खगोलशास्त्रीय सटरफटर

Submitted by aschig on 9 July, 2010 - 00:50

फार खोलात न शिरता इथे खगोलशात्राशी संबंधीत काही त्रोटक factoids (सद्य आकलनानुसार) नियमीतपणे टाकायचा विचार आहे.

(१) विश्वाच्या मालमत्तेपासुन सुरुवात करु या: विश्वात पसरलेल्या दिर्घीका, त्यांचा व्याप व विश्वावे आकारमान वाढण्याचा वेग पहाता असे लक्षात येते की ५% पेक्षा कमी मालमत्ता दृष्य वस्तुमानात आहे (म्हणजे तुम्ही-आम्ही, ग्रह, तारे ई. थोडक्यात बॅरीऑन या प्रकारात मोडणारे कण - Baryonic matter). त्याच्या ५ पट वस्तुमान अदृष्य स्वरुपात (dark matter) असते, तर तब्बल 3/4 पसारा अदृष्य उर्जेच्या स्वरुपात असतो (dark energy). [८ जुलै २०१०]

(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]

(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]

(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टींग धागा सुरू केला आहेस. खास मराठी शब्दांना इंग्रजी प्रतीशब्द देतो आहेस ते आवडलं. दीर्घीका म्हणजे galaxy का?

कोणाला खगोलशास्रिय इन्ग्लिइश शब्दांचे मराठी प्रतिशब्द माहिती आहेत का?
Mamalhuaztli (The New fire)

Tianquiztli (The Market)

Citlaltlachtli (The ball game of the stars)

ही काही उदाहरण आहेत

छान विषय आहे. आणि तुझ्यासारख्याकडून यातले बरेच काही वाचायला आवडेल.

एक सुचवू का? एकदम विश्वापासून सुरुवात करण्यापेक्षा मूलकण, उर्जा, कृष्णउर्जा अशा मुलभूत गोष्टींपासून सुरुवात केलीस तर पुढच्या गोष्टी समजायला सोपे पडेल. हे आपले माझे मत.

(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]

सही धागा... 'विश्वात किती अणु आहेत' यावरुन मलाही एक सुचलं... विश्वातील निरनिराळ्या अणुंचे प्रमाण.

(अ) निरनिराळ्या मूलतत्वांची निर्मिती:
- Big bang नंतर काही कालावधी गेल्यावर hydrogen आणि helium (92% & 8% in number) अणुंची निर्मिती झाली.
- तार्‍याच्या जीवनकालात मुख्यतः त्यातील hydrogen चे helium मधे रुपांतर होत असते.
- Hydrogen हे इंधन संपायला आल्यावर गुरुत्वाकर्शण प्रबळ होते आणि तारा आकुंचन पाउ लागतो. यामुळे तार्‍याच्या गाभ्यातले तपमान आणि दाब वाढत जातो आणि अधिकाधिक घन मूलतत्वे (helium, carbon, oxygen, neon, silicon) इंधन म्हणुन वापरली जातात. या प्रक्रियेत iron पर्यंतची मूलतत्वे तयार करण्याची क्षमता असते.
- तार्‍याच्या गाभ्यात लोखंड बनल्यावर nuclear fusion मंदावते. पुन्हा गुरुत्वाकर्शण प्रबळ झाल्याने तारा आकुंचन पाउ लागतो आणि त्याचे neutron तारा किंवा कृष्णविवरात रुपांतर होते अथवा कधीकधी supernova विस्फोट होतो. या विस्फोटावेळी निर्माण झालेल्या अत्युच्य दाब आणि तपमानामुळे लोखंडानंतरचे धातु निर्माण होउ शकतात.
या स्फोटामुळे ही सगळी मूलतत्वे अवकाशात सर्वत्र पसरली जातात आणि नविन तयार होणार्‍या तार्‍यांमधे त्यांचा समावेश होतो. अशाप्रकारे (भूतपूर्व) तार्‍यांच्या स्फोटामुळेच आपले शरीर, ही पृथ्वी आणि हे जीवन शक्य झाले आहे. [१२ जुलै २०१०]

(आशिष चुका सुधारल्याबद्दल धन्यवाद!)

सॅम, बरोबर आहे. एक छोटी दुरुस्ती: H/He हे बिग बँग मध्ये न बनता त्यानंतर काही प्रक्रीया होऊन बनतात. याकरता बराच कमी कालावधी लागतो, पण त्या दरम्यान अतिशय महत्वाच्या अनेक गोष्टी होत असल्याने ते नमुद करणे गरजेचे ठरते.
त्याचप्रमाणे मध्यापासुन वेगवेगळ्या अंतरांवर एकाचवेळी H/He/C/Ne/O/Si हे इंधन म्हणुन वापरल्या जात असतात (H पृष्ठभागाजवळ तर Si मध्याजवळ). मध्यभागाजवळ जेंव्हा लोखंड बनतं तेंव्हा त्यामुळे फ्युजन प्रक्रीया मंदावतात. या प्रक्रीयांमुळेच गुरुत्वाकर्षणाविरुद्धचा दबाव असतो. तो नाहीसा झाला की तारा आतल्या आत कोसळतो व सुपरनोव्हा किंवा न्युट्रॉन स्टार किंवा कृष्णविवरात त्याचे रुपांतर होते.

(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]

सॅम, तुझे पोस्ट संपादीत करुन (अ) हे त्याआधी लिहिशील का? नंतर मी कुठेतरी त्याचा वापर करीन तेंव्हा मुख्य यादीत टाकुन त्याचा त्याप्रमाणे उल्लेख करीन.

तु (आणि इतरही) अशी आणखीन माहिती लिहाल तेंव्हा कृपया (ब), (क), (ड) वगैरे वापरा.

aschig
मला आधिच विचारायचा होता एक प्रश्न पण नको तेवढा आधिच होइल का म्हणुन विचारला नव्हता. पण तुम्हि कृष्णविवरचापण उल्लेख केला म्हणुन विचारते.
मला वार्महोल आणि टाइम डायलेशनला मराठि शब्द हवा होता. कृपया सांगणार का?

धन्यवाद Happy
ह्म्म्म. जास्तच कठिण वाटतील का हे शब्द? मग त्यापेक्षा इंग्लिश वापरावेत अस वाटतय. तरि अजुन कोणाला काहि सुचले माहित असले तर सांगा.
परत एकदा धन्यवाद Happy

(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]

aschig तुमचे काम खुपच इंटरेस्टिंग आहे.
या विषयात काम करायला कोणत्या प्रकारचे शिक्षण लागते, कशा प्रकारचे काम असते या बद्दलही वाचायला आवडेल.

युरोपीयन्सकरता अरोरे (नॉर्दर्न लाईट्स) पहायची सुवर्णसंधी:
http://www.southgatearc.org/news/august2010/cme_impact.htm

(सावली दैनंदीन व्यवहार फार रोचक नसतो, पण काही गोष्टींबद्दल लिहिता येईल. गेल्या दिवाळी अंकात शिक्षणासंबंधी थोडे लिहिले होते - http://vishesh.maayboli.com/diwali-2009/651)

विश्वाच्या सुरुवातीला असलेले क्वार्क-ग्लुऑन सुप LHC ने घडबून आणलेल्या शिश्याच्या अणुंच्या टकरींच्या अभ्यासात आढळुन आले आहे:

http://www.cbc.ca/technology/story/2010/11/26/lhc-big-bang-quark-gluon-p...

आशिष, जेंव्हा एखादे समिकरण मांडून आणि ते सोडवून जेंव्हा वैज्ञानीक सिध्दांत मांडला जातो तेंव्हा त्यावर विश्वास कसा ठेवायचा? म्हणजे समजा झाडावरून १० आंबे काढले आणि आता ५ आंबे उरले आहेत या दोन वस्तुस्थिती मला माहीती आहेत पण त्यावरून माझ्या भावाने ५ आंबे खाल्ले हे अनुमान मी कसे काढू शकतो? अनेक शक्यता असू शकतात - १. पाच आंबे खराब झाले २. सगळे (१०) आंबे माझ्या बहिणीने खाल्ले आणि आता जे ५ आंबे आहेत ते मावशीने आणले आहेय. इ. इ.

म्हणजे खरी असते ती वस्तुस्थीती (ती पण relative च असते) जी अनुभवता येते. मग आपण जे अनुभवू शकत नाही अशा शक्यता गणिताच्या सहाय्याने सिध्द करून दाखवणे हे विज्ञानाला कसे मान्य होते?

विश्वाच्या सुरुवातीची अवस्था, कृष्णविवरे, कृष्णवस्तू अशा अनेक संकल्पना ज्या आपण कधी अनुभवू शकत नाही त्या विज्ञानाला कशा मान्य होतात?

त्या संकल्पना मान्य होतात पेक्षा त्या शक्यता त्या त्या वेळच्या "माहिती"नुसार सर्वात शक्य असतात.

जर आंबे खराब झाले तर ते कचरापेटीत दिसताहेत का? कुणाच्या ढेकरींना आंब्याचा वास आहे का?
मावशीच्या पेटीचे वजन ती आली तेंव्हा आणि आता किती आहे? फरक कुठे गेला? ई.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मान्य केल्यास, तार्‍यांच्या परीक्रमा दिसतात तशा असण्याकरता मोठे वस्तुमान आवश्यक असेल तर ते निर्माण करावे लागते. त्याचे इतर परिणाम दिसत नसतील तर ते कृष्णविवरांमध्ये किंवा डार्क स्वरुपात असावे लागेल वगैरे.

गणीत ही नंतरची पायरी झाली - आधी हवा हापुस सारखा गोड व सुदृढ पुरावा. लंगडा पण काही कामाचा नाही.

नवा विक्रमः सर्वात महाकाय तारा: >> त्या लिंकमध्ये R136a1 हा महाकाय तारा दिलेला आहे, तर
सी.वाय्.कॅनिस मेजॉरिस हाही सर्वात मोठा तारा मानतात. तर हे वर्गीकरण कशानुसार केले जाते?

तसंच याहीपेक्षा मोठे तारे सापडण्याचा चान्स आहे का?

Pages