अग मी दोन आठवड्यांनी स्कीइंगला जाणार आहे. मला कॅमेरा घ्यायचाय. चलशील का माझ्या बरोबर?
२ महिन्यापूर्वीच जपान मध्ये आलेला माझा एक ऑफिसमधला एक सहकारी विचारात होता.
कॅमेऱ्याच्या दुकानात जायच म्हटल्यावर मी एका पायावर तय्यार. तरी त्याला एकदा विचारलं कसला कॅमेरा घ्यायचा विचार करतोयस. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो डीजीकॅम घेईल असे वाटले मला होते.
आता एसेलारच घेईन म्हणतो.एसेलारने कसले छान फोटो येतात. बाकी कॅमेऱ्याना काही मजा नाही.
आतापर्यंत कुठलाच कॅमेरा कधीही न वापरता त्याच अगदी ठाम मत होत. मी त्याला पॉईंट एन्ड शूट किंवा डीजीकॅम कडे वळवायचा केविलवाणा प्रयत्न फुकटच गेला.
दुसऱ्या दिवशी आम्ही लंच टाईममध्ये बिक कॅमेरा म्हणून एका मोठ्या दुकाना जाऊन कॅननचा डिजीटल एस एल आर घेऊन आलो.
त्याच्या पुढच्या आठवड्यात एक दिवस ऑफिस मध्ये जरा कॅमेरा शिकवणी पण करून झाली. नंतर तो स्कीइंगला जाऊन वैगेरे आला.
परत ऑफिसला आल्यावर त्याला फोटोबद्दल विचारलं तर अगदी वैतागलेला.
अग कसल काय सगळे फोटो नुसते गडद आलेत. आणि माझा एकपण फोटो नाहीये त्यात.
अरे मग काढायला द्यायच ना कोणालातरी म्हणजे तुझा फोटो पण आला असता. इति मी
हो ना पण तो नवीन कॅमेरा कोणालाच धड माहीत नाही कसा वापरायचा तो, मग नाहीच काढले फोटो. परत तो गळ्यात अडकवून मला स्कीइंग पण करता येईना. शेवटी ठेवूनच दिला बेगेत.
माझ्या अगदी मनात येऊन सुद्धा आधीच वैतागलेल्या त्याला "तरी मी तुला सांगत होते..." प्रकारचा डायलॉग मारून अजून त्रस्त केला नाही. फार जवळचा मित्र असता तर अशी संधी अजिबात सोडली नसती हे हि खरं.
याच मित्राने आणखी तीन चार वेळा तो कॅमेरा कुठे कुठे घेऊन जायचा प्रयत्न केला. याच्या आवडी भन्नाट होत्या ट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग वैगेरे. प्रत्येक ठिकाणी त्याला तो कॅमेरा म्हणजे गळ्यात लोढणच वाटल. शेवटी त्याने एक छोटासा डीजीकॅम घेतला जो आता त्याच्या स्पोर्ट्स मध्ये त्याला साथ देतो.
पण हे बऱ्याच वेळा घडत कि नाही? आपल्याला कुठेतरी नवीन ठिकाणी जायचं असतं आणि अगदी शेवटच्या क्षणी आपण कॅमेरा खरेदी करतो. मग कॅमेरा वापरायचा माहीत नसला तर मनस्ताप होतो, नवीन ठिकाणाचे धड फोटोही येत नाहीत आणि वर स्कीइंग वैगेरे सारख्या गोष्टीमध्ये तर त्याची अडचणच होते.
कपडे विकत घेताना पण आपण बघतो ना आपल्याला काय शोभेल? काय वापरता येईल? मग कॅमेरा खरेदी करताना सुद्धा या गोष्टी बघायला नको का? आता माझ्या सांगण्याचा उद्देश एस एल आर कॅमेरा घेऊ नये असा नाहीये. तर आपल्याला वापरता येईल असा सुयोग्य कॅमेरा घ्यावा असा आहे.
म्हणजे या माझ्या मित्रासारख जर तुम्हाला कुठे नवीन ठिकाणी नवीन गोष्ट स्पोर्ट्स इ. करायला जायचं असेल तर तेव्हा नवीन एस एल आर कॅमेरा घेऊन जाऊन निराशाच पदरी येणार. त्यापेक्षा मग डीजीकॅम घेतलेला केव्हाही चांगला.
तुमची मुळात जर फोटोग्राफीची आवड नसेल तर एक कॅमेरा त्याच्या लेन्स, आणि अजून जे काय साहित्य लागत ते सगळ घेऊन प्रवास करणे हायकिंग करणे हा एक त्रास होऊन बसतो.
म्हणून कॅमेरा घ्यायचा ठरवताय मग जरा या बाबींकडे लक्ष द्या
तुमच्या कडे कॅमेरा कधीच नव्हता आणि आता पहिल्यांदाच घ्यायचाय
मग साधा फिल्मचा पॉईंट एन्ड शूट कॅमेरा सुद्धा चालेल. कोणत्याही घरगुती प्रसंगाचे ट्रीपचे फोटो नीट काढता येतात वापरायला सोपा एकदम. फिल्म असल्याने फोटो काढून झाले कि फिल्म डेव्हेलेप्मेंटला स्टुडीयोमध्ये दिली कि काम झालं.
तुम्हाला कॉम्प्युटर वापरता येत नसला तर फिल्मवाला कॅमेरा उत्तमच.फक्त फिल्मवाला कॅमेरामध्ये काढलेले फोटो डेव्हेलप झाल्याशिवाय कसे आलेत ते कळत नाही.
डीजीकॅम सुद्धा पॉईंट एन्ड शूट भागातच येतो. पण डीजीकॅम घेतलात तर तुमच्याकडे कॉम्प्युटर असणे आणि तो नीट वापरता येणे जरुरीचे आहे. डीजीकॅम मध्ये काढलेले फोटो मागेच डीजीकॅमच्या स्क्रीन वर बघता येतात हा सगळ्यात महत्वाचा फायदा. नवीन डीजीकॅममध्ये बरयाच सोई पण असतात. म्हणजे टच स्क्रीन, ओटो फोकस,ऑतो फ्लाश इ. बरेच काही.
Canon Cybershot,Sony ixy, Nikon Coolpix, Casio यातले नवीन मॉडेल बघुन घेता येईल. घेताना जरा मेमरी कार्डकडे लक्ष द्या. सोनी साठी स्पेशल कार्ड लागतात ते महाग असतात. बटरीकडे लक्ष द्या, काही काही मध्ये आपले पेन्सिल सेल पण चालतात. त्याना वेगळा चार्जर लागत नाही.
अजून वरच्या ऑप्शन मध्ये एस एल आर लाईक कॅमेरा पण येतो. हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येन नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.
यातहि बरीच नवीन मॉंडेल असतात याची काही उदाहरणे म्हणजे Panasonic Lumix, Panasonic FZ,Canon S5 IS,Canon PowerShot, Nikon P80,Sony H50,Olympus SP-590
तुमच्या कडे पॉईंट एन्ड शूट कॅमेरा आहेच पण एक एस एल आर पण घ्यायचाय, असाच केव्हातरी वापरायला.
नक्की घ्याच कारण हौसेला मोल नसत. एस एल आर कि डिजीटल एस एल आर हे सर्वस्वी तुमच्या कॉम्प्युटर वापरता येण्यावर,आणि बजेटवर अवलंबून आहे. कॅनन कि निकॉन हा वादहि व्यर्थ आहे. दोन्ही मध्ये चांगले कॅमेरे आहेत आणि लेन्स पण आहेत तुम्ही शक्यतो कंझ्युमर सिरीज# मधले कॅमेरे बघा. हे सगळ्यात स्वस्त रेंज मध्ये उपलब्ध असतात. कंझ्युमर सिरीजमध्ये कॅमेऱ्याबरोबर एक लेन्सहि किट मध्ये असते त्यामुळे खरेदी सोपी आणि स्वस्त पडते.
साधारण कॅनन नवीन मॉडेल अशी आहेत canon EOS 350D /EOS Rebel(अमेरिकन मॉडेल )/EOS Kiss(जपान मॉडेल), EOS 300X, EOS 1000D
निकॉन Nikon F आणि Nikon D सिरीज मध्येपण बरेच आहेत Nikon F6,Nikon F75,Nikon D3000,Nikon D60
तुमची मुळ आवड फोटोग्राफी नाही पण कॅमेरा तुमच्या छंदामध्ये उपयोगी आहे
ट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग अस काही छंद असेल तर डीजीकॅम बेस्ट आहे. तो इतका लहान असतो ती बाळगण्याचा त्रास होत नाही.
पण जर झूम वैगेरे हवे असेल तर वर सांगितलेल्या प्रमाणे एस एल आर लाईक कॅमेरा घेता येईल. हलका असल्याने नेणे खूप त्रासाचे नाहीये, आणी लेन्सचा पसारा पण न्यायला लागत नाही.
तुम्हाला फोटोग्राफीची खूप हौस आहे आणि फोटोग्राफी शिकायची आहे. सध्याचा पॉईंट एन्ड शूट ने क्रिएटिव्ह फोटोग्राफी करता येत नाहीये.
तुमच्याकडे जर आधीच एक एस एल आर असेल तर तुम्हाला सुरुवातीला काहीही घ्यायची गरज नाही.
नसेल तर मात्र आधी बजेट ठरवा. जर ते खूप कमी असेल तर फिल्म एस एल आर घेणे उत्तम. काही जुने मॉंडेलचे पूर्ण मेकॅनिकल कॅमेरे खुप स्वस्त मिळू शकतात. यात सगळे कंट्रोल तुम्हालाच ठरवायला लागतात यामुळे सुरुवातीला चांगले फोटो येणे जड जाते. फोटोग्राफीची खरच आवड आणि लाईट, शटरस्पीड याबद्दल खूप काही शिकावं लागत पण जे शिकाल ते अगदी पक्क होऊन जाईल.
मी जवळपास अकरा वर्षापुर्वी याच वळणावर होते. मला तस यात काही सांगणार कोणीच नव्हत. पण मी ठरवल होत कि नोकरी लागल्यावर जेव्हा एका महिन्याच्या पगारात कॅमेरा बसेल एवढा पगार होईल तेव्हा एस एल आर घ्यायचाच. आयटी भाग्यामुळे तो योग लगेचच आला. पण त्यावेळी इंटरनेटवर शोधणे वगेरे काहीच धड माहित नव्हते. मी आणि चुलत दादा दोघ मिळून बॉम्बेसेंट्रललं गेलो पैसे घेऊन. एका दुकानात जाऊन त्याने जे दोन चार कॅमेरे दाखवले त्यातला एक घेऊन आलो. तो कॅननचा होता. मी बहुतेक इतक्या मठ्ठपणे कॅमेरा घेतला कि त्या दुकानदाराला मी अगदी लक्षात राहिले. १०वर्षानी माझा लहान भाऊ त्याच दुकाना गेल्यावर नावावरून त्याने ओळखले आणि भावाला विचारले होते कि तुमच्या बहिणीने इथूनच घेतला होता न कॅमेरा!
मी घेतलेला ऑटो आणि मन्युअल दोन्ही मोड वाला होता. आता जवळपास सगळे एस एल आर कॅमेरे असेच असतात. यामुळे अगदी काही येत नसेल तरी ऑटो मोड मध्ये फोटो काढता येतात. पण असा केला तर खरतर यात आणि पॉईंट एन्ड शूट मध्ये मग फार फरक रहातच नाही.
फिल्म कॅमेऱ्याचा एक तोटा असा कि फिल्म डेव्हलपमेंटचा खर्च, आणि ठेवायची जागा. मी फिरायला गेल्यावर इतके फोटो काढायचे कि प्रत्येक ट्रीपवरून आल कि ५/६ रोल असायचेच. ते घरात ठेवायला जागा पण होईना.
सहसा या वेळी जो कॅमेरा घेतला जातो तोच ब्रांड नंतरहि वापरण चालू राहत. कारण त्या अनुषंगाने आपण इतर लेन्स इ. हळूहळू खरेदी करतोच. त्यामुळे तुमचा काही चोइस असा असेलच तर त्या कंपनीचा घ्या. पण जर पुढे तुम्हाला काही स्पेशालिटी करावीशी वाटली तर ब्रांड बदलताही येतो त्यामुळे खूप काळजी करून नका.
बजेट जास्त असेल तर डिजीटल एस एल आर घेता येईल
Nikon D3000,Nikon D90, Nikon D6,
canon EOS 20D, 30D, 40D, 5D, 350D
असे बरेच ऑप्शन आहेत आणि दरवर्षी नवीन येत असतात.
डिजीटल एस एल आर घेताना लक्षात ठेवायची एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फोटो काढलेत कि ते कॉम्प्युटरवर डाउनलोड करावे लागतात. त्यानंतर ते प्रोसेस म्हणजे raw format मधून jpg मध्ये convert करावे लागतात.
हे त्रासदायक वाटत असेल तर फोटो काढतानाच jpg काढण्याचा एक ऑप्शन असतो कॅमेऱ्या मध्ये तो चालू करून ठेवावा.
तुमच्या कडे एक एस एल आर कॅमेरा आहेच पण आता अपग्रेड करायचाय
इथे मात्र तुम्हाला बराच विचार करावा लागेल. सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्हाला अपग्रेड का करायचंय?
म्हणजे "माझ्या मित्राकडे हा नवीन कॅमेरा आहे त्याने मस्त येतात त्याचे फोटो. माझ्या कॅमेऱ्याने येत नाहीत म्हणून मला त्याच्याकडे असलेलाच कॅमेरा घ्यायचा आहे" अस काहीस वाटत असेल तर ते म्हणजे नाचता येईना... अस आहे.
जर तुम्हाला तुमचे फोटो चांगले येत नाहीत असे वाटत असेल तर कॅमेरा बदलून काहीच उपयोग नाही. कारण त्या नवीन कॅमेऱ्याच्या मागे उभे रहाणारे तुम्ही जुनेच असणार. त्यापेक्षा ते पैसे फोटोग्राफीच्या कोर्स किंवा पुस्तकांसाठी साठी घाला. तुमच नक्की कुठे चुकत ते माहिती करा.
जर तुम्हाला तुमच्या कॅमेर्यामधल्या त्रुटी जाणवायला लागल्यात आणि त्यामुळे फोटो काढताना अडचण होतेय असा वाटल कि मात्र बदलण गरजेच ठरत.अशा वेळी नवीन कॅमेरा म्हणजे नवीन बाजारात आलेल मॉंडेलच असेल असा नाही. तुमच्या गरजेला जे योग्य असेल ते मॉंडेल घ्याव.
म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स फोटोग्राफी आवडते आणि तुमच्याकडे कॅनन 10D आहे. छान फोटो येतात पण बऱ्याचवेळा नेमका हायलाईट निसटून जातोय कारण कॅमेरा एवढा चपळाईने (३ फ्रेम पर सेकंद) फोटो काढू देत नाही. मग तुम्हाला ज्या कॅमेऱ्या मध्ये जास्त फ्रेम पर सेकंद असतात असा कॅमेरा घेणे उपयुक्त ठरेल.
किंवा तुम्हाला बर्ड फोटोग्राफी आवडते तुमच्या कडे एक निकॉन कॅमरा आहे. याने हि फोटो मस्त येतायेत. पण तुमचा फोकस खूप वेळा बरोबर येत नाही. नीट फोकस राहिला तर अजून छान फोटो येतील अशा वेळी नवीन आलेला 51 point focus आणि focus followup वाला कॅमेरा घेण फायद्याच होईल.
अगदी तुम्हाला खांद्याला इजा झालीये आणि तुम्ही जड कॅमेरे उचलू शकत नाही अशावेळी वजनाने हलके असलेले कंझ्युमर कॅमेरा घेताना वाईट वाटू नये.
असे अपग्रेड करताना बहुतेकदा प्रोझ्युमर कॅमेरे# किंवा प्रोफेशनल कॅमेरे# मध्ये केले जाते.
अजून एक अपग्रेड करायचं कारण म्हणजे डीजीटल वर्ल्ड मधले मेगापिक्सेल
बरेचजण या रेस मध्ये धावताहेत. नवीन १०मेगापिक्सेल कॅमेरा आला कि आधीचा ८चा सोडून तो घ्यायचा मग १२ चा आला कि परत बदलायचा. खरतर तुम्ही तुमचे फोटो कुठेही विकत नसाल, किंवा A4 पेक्षा मोठ प्रिंटहि काढत नसाल तर ८ मेगापिक्सेल च्या वर धावायची गरज नाहीये. या मेगापिक्सेल रेस आणि प्रिंट बद्दल पण सांगेनच मी नंतर केव्हातरी.
एस एल आर च्या पेक्षा अजून एक वेगळ जग सुद्धा आहे बर का. ते म्हणजे मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर्मेट फोटोग्राफी. आपल्या एस एल आर च्या निगेटिव्ह किंवा सेन्सर ची साईज ३५मिमि अशी (खरतर 24x36mm) म्हटली जाते. मिडीयम फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंचापेक्षा कमी पण ३५मिमि पेक्षा जास्त. तर या लार्ज फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंच किंवा 8x10इंच किंवा मोठीच.
मोठे मोठ बिलबोर्ड, जाहिराती यासाठी लार्ज फॉर्मेट फोटोग्राफी वापराली जाते पण याविषयावर अजून काही माहिती देण्याची माझी अजूनतरी पात्रता नाहीये. हा एक फॉर्मेट मला पण हाताळून बघायचाय कधीतरी.
आता हे एवढ लिहण्याने तुमच्या ज्ञानात भर पडली कि गोंधळात ते माहीत नाही. पण हि माहिती कुठेतरी, कोणालातरी उपयोगी होईल हि अपेक्षा.
कुठलाही कॅमेरा घ्या,पण तो हातात आल्यावर पहिली गोष्ट कुठली कराल तर त्याचे manual किमान चार वेळा वाचून काढा. आगदि पाठ केलात तरी चालेल.
त्यानंतर काय कराल तर कॅमेऱ्याची सगळी बटन कुठे कुठे आहेत ते नीट बघा. हे इतक छान आलं पाहिजे कि अंधारात कॅमेरा हातात असेल तरी न बघता नुसत हातांना कळल पाहिजे कुठच बटन कुठ आहे ते.
#कंझ्युमर कॅमेरा म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्याचा बोलीभाषेत ) अस पण म्हणतात. (या सेन्सर साईज बद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन)
#प्रोझ्युमर कॅमेरा म्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड Magnesium alloy body असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.
#प्रोफेशनल कॅमेरा म्हणजे ज्यांचा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).
आधिचे लेखः
फोटोग्राफी: कॅमेर्याची काळजी भाग २
फोटोग्राफी: कॅमेर्याची काळजी
नमस्कार मंडळी सावलीने
नमस्कार मंडळी
सावलीने लिहीलेला लेख खूपच ऊत्तम आहे. आणि त्यावर मिळालेल्या प्रतिक्रिया हि छान आहेत. मी गेली १५ वर्षे वाईल्ड लाईफ फोटोग्रफी करत आहे. आणि आनेक फोटोग्रफी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मी लोकान्ना फोटोग्रफी शिकवताना मला एक गोश्ट खुप जाणवली. ती अशी की अनेक लोक कॅमेर्या बरोबर आलेले म्यन्युअल नीट वाचत नाहीत. त्यामुळे बर्याच जणांना स्वत: च्या कॅमेर्यातली सर्व फीचर्स माहितच नसतात.
तेंव्हा मित्रांनो जेंव्हा कधी कॅमेरा घ्याल तेंव्हा आधी नीट मॅन्युअल नीट वाचा आणि मग कॅमेर्याला हात लावा. जर कोणाला आधिक माहिती हवी असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकतात. ९४२२००२२८०.
निखिल, निकॉन कूलपिक्स स३०००
निखिल,
निकॉन कूलपिक्स स३००० १२ मेगापिक्सेल उत्तम कॅमेरा आहे... नविन मॉडेल असून VR Stabilization, EXPEED Image Processor सारख्या खुबी उपलब्ध आहेत.
तूला काही विशेष खुबींना प्राध्यान द्यायचे आहे का?
अजून काही माहिती हवी असल्यास विचार.
-अमित
वेगवेगळे कॅमेरे, त्यांचे
वेगवेगळे कॅमेरे, त्यांचे फीचर्स वगैरे ही माहिती पाहण्यासाठी www.dpreview.com हे एक उत्तम संस्थळ आहे.
सावली लेख लिहल्या बद्दल धन्स,
सावली लेख लिहल्या बद्दल धन्स, कॅमेरा किंवा ईतर गॅजेट्स विकत घ्यायची असतील तर कोणीतरी मार्गदर्शक हवाच, माझा पहिला कॅमेरा मॅन्युअल कन्ट्रोल फिल्म कॅमेरा होता, चहाच्या पॅकेट सोबत एक्स्ट्रा ५० रु भरल्यावर मिळालेला, त्याचा पहिला रोल डबीच्या आत गेला तो परत कधीच बाहेर निघाला नाही . दुसय्रा रोलने मात्र १० ते १२ फोटोग्राप्स दिले. मग मी कॅनॉन A-४२० घेतला पण त्यानेही त्याच्या नावाला जागून व्हिडीओ रेकॉर्डींग करताना आवाज रेकॉर्ड करण्याची फॅसिलीटी काढुन घेतली होती. गेल्या वर्षी लोनावळ्याच्या धुक्यात तो देखिल आता डब्बा झालाय. त्याची लेन्स बदलण्याचा खर्च कॅमेराच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे. आता Nikon Coolpix L100 घेण्याच्या विचारात आहे, तोपर्यंत मोबाईल जिंदाबाद!
डिजिटल कॅमेरावरचे फोटो डिलिट
डिजिटल कॅमेरावरचे फोटो डिलिट केले गेले आहेत. ते रिकव्हर करायला कोणतं फ्री सोफ्टवेअर माहित आहे का?
आर्च, लिनक्स्/युनिक्स वर
आर्च, लिनक्स्/युनिक्स वर कार्ड माउंट करता आल्यास डिस्क डंप घेता येईल. फोटो शाबुत असतीलच असे मात्र नाही
इंटरनेटवर सर्च केल्यास
इंटरनेटवर सर्च केल्यास विंडोजसाठीही काही सॉफ्टवेअर मिळु शकतील.
पण तो पर्यंत त्यावर एकही फोटो काढू नका किंवा काही सेव्ह करु नका.
तरीसुद्धा फोटो परत मिळण्याची गॅरंटि नाही
साऊली, मला आत्ता जाताना
साऊली, मला आत्ता जाताना स्वत:साठी एक चांगला डिजीकॅम घ्यायचा आहे. जर ४ मानच्या आत येत असेल तर डिएसएलआर. पाच सात वर्षांपुर्वी सोनीचा ३ मेगापिक्सेल सायबरशॉट घेतलेला अजुनही वापरात आहे. पण आता नविन मॉडेल्स पाहुन बदलावा अस वाटत आहे.
महेश ४ मान मधे डिएसएलआर
महेश ४ मान मधे डिएसएलआर येणार नाही. तुला उत्तर दिलय.
आर्च रेकुव्हा हे एक सॉफ्टवेअर
आर्च रेकुव्हा हे एक सॉफ्टवेअर चकटफू आहे. पण त्याला किती फाईल सापडतील ते सांगता येत नाही.
माझ्या बहिणीने एक सॉफ्टवेअर वापरून काही फोटो परत मिळवले होते. ते कुठले होते ते १/२ दिवसात कळवतो.
मुंबईमधे डिजिटल कॅमेरासाठी
मुंबईमधे डिजिटल कॅमेरासाठी वॉटरप्रुफ पावूच (image V) कुठे मिळेल? माझा एक कॅमेरा पावसाळ्यात खराब झाला. कॅनॉन आणि ऑलिम्पस मधे वॉटरप्रुफ कॅमेरा उपलब्ध आहेत पण त्या मधे फिचर्स खुपच कमी आहेत. म्हणुन मला वॉटरप्रुफ पावुच हवेय. कोणाला काही आयडीया असल्यास प्लिज.....
मला डिजिकॅम घ्यायचाय... सोनी
मला डिजिकॅम घ्यायचाय...
सोनी h 55 वा निकॉन ixsus 120 is ...यांच्यापैकी कुणी वापरलाय का? अनुभव सांगाल का ?
पुढचा लेख कधी
पुढचा लेख कधी लिहिणार?
फिल्टर्स, झुम, टेलेफोटो बद्दल वाचायला आवडेल.
साऊली, घेतला घेतला घेतला !!!
साऊली, घेतला घेतला घेतला !!! कॅनन फॅमिली पॅक !
प्रसिक, तुम्हाला कॅमेरा पाऊच
प्रसिक, तुम्हाला कॅमेरा पाऊच हवय कि कॅमेरा केस.
पाऊच म्हणजे कॅमेरा नुसता ठेवायला. त्यात ठेवुन फोटो काढता येणार नाही. हे कुठलेही जनरल कॅमेरा बॅगच्या दुकानात मिळेल.
केस म्हणजे जी कॅमेरा बॉडी ला फिट बसते आणि त्यात कॅमेरा घातल्यावर सुद्धा ऑपरेट करता येतो. या डायव्हिंग स्नॉर्कलिंग वगरे करणारे लोक वापरतात. हे फारच महाग असतात.
फोटो मधे दाखवलेली कॅमेरा केस आहे असं वाटतं
रोहीत हे कॅमेरे मी वापरले नाहीएत. इथे अजुन कोणितरी असणारच वापरणारे.
अश्चिग ,
फिल्टर्स चा लेख आधीच लिहुन झालाय. इथे पहा
http://www.maayboli.com/node/18124
बाकीचे बरेच लेख आहेत ते इथे बघता येतील.
http://www.maayboli.com/node/19105
किंवा माझा ब्लॉग इथे बघता येईल
http://prakashraan.blogspot.com/
झुम टेलिफोटो लेन्स बद्दल लिहिणार आहे. त्या आधी अपेर्चर बद्दल लिहायचा प्लॅन आहे.
महेश नक्की कुठलं मॉडेल घेतलस?
साऊली, एसएक्स २१०, १४ मेपि,
साऊली, एसएक्स २१०, १४ मेपि, १४ एक्स झूम
वॉटरप्रूफ कॅमेरा केस खुप महाग
वॉटरप्रूफ कॅमेरा केस खुप महाग असते आणि बल्की सुध्दा, फोटोमधे दाखवलेला पावूचच आहे पण त्याला लेन्स साठी एक लेन्स एडाप्टर/विन्डो दिलेली असते, ज्यामधे ती ऑपरेट होताना देखिल काही प्रॉब्लेम येत नाही. फोर्टला काही शॉप्समधे मी शोध घेतला, but still searching. अशाप्रकारचा पावूच मला निकॉन L100 साठी हवाय. डिसेम्बल केल्यावर त्याचा फोटोV
घरगुती प्रसंगाचे / ट्रीपचे
घरगुती प्रसंगाचे / ट्रीपचे फोटो काढण्यासाठी व शूटिंग करण्यासाठी, फोटो व शूटिंग अशी दोन्ही फीचर्स असलेला कोणता डिजिटल कॅमेरा घ्यावा? त्याला मेमरी, झूम पॉवर, मेगॅपिक्सेल, इ. किती असावे?
Olympus चा SP-600 UZ हा
Olympus चा SP-600 UZ हा कॅमेरा कसा आहे?
12 MPX, 1 GB internal memory, TFT colour LCD monitor 2.7 inches, Zoom [Optical / Digital (total)] 15x / 5x (75x) (हे नक्की काय आहे ते कळले नाही), Recording file format - JPEG , 4 GB memory card असलेला हा कॅमेरा रू. १३,००० ला आहे.
कोणी वापरला असल्यास माहिती द्यावी.
मला Olympus कॅमेरे आवडतात,
मला Olympus कॅमेरे आवडतात, पण १३ च्या मानानी महाग वाटतो - आजकाल२५०-४०० $ मध्ये २०-३५ ऑप्टीकल झूमचे कॅमेरे मिळतात. यात १५क्ष ऑप्टीकल आहे व आणखी ५क्ष डिजीटल आहे (त्यात फार काही अर्थ नाही).
५-६ मेगापिक्सेल ही योग्य रेंज असते - त्यापुढे नॉईज वाढतो (डिजीटल असल्यास) व जागाही भरमसाठ लागते.
कुठला कॅमेरा घ्यावा हा प्रश्न
कुठला कॅमेरा घ्यावा हा प्रश्न इथे विचारता येईल
http://www.maayboli.com/node/25692
४१ मेगापिक्सलचा मेगा-स्मार्ट
४१ मेगापिक्सलचा मेगा-स्मार्ट फोन. हा जरा जास्तच नॉय्जी नसेल का?
http://www.digitaltrends.com/mobile/meet-the-smartphone-with-higher-reso...
मी गेली अनेक वर्षे कॅनॉन
मी गेली अनेक वर्षे कॅनॉन पॉवरशॉट ए५५० ने फोटो काढतो आहे.... आता डीएसएलआर कडे वळण्याचा विचार आहे
कॅनॉन EOS550D एंट्री लेव्हल डीएसएलआर म्हणून कसा आहे?.... बरीच डोकेफोड करुन शॉर्टलिस्ट केला आहे!
हा भारतातुनच घ्यावा का US हुन मागवावा.... कितीसा फरक पडेल?
भारतातच घ्यायचा झाला तर flipkart सारख्या साइटवरुन डील्स बघुन घेणे चांगले की अधिकॄत शोरुम मधुन घेणे जास्त चांगले?
एन्ट्री लेवल असे नाही पण
एन्ट्री लेवल असे नाही पण चान्गला आहे. किमती दोन्हीकडे फरक नाही. शोरुम बरे पडेल फ्लिप्कार्ट चा अनुभव नाही. झुम लेन्स घ्यावी.
स्वरूप, कॅननच घ्यायचा तर
स्वरूप, कॅननच घ्यायचा तर ५५०डी च्या ऐवजी ६००डी घ्या आता. कॅमेरा खरेदी ही खर्चाची सुरुवात आहे. आम्ही घेतला तेव्हा किट लेन्स म्हणून १८-५० एम एम लेन्स आली. नन्तर लाम्ब्चे फोटोंचा क्लोजपसाठी १८-२५० एम एम ची लेन्स 'घ्यावी लागली' . त्याला ७ की ८ हजार. त्यानन्तर शार्प फोटो येण्यासाठी नुसती ५० एम एम ची लेन्स घेतली ४ की ५ हजाराला.इलेक्ट्रॉनिक फ्लॅशगन रु.१००००/- असे शेपूट वाढू लागले. त्यात तुम्ही नॅश जेओग्रफी, डिस्कवरी असले चॅनेल पहात असाल तर डोके फिरते.. कॅननची शेवटची लेन्स ५ लाखाच्या आसपास आहे वाटते
एक लक्षात घ्या लेन्सेसचा पोर्ट फोलिओ वाढवणार असाल तर पुन्हा कॅमेर्याचा ब्रॅन्ड बदलता येत नाही. (मॉडेल बदलता येते...)त्या लेन्सेस दुसर्या ब्रॅन्ड्ला जुळत नाहीत बर्याचदा.
अधिकृत शो रूम मध्ये घेऊ नये
अधिकृत शो रूम मध्ये घेऊ नये असे माझे मत. त्या ऐवजी फ्रॅन्चायजी कडून घ्या त्यात बेस्ट बायचा डील होऊ शकतो. अधिकृत शो रूम मध्ये एम आरपी लाच विकतात. एकदा रिबॉकचा बूट घेतला तेव्हा डेक्कनवरच्या अधिकृत शो रूम मध्ये २५०० किंमत सांगितली. तोच बूट डेक्कनवरच्या प्रसिद्ध स्पोर्ट्स शॉपमध्ये २२०० ला मिळाला. त्याना विचारले असता त्यानी सांगितले की २५०० ही एम आर पी (मक्झिमम रिटेल प्राईस) आहे त्यापेक्षा अधिक किमतीला विकणे गुन्हा आहे. त्यापेक्षा कमी किमतीत विकता येतो. हा बूट समजा आम्हाला २००० त कंपनीने दिला तर २५०० पर्यन्त कोणत्याही किमतीला आम्ही विकू शकतो. आमचा नफा किती ठेवायचा यावर ते अवलम्बून आहे.माल पडून राहण्यापेक्षा १०० रु चालू नफाही परवडतो.बूट विकणे हा आमचा मुख्य बिझिनेस नाही स्पोर्ट्स होजियरी हे आहे, आलेले गिर्हाईक बूटही पहाते व नेते मग त्यात जास्त नफा घेत नाही. अधिकृत शो रूम वाले हे कंपनीचे पगारी नोकर असतात बर्याचदा.त्याना काहीच घेणे देणे नसते.
मात्र अधिकृत शो रूम मध्ये सर्व मॉडेल्स पहायला मिळतात.
विक्री पश्चात सेवेसाठी अथवा तक्रार निवारणासाठी नाहीतरी सगळेच तुम्हाला कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेन्टरकडेच जायला सांगतात. विकल्यानन्तरच्या फॉल्ट्स साठी जिथून घेतली आहे वस्तू त्याच्याशी भांडण्यात काही पॉईन्ट नसतो
बाजो, फोटो कुठे आहेत? इतक्या
बाजो, फोटो कुठे आहेत? इतक्या लेन्सेस घेतल्यात, कॅमेरा घेतलात.. अभिनंदन!
फोटो दाखवा की
फोटो ४-५ एम्बीचे आहेत मला ते
फोटो ४-५ एम्बीचे आहेत मला ते लोड करता येत नाहीत . कॅमेरा, फोटो हे सर्व प्रकार 'जनरेशन नेक्स्ट' बघते
स्वरुप... महावीर
स्वरुप... महावीर इलेक्ट्रॉनिक्स, बाजीराव रोड इथे चेक कर कोणताही कॅमेरा घ्यायच्या आधी... जर कॅश देऊन खरेदी करणार असशील तर.. अन्यथा कुठल्याही दुकानातून घेतला तरी फार फरक पडत नाही... आणि वर बाजोंनी लिहिले आहे त्यानुसार काही झालेच तर सर्व्हिस सेंटरमध्येच जावे लागते..
बाजो.. खरच फोटो टाका की..
बाजो, जनरेशन नेक्स्टला सांगा
बाजो, जनरेशन नेक्स्टला सांगा की फोटो रिसाईझ करुन अपलोड करायला. नक्कीच माहीत असणार. फारतर तुम्ही शेजारी बसा, म्हणजे तुमच्या इतरत्र पोस्टी वाचणार नाही ज. ने.
Pages