गावाकडची संध्याकाळ.....

Submitted by किश्या on 18 November, 2010 - 02:17

दिवाळीत खुप सुट्ट्या होत्या म्हणुन ह्या वळेस खुप निवांत होतो. आणि बरचं वेळ घराबाहेर बसायला मिळालं. खालील फोटो माझ्या गावाकडच्या सगळ्यात आवडीच्या जागेवरचे आहेत. हि संध्याकाळ फार Romantic आणि शांत असते.

सध्यातरी मी आणि माझा मित्रं...

गुलमोहर: 

अशि स्वप्ने उघड करायची नसतात..किश्या......
बायदवे...ते कापसासारखे काय आहे? ढग.........??
शेवटुन ६ फोटो छान आले आहेत...आणि वरून दुसरा

बायदवे...ते कापसासारखे काय आहे? ढग.........??>>
हो रे ते ढग आहेत...
बाय द वे तुम्ही बसलात तिथे शंकराच्या पिंडी सारखा दिसणारा दगड नक्की कसला आहे ?>>
तो महादेवच आहे. त्याला मधला बुरुज म्हणतात. दगडी घाटावरचा फोटो आहे तो...

सगळ्याचा आभारी आहे...

काही फोटोज् (ढगांच्या प्रतिबिंबाचे) अप्रतिम आले आहेत. ईतके शांत आणी स्थिर पाणी मिळायला नशीब लागते.

मुलाची माहिती :- गोरा आहे. >>> Rofl
किश्या, हे गाणं आठवतंय का??? खास तुझ्यासाठी गप्पांच्या पानावर बनवलेलं...

गोरा गोरा पान
फुलासारखा छान
किश्याला मंद्याच्या
शिणुमात आण Lol

बाकी तुझं गाव, तिथलं नितळ, निर्मळ पाणी, ती रम्य संध्याकाळ आणि तुझी रोमँटिक पोझ, सगळंच मस्त!!!!

तुझी रोमँटिक पोझ>> Rofl
अग तो फोटो टाईमर लावुन काढला आहे....
आमच्या दोघांचा फोटो काढायला कोणीच नव्हतं.....
टाईमर ऑन केला आणि लगेच आडवा पडलो दगडाला अडकुण
म्हणुन ती घाईची पोझ झाली...

किश्याभौ सह्हीच की रे.......
पहिले चार आणी ९, १०, ११, १२ तर अफलातून आलेत....
सध्यातरी मी आणि माझा मित्रं...>>> अशा जागा मित्राबरोबर फिरण्यालायक नसतात.... Wink
चातक, अशि स्वप्ने उघड करायची नसतात..किश्या.....>>>> अनुमोदन...

फोटो आवडले. Happy

>>>लगेच आडवा पडलो दगडाला अडकुण
म्हणुन ती घाईची पोझ झाली...

किशा, लग्नानंतर बायकोबरोबर येशील इथे बसायला तेंव्हा असा धडपडू नकोस. नंतर असंख्यवेळा धडपडायचच आहे. Happy आणि पहिल्या फोटोमध्ये किनार्‍याला चिखल दिसतोय सगळा. तेंव्हा दोघांनी जोड्याने पेपर घेऊन या बसायला. (आणि हो तेंव्हा या मित्राला आणू नकोस रे बरोबर.. नाहीतर तेंव्हाही इथे हाच फोटो दिसायचा आम्हाला.. यावेळेस टायमर नाही तर बायकोने काढलेला असायचा) Proud

Pages