गतिमान 'जाणता राजा'

Submitted by DrSheetalAmte on 20 November, 2010 - 13:45

काल जाणता राजा हे नाटक पहिल्यांदा बघितले. त्यातील ते अतिभव्य सेट, अचाट कलाकुसर आणि कलावंतांचा काफिला बघताना मन हरवून गेले. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. ज्याकाळी हे एवढे प्रचंड नाटक नुसते स्वप्नात डोळ्यांपुढे उभे करणे कठीन, तिथे त्या माणसाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दा़खवले. नुसते दाखवूनच नाही तर चालवूनही दाखवले आणि अजूनही शंभर वर्षे त्या नाटकाला मरण नाही.

मला सर्वात भावलेल्या गोष्टी म्हणजे त्या नाटकातील अफाट वेग आणि रंगांची अचाट उधळण. त्यामुळे फोटो काढताना त्या गोष्टी कश्या अधिकाधिक दृष्यरुपात आणता येतील अश्या प्रकारे कॅमेर्‍याची सेटींग्ज करत गेले. हे फोटो काढताना कुठलेही फिल्टर, ट्रायपॉड किंवा खास लेन्स वापरली नाहीये. खरे म्हणजे मी हे ठरवून वगैरे काही काढलेले नाही. जसे नाटक मनाला भावत गेले तसे फोटो काढत गेले. उपलब्ध सहित्यात अधिकाधिक कसे उत्तम फोटो काढता येतील असा विचार त्याच्या मागे होता. वेग आणि रंग हा मुख्य विषय धरला होता. त्यामुळे फोकस आणि composition या गोष्टींना दुय्यम महत्व दिले आहे.

सुरुवातीला मुद्दाम काही फोटो नेहमीप्रमाणे (still) काढले आहेत जेणेकरून दोन सारख्या lighting conditions मध्ये आपण कसे वेगवेगळे प्रयोग करून मजा आणू शकतो हे आपल्याला दिसेल. (फोटो नाटकातील क्रमानुसार नाहीत).

g-DSC_7506web.jpgg-DSC_7512 web.jpgg-DSC_7526 web.JPGg-DSC_7573 web.jpgg-DSC_7546 web.jpgg-DSC_7568 web.jpgg-DSC_7547-web.JPGg-DSC_7581 web copy.jpgg-DSC_7582web.jpgg-DSC_7594 web.jpgg-DSC_7636web copy.jpgg-DSC_7662 web.JPGg-DSC_7717web.jpgg-DSC_7722 web.jpgg-DSC_7746web.jpgg-DSC_7738 webjpg.jpgg-shahir web.jpgg-DSC_7608 web.jpgg-DSC_7574 web.jpg

गुलमोहर: 

काही फोटो छान आहेत पण ती गतिमानता फोटोत नको होती. जाणता राजा बद्दल दुमत नाही. या महानाट्यातील काही कलाकार आपल्या मायबोलीवर आहेत.

घोर गति.

--------------------------------------------------------------------
सध्या आमची डुआयडीची चोपडी हरवली आहे.

जाणता राजा खूप लहानपणी पाहिलं होतं.....तरी अजूनही अंधुक आठवणी आहेत.
१ ला आणि खलिता वाचतानाचा फोटो जास्त आवडले !:)

आपल्याकडे प्रॉडक्शनचे फोटो थिएटरमध्ये काढले तर चालतात का? जाणता राजा ओपन एअर थिएटरमध्ये असतं माहित आहे.

खलिता वाचतानाचा आणि ८वा फोटो आवडला.
आर्च तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न बरोबर आहे. कॉपिराईटच्या बाबतीत दुसर्‍याच्या निर्मितीचा आपण घेतलेला फोटो त्या कलाकाराची पुर्व परवानगी घेऊनच प्रकाशित करता येतो. पण ओपन थिएटरच नक्की माहीत नाही. मला वाटत आधी परवानगी घेऊन काढलेले /प्रकाशित केलेले कदाचित चालत असावेत.

सावली, आर्च,

कोणतेही फोटो (रंगमंदिरात किंवा ओपन एअर थेटरात) काढताना परवानगी घ्यावीच लागते. परवानगी न घेता ते प्रकाशितही करता येत नाहीत.

'जाणता राजा'चा हा प्रयोग आनंदवनाच्या मदतीसाठी खास केला गेला होता. त्यामुळे शीतलने इथे परवानग्यांचा उल्लेख केलेला नाही.

शीतल,
मस्त आले आहेत हे फोटो.. Happy

माफ करा पण मला नाही आवडले फोटो.
गतिमानता फोटोत अश्या प्रकारे आणून ते फोटो नको इतके अंगावर येणारे आणि जारींग होतायत.
बहुतांश फोटोत नाटकातले कुठले क्षण आहेत ते मी ओळखू शकते आणि ते इतके अंगावर यायची गरज असलेले/ जारींग इत्यादी नाहीत.

फोटों मधील गतिमानता नाही आवडली .....पहिले तीन, हत्तीचा आणि शेवटुन दुसरा हे फोटो आवडले ....... शितल तुम्ही अतिशय चांगले असे फोटो गतिमानतेच्या नादात वाया घालविलेत.....असो या मागे आपला उद्देश चांगला होता हे कळले

.

खलिता वाचतानाचा फोटो आवडला. रंग आवडले.
उत्तरादाखल शितलताईंनी आत्ता एक मोठी कॉमेन्ट लिहिली होती, ती डीलीट झाली वाटते! Sad