Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36
मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अच्युता
अच्युता नंद ने नो ऑपोलेजि म्हटलय))) यात अच्युतानंदन चि काहि चुक दिसत नाहि.
दारावर आलेल्या माणसाशि असे तोडुन उन्निक्रुषनन नि सुध्दा वागायला नको होते.
---- चुक नाही असे काय म्हणताय? अजुन चार दिवसही नाही झालेत विरमरणाला, चर्चा बहादुरीची व्हायला हवी आणि आपण मानापमानात अडकलो आहे.
मुलगा गेल्याचे दु:ख, शोक-संताप, जबर धक्का ह्या गोष्टी समजायला काय हरकत होती? तुमच्या (राजकारण्यांवर) वर सबंध आयुष्य भर कॅमेरा रहाणारच आहे... पण शहिद जवानांना विसरणारे आपण करंटे आहोत (अक्षरधाम मधे कोण लढले/ धारातिर्थी पडले होते, दवाखन्यात नंतर किती दिवस/ महिने/ वर्षे झगडत होते --- हे १ % लोकांना पण माहित असेल तर खुप आहे).
मुख्य म्हणजे एका लहान वर्गात राजकारण्यां बद्दल प्रचंड घृणा आहे... जनतेच्या मनाची नाडी देखील समजत नसेल तर काय म्हणावे.
Please allocate some time if
Please allocate some time if you can.
Petition to be submitted to Prime Minister of India for Assertive Action
Please view and endorse the enclosed page at PetitionOnline.com:
http://www.PetitionOnline.com/26novAct/petition.html
On 7th December 2008 this petition will be presented to the Prime Minister of India. Till 7th December, endeavour is to collect at least 1 million signatures.
Probably such mass is needed to stir the administration to take visible and needful action.
Please sign and forward to as many people known to you as possible.
पिटीशन
पिटीशन चांगलीय, हेतु चांगलाच. पण फक्त इंग्रजीत (तेही इतक्या चुकांसह) का बरं?
http://news.bbc.co.uk/2/hi/so
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7760460.stm
हे वाचून कोणाला वाटेल आपल्या देशाकडे पैसे नाहीयेत 
A letter written by my
A letter written by my Friend's friend to Kerala CM for his comments about Major's house..
****************************************************************
Dear Chief Minister,
I just read the remarks you made about the family of the slain Major, a true Martyr - 'But for slain major, not even a dog will visit his house'".
As a citizen of India, I am writing this email to you with a sense of deep anguish and regret.
Anguish, because you seek to demean the family and the sacrifice of a soldier. I don’t think you or anyone remotely connected to you knows the meaning of being a soldier, sacrificing your life so that people like you and me can enjoy the freedom and live under the flag of India.
I can understand your disappointment of being turned away by the father of the martyr. However, no civilized person would make the comments with you have made.
Anguish, cause you are not only insensitive but it also seems you are deprived of any morals and sensibility. I kindly suggest you refer yourself to an institution reserved for mentally challenged. I hope they accept you for immediate treatment.
I was actually counting minutes before our "beloved" politicians made a spectacle of them after the Mumbai tragedy. Fortunately for me, you amongst other few made it to the list and in matter of hours, you did it.
Regret, cause I as a citizen of India, cannot do anything till the next elections. I wish our constitution had given the common man powers to recall the elected public officials.
Regret, cause I know you will get away with the comment. At the most, a government spokesman will say you were misquoted etc. I also know your party will not censure such a shameful behavior on your part cause like you, probably they too have lost the moral reasoning in the sands of politics.
Regret, cause it is I as a citizen of India who elected an official like you. I believe our procrastination and reluctance to vote lead to people like you, occupying what should be an office of responsibility but, I give it you people for make a mockery of the office.
Regret, that it’s a miracle that people like you will get away with this and live to see the sunrise and sunset while people who actually matter, the true bravehearts, the real heroes of India sacrifice their life for you.
I hope the security forces stop providing people like you with security cover but I know their commitment to uphold the constitution and the legislature, their duty towards India and citizens of the country. They will continue to perform their duties with utmost dedication and if required, take a bullet for a person like you.
I hope and I do, that maybe you will have some sense and apologize for your comments. I also hope that your party, which always claim to be high on morals do have the balls to censure you.
It’s a long shot but I still hope, that you will resign following such comments and never stand for election again.(trust any politician to take the moral high ground and resign. They usually offer to resign which is promptly rejected by their party). Even If you do stand for elections, I hope the citizens of India do not let people like you to be even near a public office.
With deep sense of shame to have you as a Chief Minister of an Indian State
Iamanindian
भ्रमर
भ्रमर तुम्हि सगळे सुखरुप आहात हे वाचुन बर वाटल. केरळच्या मुख्यमंत्र्यांविषयि इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये काय वातावरण आहे? त्यांना राजिनामा द्यायलाच पाहिजे इतका संताप सगळिकडे व्यक्त होत असताना त्यांना पाठिशि कोण घालतय?
भाउराव कि
भाउराव कि कोन ते..
तुह्माला काय अक्ल आहे काहो? वेल काय तुह्मी बड्बड्ताय काय.
यात दोघांचि फारशि चुक दिसत नाहि---- हे आग्दी बरोबर. तुम्ची चुक सगल्यान्ना दिसते आहे, ति तुह्माला फक्त दिसत नाही? त्या अचुतानंदाचे तुमी चुल्तअभाउ काय? इडिएत.
बावल्ट्सारख्या ग्प्पा मार्ने बन्द करा. माय्बोली हजारो लोक वाच्त आस्तात. तुम्च्या भिकारि पोस्तम्धून चुकीचा संदेश जानार नाही याची कालजी घ्या. नाहीतर इथे येवुच नका.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/4681 इथे मी भारत पाक संबधावर एक पोल घ्यायचा विचार करत आहे.
raw - तुमचे
raw - तुमचे स्वागत... का कोण जाणे पण ओळखीचे वाटत आहात :स्मित:.
हा लेख
हा लेख वाचलात का?
माझी
माझी मुंबई!
http://www.rediff.com/news/2008/dec/02mumattacks-why-do-they-hate-a-city...
मस्त लेख.
मस्त लेख. खरेच.... that my beloved Mumbai..
पाकीस्तनल
पाकीस्तनला पुरावा हवाय !
http://www.rediff.com/news/2008/dec/02mumterror-pakistan-will-have-to-pa...
अजुन कीती पुरावे हवे आहेत ?
Please note...... 13 May
Please note......
13 May -------- JAIPUR
June---------NA----------
26 July ------------ AHMEDABAD
August ------------NA--------------
13 September ------------ DELHI
October ----------NA---------------
26 November --------------- MUMBAI
December --------NA(hopefully)------
13 January ----------------- What Next?
Please be careful in the week of January 13.
This might be some random observation of sequence dates of bomb blasts or terror attacks.
But there's no harm in keeping ourselves alert.
http://www.daily.pk/politics/
http://www.daily.pk/politics/politicalnews/8368-mumbai-evidence-being-de...
हे बघा काय सांगतायत इथे.
'रॉ'
'रॉ' हार्दिक अभिनंदन व स्वागत.
फक्त तुमचा राग पुरवुन-पुरवुन वापरा कारण इथे असल्या बंधु'भावा'ंची कमतर्ता नाही.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
Dear All, Please read the
Dear All,
Please read the article titled "I VOTE NOBODY" IN 2nd Dec 2008 TIMES OF INDIA EDITION (Page 4 extreme right column) :
Did you know that there is a system in our constitution, as per the 1969 act, in section "49-O" that a person can go to the polling booth, confirm his identity, get his finger marked and convey the presiding election officer that he doesn't want to vote anyone!
Yes such a feature is available, but obviously these leaders have never disclosed it.
This is called "49-O".
Why should you go and say "I VOTE NOBODY" because, in a ward, if a candidate wins, say by 123 votes, and that particular ward has received "49-O" votes more than 123, then that polling will be cancelled and will have to be re-polled. Not only that, but the candidature of the contestants will be removed and they cannot contest the re-polling, since people had already expressed their decision on them.
This would bring fear into parties and hence look for genuine candidates for their part
*****************
सुमेधा पुनकर
*****************
सुमेधा, 49-O
सुमेधा,
49-O ही एक गाजराची पुंगी आहे.. वस्तूस्थिती अशी आहे की बरेचशे सुशिक्षीत लोक हे गेले कित्त्येक वर्ष मतदान करतच नाहीत, किम्बहुना त्यामूळेच बरेचसे नालायक उमेदवार इतर खरेदी केलेल्या मतांवर निवडूनही येतात.
या 49-O मुळे फक्त कागदोपत्री मि मतदान करणार नाही हे लिहून दिल्यासारखे आहे.. यातून कुठल्याही पार्टीत कसलिही भिती वगैरे येईल असे अजिबात वाटत नाही.
मुळात आजच्या घडीला भारतीय लोकशाही पध्धतीच्या/संसद रचनेकडे नव्याने पहाण्याची गरज आहे. जेव्हा निवडणुका मूल्ये, मुलभूत प्रश्ण, काम, गुणवत्ता या आधारावर लढवल्या जात होत्या तेव्हा ती रचना तग धरू शकत होती...अलिकडे/गेल्या दशकात मात्र धर्म, जात, पात इत्यादींवर आधारीत सर्व मामला असल्याने या रचनेचा मूळ पायाच कोलमडून पडला आहे. आज एका मुख्ख्यमंत्र्याचा राजिनामा घेण्याआधी त्याच्या replacement ला जात, प्रांत, भाषा चे निकष लावले जातात अन त्यावर एकमत होवू शकत नाही. त्यामुळे 49-O हे फारतर एका रात्रीचे मलम ठरू शकते.
मला आलेली
मला आलेली एक ईमेल ...........
स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे
आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते. संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा घराघरातून तलवार उठली. औरंग्याला इथेच गाडेपर्यंत शांतता नव्हती. लालाजींच्या अंगावर यमदूतांच्या लाठया बरसल्या, तेव्हा इंग्रज साम्राज्याच्या शवपेटीवर खिळे ठोकणारे कैक मर्द निपजले... मग आत्ताच का सगळं शांत शांत? आमच्या श्रध्दास्थानांवर आघात होतात, आणि आम्हालाच सगळे म्हणतात 'शांत रहा, शांत रहा'. जाहीरपणे आम्हाला बांगडयाच भरायला सांगितले जाते. का?
आम्ही काय नेभळट आहोत का? की आम्ही दूधखुळे आहोत - उगी उगी हं बाळा, तुला नाय कोनी माल्लं, गप गप... असं म्हटलं की आम्ही गप्प! हाताची घडी तोंडावर बोट?
आम्ही जवान आहोत, मर्द आहोत... रक्तात शिवाजी सळसळतो आमच्या, 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' म्हणणारा भीम सळसळतो! आमच्या हातात भवानी आहे, पण डोळयावर पट्टी आहे. आम्हाला शत्रू कोण, हेच कळत नाही. गनिम कावा साधून जातो, आणि मग आम्ही मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे काढतो. असल्या भेदरट मेणबत्त्यांच्या उजेडात दुष्मन दिसत नाही. त्यासाठी डोक्यात उजेड पडावा लागतो आणि छाती निधडी असावी लागते. आमच्यात आणखी एक प्रकार आहे. राग आला की, आम्ही शेजार पाजारच्यांना ठोकून काढतो, दंगे करतो. खूप भुई थोपटतो पण साप मरत नाही.
मीडिया काहीही सांगतो, आणि आपण ऐकतो? कोणी म्हणतं इस्लामी अतिरेकी, तर कोणी म्हणतं दहशतवाद्याला धर्म नसतो... सुटका झालेल्या दोन तुर्की नागरिकांनी सांगितलं, की आम्हाला अतिरेक्यांनी आमचा धर्म विचारला, आम्ही मुसलमान म्हणून आम्हाला सोडले, सोबतच्या तीन आर्मेनियन ख्रिस्ती महिलांना ठार मारले. पकडलेला अतिरेकी सांगतो की, मी मदरशात शिकलो. आमचे गृहमंत्रालय म्हणते, की उत्तर सीमेवर मदरसे वेगाने वाढतायत... हे सगळं काय आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत. माझे मुसलमान मित्र-मैत्रिणी आहेत, ते अतिरेकी नाहीत. आमचे लाडके माजी राष्ट्रपती, आमचे गायक, संगीतकार, खेळाडू, परमवीरचक्र मिळवलेले शहीद सैनिक - हेही मुसलमान आहेत. पण ते जिहादी नाहीत... मग हा जिहाद काय आहे, मदरसे काय आहेत, या विषवल्लीचं मूळ कुठे आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत.
उत्तरं मागण्याचा अधिकार हे लोकशाहीतले पहिले हत्यार आहे. आहे ना खुमखुमी? मग उचला हे हत्यार!
तीस-पस्तीस वर्षांपूर्वी इस्राएलच्या खेळाडूंची ऑलिंपिक मध्ये हत्या झाली होती. पुढच्या दोन वर्षात ही हत्या करणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढून इस्राएलच्या कमांडोंनी ठार मारले. दुसऱ्या महायुध्दात हजारो ज्यूंची हत्या करणाऱ्या ऍडोल्फ आइकमनला इस्राएलच्या हेरांनी परदेशातून शोधून उचलून आपल्या देशात आणला, त्याच्यावर खटला चालवला, आणि त्याला देहदंड दिला. टीचभर देश आहे इस्राएल. पण त्यांचा राष्ट्रीय स्वाभिमान जागा आहे. कोण आहेत त्यांचे नेते? आणि मग आमचेच असे कसे?
आम्ही मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो, किंवा आमची मतं विकतो, किंवा १८ पूर्ण झाली तर नावच नोंदवत नाही... मत देताना रस्ते आणि पाणी एवढेच मुद्दे दिसतात आम्हाला, मग निवडणूक पंचायतीची असो नाही तर लोकसभेची! लोकशाहीत प्रजेच्या लायकीवर किंवा नालायकीवर राजा ठरतो. आम्हाला स्वाभिमानी निडर नेतृत्त्व हवे असेल, तर जागरूक राहिले पाहिजे. आत्ताच्या नेत्यांमध्ये सगळेच बुणगे दिसत असतील, तर स्वत:च राजकारणात उतरले पाहिजे.
शांत रहा, शांत रहा... असं कोणीही सांगितलं तरी गप्प बसण्याची वेळ नाही आता. लोकशाहीतली हत्यारं उचलून लढलं पाहिजे. सूडाच्या अग्निकुंडात आपल्या अभिमानाची आहुती पडली आहे. संसदेवर हल्ला झाला आहे, ताजची राख झाली आहे... इतक्या आहुती देऊनही जर स्वाभिमानाची भवानी जागी होणार नसेल, तर आमचे राष्ट्र नष्टच होणार असेल.
शंभर शिशुपालांचे हजार अपराध भरलेत, जनतेतल्या जनार्दना - उठ!
पोलिस जमा
पोलिस जमा करताहेत मारलेल्या गोळ्यांचे हिशोब
हातातील असलेल्या शस्त्रांनिशी रेल्वे आणि शहर पोलिसांनी अतिरेक्यांचा सामना केला. पण अतिरेक्यांशी लढा देताना मारलेल्या गोळयांचा हिशोबही आता पोलिसांना द्यावा लागणार आहे. अतिरेकी हल्ल्यात आपल्या सहकाऱ्यांना गमावल्याच्या धक्क्यातून अनेक पोलिस सावरत आहेत. त्यातच गोळ्याच्या हिशोबही आपल्या वरिष्ठांना तातडीने द्यावा लागणार असल्याने या पोलिसांचा मानसिक ताण अधिक वाढला आहे.
' नियमाप्रमाणे आम्हाला मारलेल्या प्रत्येक गोळीचा हिशोब द्यावाच लागतो. पण त्या दिवशीची स्थिती इतकी बिकट होती नक्की कुठल्या भागात आम्ही किती गोळया मारल्या तेच आता आठवणे अशक्य आहे. अशा स्थितीत गोळयांचा हिशोब कसा काय देणार? आमच्याकडे असलेल्या पिस्तौल, रिव्हॉल्व्हर, ३०३ रायफल यामधून अतिरेक्यांवर गोळीबार सुरू होता. अतिरेक्यांकडूनही त्यांच्या अत्याधुनिक रायफल्समधून गोळीबार सुरू होता. अंधारातच आमची ही अॅक्शन सुरु होती. त्यातून आम्ही मारलेल्या गोळयांच्या पुंगळया जमा करणे तर निव्वळ अशक्य गोष्ट आहे.' सीएसटी रेल्वे स्थानकाजवळ अतिरेक्यांशी दोन हात करणारे एक पोलिस कर्मचारी सांगत होते.
अतिरेकी हल्ल्याला सामोरे गेलेले अनेक पोलिस अधिकारी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. काही पोलिसांनी तर आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना गमावले आहे. त्यामुळे त्यांचे दु:खही खूप मोठे आहे. अशावेळी वरिष्ठांकडून बंदुकीतून मारलेल्या गोळ्यांचा तातडीने हिशोब मागणे योग्य नाही. आम्हाला नियमांची जाणीव आहे. पण अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या ठिकाणी नियमांचा पलिकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे अन्यथा हातात बंदुका असल्या तरी पोलिस त्याचा वापर करण्यास धजावतील का, याचा विचार पोलिस दलात नवे बदल करताना करणे आवश्यक असल्याचे अनेक पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांकडून झालेल्या गोळीबाराची माहिती ही आम्हाला न्यायालयीन चौकशीत द्यायची असते. त्यामुळे किती गोळया मारल्या यासाठी रिकाम्या पुंगळ्यांसह सविस्तर माहिती देणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या हल्ल्याची घटना पहिल्यांदाच घडते आहे. पण आम्हीही नियमाने बांधलेले आहोत. त्यामुळे प्रत्येक गोळीचा हिशोब देणे शक्य नसले तरी कारवाईत सहभागी असलेल्या पोलिसांकडून शक्य तेवढी माहिती घेऊन गोळीबाराचा रिपोर्ट तयार करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मान्य केले.
. ... ... ......
फायरिंगच्या ऑर्डर्स येण्याची वाट पाहात होतो...
सीएसटी स्टेशनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अतिरेक्यांनी डी. एन. रोडवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या अतिरेक्यांना घेरणे शक्य होते पण त्यावेळी तातडीने पोलिसांनी अतिरेक्यांवर फायरिंग का सुरू केली नाही, असा प्रश्ान्ही उपस्थित करण्यात येत आहे. फायरिंगच्या ऑर्डर्स वरिष्ठांकडून येण्याची वाट पाहात बसल्यामुळे अतिरेक्यांवर पोलिसी कारवाईस उशीर झाल्याची धक्कादायक माहिती अतिरेक्यांविरोधातील कारवाईत सहभागी असलेल्या काही पोलिसांनी दिली. राहुल राज प्रकरणानंतर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे परिस्थितीची गंभीर असली तरी वरिष्ठांकडून आदेश येण्याची वाट पाहण्यात मोलाचा वेळ वाया गेला.
.......... .........
बहुतांश अधिकाऱ्यांचा एके-४७शी ३६चा आकडा
स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना केल्या जाणाऱ्या मुंबई पोलिस दलातील सुमारे ७५ टक्के अधिकाऱ्यांना अत्यंत उपयुक्त मानली जाणाऱ्या एके-४७ रायफल हाताळता येत नाही. इतकेच नव्हे तर नव्याने आलेल्या ऑस्ट्रियन बनावटीच्या 'ग्लॉक' ९ एमएम पिस्तुलाचा वापर किमान २५ टक्के अधिकाऱ्यांना करताच येत नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
अत्यंत अपुऱ्या संख्येने एके-४७चे वाटप पोलिस स्टेशनमध्ये झालेले आहे. त्यातच वरळीतील पोलिस फायरिंग रेंजमध्ये एके-४७च्या काडतुसांची बहुतांशवेळा कमतरता असते. त्यामुळे, जेव्हा आवश्यक तो साठा येतो तो लागलीच सरावसाठी अधिकाऱ्यांना बोलावून वापरला जातो.
काही वर्षांपासून एके-४७ पोलिस दलात अंतर्भूत झाली, तेव्हा एक चांगले शस्त्र पोलिसांना मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. मात्र दैनंदिन कामकाजातून मिळणारा कमी वेळ, कामाचा अतिताण अशा स्थितीत कॉन्स्टेबलपासून अधिकाऱ्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. फक्त वाषिर्क सरावाच्या वेळी अधिकारी, कॉन्स्टेबल तिथे जातात. तिथेही अनेक गंमतीजमती होतात. एके-४७ हातात घेण्याचीही इच्छा अनेक अधिकाऱ्यांना नसते, काबॉईन, एके-४७ हे कॉन्स्टेबल्सनी वापरायचे शस्त्र अशी अनेक अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी एके-४७ वापरायची वेळ आल्यास त्याचा वापर या अधिकाऱ्यांना कधीच करता येत नाही.
ग्लॉकचेही तेच आहे. सरावाच्या वेळी बहुतेक अधिकारी स्वत:ऐवजी तिथल्याच कॉन्स्टेबलला गोळ्या मारण्यास सांगतात. ग्लॉक हे ९ एमएम बनावटीचे अत्याधुनिक पिस्तुल आहे. त्याची रेंजही चांगली आहे. मात्र, सरावादरम्यान त्यात काडतुसे भरतानाही या अधिकाऱ्यांची फजिती होते. काडतुसे ज्या बाजूने लोड करायची त्याऐवजी उलट्या बाजूने ती भरण्याचे प्रकारही घडतात. त्याचवेळेस अजूनही पोलिसांकडे जुन्या जमान्यातील '३०३' रायफल आणि दंडुके अशी परंपरागत शस्त्रे असल्याचा विरोधाभास पाहता येतो.
........ ........ ........
* माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी १९८५ च्या काळात 'अनआर्म्ड' आणि 'आर्म्ड कोम्बिंग ट्रेनिंग' भरवले होते. कराटेपटू व्हिस्पी कपाडिया यांनी स्वरक्षणासाठीचे प्रशिक्षण दिले होते. त्यावेळेस एके-४७ वापरण्याचे प्रशिक्षणही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर असा उपक्रम कोणीही न राबवल्याने एके-४७च्या सरावापासून सारेच दुरावले आहेत.
* राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक आदींकडे कार्बाइन, एके-४७ काही प्रमाणात असली तरी दहशतवादविरोधात लढण्याचे प्रशिक्षण त्यांना लाभलेले नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्यांचा वापर केला जातो.
* जगात 'स्कॉटलँड यार्ड'नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पोलिस दल मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी दहशतवाद्यांना दिलेली लढत इतिहासात नोंदवण्यासारखी ठरली. मात्र दहशतीच्या संकटाचे कायम सावट असलेल्या शहराच्या संरक्षणासाठी पोलिस दल अत्याधुनिक शस्त्रांच्या तुलनेत किती अपुरे पडतेय, यावरही प्रकाश पडला आहे.
* मुंबई पोलिस दल- ४२,२४२. त्यात पोलिस शिपाई-१९,०२४, पोलिस नाईक-७,००२, हवालदार-८,४२५. असि. सबइन्स्पेक्टर (एएसआय)-३६०१, पोलिस सबइन्स्पेक्टर-२९७१, असि. पोलिस इन्स्पेक्टर-९८५, पोलिस इन्स्पेक्टर-१०३१, एसीपी-१३९, डीसीपी-४०, सहपोलिस आयुक्त-५ आणि आयुक्त-१.
... .... ....
' त्यां'च्या अफाट ताकदीचे रहस्य
ताज, ओबेरॉय, लिओपोल्ड येथे सुमारे ६० तास झुंजवणाऱ्या आठ दहशतवाद्यांचा प्रतिकार पाहून एनएसजीचे कमांडोही अचंबित झाले होते. कितीही प्रशिक्षित कमांडो असला तरी इतकी अफाट ताकद त्यांच्यात कशी आली या विचारात सारे होते. दहशतवाद्यांच्या तुफानी प्रतिकारात कोकेन, एलएसडीचा त्यांनी सर्रास केल्याचे मानले जाते. या काळात एकक्षणही न झोपलेल्या दहशतवाद्यांना ऊर्जा या ड्रग्जच्या सेवनातूनच मिळाली असावा, असा कयास ज्येष्ठ पोलिस अधिकारी व्यक्त करत आहेत.
स्टिरॉइड्स, कोकेन, एलएसडीच्या सेवनातून अपरंपार ताकद मिळते. 'मॅन टू सुपरमॅन' अशा बदल त्यांच्या सेवनातून होत असल्याने 'मौके पे चौका' मारत दहशतवाद्यांनी हल्ले चढवले. या कारवाईच्यावेळी एखादा दहशतवादी विश्ाांती घेत असावा, असा संशयाने कमांडो गोळीबार करत तेव्हा लगेचच प्रत्युत्तर देत असत, असे एका कमांडोनेच नंतर नमूद केले.
पाकिस्तानात निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर कमांडो प्रशिक्षण मिळालेल्या दहा दहशतवाद्यांनी येताना शस्त्रसाठ्यासोबत बदाम, खजूर असा सुकामेव्याचा साठाही घेतला होता. पाणीही न पिता सुकामेव्याच्या आधारे ऊर्जा मिळवणाऱ्या दहशतवाद्यांनी ज्या तऱ्हेने गोळीबार केला ते पाहून कमांडोही अचंबित झाले होते. त्यामुळे कमांडोच्या शैलीस त्याच पद्धतीने उत्तर देणाऱ्या दहशतवाद्यांना ड्रग्जचा फायदा झाला असावा, असे मत पोलिस अधिकारी व्यक्त करत आहेत. कितीही प्रशिक्षण असले तरी तेवढी प्रतिकारशक्ती त्यांच्यात आली कुठून हा प्रश्ान् उरतोच, असे त्यांचे मत आहे. अमेरिकेत ९/११ हल्ल्यात मोहम्मद अट्टा हादेखील ड्रग्जचे सेवन करायचा असा दावा केला गेला.
मात्र, काही तज्ज्ञांनी ड्रग्जचा आणि त्यांच्या क्षमतेचा संबंध नसल्याचे मत व्यक्त केले. ते इतके प्रशिक्षित असल्यानेच त्यांना ते शक्य झाले. त्यासाठी प्रत्येकवेळी स्टिरॉइड्स, ड्रग्जचा संबंध येतोच असे नाही, असे मत डॉ. मंगेश तिवसकर यांनी मांडले. त्यांचे वय, प्रशिक्षण यामुळे त्यांना लढण्याचे बळ मिळाले असावे, असे त्यांनी सांगितले.
.. .. .. .. .. ..
कठोर कायद्यांची गरज
आपल्याकडे सध्या असलेल्या कायद्यामुळे पोलिस यंत्रणेला तपासासाठी केवळ १५ दिवसांचीच मुदत मिळते व ९० दिवसात आरोपपत्र सादर करावे लागते, मात्र 'पोटा' व 'टाडा' या विशेष कायद्यांमध्ये आरोपपत्रासाठी १८० दिवस मिळतात तर तपासात आणखी काही मिळाल्यास विशिष्ट परिस्थितीत पोलिस आरोपीला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात. आपल्याकडे 'बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा असल्याने 'पोटा' व 'टाडा' सारख्या कायद्याची गरज नसल्याचे म्हटले जाते पण त्या कायद्यातसुद्धा विशेष कायद्यासारखा प्रभावी तरतुदी नाहीत.
दहशतवादी एके-४७ वापरतात आणि आपल्या पोलिसांनी लाठ्या व रिवॉल्व्हर घेऊन लढावे, अशी अपेक्षा आहे का? पोलिस यंत्रणेलासुद्धा अत्याधुनिक शस्त्रे देण्याची गरज असल्याचे नमूद केले. दहशतवाद हे आता युद्धच झाले आहे, त्यामुळे युद्धात जी शस्त्रे वापरली जातात तशीच पोलिस यंत्रणेकडे असणे आवश्यक आहे.
- माजी वशेष सरकारी वकील रोहिणी सालियन
... ..... ......
कारवायांच्या मूळाशी जायला हवे
कठोर कायदे नसल्याने दहशतवादी घटना वाढल्याच्या मुद्द्याशी मी सहमत नाही. दहशतवादी कारवायांच्या मुळाशीच आपल्याला जायला पाहिजे. तसेच आपली गुप्तचर यंत्रणा, प्रशासकीय क्षमता आणि दहशतवादी कारवायांचा नीट अभ्यास करण्याची गरज आहे. एखाद्या दहशतवाद्याला फाशी दिले तरी त्याच्यामागे शंभर तयार असतात, कारण ते मरणाच्याच तयारीने येतात, हे लक्षात घेतल्यास कठोर कायदे केले तरी या कारवाया थांबतील का, हा मूलभूत प्रश्न आहे.
- अॅड. मजिद मेमन
..... ... ..
हा तर भ्रष्ट यंत्रणेचा पुरावा!
मुंबईतील दहशतवादी हल्ला हा भ्रष्ट यंत्रणेचाच पुरावा आहे. मंत्र्यांपासून आयपीएस अधिकारी आणि तपास यंत्रणा यांना केवळ स्वत:च्या पदाबद्दल महत्व असून त्यांना जनतेच्या जीविताशी काहीच कर्तव्य नसल्याचे दिसून येते हे संतापजनक आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरु याला अद्याप फाशी का दिले जात नाही? यासाठी कोणता कायदा आडवा येत आहे? 'टाडा' व 'पोटा' सारखे कायदे काढून टाकणे योग्य नाही. असे कायदे असले पाहिजेत आणि त्यापेक्षाही आवश्यक आहे ती त्यांची अमलबजावणी...
- अॅड. पी. एम. प्रधान
काल एका
काल एका पत्रकार परिषदेत हसन गफुर यानी सांगितले की दहाच अतिरेकी होते. २ चा एक गट असे पाच गट त्यानी केले व पाच ठरलेल्या स्थळी ते गेले त्यांची कामगिरी पार पाडण्यासाठी.
फक्त दहाच??????
ताज मध्ये किती पकडले किती मारले काहिच ताळेबंद लागत नाहिये की.
एवढा काल
एवढा काल आस्साम मधे स्फोट झाला. तरि
त्याचि कुणा ला आठ्वण आहे का?
आत्ता पर्यंत इतके स्फोट झाले. इतकि मानस मेलि तरि कुणि म्हटले का
अरे बाबा मन्मोहना तु काय तिथ अंडि घालतोस का.? सोनिया बाइ
तुम्हि झोपलाय का? बांगला देश चि घुसखोरि का थाबवत नाहि.
खरा रोग कॉन्सर तिथ झालाय. इथ मुम्बैइत फक्त त्याचि लक्षण दिसत आहेत.
मग नुसते शिवराज पाटिल व आबा ला धोपटुन काय होणार.
शिवराज पाटिल तर सोनियाना विचारल्या शिवाय तोन्डात घास सुध्दा घालत नाहि.
(किंबहुना त्यासाठिच त्यांचि निवड झालिय.) असे असताना शिवराज पाटलाचा काय दोष.
पोटा रद्द केला आणि शिवराज च्या मुसक्या बांधल्या मग शिवराज काय करिल?
अफजल ला कबाब देतायत मग त्याना पकडणार्या पोलिसाचे मनो धैर्य टिकेल काय.
त्यावेळि किति मुम्बै च्या मेक अप वाल्या बायानि मेण्बत्त्या लावल्या. कोण म्हटले का
कि अफजल ला सरक्षण का देताय?
कुणि मुसलमाना ला अटक केलि कि लगेच अर्जुन सिन्ग व त्यांचेव बगल बच्चे त्याना कायदेशिर मदत देतायत.
मग पोलिसाना तरि काय पडलिय त्यानि तरि कशाला जिवाचि बाजि लावावि
एकुण दहा
एकुण दहा होते त्यापैकि ९ मारले आणि एकाला पकडले.
आपली पोलिसयंत्रणा खरच इतक्वी सतर्क आहे का की आपण यावर विश्वास ठेऊ शकतो?
प्हक्त दहाच होते ??? आणि चक्क ते "जिंदा या मुर्दा" पोलिसांच्या हाती लागले??? हास्यास्पद वाटते हे सारे.
मग टैक्सीत स्फोट कोणी केले???
नक्कीच अजुनही काहीजण मोकळे फिरत असणार्......आणि हे पोलिसही जाणत असणार.
आता पोलिसानी आणि मिडियाने एक नियम नक्कीच पाळला पाहीजे की जे काही तपासकार्य सुरु आह्वे त्याची वाच्यता कुठेही करु नये कारण त्यामुळे तपासात अडथळे निर्माण होतील. आणि त्याच बरोबर हे ही पाळले पाहीजे....चुकीची माहीती मिडिया वा जनतेला देऊ नये त्यातुन गैरसमज होऊन अजुनच गोंधळ माजेल.
तपासाची दिशा आणि तपशील जाहीर करु नये.
कृपया हेही
कृपया हेही पहा:
http://www.rediff.com/news/2008/dec/03mumterror-wednesdays-will-be-days-...
हे वाचा
हे वाचा फ्रेंच लेखक सोनिया बद्दल काय लिहितोय ते http://epaper.newindpress.com/NE/NE/2008/12/02/Article/011/02_12_2008_01...
बाकी अशी लिंक न दिसता फक्त 'हे वाचा' हे शब्द क्लिक करण्यासाठी काय करावे????ब्लॉगस्पॉट वर कसे लिहावे तेही सांगितल्यास बरे होईल.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
विलासरावा
विलासरावांचा राजिनामा मंजूर केला पण हे काय? यांना कोणि चांगले नेते मिळत नाहित का?
निवडणुका जिंकून देणारा सीएम हवा.. !
दरम्यान, विलासराव यांच्या जागी कोण येणार, याबाबतची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. महसूलमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री अशोक चव्हाण आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा विजय मिळवून देऊ शकेल, अशा नावावर मुख्यमंत्री म्हणून अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
कल्पू
अतीरेकी
अतीरेकी मुस्लीम होते आणि त्यांची चिकाटी हे नुसते प्रशिक्षण,वय नी ड्रग्स नसून त्यांच्या धार्मीक प्रथेमुळे सुद्धा ही कठोरपणे वागण्याची वृत्ती निर्माण झालेली असते. ते कसे?
'रोजा' हा नुसता उपवास नसून तो एक प्रकारे आपल्याला कठीणातील कठीण परीस्थीशी सामना करण्यास मदत करतो. पाणी, अन्नाशिवाय कसे रहावे, झुंज कशी द्यावी, कठोर परीस्थीत आपल्या ध्येयाला चिकटून रहावे हेच हा 'रोजा' शिकवतो अशी माझी एक मुस्लीम मैत्रीण सांगत होती. त्याचा positive उपयोग करावा ह्यासाठी असु शकेल ही प्रथा. पण बहुधा negative उपयोगासाठीच वापर केला जातोय.
त्यामुळे अतीरेक्यांच्या ह्या aggressive, कठोर व्रुत्तीचे कारण त्यांना धार्मीक गोष्टीतूनच मिळते एका प्रकारे. जरी असे मानले की अतीरेकीला धर्म नसतो पण ह्या सर्वाचे कारण धर्मच आहे असे बर्याचदा दिसून आले आहे. religion maniacs असे असतात म्हणूनच हे असे झालेय असे कित्येक सायकोलॉगीस्टनी नमूद केलेय.
आजच्या
आजच्या काळात अतिरेकी कारवायात सिंहाचा वाटा हा मुस्लिम लोकांचा असतो ह्याविषयी कुणाच्या मनात शंका नसावी. असे का?
ह्याला इस्लामचे आक्रमक तत्त्वज्ञान आणि कुराण, शरियतमध्ये एका शब्दाचा फेरफार न करण्याची भूमिका जबाबदार आहे. ह्या धर्मात काहीही सुधारणा होत नाही कारण कुराण अल्लाने सांगितले आहे आणि त्यात सुधारणा करण्याचा विचार करणेही पाप आहे अशी ह्यांची भूमिका आहे. बायकांना, परधर्मीयांना तुच्छ मानणे, नृशंस, क्रूर शिक्षा देणे जसे हातपाय तोडणे, दगडाने ठेचून मारणे हे सगळे कालबाह्य प्रकार बाकी सगळ्या धर्मांच्या मुख्य प्रवाहातून फेकून दिले आहेत. काही अपवादात्मक उदाहरणे वगळा. पण कुणी मुल्ला मौलवी जाहीरपणे असे म्हणू शकत नाही की आमच्या धर्मात अमुक एक कालबाह्य प्रथा आहे. ती बदलायला हवी. तसे म्हटले तर ते त्याचे शेवटचे शब्द ठरतील.
जिथे हा धर्म अल्पसंख्य आहे तिथे म्हणजे भारतासारख्या देशात त्यांना अशा सुधारणा करणे भाग पाडले पाहिजे. त्याकरता पहिले ठोस पाऊल म्हणजे समान नागरी कायदा. कुणी माईचा लाल असा पक्ष आहे का की जो हा कायदा लादू शकेल?
झरदारी
झरदारी म्हणतो ते वीस लोक देणार नाही. (इराक च्या पत्त्यांसारखे हे वीस कोणाला माहीत आहेत का?). म्हणे पाकिस्तानातच त्यांच्यावर कारवाई करू. आता भारताची खेळी काय असेल? हे नाही केले तर "सर्व ऑप्शन ओपन आहेत" पैकी काही करणार का?
आणि मुळात भारत पुरावे का देउ शकत नाही? दोन देशांमधल्या गुन्ह्यांमधे कसे पुरावे लागतात ते जमा केलेले नाहीत का हळुहळू एकेक पान बाहेर काढणार आहेत? नुसती नावे देउन काय होणार आहे?
का हे सर्व लोक विसरेपर्यंत काहीतरी प्रयत्न चालले आहेत हे दाखवणे चालू आहे? कळत नाही.
मायबोलीकर
मायबोलीकरांसाठी एक विलक्षण माहिती आहे. कामा हॉस्पिटलमधले अतिरेकी, ज्यानी कामटे साहेबाना अन साळसकराना मारले ते चक्क शुद्ध मराठीत बोलत होते
एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह तिघा वरिष्ठ पोलिस अधिका-यांची हत्या करणारे ‘ कामा हॉस्पीटल ’ मध्ये बुधवारी रात्री घुसलेले दहशतवादी अस्खलित मराठीत बोलत होते...
एकुण दहा होते त्यापैकि ९ मारले आणि एकाला पकडले.
नक्कीच अजुनही काहीजण मोकळे फिरत असणार्
सावध रहा....
इथे अचानक नवीन आलेल्या आयडीज आणि त्यांचे विचार वाचुन मनात शंकेची पाक (ल) चुकचुकायला लागली आहे...
दोस्तांनो सावध रहा...
Pages