रावस (कापुन, धुवुन) (रावस हा बाजारातुनच कापुन मिळतो कारण हा मासा मोठा असतो कोळणी त्याचे तुकडे करुन विकतात.)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
तळण्याचे साहित्य :
रावसाच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
क्रमवार पाककृती:
रावसाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर रावसाच्या तुकड्या घालाव्यात. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
रावसाच्या तळण्याची कृती :
रावसाच्या तुकड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन रावसाच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.
तळताना लसुण हा ऑप्शनल आहे. जर तळलेल्या लसूणाचा वास आवडत असेल तर घालावा. नाही घातला तरी चालतो.
कालवण करताना बिन वाटणाच सुद्धा करता येत. पातळ आणि छान लागत.
जागु, छान, पण नेहमीसारखी
जागु,
छान, पण नेहमीसारखी नुसतं वाचायला ही काही फार मजा नाही आली...
छे जागू, कथेची लिंक कुठली ?
छे जागू, कथेची लिंक कुठली ? मला शाळेत होती ती कथा अभ्यासाला !
दक्षीणा कदाचित मी कापलेल्या
दक्षीणा कदाचित मी कापलेल्या तुकड्या वगैरे टाकल्या नाहीत म्हणुन तुम्हाला मजा नसेल आली.
दिनेशदा पण तो मासा कसा होता ?
जर मासा अख्खा मिळत नसेल तर तो
जर मासा अख्खा मिळत नसेल तर तो ताजा आहे की नाही, हे कसे कळते? फक्त त्याच्या पिसेस वरून कोणता मासा आहे, हे ओळखता येते का?
अमे, शक्यतो मासे अख्खेच
अमे, शक्यतो मासे अख्खेच मिळतात, "घोळ" हा मास वगळता!! कारण त्याचे तुकडे करुनच विकले जातात. पिसेस वरुन मासा ओळखायला 'नजर तयार' व्हायला लागते. आधी चुकशील, मग शिकशील!!
फक्त त्याच्या पिसेस वरून
फक्त त्याच्या पिसेस वरून कोणता मासा आहे, हे ओळखता येते का?>>>>>>>>>>
हो येतो ना..... फक्त कधी कधी ते तुकडे शिजवून खाल्ल्यावर कळतं.. गंमत केली.
पण बर्यचदा तुकड्यांवरुन मासा ओळखायला येतो.... स्कीन इंटॅक्ट असावी लागते.
अमी, भ्रमर आमच्याकडे जास्त
अमी, भ्रमर आमच्याकडे जास्त करुन रावस मोठे येतात. त्यामुळे त्याच्या तुकड्याच जास्त आणल्या जातात.
माश्यांच्या तुकड्या ओळखायला सवय व्हावी लागते. त्या अगदी ओळखिच्याच कोळणीकडुन घ्याव्यात.
ताजी तुकडी ओळखण्यासाठी तुकडी तुकतुकीत असायला पाहीजे. तिच्या काट्याजवळ लालसर, गुलाबी रंग् म्हणजे त्याच्या रक्ताचा फ्रेश कलर असतो.
कोणत्या माश्याची तुकडी हे ओळखण्या करिता पहिला तिची कातडी पहायची. जर आपल्याला मासा ओळखता येत असेल तर कातडी पाहुन कोणत्या माश्याची तुकडी हे ओळखता येते.
साधारण घोळ, रावस, समुद्री जिताडा (मोठा), ह्या मास्यांच्या तुकड्या असतात.
घोळीची खौले मोठी गोलाकार असतात. तुकडीच्या मांसाला ज्या रेषा पडलेल्या असतात त्याच्या आकारावरुनही मासे ओळखता येतात.
आज घरी सकाळी बेबी रावस
आज घरी सकाळी बेबी रावस (रावसाची पिल्ले) आणि मांदेली घेतलीत. माझ्यासाठी बहुतेक उरणार नाहीत संध्याकाळपर्यंत (घरी सध्या मासेखाऊ आणि मासेबनवू पाहुणी आलीय त्यामुळे घरी आठवड्यातुन तिन्दा मासळी )
बेलापुरच्या दिवाळे गावातील मासेबाजारात तिन फुट लांबीचा जाडाजुडा रावस जो रु.२५०-३००-४०० किलोवर मिळतो तोही मिळतो आणि जो मी आज घेतला (रु ५० ला तिन हा बाजारभाव आणि कोळणीने उदार होऊन वर टाकलेला अजुन एक) तो रावसाचा बच्चा दोन्ही मिळतात.
कोळी लोक ह्या माश्यांचिच भेट देतात.
माझ्या भावाला त्याच्या विरारच्या कोळीमित्राने एकदा मासा भेट दिलेला. रेतीतला आहे, खुपच स्पेशल असतो असे त्याने सांगितलेले. माशाचे नाव विसरले, कदाचित रावसच असेल. बिचारा भाऊ घरी मासा देऊन बाहेर कुठेतरी गेला. मासा इतका चविष्ट की खाताखाता कधी संपला ते कळलेच नाही आम्हाला. भाऊ परत आल्यावर मासा संपल्याची दु:खद बातमी आम्ही त्याला कळवली. तोही दु:खात बुडाला आणि मग आम्हाला कळले की तो रेतीतला स्पेशल मासा होता..
अमे, शक्यतो मासे अख्खेच
अमे, शक्यतो मासे अख्खेच मिळतात, "घोळ" हा मास वगळता!!
भ्रमर, एकदा बेलापुरला या. इथे सुरमई, रावस, जिताडा, घोळ आणि अजुन बरेच मला नावे माहित नसलेले मासे येतात ज्यांची लांबी २.५-३ फुट आणि रुंदी अर्धा-एक फुट असते. हे सगळेजण २५०-३००-४०० रुपये किलो ह्या भावाने कोळणी विकतात. अख्खे पण मिळतात पण रावस, घोळ वगैरे कायम मोठ्ठेच. पिल्ले फार क्वचित. मी अर्धा किलो घेतले तरी व्यवस्थित पुरतात. पाहुणे येणार असतील तर मी अख्खे घेण्यापेक्षा असे कापुनच घेते कारण वाया जाणारे घटक कमी असतात कापुन घेतलेल्या माशात.
साधना आई आली आहे का ग ? की
साधना आई आली आहे का ग ? की बहीण आलेय ?
नाही गं.. एक दुरची नातलग आहे.
नाही गं.. एक दुरची नातलग आहे. जरा आजारी होती म्हणुन ती आराम करायला आलीय खरी, पण माशांच्या वाराला तिला मासे लागतात्च. आज मला करायला वेळ नव्हता त्यामुळे तिला करावे लागतील आता.
आता ती आजारातुन लवकरच बरी
आता ती आजारातुन लवकरच बरी होईल मासे खाऊन.
रेतीतला मासा म्हणजे समुद्रातला की खडपातला ग ?
धारावीला, म्हणजे पुर्वीच्या
धारावीला, म्हणजे पुर्वीच्या ड्राईव्ह ईन थिएटरच्या मागच्या बाजूला मस्यशेती होते, असे लोकसत्तामधल्या लेखात वाचले. कुठे विकत असतील ते मासे ? असे मर्यादीत क्षेत्रात वाढवलेले मासे चांगलेच धष्टपुष्ट असतात.
मी कर्जतला एका प्रॉन्स फार्म वर बघितले होते, एकेक कोलंबी २०० /२५० ग्रॅम्सची झाली होती. आणि मग त्यांची इतकी दाटी होते, कि एरवी पाण्यातले मासे पकडण्याचे कौशल्य नसणारे कावळेपण त्या उचलून नेत होते.
एकेक कोलंबी २०० /२५०
एकेक कोलंबी २०० /२५० ग्रॅम्सची झाली होती
कावळेपण त्या उचलून नेत होते what a waste.....
रेतीतला मासा म्हणजे
रेतीतला मासा म्हणजे समुद्रातला की खडपातला ग
समुद्रातला होता गं.. लै भारी होता..... गेला बिचारा आमच्या पोटात.. त्याची पणतंवडे कुठे नांदत असतील तर शोधायला पाहिजेत... त्यांच्यासाठी पण जागा आहे इथे...
साधना माझ्याकडे पण आहे जागा.
साधना माझ्याकडे पण आहे जागा. तुझ्याकडची जागा भरली की माझ्याकडे पाठव.
साधना, मासे बघायला कसली
साधना, मासे बघायला कसली बोलावतेस?
अरे बाबा, मासळीबाजारात जाऊन
अरे बाबा, मासळीबाजारात जाऊन मासे बघितले की त्याची परिणती शेवटी त्यांना घरी आणुन तव्यावर टाकण्यातच होते मासळीबाजारातुन कोणी रिकाम्या हाताने परतलाय काय??? तु मासे बघ, मी बनवते आणि मग आपण सगळे खाऊ...
अक्खा रावस मिळतो ना... आई
अक्खा रावस मिळतो ना... आई भारतात गेआनतेणते मॉल मधून कारण आजकाल अक्खा रावस मॉल मध्ये मिळतो.
अहाहा, माशाचे कालवण आणि
अहाहा, माशाचे कालवण आणि गरमागरम भात!!!!!
आताच बाजारात जाऊन आलो.जायंट
आताच बाजारात जाऊन आलो.जायंट रावस बघितला. सगळ्यांची आठवण काढुन आणलाय, आणि खाईन देखिल!
Untitled Album
धन्स वर्षुनील, भ्रमर येत्या
धन्स वर्षुनील, भ्रमर
येत्या भारतवारीत रावस खाऊन बघायला पाहिजे.
भ्रमर एवढा मोठा रावस आख्खा
भ्रमर एवढा मोठा रावस आख्खा आणलास की तुकड्या आणल्यास ?
आख्खा आणला. मी "काती" आणुन
आख्खा आणला. मी "काती" आणुन ठेवलीये कोळणीकडुन. घरी तुकडे केले आणि जवळच्या नातेवाईकांना वाटुन टाकले!
भ्रमर आता परत घेतलास की
भ्रमर आता परत घेतलास की माबोकरांना वाट.
भ्रमरा आम्ही दुरचे
भ्रमरा आम्ही दुरचे काय???????????????
माबोमुळे सगळेजण खिशात कॅमेरा ठेऊन फिरतात की काय?????
साधने, जागु पत्ता कळवुन ठेवा,
साधने, जागु पत्ता कळवुन ठेवा, लागलीच कुरीयर मार्फत धाडुन देतो. आणि मी तुमची आठवण काढुन खाल्ला असं लिहिलय ना! ;-).
कॅमेरा नाही गं, मोबाईल मधे काढलाय.
शिजवुन पाठव रे नाहीतर
शिजवुन पाठव रे नाहीतर कुरीयरवाला रस्त्यातच टाकेल वासाने गुदमरुन.
शिजवून पाठवलं तरी आजचं उद्या
शिजवून पाठवलं तरी आजचं उद्या मिळेल विचारे कुरियरनेसुद्धा.
>>जवळच्या नातेवाईकांना वाटुन
>>जवळच्या नातेवाईकांना वाटुन .>>> तुमच्यात बी वाटतात. बरयं. जल्ला आमच्यातच कोण वाटत नाही. रच्याकने एव्ह्ढा मोठ्ठा कितीला पडला बरं? गेल्या बुधवारी मी गेलेली तर मध्यम आकाराचा मला १५० ला सांगितला.
Pages