२६/११ च्या त्या काळरात्रीला आज शुक्रवारी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. त्या रात्री दहशतवाद्यांनी मांडलेले थैमान, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक तसेच इतरत्र गेलेले निरपराधांचे बळी, हा हल्ला परतवुन लावताना धारातीर्थी पडलेले वीर अशा या क्रौर्य, शौर्य आणि वेदनेला आज दोन वर्षे होत आहे. त्या हत्याकांडाला बळी पडलेल्या सर्व असहाय नागरिकांना तसेच हा हल्ला छातीवर झेलुन स्वतःच्या प्राणाचे बलिदान देवुन दहशतवादाला आपले सामर्थ्य, आपली एकजुट दाखवुन देणार्या सर्व ज्ञात्-अज्ञात महावीरांना विनम्र श्रद्धांजली !
"हुतात्मा हेमंतजी करकरे, हुतात्मा विजय साळसकरसाहेब आणि हुतात्मा अशोकजी कामटे"
"हुतात्मा इन्स्पेक्टर शिंदे आणि त्यांचे वीर सहकारी"
"हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन"
"यांच्या हौतात्म्याची किंमत काय?"
"इथे जो नृशंस हिंसाचार घडला तो आपण इतक्या सहजासहजी विसरलो की काय?"
मी इथे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो असे म्हणत नाहीये कारण ते देवाच्या नसुन आपल्या हातात आहे. कसाब, अफजल सारख्या कृरकर्म्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्यास शांती कशी मिळेल? ठिक आहे, अपराध्यांना शिक्षा देण्यात काही कायदेशीर प्रक्रियातून जाणे आवश्यक असते, त्यामुळे होणारा विलंब समजु शकतो. पण या घटनेतून आपण काय धडा घेतला हा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतोच. आजतरी परिस्थिती बदलली आहे काय? देशाच्या सागरी सीमा आजतरी सुरक्षीत आहेत काय?
दहशतवाद्यांच्या दृष्टीने आजही भारत हे सॊफ़्ट टार्गेटच आहे.
"सद्ध्या आपण फ़क्त एवढेच करु शकतो का.....?"
त्या सर्व ज्ञात्-अज्ञात महावीरांना पुन्हा एकदा शतश: प्रणाम आणि विनम्र श्रद्धांजली !
आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?
विशाल
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
तर, आज २६/११. एका न विसरता
तर, आज २६/११. एका न विसरता येणार्या काळ्या दिवसाचे थैमान.
काय केलं आपण २ वर्षांत? कोर्ट-कचेर्या, हेवे दावे, पुरावे दाखल करुन कसाबला गुन्हेगार ठरवला, त्याला फाशीची शिक्षा झाली. आम्ही आनंद व्यक्त केला, फटाके फोडले. पण त्यानंतर काय? कितीतरी लोकांचा बळी घेतलेल्याला लाखो-करोडो रुपये खर्च करुन अक्षरशः पोसलं जातंय. इतका गुन्हा करुन देखील त्याने दयाअर्ज केलाय. कधी होणार त्याला फाशी?
दरवर्षी आम्ही २६/११ साजरा करतो शहिदांना श्रद्धांजली वाहुन. त्यापलीकडे काहीच करण्यासारखं नाही का आपल्याकडे? ज्या दिवशी त्याला फाशी होईल त्याच दिवशी शहिदांना खरी श्रद्धांजली पोहोचेल.
आणखी थोडे वर्षं कसाबला पोसतील आणि शाल, श्रीफळ देऊन पाकिस्तानात बाईज्जत पोचते करतील, इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा वाढेल इतकंच.
आणि इतकं होऊनही 'मेरा भारत महान' 'इन्क्रीडीबल इंडिया'..
विशाल, नशिब चांगलं होतं
विशाल, नशिब चांगलं होतं म्हणून कदाचित ह्या विध्वंसापासून मी वाचलो रे त्या दिवसच्या संध्याकाळी ७ वाजता आम्ही 'ताज' हॉटेलजवळून निघालो अन तळेगावची एक साईट उरकून चाकणजवळचा टोल नाका टाळला अन त्याचं बॅरिअर तोडलं तेव्हा लगेच आम्हाला पुढे काही पोलिसांनी पकडलं होतं तेव्हा आम्हाला कळलं कि 'ताज' हायजॅक झालयं. अक्षरशः आमची फाटली होती तेव्हा.
भयंकर होतं ते सगळं , एवढ्या तासांची झूंज, निष्पाप जिवांचे बळी, अन कसाबसारख्या गिधाडवृत्तीचा भयंकर अनूभव.
रच्याकने, अशोक कामटे यांचं पार्थिव पुण्यालाच आणलं होतं तेव्हा शेवटचं दर्शन अन त्यांची कारकिर्द जाणून घेता आली. अशोक कामटेंचं सोलापूरचा एकूण केलेला बदल अन ऐन दंगलीत ak47 घेऊन शिवाजी चौकात उभा राहीलेला सैनिक अन आमदार वाढदिवसाची ती धूलाई करणारा गेला यावर विश्वासच बसत नव्हता.
हल्ली यथा प्रजा तथा राजा असा
हल्ली यथा प्रजा तथा राजा असा उलटा प्रकार असल्याने याला आपणच जबाबदार आहोत
लेखाचं शीर्षक समर्पक आहे. "आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?"
खरय सुकि, कामटेसाहेबांवर
खरय सुकि, कामटेसाहेबांवर लिहायचय. एक सोलापूरकर या नात्याने मी ही त्यांचे देणे लागतो. लिहीन वेळ काढुन
विशाल , कामटे साहेबांवर लिही
विशाल , कामटे साहेबांवर लिही अन जमल्यास त्यांच्या घरच्यांविषयी सुद्धा लिही. त्यांचे वडील, आजोबा यांचेच तर संस्कार होते त्यांच्यावर. सध्या ते माझ्या घराजवळ असणार्या "रक्षक सोसायटी" मधे राहते त्यांचे कुटुंब.
विशाल
विशाल
एक सोलापूरकर या नात्याने मी
एक सोलापूरकर या नात्याने मी ही त्यांचे देणे लागतो. >>> अगदी, अगदी.
त्या दिवशी ज्या चुका झाल्या,
त्या दिवशी ज्या चुका झाल्या, त्या परत होऊ नयेत, याचीच काळजी घ्यायला पाहिजे.
रेल्वेत, बसमधे अनेक सुचना असतात. अनोळखी वस्तू, अनोळखी व्यक्तीबद्दल. त्या कुणीच पाळताना दिसत नाही. अगदी बसायच्या पुर्वी बाकाखाली बघा, ही सूचना पण पाळली जात नाही.
शाळेत लहान मूलांचे ड्रील घेतले जाते का ? नसेल तर तेही घ्यायला पाहिजे. लहान मूलांची नजर जात्याच तीक्ष्ण असते. त्यांच्या नजरेला या गोष्टी आपोआप दिसतात.
अशोक कामटेंचं सोलापूरचा एकूण
अशोक कामटेंचं सोलापूरचा एकूण केलेला बदल अन ऐन दंगलीत ak47 घेऊन शिवाजी चौकात उभा राहीलेला सैनिक अन आमदार वाढदिवसाची ती धूलाई करणारा गेला यावर विश्वासच बसत नव्हता.
त्या दिवशी या बद्दल जेव्हा मला मित्राचा रात्री फोन आला मला विश्वासच बसला नव्हता. त्यालाच झोपेत चार शिव्या हाडसुन गप बसलवलं. पण खरं जेव्हा कळलं तेव्हा मात्र...
एक सोलापूरकर या नात्याने मी ही त्यांचे देणे लागतो.
हो तर....
दिनेशदा, या आपण घ्यावयाची
दिनेशदा, या आपण घ्यावयाची काळजी झाली. पण त्या कसाबचं काय ? खटला पुन्हा पहिल्यापासुन सुरु करा म्हणतोय.
विनम्र
विनम्र श्रद्धांजली....
लोकांनी रस्त्यावर उतरून क्रांती केल्याशिवाय व्यवस्थेचा टोणगा काबूत येणार नाहीयेय!
रंग दे बसंती मधला 1 dialogue
रंग दे बसंती मधला 1 dialogue आठवला..
अभी भी जिसका खून न खौला..खून नही वो पानी हैं ..
देश के जो काम न आए...बेकार वो जवानी हैं..
जय हिन्दं !
दुर्दैवाने आपल्याकडे
दुर्दैवाने आपल्याकडे न्यायसंस्थेवर सामान्य नागरिकांच्या मतांचा परिणाम होत नाही. शिवाय फाशीच्या शिक्षेविरुद्ध राष्ट्रपतिंकडे दयेचा अर्ज करता येतो.
अयोध्येचा निकालाच्या बाबतीत, जर लोकांच्या श्रद्धेचा विचार केला, तर इथे नागरिकांच्या भावनांचा का नको ?
शक्य तितक्या मार्गाने निषेध नोंदवला पाहिजे. कसाबला मोठा करणार्या मिडीयावर पण जनमताचा रेटा पडला पाहिजे.
तसे अनेक गैरप्रकार होत आहेत. रत्नागिरीजवळ एका प्रकल्पासाठी कमी प्रतीची अणूभट्टीची साधने आयात केली जात आहेत, त्याविरुद्ध एक संस्था कार्य करत आहे. तिला जोरदार पाठिंबा मिळालाच पाहिजे.
आपल्याकडच्या प्रतिक्रिया आणि प्रक्रिया संथ आहेत, पण त्या नक्कीच प्रभावी आहेत. बिहारमधल्या निवडणुक निकालात, हे थोडेफार दिसलेच आहे.
दयेचा अर्ज हा या देशाच्या
दयेचा अर्ज हा या देशाच्या कायद्याने नागरिकाना दिलेला अधिकार आहे... कसाब हा या देशाचा नागरिक नाही, त्याला हा अधिकार कसा मिळाला?
http://www.esakal.com/esakal/
http://www.esakal.com/esakal/20101126/5318845579418871489.htm
आपण कधी शिकणार आहोत धडा
आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला? खरंय विशाल
नुसते ते फोटोज पाहूनच डचमळतंय...
पुन्हा दोन वर्षांनी आजच्या दिवशी त्या स्मृती जागृत केल्यास... तुझे आभार....
दृष्य १: ऑगस्ट २००८ मधे २२
दृष्य १:
ऑगस्ट २००८ मधे २२ कस्टम अधिकार्यांना नंगानाच करताना पोलीसांनी पकडलं. तिथून जप्त केलेल्या वस्तूंमधे रोकड - जिचा कुठलाही हिशेब त्यांना देता आला नाही - समाविष्ट होती. परवा त्या सर्व अधिकार्यांना हाय कोर्टाने "बाईज्जत बरी" केलं.
दृष्य २:
नोव्हेंबर २००८ - केवळ दहा अतिरेक्यांनी ३ दिवस या देशाच्या हजारो पोलीस आणि फौजेला झुंजवलं. त्यांच्या कडे प्रचंड दारुगोळा, हत्यारे आणि सुका मेवा होता. आणि हे सर्व त्यांनी पाठीवर लटकवलेल्या छोट्याशा सॅक मधे आणले.
केवळ तिन महिन्यांच्या अंतराने घडलेल्या या घटनांमधे काही लिंक आहे असं कुणालाच का वाटलं नाही ? अतिरेक्यांनी वापरलेलं साहित्य हे आधीपासूनच मुंबईत आलं होतं हे अजूनही का कुणी सिद्ध करु शकलं नाही ?
टवाळ , अनुमोदन. आजही आपण
टवाळ , अनुमोदन. आजही आपण 'हवालामार्फत' आलेली रोकड पकडली गेली. हे वाचतोच ना. कुठून येते ती रक्कम, कोण पाठवतं. ह्याचे धागे दोरे खरोखर तपासायलाच हवे. अरे पुण्यातल्या काही गाव खेड्यात गेलास कि काही टघ्यांकडे विदेशी बनावटीची पिस्तुले सहज उपलब्ध होतात , ती कशी?
२६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा
२६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेले वीर आणि बळी पडलेले निरपराध नागरिक यांना मनःपूर्वक व विनम्र श्रद्धांजली.!
विशाल आणि योडी यांना मी १००% सहमत आहे. आपण अजून किती वर्ष फक्त श्रद्धांजली वाहत रहाणार आहोत? फक्त श्रद्धांजली वाहून आणि मेणबत्त्या लावून त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल? त्यांच्या कुटुंबाची झालेली हानी भरून येईल्? जो पर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणालाच शांती लाभणार नाही. पण हे आपले सामान्यांचे विचार आहेत. त्याला काय किंमत? किंमत आहे ती कसाबच्या खाण्यापिण्याला, त्याच्या आरामाला, त्याचे चोचले पुरवायला, आणि त्याचे लाड करायला, त्याच्या मर्कट लिलांना, त्याच्या दयेच्या अर्जाला, आणि लवकरात लवकर त्याला मुक्त करायला............
पुरावे गोळा करायला, साक्षीदार तपासायला १ वर्ष लागलं. १ वर्षानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वांना आनंद झाला. १ वर्षानंतर का होईना बलिदान केलेल्यांना न्याय मिळेल असे वाटले. पण ज्यांनी आपल्या सर्वांसाठी प्राणाची आहुती दिली त्यांना कधी न्याय मिळेल असे वाटत नाही. कारण कसाबला सुटायचे मार्ग आपणच दाखवत आहोत. त्याला दयेचा अर्ज करायची परवानगी आपणच दिली. आपल्याला रस्त्यावर तडफडणार्या भिकार्याची दया येणार नाही, पण अशा नराधमाची नक्कीच दया येईल. आणि योडीने लिहील्याप्रमाणे शाल श्रीफळ देवून परत परत आणि अनेक साथीदारांना घेऊन यायचे आपण आमंत्रण देवू.
किती त्याचे लाड? तो आपला गुन्हेगार आहे की आपण त्याचे? पोटभर खाणं, आराम, इतर सर्व सोयी - सुविधा. जणू काही तो आपला खास पाहुणाच आहे. (तसा ही तो आहेच म्हणा- सरकारचा जावई) खरंतर त्याचा गुन्हा शाबूत झाला तेव्हाच त्याला भर चौकात फाशी द्यायला हवी होती. त्यांच्याकडे अशा शिक्षा त्वरीत दिल्या जातात. आपण मात्र शाहि पाहूणचार देत बसतो.
आपल्या देशात कैद्यांना तुरुंगात ठेवायला जागा नाही. कशी असणार? प्रत्येक कैद्याला आयुष्यभर कुठलीही शिक्षा न देता, राजपुत्र / राजकन्या म्हणून पोसण्याचे पुण्य आपण मिळवत आहोत ना??? कैदि देवो भव....आपल्या देशातील जनता उपासमारीने मेली तरी चालेल(तेव्हढीच लोकसंख्या कमी होईल.)
पण कैद्यांचा शाहि पाहूणचार झालाच पाहिजे.
३० वर्षानंतर आपल्याला गुन्हेगार सापडतो आणि आपण त्याला जामिनावर मोकळा सोडतो. खून करणारे, बायकोला जाळणारे, लहान मुलांना अनन्वीत हाल करुन मारणारे, लहान मुलांवर अत्याचार करणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी मुलांचा बळि देणारे या सर्वांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्त्तताच होते.
आणि आपण मात्र शांतपणे हे सर्व वाचत व पहात असतो.
आपले देशभक्त (उदा: सावरकर)जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांना किती त्रास सहन करायला लागले हे वाचून आजही अंगावर काटा येतो. कुठे तेव्हाचा तुरूंगवास आणि कुठे आत्ताचा पंचतारांकित तुरूंगवास?????????
अशा पंचतारांकित तुरूंगवासासाठी भविष्यात प्रत्येक नागरिक कसाबच होईल.
असो...........देव सर्वांना सदबुध्धी देवो..........
आयकर खात्याकडे सर्व्हे सर्कल
आयकर खात्याकडे सर्व्हे सर्कल नावाचे खाते निदान पुर्वी तरी होते. एखाद्या व्यकीची जीवनशैली बघून त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोताशी ती विसंगत असेल, तर ते खाते कार्यवाही करत असे. त्यांची नजर अशा लोकांकडे का जात नाही ? तूम्ही एखादी जमीन घ्यायला जा, किती पिडतात !!
(No subject)
टवाळ चा प्रतिसादाला
टवाळ चा प्रतिसादाला अनुमोदन....
आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला? खरच .
शेवटचा दुसरा फोटो सुन्न करणारा
विनम्र श्रद्धांजली ! ’ते’ असं
विनम्र श्रद्धांजली !
’ते’ असं करण्याची हिम्मत कशी करू शकले यामागील कारणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
आपल्यात फुटीर वृत्ती किती बळावलेली आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असावी. आपली ही कमजोरी, त्यांची हिम्मत वाढवते.
आपल्या असंघटित भारतीय समाजाला, समाज म्हणायचं की प्रचंड गर्दी ?
आणि सामान्य भारतीय माणूस हा नागरिक, की केवळ रहिवासी ?
विशाल, त्यांची काहीही चुक
विशाल,
त्यांची काहीही चुक नसताना १५० च्या वर लोक हकनाक,भयानकपणे मारले गेले, काही चांगले,धाडसी अधिकारी आपण गमावले ...
आणि हे सगळं १०-१२ लोकांनी (पोरांनी) येऊन ठरवुन करुन दाखवलं ..
सुरक्षायंत्रणा,पोलिस यांच्या देखील मर्यादा आहेतच,त्यात त्यांच्याकडे आधुनिक हत्यारेदेखील वेळेवर नसतात ..
त्यामुळे आज ही पुन्हा तेच तसच घडु शकतं हे खरं दुर्दैव आहे
जनतेचा दबाव्,लोकांचा सहभाग म्हणाल तर १ कोटीच्यावर लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात १०-१५ लाख एकत्र येऊन दबाव आणु शकत नाहीत,हा देखील एक प्रश्नच आहे
आपण कधी शिकणार आहोत धडा
आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?
अशक्य आहे जोपर्यंत मतदार पैसा /पार्टी घेउन मतदान करतात.
विशाल .... इथे बसून आपण एकतर
विशाल .... इथे बसून आपण एकतर लेख लिहू शकतो नाहीतर मेणबत्त्या जाळू शकतो ..
त्याहून जास्त काही नाही ...
काही लोक ज्यांना बसल्याजागी ह्या पेक्षा जास्त काही करता येते ... ते करताहेत ..
http://www.rediff.com/news/report/indian-cyber-army-hacks-pak-govt-websi...
आणि त्याखालचे लोकांचे प्रतिसादही वाचा ... त्यांचा मते मेणबत्त्याच धराव्यात आणि अशा लोकांना जाहीर फाशी द्यावी ...
त्या प्रतिसादाच्या मूर्खपणावर हसावे कि चिडावे कळत नाहीये ...