रावस (कापुन, धुवुन) (रावस हा बाजारातुनच कापुन मिळतो कारण हा मासा मोठा असतो कोळणी त्याचे तुकडे करुन विकतात.)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
तळण्याचे साहित्य :
रावसाच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
क्रमवार पाककृती:
रावसाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर रावसाच्या तुकड्या घालाव्यात. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
रावसाच्या तळण्याची कृती :
रावसाच्या तुकड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन रावसाच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.
तळताना लसुण हा ऑप्शनल आहे. जर तळलेल्या लसूणाचा वास आवडत असेल तर घालावा. नाही घातला तरी चालतो.
कालवण करताना बिन वाटणाच सुद्धा करता येत. पातळ आणि छान लागत.
हा आहे रावस. हे आहे रावसाचे
हा आहे रावस.
हे आहे रावसाचे कालवणः
ह्या आहेत तळलेल्या रावसाच्या तुकड्या.
वरच्या फोटोतल्या तारखा बघु
वरच्या फोटोतल्या तारखा बघु नका. एक वर्षाचा फरक आहे. पण आता आक्खा रावस मिळणे कठीण आहे म्हणून जुना फोटो टाकला आहे. तो रावस आम्हाला भेट पाठवला होता.
जागु कंट्रोल... पुन्हा एकदा
जागु कंट्रोल...
पुन्हा एकदा मस्त रेसीपी...
अख्खा रावस मला वाटतं मी
अख्खा रावस मला वाटतं मी पहिल्यांदाच बघतोय.
विनय धन्स. दिनेशदा धन्स. बदल
विनय धन्स.
दिनेशदा धन्स. बदल केला आहे.
जागु, अख्खे रावस असतात की
जागु, अख्खे रावस असतात की बाजारात.
जागू जागू.... नको गं ईतके
जागू जागू.... नको गं ईतके अत्याचार करुस.
>>तो रावस आम्हाला भेट पाठवला होता>> जल्ला अश्या पण भेटी देतात तुमच्यात. ए ते न
जागू, अख्खे रावस मिळतात
जागू, अख्खे रावस मिळतात की.
कालवणातल्या तुकडींना तिखट हळदीचा मसाला लावला नाहीये का? पांढरे कसे दिसतात?
तळलेल्या तुकडी मस्त दिसतायत
>>तळलेल्या तुकडी मस्त
>>तळलेल्या तुकडी मस्त दिसतायत>> तेच नं.. कॉम्प्युच्या स्क्रीनातून पदार्थ मिळायची सोय असती तर कित्ती बरं झालं असतं नै
भ्रमर, शैलजा आख्खे रावस
भ्रमर, शैलजा आख्खे रावस मिळतात पण बर्याचदा आमच्याकडे मोठ्या रावसाचे तुकडेच आणले जातात.
निलू कोळी लोक ह्या माश्यांचिच भेट देतात. त्यामुळेच मी इथे आख्या माशांचे फोटो टाकु शकते.
शैलजा लावल आहे ग. गॅस मंद असल्यामुळे ह्याचा रंग आला नाही. ह्या घे थोड्या करपलेल्या तुकड्या.
<
>> कोळी लोक ह्या माश्यांचिच
>> कोळी लोक ह्या माश्यांचिच भेट देतात. .> >> कोळी म्हणून जन्माला आली याच अतीव दु:ख होतय मला
>>करपलेल्या तुकड्या. >> मला
>>करपलेल्या तुकड्या. >> मला नकोत बै करपलेल्या तुकड्या! त्या न करपलेल्याच छान आहेत.
पाकृ एकदम तोंपासु
पाकृ एकदम तोंपासु
खरंच एकदम तोंपासु
खरंच एकदम तोंपासु
जागू, मी एका कथेत अहिर
जागू, मी एका कथेत अहिर नावाच्या माशाबद्दल वाचले होते (बहुतेक भूक हि कथा. ती म्हातारी कोळीण, आजारपणात नदीवर मासे पकडायला जाते...) तो माहीत आहे का ? मी कधीच तो पाहिला नाही वा त्याबद्दल ऐकलेही नाही.
तुकड्यावरुन रावस ईस्वणापेक्षा
तुकड्यावरुन रावस ईस्वणापेक्षा मोठ्ठा असावा असं वाटतय.
कलवणात वाटण असेल तर फारच छान
कलवणात वाटण असेल तर फारच छान नाहीतर रस्सा फारच पातळ लागतो... अर्थात रावस असल्याने तसा रस्साही मस्तच लागतो. तळताना लसूण हवाच. फार छान माहीती जागू... तों.पा.सु.
आज मी हा फोटो बघुन पोट्भरुन
आज मी हा फोटो बघुन पोट्भरुन वेज जेवण जेवलो....
आभारी जगुतै....
(हजेरी लावलेली आहे)
(हजेरी लावलेली आहे)
तोंडाला पाणी सुटलं!
तोंडाला पाणी सुटलं!
हजर कालवण एवढं नाही आवडलं
हजर कालवण एवढं नाही आवडलं कारण बहुतेक मासे असे पांढुरके दिसताएत त्यामुळे, तळलेल्या तुकड्या भारी दिसताएत. बाकी करणार्यांनी करा, खाणार्यांनी खा. मी आणि केश्वी फोटो बघतो
शाळेत कुठल्यातरी परिक्षेची
शाळेत कुठल्यातरी परिक्षेची तयारी करत असताना एका जीवशास्त्राच्या पुस्तकात हा मासा पाहिला होता आणि आता इथे..
तुकड्या सही दिसतायत !!
तळलेला मासा मस्त दिसतोय मी
तळलेला मासा मस्त दिसतोय
मी कधी खाल्ला नाही रावस. रावस आणि रोहू मासा एकच असतो का?
नाही दीपान्त, रावस हा इन्डिअन
नाही दीपान्त, रावस हा इन्डिअन सालमन फिश आहे आणी रोहू हा Greas carp fish आहे
जागू... क्या रावस
जागू... क्या रावस है!!!!!!!!!! तोंपासू.. सगळ्यांना लाळेरी(Bibs) दे आता फोटोंबरोबर
रोहु हा नदीतला मासा आहे.
रोहु हा नदीतला मासा आहे.
यस्स्स भ्रमर .. रोहू नदीतला
यस्स्स भ्रमर .. रोहू नदीतला मासा आहे आणी रावस डीप सी मधला
जागू, मासे खूप आवडत असले तरी
जागू, मासे खूप आवडत असले तरी काटे जास्त असलेल्या माशांची मला जाम भिती वाटते ( काटेवाल्या माशांना जास्त चव असते हे माहिती आहे ) त्यामुळे जेव्हा जेव्हा घरी मासे केले गेले तेव्हा रावस, सुरमई, पापलेट हेच आणले जायचे. एकदोनदा बोंबिल पण आणले आहेत.
रावसाच्या तळलेल्या तुकड्या पाहून फार त्रास झाला आज
वर्षा १ वर्षाच्या अंतराच
वर्षा १ वर्षाच्या अंतराच स्पष्टीकरण मी वरच्या पोस्ट मध्ये दिलेल आहे ग बयो.
मंजिरी,
दिनेशदा मला कथेची लिंक द्या.
भ्रमर इस्वण म्हणजे काय ?
डॉ. कैलास, चातक, स्वाती, सिंडरेला, पराग, दिपान्त अगो धन्यवाद.
अश्विनी तुझ्या कॉमेन्टस अपेक्षीत आहेत. नुतसी डोळे फिरवु नकोस.
भ्रमर इस्वण म्हणजे काय ?>>>
भ्रमर इस्वण म्हणजे काय ?>>> मोठ्या सुरमयीला कोकणात ईस्वण म्हणतात.
Pages