फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी

Submitted by सावली on 16 June, 2010 - 22:32

अग मी दोन आठवड्यांनी स्कीइंगला जाणार आहे. मला कॅमेरा घ्यायचाय. चलशील का माझ्या बरोबर?
२ महिन्यापूर्वीच जपान मध्ये आलेला माझा एक ऑफिसमधला एक सहकारी विचारात होता.
कॅमेऱ्याच्या दुकानात जायच म्हटल्यावर मी एका पायावर तय्यार. तरी त्याला एकदा विचारलं कसला कॅमेरा घ्यायचा विचार करतोयस. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो डीजीकॅम घेईल असे वाटले मला होते.
आता एसेलारच घेईन म्हणतो.एसेलारने कसले छान फोटो येतात. बाकी कॅमेऱ्याना काही मजा नाही.

आतापर्यंत कुठलाच कॅमेरा कधीही न वापरता त्याच अगदी ठाम मत होत. मी त्याला पॉईंट एन्ड शूट किंवा डीजीकॅम कडे वळवायचा केविलवाणा प्रयत्न फुकटच गेला.
दुसऱ्या दिवशी आम्ही लंच टाईममध्ये बिक कॅमेरा म्हणून एका मोठ्या दुकाना जाऊन कॅननचा डिजीटल एस एल आर घेऊन आलो.
त्याच्या पुढच्या आठवड्यात एक दिवस ऑफिस मध्ये जरा कॅमेरा शिकवणी पण करून झाली. नंतर तो स्कीइंगला जाऊन वैगेरे आला.
परत ऑफिसला आल्यावर त्याला फोटोबद्दल विचारलं तर अगदी वैतागलेला.
अग कसल काय सगळे फोटो नुसते गडद आलेत. आणि माझा एकपण फोटो नाहीये त्यात.
अरे मग काढायला द्यायच ना कोणालातरी म्हणजे तुझा फोटो पण आला असता. इति मी
हो ना पण तो नवीन कॅमेरा कोणालाच धड माहीत नाही कसा वापरायचा तो, मग नाहीच काढले फोटो. परत तो गळ्यात अडकवून मला स्कीइंग पण करता येईना. शेवटी ठेवूनच दिला बेगेत.
माझ्या अगदी मनात येऊन सुद्धा आधीच वैतागलेल्या त्याला "तरी मी तुला सांगत होते..." प्रकारचा डायलॉग मारून अजून त्रस्त केला नाही. फार जवळचा मित्र असता तर अशी संधी अजिबात सोडली नसती हे हि खरं.
याच मित्राने आणखी तीन चार वेळा तो कॅमेरा कुठे कुठे घेऊन जायचा प्रयत्न केला. याच्या आवडी भन्नाट होत्या ट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग वैगेरे. प्रत्येक ठिकाणी त्याला तो कॅमेरा म्हणजे गळ्यात लोढणच वाटल. शेवटी त्याने एक छोटासा डीजीकॅम घेतला जो आता त्याच्या स्पोर्ट्स मध्ये त्याला साथ देतो.

पण हे बऱ्याच वेळा घडत कि नाही? आपल्याला कुठेतरी नवीन ठिकाणी जायचं असतं आणि अगदी शेवटच्या क्षणी आपण कॅमेरा खरेदी करतो. मग कॅमेरा वापरायचा माहीत नसला तर मनस्ताप होतो, नवीन ठिकाणाचे धड फोटोही येत नाहीत आणि वर स्कीइंग वैगेरे सारख्या गोष्टीमध्ये तर त्याची अडचणच होते.
कपडे विकत घेताना पण आपण बघतो ना आपल्याला काय शोभेल? काय वापरता येईल? मग कॅमेरा खरेदी करताना सुद्धा या गोष्टी बघायला नको का? आता माझ्या सांगण्याचा उद्देश एस एल आर कॅमेरा घेऊ नये असा नाहीये. तर आपल्याला वापरता येईल असा सुयोग्य कॅमेरा घ्यावा असा आहे.
म्हणजे या माझ्या मित्रासारख जर तुम्हाला कुठे नवीन ठिकाणी नवीन गोष्ट स्पोर्ट्स इ. करायला जायचं असेल तर तेव्हा नवीन एस एल आर कॅमेरा घेऊन जाऊन निराशाच पदरी येणार. त्यापेक्षा मग डीजीकॅम घेतलेला केव्हाही चांगला.
तुमची मुळात जर फोटोग्राफीची आवड नसेल तर एक कॅमेरा त्याच्या लेन्स, आणि अजून जे काय साहित्य लागत ते सगळ घेऊन प्रवास करणे हायकिंग करणे हा एक त्रास होऊन बसतो.
म्हणून कॅमेरा घ्यायचा ठरवताय मग जरा या बाबींकडे लक्ष द्या

तुमच्या कडे कॅमेरा कधीच नव्हता आणि आता पहिल्यांदाच घ्यायचाय
मग साधा फिल्मचा पॉईंट एन्ड शूट कॅमेरा सुद्धा चालेल. कोणत्याही घरगुती प्रसंगाचे ट्रीपचे फोटो नीट काढता येतात वापरायला सोपा एकदम. फिल्म असल्याने फोटो काढून झाले कि फिल्म डेव्हेलेप्मेंटला स्टुडीयोमध्ये दिली कि काम झालं.
तुम्हाला कॉम्प्युटर वापरता येत नसला तर फिल्मवाला कॅमेरा उत्तमच.फक्त फिल्मवाला कॅमेरामध्ये काढलेले फोटो डेव्हेलप झाल्याशिवाय कसे आलेत ते कळत नाही.
डीजीकॅम सुद्धा पॉईंट एन्ड शूट भागातच येतो. पण डीजीकॅम घेतलात तर तुमच्याकडे कॉम्प्युटर असणे आणि तो नीट वापरता येणे जरुरीचे आहे. डीजीकॅम मध्ये काढलेले फोटो मागेच डीजीकॅमच्या स्क्रीन वर बघता येतात हा सगळ्यात महत्वाचा फायदा. नवीन डीजीकॅममध्ये बरयाच सोई पण असतात. म्हणजे टच स्क्रीन, ओटो फोकस,ऑतो फ्लाश इ. बरेच काही.
Canon Cybershot,Sony ixy, Nikon Coolpix, Casio यातले नवीन मॉडेल बघुन घेता येईल. घेताना जरा मेमरी कार्डकडे लक्ष द्या. सोनी साठी स्पेशल कार्ड लागतात ते महाग असतात. बटरीकडे लक्ष द्या, काही काही मध्ये आपले पेन्सिल सेल पण चालतात. त्याना वेगळा चार्जर लागत नाही.
अजून वरच्या ऑप्शन मध्ये एस एल आर लाईक कॅमेरा पण येतो. हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येन नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.
यातहि बरीच नवीन मॉंडेल असतात याची काही उदाहरणे म्हणजे Panasonic Lumix, Panasonic FZ,Canon S5 IS,Canon PowerShot, Nikon P80,Sony H50,Olympus SP-590

तुमच्या कडे पॉईंट एन्ड शूट कॅमेरा आहेच पण एक एस एल आर पण घ्यायचाय, असाच केव्हातरी वापरायला.
नक्की घ्याच कारण हौसेला मोल नसत. एस एल आर कि डिजीटल एस एल आर हे सर्वस्वी तुमच्या कॉम्प्युटर वापरता येण्यावर,आणि बजेटवर अवलंबून आहे. कॅनन कि निकॉन हा वादहि व्यर्थ आहे. दोन्ही मध्ये चांगले कॅमेरे आहेत आणि लेन्स पण आहेत तुम्ही शक्यतो कंझ्युमर सिरीज# मधले कॅमेरे बघा. हे सगळ्यात स्वस्त रेंज मध्ये उपलब्ध असतात. कंझ्युमर सिरीजमध्ये कॅमेऱ्याबरोबर एक लेन्सहि किट मध्ये असते त्यामुळे खरेदी सोपी आणि स्वस्त पडते.
साधारण कॅनन नवीन मॉडेल अशी आहेत canon EOS 350D /EOS Rebel(अमेरिकन मॉडेल )/EOS Kiss(जपान मॉडेल), EOS 300X, EOS 1000D
निकॉन Nikon F आणि Nikon D सिरीज मध्येपण बरेच आहेत Nikon F6,Nikon F75,Nikon D3000,Nikon D60

तुमची मुळ आवड फोटोग्राफी नाही पण कॅमेरा तुमच्या छंदामध्ये उपयोगी आहे
ट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग अस काही छंद असेल तर डीजीकॅम बेस्ट आहे. तो इतका लहान असतो ती बाळगण्याचा त्रास होत नाही.
पण जर झूम वैगेरे हवे असेल तर वर सांगितलेल्या प्रमाणे एस एल आर लाईक कॅमेरा घेता येईल. हलका असल्याने नेणे खूप त्रासाचे नाहीये, आणी लेन्सचा पसारा पण न्यायला लागत नाही.

तुम्हाला फोटोग्राफीची खूप हौस आहे आणि फोटोग्राफी शिकायची आहे. सध्याचा पॉईंट एन्ड शूट ने क्रिएटिव्ह फोटोग्राफी करता येत नाहीये.
तुमच्याकडे जर आधीच एक एस एल आर असेल तर तुम्हाला सुरुवातीला काहीही घ्यायची गरज नाही.
नसेल तर मात्र आधी बजेट ठरवा. जर ते खूप कमी असेल तर फिल्म एस एल आर घेणे उत्तम. काही जुने मॉंडेलचे पूर्ण मेकॅनिकल कॅमेरे खुप स्वस्त मिळू शकतात. यात सगळे कंट्रोल तुम्हालाच ठरवायला लागतात यामुळे सुरुवातीला चांगले फोटो येणे जड जाते. फोटोग्राफीची खरच आवड आणि लाईट, शटरस्पीड याबद्दल खूप काही शिकावं लागत पण जे शिकाल ते अगदी पक्क होऊन जाईल.
मी जवळपास अकरा वर्षापुर्वी याच वळणावर होते. मला तस यात काही सांगणार कोणीच नव्हत. पण मी ठरवल होत कि नोकरी लागल्यावर जेव्हा एका महिन्याच्या पगारात कॅमेरा बसेल एवढा पगार होईल तेव्हा एस एल आर घ्यायचाच. आयटी भाग्यामुळे तो योग लगेचच आला. पण त्यावेळी इंटरनेटवर शोधणे वगेरे काहीच धड माहित नव्हते. मी आणि चुलत दादा दोघ मिळून बॉम्बेसेंट्रललं गेलो पैसे घेऊन. एका दुकानात जाऊन त्याने जे दोन चार कॅमेरे दाखवले त्यातला एक घेऊन आलो. तो कॅननचा होता. मी बहुतेक इतक्या मठ्ठपणे कॅमेरा घेतला कि त्या दुकानदाराला मी अगदी लक्षात राहिले. १०वर्षानी माझा लहान भाऊ त्याच दुकाना गेल्यावर नावावरून त्याने ओळखले आणि भावाला विचारले होते कि तुमच्या बहिणीने इथूनच घेतला होता न कॅमेरा!
मी घेतलेला ऑटो आणि मन्युअल दोन्ही मोड वाला होता. आता जवळपास सगळे एस एल आर कॅमेरे असेच असतात. यामुळे अगदी काही येत नसेल तरी ऑटो मोड मध्ये फोटो काढता येतात. पण असा केला तर खरतर यात आणि पॉईंट एन्ड शूट मध्ये मग फार फरक रहातच नाही.
फिल्म कॅमेऱ्याचा एक तोटा असा कि फिल्म डेव्हलपमेंटचा खर्च, आणि ठेवायची जागा. मी फिरायला गेल्यावर इतके फोटो काढायचे कि प्रत्येक ट्रीपवरून आल कि ५/६ रोल असायचेच. ते घरात ठेवायला जागा पण होईना.
सहसा या वेळी जो कॅमेरा घेतला जातो तोच ब्रांड नंतरहि वापरण चालू राहत. कारण त्या अनुषंगाने आपण इतर लेन्स इ. हळूहळू खरेदी करतोच. त्यामुळे तुमचा काही चोइस असा असेलच तर त्या कंपनीचा घ्या. पण जर पुढे तुम्हाला काही स्पेशालिटी करावीशी वाटली तर ब्रांड बदलताही येतो त्यामुळे खूप काळजी करून नका.
बजेट जास्त असेल तर डिजीटल एस एल आर घेता येईल
Nikon D3000,Nikon D90, Nikon D6,
canon EOS 20D, 30D, 40D, 5D, 350D
असे बरेच ऑप्शन आहेत आणि दरवर्षी नवीन येत असतात.

डिजीटल एस एल आर घेताना लक्षात ठेवायची एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फोटो काढलेत कि ते कॉम्प्युटरवर डाउनलोड करावे लागतात. त्यानंतर ते प्रोसेस म्हणजे raw format मधून jpg मध्ये convert करावे लागतात.
हे त्रासदायक वाटत असेल तर फोटो काढतानाच jpg काढण्याचा एक ऑप्शन असतो कॅमेऱ्या मध्ये तो चालू करून ठेवावा.

तुमच्या कडे एक एस एल आर कॅमेरा आहेच पण आता अपग्रेड करायचाय
इथे मात्र तुम्हाला बराच विचार करावा लागेल. सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्हाला अपग्रेड का करायचंय?
म्हणजे "माझ्या मित्राकडे हा नवीन कॅमेरा आहे त्याने मस्त येतात त्याचे फोटो. माझ्या कॅमेऱ्याने येत नाहीत म्हणून मला त्याच्याकडे असलेलाच कॅमेरा घ्यायचा आहे" अस काहीस वाटत असेल तर ते म्हणजे नाचता येईना... अस आहे.
जर तुम्हाला तुमचे फोटो चांगले येत नाहीत असे वाटत असेल तर कॅमेरा बदलून काहीच उपयोग नाही. कारण त्या नवीन कॅमेऱ्याच्या मागे उभे रहाणारे तुम्ही जुनेच असणार. त्यापेक्षा ते पैसे फोटोग्राफीच्या कोर्स किंवा पुस्तकांसाठी साठी घाला. तुमच नक्की कुठे चुकत ते माहिती करा.
जर तुम्हाला तुमच्या कॅमेर्यामधल्या त्रुटी जाणवायला लागल्यात आणि त्यामुळे फोटो काढताना अडचण होतेय असा वाटल कि मात्र बदलण गरजेच ठरत.अशा वेळी नवीन कॅमेरा म्हणजे नवीन बाजारात आलेल मॉंडेलच असेल असा नाही. तुमच्या गरजेला जे योग्य असेल ते मॉंडेल घ्याव.
म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स फोटोग्राफी आवडते आणि तुमच्याकडे कॅनन 10D आहे. छान फोटो येतात पण बऱ्याचवेळा नेमका हायलाईट निसटून जातोय कारण कॅमेरा एवढा चपळाईने (३ फ्रेम पर सेकंद) फोटो काढू देत नाही. मग तुम्हाला ज्या कॅमेऱ्या मध्ये जास्त फ्रेम पर सेकंद असतात असा कॅमेरा घेणे उपयुक्त ठरेल.
किंवा तुम्हाला बर्ड फोटोग्राफी आवडते तुमच्या कडे एक निकॉन कॅमरा आहे. याने हि फोटो मस्त येतायेत. पण तुमचा फोकस खूप वेळा बरोबर येत नाही. नीट फोकस राहिला तर अजून छान फोटो येतील अशा वेळी नवीन आलेला 51 point focus आणि focus followup वाला कॅमेरा घेण फायद्याच होईल.
अगदी तुम्हाला खांद्याला इजा झालीये आणि तुम्ही जड कॅमेरे उचलू शकत नाही अशावेळी वजनाने हलके असलेले कंझ्युमर कॅमेरा घेताना वाईट वाटू नये.
असे अपग्रेड करताना बहुतेकदा प्रोझ्युमर कॅमेरे# किंवा प्रोफेशनल कॅमेरे# मध्ये केले जाते.
अजून एक अपग्रेड करायचं कारण म्हणजे डीजीटल वर्ल्ड मधले मेगापिक्सेल
बरेचजण या रेस मध्ये धावताहेत. नवीन १०मेगापिक्सेल कॅमेरा आला कि आधीचा ८चा सोडून तो घ्यायचा मग १२ चा आला कि परत बदलायचा. खरतर तुम्ही तुमचे फोटो कुठेही विकत नसाल, किंवा A4 पेक्षा मोठ प्रिंटहि काढत नसाल तर ८ मेगापिक्सेल च्या वर धावायची गरज नाहीये. या मेगापिक्सेल रेस आणि प्रिंट बद्दल पण सांगेनच मी नंतर केव्हातरी.

एस एल आर च्या पेक्षा अजून एक वेगळ जग सुद्धा आहे बर का. ते म्हणजे मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर्मेट फोटोग्राफी. आपल्या एस एल आर च्या निगेटिव्ह किंवा सेन्सर ची साईज ३५मिमि अशी (खरतर 24x36mm) म्हटली जाते. मिडीयम फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंचापेक्षा कमी पण ३५मिमि पेक्षा जास्त. तर या लार्ज फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंच किंवा 8x10इंच किंवा मोठीच.
मोठे मोठ बिलबोर्ड, जाहिराती यासाठी लार्ज फॉर्मेट फोटोग्राफी वापराली जाते पण याविषयावर अजून काही माहिती देण्याची माझी अजूनतरी पात्रता नाहीये. हा एक फॉर्मेट मला पण हाताळून बघायचाय कधीतरी.

आता हे एवढ लिहण्याने तुमच्या ज्ञानात भर पडली कि गोंधळात ते माहीत नाही. पण हि माहिती कुठेतरी, कोणालातरी उपयोगी होईल हि अपेक्षा.
कुठलाही कॅमेरा घ्या,पण तो हातात आल्यावर पहिली गोष्ट कुठली कराल तर त्याचे manual किमान चार वेळा वाचून काढा. आगदि पाठ केलात तरी चालेल.
त्यानंतर काय कराल तर कॅमेऱ्याची सगळी बटन कुठे कुठे आहेत ते नीट बघा. हे इतक छान आलं पाहिजे कि अंधारात कॅमेरा हातात असेल तरी न बघता नुसत हातांना कळल पाहिजे कुठच बटन कुठ आहे ते.

#कंझ्युमर कॅमेरा म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्याचा बोलीभाषेत ) अस पण म्हणतात. (या सेन्सर साईज बद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन)
#प्रोझ्युमर कॅमेरा म्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड Magnesium alloy body असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.
#प्रोफेशनल कॅमेरा म्हणजे ज्यांचा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).

आधिचे लेखः
फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी भाग २
फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातूनच घ्यायचा असेल तर औंधला परिहार चौकात कॅमशॉट्स म्हणून एक लहानसे दुकान आहे....त्याला मालक हा कॅमेरा नुसता विकत नाही तर त्यातला चांगला दर्दी आहे...पुण्यातील बहुतांश प्रेस फोटोग्राफर त्याच्याकडूनच कॅमेरा घेतात...तुमचे स्पेसिफिकेशन्स आणि गरज त्याला सांगितल्यावर तो एखादा चांगला कॅमेरा सांगेल...आणि ऑफीशिअल शोरूम किंवा अन्य दुकानांपेक्षा तिकडे नक्कीच स्वस्त मिळेल....गॅरंटिड...
मी माझा ५५०डी तिकडूनच घेतला आहे...

कॅमशॉट्स आता बाणेर रस्त्यावर आहे ना? परिहार चौकातून हलवले कधीच.
आणि ते महागडे आहे असा बर्याच जणांचा अभिप्राय ऐकला आहे, खखोमाना.

मी 'दाबी' कडून घेतला . नळ स्टॉप वरील शौकीन पान दुकानाच्या शेजारी आहे दोन तीन दुकाने सोडून. केवळ घराजवळ आहे म्हणून आणि तो स्वतः फोटोग्राफरही आहे.म्हणून .
फ्लॅश गन पुढच्याच चौकात कॅननचे एक दुकान आहे त्यात घेतली त्याला त्यातले ओ की ठो कळत नव्हते. फक्त खोक्यावरची किम्मत पाहून विकणे एवढेच त्याला माहीत होते...:)

कॅमशॉट्स आता बाणेर रस्त्यावर आहे ना? परिहार चौकातून हलवले कधीच.

हो का...हे माहीती नव्हते..मी दीड वर्षापूर्वी घेतला होता....आणि मला तरी त्यावेळी स्वस्त वाटले.....बाकीच्यांच्या तुलनेत....

बाजो - दाबी हे दुकानाचे नाव आहे का...माझ्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर आहे..पण कधी लक्ष गेले नाही....

>>मी 'दाबी' कडून घेतला - हे दुकान माहित नव्हते, एकदा बघायला हवे. धन्यवाद.
कॅननच असतात की इतरही?

अवतार, बाजो, शैलजा, हिम्या, आशुचँप.... माहितीबद्दल धन्यवाद!

मी आज जरा २-३ दुकानात चक्कर मारुन किमती चेक केल्या.... फोटोफास्ट डिजीटलच्या कर्वे रोड, डेक्कन वरच्या काही शोरुम्स चेक केल्या... आणि रुपालीसमोरचे कॅनॉन स्क्वेअर (अत्यंत अरोगंट सेल्स पर्सन्स :() !

कॅनॉन ५५०डी च्या किमती सगळीकडे ३० ते ३२ हजाराच्या आसपास आहेत.... तर ६००डी ३६हजारापर्यंत मिळतोय.... पण एका दुकानदाराने ६००डी बंद झालाय घेऊ नका असा सल्ला दिला.... एकाने ५५०डी ला पर्याय म्हणून निकॉन डी५१०० (३१हजार) घ्या म्हणून फार आग्रह केला!

आशुचँप, तुमचा ५५०चा अनुभव कसा आहे?
हिम्या, आता उद्या परवा चेक करतो महावीर इलेक्ट्रॉनिक्सम्ध्ये!

५५० हा उत्तम कॅमेरा आहे...फोटो क्वालीटी बेस्ट आहे...६४०० आयएसओला सुद्धा तुलनेने कमी ग्रेन्स मिळातात...
एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग साठी तर फुल मार्क्स....
६००डी बदल केला आहे तो म्हणजे स्क्रीन रोटेट होते...हँडीकॅमसारखी...पण मला तरी ते फिचर अनावश्यक वाटले...
बाकी मी पावसापाण्यात, धुळीत, ट्रेकवर सगळीकडे वापरलाय....दणकट बॉडी आहे..एकदम हँडी आहे...
मी व्यक्तिश अतिशय समाधानी आहे कॅमेराबाबत.....
तुला निकॉनकडे जायचे का कॅनन कडे हे आत्ताच ठरव...नंतर बदल करता येणार नाही..
आणि शक्य असल्यास १८-५५ किट लेन्स घेण्यापेक्षा १८-१३५ घे...ती बेस्ट आहे...
किंमत वाढेल पण वर्थ आहे...
किंवा मग नंतर तु ५५-२५० नाहीतर ५० प्राईम लेन्स घेऊ शकतोस बजेट प्रमाणे...
मुख्यत्वे कशासाठी वापरला जाणार आहे कॅमेरा

तुला निकॉनकडे जायचे का कॅनन कडे हे आत्ताच ठरव...नंतर बदल करता येणार नाही..
>>> असे काही नाही हां.. Wink कॅनन असताना नवा नि़कॉन घेता येतो की.. Wink Proud

स्क्रीन रोटेट होते...हँडीकॅमसारखी...पण मला तरी ते फिचर अनावश्यक वाटले...
>>
त्याचा उपयोग होतो सेल्फ पोर्टेट साठी . लेन्सच्या बाजूने इमेज पहायची असेल स्क्रीनवर तर. अनावश्यक नाही पण नसले तर फारसे अडतही नाही. ६०० डी बन्द झाला नसावा परवाच सेन्ट्रल मॉलमध्ये तर पाहिला. त्या विक्रेत्याकडे शिल्लक नसेल.(तसाही तो नसतोच तुम्ही ऑर्डर दिल्यावर कंपनी गोडाऊनकडून मागवून घेतात. डॉलरच्या किमती बदलत असल्याने किमती सारख्या बदलत असल्याने बहुधा.)
एका फोरम वर एकाने दिलेला फरक...(५५०डी व ६००डी)

The hardware is virtually identical, but there are a few features that may sway you. Two of the biggest changes are the flip out LCD and wireless flash control. So, if either of those things would be worth the $50-$100 premium, then go for it. But if you aren't shooting a lot of video or in situatiosn where a flipout LCD would be useful, or if you won't be firing flashes wirelessly, IMO save the money.

Otherwise, the sensor is identical, the processors are identical, and body construction is virtually identical. The upgrades on the 600D are mostly for the person who will be taking more video with it. I currently own the 550D and there's nothing on the 600D that makes me wish I could upgrade. But then again, I don't shoot video with mine.
Good call IMO if you aren't going to be doing much video. I'll admit, since I shoot the stars at night a bit there are a few times where I could have saved my back with a rotating LCD, but in the end I'd rather spend that 100 bucks on a nice tripod, a 50mm lens, or any number of other things that will actually help me take better photos.

Either way, good luck, and you will no doubt love the camera. Like others have said long before on various corners of the web, this camera will take photos every bit as good as the 7D, so there's nothing to worry about.

आणि शक्य असल्यास १८-५५ किट लेन्स घेण्यापेक्षा १८-१३५ घे...ती बेस्ट आहे...
किंमत वाढेल पण वर्थ आहे...>>>>> +१

स्वरुप, जर बजेट वाढवणे शक्य असेल तर 60D with 18-135 lens हे काँबीनेशन घे. किंमत साधारणपणे ६५,००० पर्यंत जाईल. गेल्या दिवाळीमध्ये मी घेतला - ६७,००० (महाविर फोटो शॉप - बाजीराव रोडवरील). काँबीनेशनमध्ये घेतले तरच एवढे स्वस्त पडेल. अन्यथा वेगळे-वेगळे घेतले तर साधारणपणे १२ ते १५ हजार जास्ती जातील, वर १८-५५ किट लेन्स पडून राहील. त्यापेक्षा ५-६ हजारात ५०mm, १.८ apertureची प्राईम लेन्स घेता येईल. त्याशिवाय UV filter, remote, tripod, camera bag वगैरे गोष्टी मिळवल्या तर साधारण ७५००० पर्यंत जाईल. 60D ला 600D प्रमाणेच २७० डिग्री रोटेट होणारे LCD panel आहे. त्याचा उपयोग बाजोने सांगीतल्याप्रमाणे फक्त सेल्फ पोर्ट्रेटसाठीच नाही, तर odd angles मध्ये फोटोग्राफी करताना होतो. जसे हात ऊंच करून किंवा गुडघ्याच्या लेवलला, झोपून वगैरे.

अन्यथा ५५०D with 18-135 lens हे काँबीनेशन वरील सर्व accessories सहीत ४५,००० पर्यंत जाईल. तो सुध्धा चांगला कॅमेरा आहे. Happy

सेनापती, बाजो, अजय टीप्सबद्दल धन्यवाद Happy
आशुचँप, फर्स्टहॅन्ड रिव्ह्युबद्द्ल धन्यवाद!
आजपण वेगवेगळ्या फोरमवर बरीच डोकेफोड केली..... आता बहुतेक ५५०डी फायनल!

>>स्वरुप, जर बजेट वाढवणे शक्य असेल तर
अरे नाही रे... तसा मी आरंभशूर प्राणी आहे.... हा इंटरेस्ट जरा टिकू देत... मग बघू!

एक बेसिक प्रश्नः कीट लेन्स घेणे अजिबातच वर्थ नाही का?

भटक्या लेका - ते तुम्हा श्रीमंतंसाठी...आम्ही गरीब लोक...साधी प्राईम लेन्स घ्यायची झाली तरी दहा वेळेला विचार करावा लागतो...

स्वरुप - कोण म्हणाले असे...किट लेन्स म्हणजे काय टाकाऊ नसते....आपला जिप्स्या बघ..किटलेन्स वर कसले कडक फोटो काढतो...फक्त ५५ ऐवजी तुला १३५ मिळतात....नाहीतर १८-५५ आणि नंतर ५५-२५० किंवा ७५-३०० ची भर घालावी लागते..झूमींग, प्राथमिक लेव्हलची बर्ड फोटोग्राफी यासाठी
खरंतर सिग्मा का टॅमेरॉनची १८-२७० लेन्स मिळते...एकदम झकाझक...लेन्स बदलायची भानगडच नाही...पण सुरुवातीला तरी त्या लेन्सचा विचार करू नकोस...(नंतरही नाही केलास तरी चालेल..)

बाकी तु ५५०डी घे...कॅमेरा घेतानाच होया किंवा मारूमीचा यूव्ही फिल्टर न विसरता घेणे (४००-५०० पर्यत)...ट्रायपॉड लगेचच घेतला नाहीस तरी चालेल...नंतर रिसर्च करून व्हॅनगार्ड किंवा बजेट असेल मॅनफ्रोटोचा...

एक महत्वाची टीप - व्हिडीओ शूट करण्यात जास्त इंट्ररेस्ट असेल तर मेमरीकार्ड १० पॉवरचे घे...नॉर्मली कॅमेराबरोबर ४ जीबीचे कार्ड देतात पण ते ४ पॉवरचे असते आणि त्यावर एचडी शूटींग २-३ मिनिटापेक्षा जास्त होत नाही एका वेळी...
एक १६ जीबीचे १० पॉवरचे सॅनडीस्कचे कार्ड ८००-९००ला जाईल पण अत्यंत आवश्यक...

हुर्रे..... आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहुर्तावर Cannon EOS550D घेतला Happy
तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा खुपच उपयोग झाला!
महावीरमधुनच घेतला.... ३० मध्ये मिळाला... आशुचँपच्या सल्ल्यानुसार होयाचा UV Filter आणि १० पॉवरचे मेमरी कार्ड पण घेतले Happy

मस्त धागा..
कॅमेरा घ्यावा का या विचारात होते म्हटल आधी इथलं मार्गदर्शन घ्यावं..
सद्ध्या माझ्याकडे सोनी सायबरशॉट आहे १२.१ मेगापिक्सेल चा...
२०१० मधे घेतलेला..
अजुनही असं वाटतय कि काहीतरी शिकायच बाकी आहे.. भरपूर वापरलाय पण पूर्ण हात बसला अस म्हणता येणार नाही..
4X Optical Zoom आहे..

फक्त साधे डिजीटल कॅमेरा आणि त्याच्या फिचर्स बद्दल तसेच सेटिंग्स काय ठेवल्यास फोटो कसे येतील अशी कुठली गाईड आहे का बघावी म्हणते.. असलेला कॅमेरा सुटत नाहीए.. आणि त्याला कोळून पिल्याशिवाय दुसरा घेववत नाहीए..

टीना >>
मला वाटत तु डि.पी रिव्हीव्हु (dpreview) हि साईट पहा.. त्या मध्ये तुला खुप छान माहीती मिळेल.. मला डिजीटल कॅमेरा च काही हव असल्यास मी तिच साईट पाहातो..

माझ्या कडे Sony H50 (15X optical) आहे . जो मी २००८ मध्ये घेतलेला व आजुन ही छान चालतो.. सगळे फिचर वापरले त्याचे.
आता Sony चाच DSLR घ्यायच्या विचारात आहे... !!! Happy

Pages