटांगळे, छोटे सरडे असे सगळेच असते. पिल्ले मोठी झाली कि मादी ढोलीचे तोंड उघडून बाहेर येते ( या सर्वाचे सुंदर चित्रण ब्यूटीफूल पीपल या चित्रपटात आहे )
या पक्षाला भिवया असतात (असा तो एकमेव) असे वाचले होते. सिंगापूरला तो हाताळला पण होता मी.
या मोठ्या चोचीचा वापर तो कौशल्याने करतो पूर्वी कर्नाळ्याला होता तो पिंजर्यात, बाहेरून टाकलेला दाणा वा कुरमूरा पण तो अलगद पकडायचा.
दिनेशदा, वाह ! सुंदर ! तुमचा
दिनेशदा,
वाह ! सुंदर !
तुमचा अभ्यास्,निरीक्षण ..लाजवाब !
मग पिल्ले मोठी होईपर्यंत मादी आणि पिल्लाना अन्न आणून द्यायचे काम एकट्या नराचे असते, त्यात पण त्या सर्वांना चौफेर आहार मिळेल असे तो बघतो
पक्षी,प्राणी देखील असा धर्म पाळतात पण माणुस नावाच्या प्राण्याचा काही भरवसा नाही !
कोतवाल अनेकदा रस्त्याशेजारी
कोतवाल अनेकदा रस्त्याशेजारी विजेचा तारांवर बसलेला दिसतो. त्याची शेपटी उलट्या वाय सारखी असते.
येस्स्स. हे उलट्या वायवाले कोतवाल मुंबईत भरपुर आहेत. जागु तुलाही दिसतील. चिमणीपेक्षा थोडा मोठा, पण कबुतरापेक्षा लहान असा हा पक्षी आहे. त्याच्याबद्दल वाचलेय की त्याला इतर पक्ष्यांचे आवाजही काढता येतात. ही सगळी करामत वापरुन तो लहान पक्ष्यांचे रक्षण करतो आणि म्हणुन माणसाने त्याला कोतवाल नाव दिले. अर्थात माणसातल्या कोतवालाने आता ही कामगिरी सोडलीय. रक्षण करण्याचे सोडुन तो भक्षण करण्याच्या मागे लागलाय
अनिल, माणसाला देवाने स्पेशल यासाठीच तर बनवलेय... आता देव आहे की नाही माहित नाही, पण ज्याने कोणी हा अफाट, गुढ त्याचवेळी अतिशय योजकता वापरुन, अगदी लहानातल्या लहान भागाचाही उपयोग करुन घेणारा निसर्ग बनवलाय त्या निसर्गाला शक्य तितके लवकर, शक्य तितका बिनडोकपणा वापरुन कसे संपवायचे याच्याच मागे मानव लागलाय... बहुतेक देवाला (किंवा जो कोणी असेल त्याला) त्याने बनवलेल्या निसर्गाचा कंटाळा आला की तो मानवाची निर्मिती करतो. मानव लगेच निसर्गाच्या मागे हात धुवून लागतो आणि निसर्गाला संपवतो. त्याला संपवता संपवता तोही स्वतः संपतो. मग देव परत नविन निसर्ग बनवायला मोकळा. मग आळस झटकुन लागायचे कामाला परत.
साधना तू दिलेल्या लिंक मधला
साधना तू दिलेल्या लिंक मधला "स्वर्गिय नर्तक" कसला सही आहे. !!
साधना, तुम्ही लिहिलेले वरील
साधना,
तुम्ही लिहिलेले वरील विचार अगदी पटले !
धन्यवाद !
मला ती मुवी नेटवर कुठे फ्री डाऊन्लोड करुन मिळेल ? (युट्युब सोडुन)
(No subject)
(No subject)
हा वरचा पक्षी धनेश,कोतवालच ना
हा वरचा पक्षी धनेश,कोतवालच ना ?
या वर दोन लेख वाचायला मिळाले ...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=845...
पिलांसाठी आईला अंधारकोठडी! बाबांना परिश्रम
http://epaper.esakal.com/eSakal/20091002/5155955613504297273.htm
यात लिहिलं आहे की जगभरात आता फक्त चारशेच्या आसपास धनेश आहेत .
फक्त ४०० पक्षी की जाती ?
पक्षी असेल तर खुप भयानक परिस्थिती आहे ..
अनिल २ नं चा पक्षी आमच्याकडे
अनिल २ नं चा पक्षी आमच्याकडे येतो. धन्स फोटोसाठी.
पण अनिल ही पाने उडून जातील प्लिज ह्यापुढे खालच्या लिंकवर सगळी माहीती टाका. वरची सुद्धा टाका नाहीतर उडून जाईल. आता ह्या धाग्याचे नावच बदलते मी.
http://www.maayboli.com/node/21676#comment-1061853
हा वरचा पक्षी धनेश,कोतवालच ना
हा वरचा पक्षी धनेश,कोतवालच ना ?
अरे बाबा धनेश आणि कोतवाल वेगवेगळे. वरचा धनेश. वरचा पिवळा मात्र माहित नाही. कोतवाल काळे असतात.
फक्त ४०० उरलेत? मला नाही खरे वाटत. कोकणात भरपुर आहेत. माझ्या मुलीची शाळा डोंगरावर आहे. तिथे यांची भरपुर पिल्ले तिने पाहिलीत.
रच्याकने, हा धागा वाहता आहे, इथे प्रतिसाद देऊ नका. जागुने अजुन एक धागा उघडलाय, तिकडे जा...