रावस (कापुन, धुवुन) (रावस हा बाजारातुनच कापुन मिळतो कारण हा मासा मोठा असतो कोळणी त्याचे तुकडे करुन विकतात.)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
तळण्याचे साहित्य :
रावसाच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
क्रमवार पाककृती:
रावसाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर रावसाच्या तुकड्या घालाव्यात. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
रावसाच्या तळण्याची कृती :
रावसाच्या तुकड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन रावसाच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.
तळताना लसुण हा ऑप्शनल आहे. जर तळलेल्या लसूणाचा वास आवडत असेल तर घालावा. नाही घातला तरी चालतो.
कालवण करताना बिन वाटणाच सुद्धा करता येत. पातळ आणि छान लागत.
अश्वे अग कुरीयरने शिजवुन आला
अश्वे अग कुरीयरने शिजवुन आला तर तो कुरीयरवाला निदान न राहवुन खाउन तरी टाकेल. पण कच्चा पाठवला तर नको असणार्या वासाने टाकुन देईल.
जल्ला आमच्यातच कोण वाटत नाही.
जल्ला आमच्यातच कोण वाटत नाही.
निलुताय, सेम हिअर् बर्का.. जल्ले स्वतःच तळून खातील .. (माझ्यासारखे )
रावस भयानक महाग मिळतो. ७०रु
रावस भयानक महाग मिळतो. ७०रु एक तुकडि
निकिता कुठे राहतेस ? हल्ली
निकिता कुठे राहतेस ? हल्ली सगळेच मासे खुप महाग मिळताहेत.
रावस भयानक महाग मिळतो अगं
रावस भयानक महाग मिळतो
अगं बेलापुरला रु ४००-४५० किलो ह्या दराने रावस जातो.
मी जागुचे लेख वाचुन बाजारात गेल्यावर अर्धा वेळ 'ह्याचे नाव काय्,नी त्याचे नाव काय?' ह्याच्यातच वेळ घालवते. जागुच्या यादीतले लहान मासे स्वस्त मिळतात आणि मस्तही लागतात. (जल्ला अजुन खुबे आणले नाही.... मासळीबाजारात जायला वेळच नाही)
साधना हल्ली कालव पण चांगली
साधना हल्ली कालव पण चांगली येताहेत बाजारात. थोड्या दिवसांनी कोलीम येईल.
कालवं काल होती. पण लेकीला
कालवं काल होती. पण लेकीला 'कुर्ल्या' खायच्या होत्या म्हणुन त्याच नेल्या. मोठ्या कुर्ल्या काल १२०० रु डझन!
भ्रमर १२०० ? १२० असतील.
भ्रमर १२०० ? १२० असतील.
जागू, १२०० !!! मी लहान घेऊन
जागू, १२०० !!! मी लहान घेऊन आलो, ५०० रु डझन वाल्या.
भ्रमर खुपच किंमत आहे
भ्रमर खुपच किंमत आहे तुमच्याइथे. आमच्याकडे मोठ्या २००-३०० ला मोठ्या ६-७ मिळतील.
भ्रमरा काही खरे नाही बाबा..
भ्रमरा काही खरे नाही बाबा.. मला ५० रु ला एक कुर्ली ऐकुन चक्कर यायची.. आता काय करु?????
साधना अग अगदीच मोठ्या असतील
साधना अग अगदीच मोठ्या असतील कदाचित त्या. त्यात मांस ही असते भरपुर आणि लाख म्हणजे गाभोळीही.
ह्याच मोठ्ठ्या मी गटारीला ६००
ह्याच मोठ्ठ्या मी गटारीला ६०० रु डझन ने घेतल्या होत्या. जागु, तुझ्याकडे येऊन मासे घ्यायला हवेत तर.
मी अंधेरीला. ४ बंगला माक्रेट
मी अंधेरीला.
४ बंगला माक्रेट मध्ये. महा भयंकर महाग आहेत मासे सध्या. मला कुर्ल्या येत नाहीत म्हणुन घेतल्या नाहित कधी. एकदा करायच्या आहे. मी एकटी खाणारी नवरा खात नाहि मासे त्यामुळे रावस घेतलाच नाही. १० तुकड्या घ्यायच्या म्हंट्ल्या तरी ७०० होत होते. कोळीण म्हणाली अख्खाच घे. पण अख्खा घेउन खाणार कोण? मी आणी १.५ वर्षाची मुलगी
हो नक्कीच भ्रमर. तुम्ही
हो नक्कीच भ्रमर. तुम्ही सग्ळे येत असाल तर मी उद्यापासून टोपली घेउनच बाजारात बसते. चांगला धंदा होईल माझा.
निकिता अग मग एकच तुकडी
निकिता अग मग एकच तुकडी घ्यायची.
१ से मेरा क्या होगा? दात को
१ से मेरा क्या होगा? दात को भी नहि लगेगा?
निके मग भर ७०० रु.
निके मग भर ७०० रु.
हाय जागू, तू केलस म्हणजे
हाय जागू,
तू केलस म्हणजे चवदार असेल. आम्ही आपले नुसत बघणार. करणार्याने करावे आणि खाणार्याने खावे.
ते पण नाही झेपत. म्हणुन सध्या
ते पण नाही झेपत. म्हणुन सध्या फक्त बघते बाजारात जावुन. कधितरी ईच्छा कुरघोडि करेल आणी घेईन मी
निकीता तु छोटा पिस म्हणतेस का
निकीता तु छोटा पिस म्हणतेस का ? छोटे छोटे आपण कालवणात करुन टाकतो ते पिस ७०० ला १० मिळतात का ?
शुभे आळशी कुठली. दिवा घे.
जागु खायला कधी घाल्तेस ते
जागु
खायला कधी घाल्तेस ते सान्ग.
तुझ्या फोटोत रावस आहे ना
तुझ्या फोटोत रावस आहे ना त्याच्यापेक्शा जरा मोठ्या रावसाची एक आडवी तुकडी तळायला वापरु अशी. तिला परत कापता येणार नाही. मध्यम आकाराच्या सुरमईची असते तेवढी. माझी कोळीण जरा जास्तच महाग आहे पण डोळे झाकुन घेतलं तरी शिळ देणार नाही अशी म्हणुन मी तिच्याकडुन घेते. तिच्यकडे सगळे मोठे आनी महाग मासेच मिळतात, पापलेट, सुरमई, मोठी कोलंबी, रावस, हलवा.
विजय डॉ. अनिल आमंत्रण कराहेत
विजय डॉ. अनिल आमंत्रण कराहेत बघा निवट्यांच्या धाव्यावर.
निके मग तु माझ्याकडे ये चल.
निके मग तु माझ्याकडे ये चल. विजय तुम्ही पण या आपण माश्यांचा गटग करु.
निकिता, रावस एवढा महाग नाही
निकिता, रावस एवढा महाग नाही मिळत. अंधेरी मार्केट तर आमच्यापेक्षा स्वस्त आहे. लहान रावस १००-१५० ला मिळतो. तो आणुन खा की.
लहान रावस पाहीला नाही कधी.
लहान रावस पाहीला नाही कधी. ह्या रविवारी शोधेन.
जागु तुमच्याकडे यायचं तर आहे पण रावस नाही निवट्या, खुबे हे खाडीतले मासे खायला.
निके नक्की ग. आणि ह्या छोट्या
निके नक्की ग. आणि ह्या छोट्या छोट्या मास्यांनाच चांगली चव असते.
जागू, त्या गटग मधे आम्हा
जागू, त्या गटग मधे आम्हा व्हेगीटेरियन्सना काही केल नाही तर पातक लागेल
व्हेज वाल्यांनी त्यातला
व्हेज वाल्यांनी त्यातला कांदा, टोमॅटो, हिंग, हळ्द, मसाला, तेल, लसूण हे व्हेज पदार्थ निवडून खायचे.
Pages