मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Not sure what really saddens me more .... Sad

1. http://specials.rediff.com/news/2008/nov/29sld1-public-reaction-terror-a...

2. This is borrowed from Prem Pannicker's blog
Live’ images on TV are not live. A press note in our mailbox just now explains why:

While the whole world was curiously watching the shot by shot account of the Mumbai crisis, there was one man, who was trying to stop the news channels from carrying the live coverage. Ravi Raj (name changed to protect the identity), was watching the television since the day one and was shocked to hear from the news reports that the terrorists are getting the minute by minute details of the action by the commandos and military forces through the televison news channels. He was expecting that the coverage would stop now. In fact, in the wee hours of Friday morning, the government issued orders in this connection, but the TRP-greedy channels were not ready to stop the live covearge. Now, they started showing the pictures, recorded a few minutes ago, claiming that this is not the live coverage & we are obeying the government orders. It was a trick on the part of the channels to evade the orders, but at the practical level, the terrorists were still getting the information, though a few minutes late.

Seeing all this drama, Ravi Raj, working for a NGO, stood up and called up the control room of the Maharashtra police. Mr. Shivarkar, who was the Control room officer on duty, confirmed it and said, “We immediately flashed this message from the NGO to the concerned officers.”

Then, Ravi Raj also requested the Mumbai police commissioner to ensure the complete absence of media and suggested that camera crews should be asked to leave the spot immediately.

And to ensure the success of his mission that the media coverage stops helping the enemies of humanity, Ravi Raj also woke up the Secretary, Ministry of Information & Broadcasting in the early morning & complained about the role of electronic news channels. Mrs. Sushma Singh was shocked to observe that inspite of the written advisory sent to all the channels, this is still happening. The senior and responsible officer as she is known, she swung into action and in no time, the situation was brought under control and the orders are now being strictly enforced. With lack of substantial information about the movements and the strategy of the forces, the terrorists are now at the receiving end.

This happened yesterday. TV channels reacted in different ways. Barka Dutt hyperventilated; much arm-waving and breathless verbalization; “We are not in a position to tell all that we know,” she kept saying. TimesNow made a virtue out of necessity: Some channels are talking to terrorists, providing information inadvertently to terrorists. We do not think that is our duty; we will report only what… blah-blah. Not that it stopped them, later in the evening, from crowing about the “brilliant photography” of their live coverage of the commando storm of Nariman House.

आबानी आता पुड्या सोडायचा धन्दा सुरु केला वाटते . >>. मी अगदी हेच वाक्य लिहीनार होतो पण म्हणल लोकांना राग यायचा.

विलासराव म्हणतात nsg च्या धर्तीवर मुंबईत पथक तयार केले जाईल. - आत्ता उजाडल का? मला उगीच वाटायची की RPF, ATS हे पथक ह्या संबधीत काम करत आहेत.

गेल्या दोन दशकांपासून भारतात आतंकवाद चालू आहे आणी अजुनही लोक लेसन लर्नड च म्हणत बसतात, असे बसले तर उठ्या व्ह्यायचा. नो टाईम फॉर ऑन द जॉब ट्रेनींग. प्लिज.

आधीही वर लिहीले ते परत मांडायची गरज पडली. -- मुंबई, दिल्ली अश्या ठिकानी अशी सर्व पथक २४ X ७ तयार हवीत. पिरिऐड. त्यावर उगीच वाद घालायची गरज पडू नये. नुसते पथक असुन फायदा नाही तर त्यांना योग्य ते प्रशिक्षन सतत दिले जायला पाहीजे. (इथे त्याची ही बोंब). दहशतवाद विरोधी पथकाला वाटाघाटी कश्या करायच्या हेच माहीती न्हवतं असे सांगनार्या दोन वाहिन्या बघीतल्या. कमाल आहे. ATS मध्ये अश्या लोकांची फौज असते असे मला वाटतं होते.

आपण अशा हल्ल्याला तयार न्हवतो. हेच दिसुन येते.

लोकांना अधांरात ठेवतात आपले लोक.

सर्व NSG/ black cats हे केवळ दिल्ली मधेच असतात कां? भारतात कुठेही हल्ला झाल्यावर (पाठवायचे हा निर्णय घ्यायला पण काही तास लागतात) दिल्ली वरुनच निघणार का पथके? भारताचे भौगोलीक क्षेत्र बघितल्यावर किमान ४ जागी अशी पथके २४ x ७ तयारच हवीत. एक गोष्ट जाणवते, 'use and modify techniques' वापरले जात आहेत, पुन्हा त्याच तशाच पद्धती नाही वापरत.

५००० टार्गेट होते, आणी आम्ही ते हाणुन पाडले... थोपटा स्वत:ची पाठ. येथे २५ लोकांनी देश वेठीला धरला आहे. अतिरेक्यांचे काम १००० % यशस्वी झाले आहे.

अजुनही साधे कपडे घालून अतिरेकी सामान्य मुंबईच्या जनतेत मिसळाले असतील, प्रतिक्रिया गोळा करत, आणि ह्या डाटाच्या आधारावर पुढच्या मोहिमेत हवा तो बदल करतील.

आत्ता आयबीन लोकमत्वर बातमी बघत होते. झोपडीत राहाणार्‍या एका इसमाला अतिरेक्यांनी गोळी घालून मारलं. त्याचा चार वर्षांचा मुलगा 'पपाला ठार केलं' हे शब्द बोलंत, रडंत आला. काय झालं असेल त्या बाळाला?
गोळीबार होत असता शेजारच्या बाईला पोलीसांनी 'घरात जा' येव्हडच सांगीतलं. घर काय तर तट्ट्याची झोपडी!

अजुनही साधे कपडे घालून अतिरेकी सामान्य मुंबईच्या जनतेत मिसळाले असतील, प्रतिक्रिया गोळा करत, आणि ह्या डाटाच्या आधारावर पुढच्या मोहिमेत हवा तो बदल करतील.

प्रश्नच नाही. ते लोक मरायला तयार असतात, पैशासाठी करत नाहीत ही कामे.

दुसरी एक गोष्टः काल एके ठिकाणी केळवण (ज्याला मराठीत तुम्ही banana forest म्हणाल) चे जेवण जेवायला गेलो होतो. तेथे काही विचारवंत (पुण्या मुंबईचे, आता अमेरिकेत असले तरी दरवर्षी भारतात जाऊन येणारे) म्हणाले की 'या लोकांचे (अतिरेकी) बरोबर आहे, मुसलमानांची परीस्थिती खरोखरच फार दयनीय आहे, त्यांची वस्ति पहा, त्यांच्या नोकर्‍या पहा! आपण कसे श्रीमंत आहोत हिंदू लोक, आपले लोक मोठ्ठे नेते, लष्करात वरच्या जागेवर, धंद्यात सुद्धा वर. त्यांना बिचार्‍यांना असे काही केल्याशिवाय त्यांच्याकडे समाजाचे लक्षच जाणार नाही!

मी जमीनीवर आडवा, अरे तुम्ही उपरोधाने बोलता आहात असे सांगा. तोपर्यंत मी कुणालाहि दारू पिऊ देणार नाही नि काही खाऊ देणार नाही! तेंव्हा त्यांनी अत्यंत गंभीरपणे सांगितले की नाही ते उपरोधाने बोलत नाहीयेत, वस्तुस्थिती सांगत आहेत.

आता मला असे समाजाला दोष देणार्‍या लोकांचा कडक संताप येतो. भारत स्वतंत्र आहे, काम करा, शिका, पैसे मिळवा. यहुदी लोकांचे तर जगात किती हाल झाले, त्यांना त्यांचे राष्ट्र पण नव्हते. त्यांनी विज्ञान, अर्थव्यवस्था यात केव्हढी प्रगति केली आहे!
एका विद्वानाने सांगितले, 'त्यात काय, त्यांनी कला कुसरीची कामे करू नयेत म्हणून
त्यांचे हातच कापले होते, म्हणजे त्यांना डोके वापरावेच लागणार!

मग मुसलमानांचे हात पाय कुठे कापले आहेत? एम एफ हुसेन हिंदू देवतांची अश्लील चित्रे काढतो, नि हिंदूच त्याला डोक्यावर घेऊन नाचतात, 'केव्हढा थोर कलाकार' म्हणून. सगळ्यांना हज ला जायला सरकार पैसे देते! तरी यांची बोंब! चोर लेकाचे.

त्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी पण ते पुराव्यानिशी सादर करावे. ते जर निरपराध लोकांना मारून व्यवहार उध्वस्त करत असतील त्यांच्या नेत्यांनी त्यांना थांबवावे नाहीतर समाज कधीहि त्यांना क्षमा करणार नाही, कधीहि कुठल्याहि मुसलमानाला नोकरी देणार नाही!

Thanksgiving च्या पार्ट्यांना जाउच शकले नाही. काळजाची कळ अजूनही गेली नाहि. गुरवारी संध्याकाळी, Skokie, IL इथल्या प्रमुख Rabbi ने, मुंबईमधे ओलीस ठेवलेल्या ज्यूइश लोकांकरता प्रार्थना synegourge मधे आयोजित केली होती. नुसत्या फोन आणि ई-मेल ने ३०० ज्युइश लोक संध्याकाळी ६ वाजता प्रार्थनेला जमले! कालच अविनाश धर्माधिकारिंची Operation Entebee ची DVD बघत होतो. या प्रसंगाची कंदाहार अपहरणाशी तुलना करत त्यांनी भारतीय आणि ज्युईश मानसिकते मधला फरक विषद केला आहे. civic spirit मधे आपण का कमी पडतो?

कल्पू

सगळ्या फोटो मधे मुंबई पोलिस हे कोणत्याही बुलेट्प्रुफ जॅकेट शिवाय फिरत होते. त्यांच्याजवळची हत्यारे पण फार फार तर खिसेकापुला धमकावण्यासाठीच असावित. त्यांना पुरेसे प्रशिक्षण तरी दिले असेल की नाही अशी शंका वाटते.
ई-सकाळ मधला एक फोटो: http://www.esakal.com/features/291108/final/index.htm?detectflash=false& (शेवटचा फोटो)
diff.jpg

आताच एन डि टि व्ही वर बघितले कि मृतांना आणि वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रध्दांजलि म्हणुन एस एम एस करा आणि सध्या एक लाख एस एम एस आलेत अस जाहिर करतायत पण ह्या एस एम एस च्या उत्पन्नातुन जे गेले त्यांच्या कुटुम्बियांना मदत वगैरे अस काहिहि जाहिर केलेल नाहिये. कायम पैसे कमावण्याच्या संधि शोधणारि हि किळसवाणि वृत्ति बघुन उबग आला अगदि.

५००० लोकांना मारण्याचा कट होता. इति R. R. पाटिल.>>>.

हे माणसांबद्द्ल बोलत होते की किड्या-मुंग्यांबद्द्ल?
वर म्हणे अशी छोटी-मोठी प्रकरणं होतच असतात...छोटी-मोठी???? पावलोपावली हे नेते किती लायकीचे आहेत आपला देश सांभाळायला ह्याची प्रचिती येतेय...
आणी आता ह्या सगळ्या प्रकरात राज ठाकरे दिसले का कुठे? परप्रांतीयांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यांना हाकलुन लावायचं म्हणत होते ना? आता हे अतिरेकी ह्यांच्या घरचे होते का? ह्या हल्ल्यात शहीद झालेले सर्वाधीक पोलिस कर्मचारी मराठीच होते. काय मदत केलीये मनसेने त्यांना?
सगळे एकाच माळेचे मणी!

*****************
सुमेधा पुनकर
*****************

मनसे कडुन नेमकी कसली मदत अपेक्षित होती? सरकारी तिजोरी हातात असल्यावर सगळेच आर्थिक मदत करतील पण अनेकांनी खारीचा वाटा उचलला असेल. काहींना प्रसिद्धी मिळाली असेल काही अनामिक राहुन अजुन मदत करत असतील.
मदत ही नंतरची गोष्ट पण मुळ दहशतवाद रोखायचा कसा हा प्रश्न सोडवायला कोणताही राजकीय पुढारी लायक असेल असे वाटत नाही.
मनसेच्या बाबतीतली ही बातमी

त्या पाटलांना कसे कळले ५००० माणसे मारायचा कट होता? कुणा पकडलेल्या अतिरेक्यानी त्यांना सांगितले का? त्या अतिरेक्याला विचारले का कसे मारणार होतात ५००० लोक? नि असेल तरी ते आता लोकांना सांगून काय होणार?
का पुनः हल्ला होण्याची शक्यता आहे हे सुचवून लोकांत घबराहट पसरवायची आहे? यांनी काय असे केले की त्यामुळे ५००० ऐवजी २०० लोक मेले? मग त्याबद्दल त्यांना काय बक्षिस द्यायचे का?
लोक म्हणजे या गर्विष्ठ अधिकार्‍यांना किडा मुंगी वाटतात, गेले २०० तर गेले!

http://www.rediff.com/news/2008/nov/29mumterror-maharashtra-deputy-cm-it...

मोठ्या शहरात अशा छोट्या-मोठ्या घटना घडतातच असे पाटील साहेब म्हणाले असतील तर आष्चर्य आहे. अतिरेकी कारवायांना कमी लेखण्याचा उद्देश आणि त्याच्यातून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा उद्देश तर नसेल ना?

मुसलमानांची परीस्थिती खरोखरच फार दयनीय आहे
----परिस्थिती सर्वांचीच दयनीय आहे (प्रत्येक धर्मात गरिब, भुकेकंगाल लोक आहेत), पण ते कारण काही शेकडो लोकांचे खुन करायला परवाना देत नाही. ह्या हल्ल्यात संपुर्णतः पाकचा हात होता हे आता सुस्पष्ट होते आहे, भारतातील दयनीय (?) परिस्थिती कडे जगाचे लक्ष वेधणे हे पाक लष्कराचे धोरण आहे?

अफगाण-पाक सिमेवरून पाकचे सैन्य हलवण्यासाठी पाकला चांगले कारण हवे आहे, तेथे काम करायचा पाक लष्कर नाखुषच असते. दबलेला हात काढायला कारण तर हवे आहे. भारताच्या पाठीत एव्हढा जबरदस्त वार हल्ला करायचा की भारत चिडून काहीतरी मुर्खासारखी कृती करेल (किमान किमान कडक भाषा तरी वापरेल). त्याच एकमेव उद्देशाने हा हल्ला केला गेला आहे. आता म्हणत आहेत की आम्हाला अफगाण सिमेवर (war on T) लक्ष ठेवणे जमणार नाही कारण भारताच्या बाजुने धोका आहे, आमची दक्षिण सिमा जास्त धोक्याची वाटते.

आय एस आय च्या प्रमुखाला भारतात पाठवण्याचा (तपासात मदत) निर्णय पाकचे प्रधान-अध्यक्ष या दोघांनी केलेल्या चेर्चेनंतरच घेतला. त्या आधी तशी विनंती भारताने केली होती. आय एस आय च्या गळी हा निर्णय उतरवणे जमले नाही, त्यांना आवडला नाही म्हणुन आता प्रमुख नाही तर दुय्यम अधिकारी भारत भेटीवर पाठवणार. हा बदल का केला तर मुखर्जींनी (फोनवर) कडक भाषा वापरली के फुसके कारण पुढे केले.

बोलघेवड्या आर आर पाटलाना निट विधानं करता येत नसतिल तर कमीत कमी थोबाड बंद तरी ठेवाव. त्या दुसर्‍या पाटलांना तर सुरक्षा बैठकीला सुद्धा बोलावले जात नाहिये आता http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=1711294

ज्या कुबेर ट्रॉलर ने अतिरेकी मुंबईत आले असे सांगितले जातेय त्यावरच्या मच्छीमारांचे मृतदेह हाती लागलेत.
http://www.sakaaltimes.com/2008/11/29212814/Bodies-of-Kuber-crew-killed-...
आपल्या देशभरातल्या सुरक्षा यंत्रणेची काय अवस्था आहे? अतीरेकी ट्रॉलर पळवतात, हत्या करतात आणि मुंबईत पोचतात , तो पर्यंत सागरी तट रक्षक दलाला पत्ता सुद्धा नसतो.
रस्त्यावरच्या चेक पोस्ट्ची तर त्याहुन वाइट अवस्था. काल दहिसर चेक नाक्यावरुन मुंबईत आलो, तर नेहमी प्रमाणे Barricades लाउन पोलिस गप्पा मारत बसले होते. नेहमीपेक्षा जास्त पोलिस पण येकजात सगळे चहा/गप्पात मग्न होते. येकही गाडी चेक केलि जात नव्हती. बहुदा आता अतिरेकी मारले गेले असल्यामुळे पुन्हा लगेच काहि कुणी घुसणार नाहि मग काळजी घ्याच का?

आपल्या मुख्यमंत्र्यानी राज्यात NSG च्या धर्तीवर पथक तयार करायची घोषणा केलिय. हे उशिरा सुचलेले शहाणपणं अमलात कधि येतं त्याची वाट बघायची.

>>आणी आता ह्या सगळ्या प्रकरात राज ठाकरे दिसले का कुठे?
मुंबईतले हल्ले ज्या तीव्रतेचे होते ते पाहता तिथे राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिसाद अपेक्षित आहे, हे सर्वांनीच मानायला हवं. एनएसजी, भारतीय लष्कर यांना या कामी तैनात करून राष्ट्रीय पातळीवर अपेक्षित असलेला साजेसा प्रतिसाद दिलाही गेला. राज्यपातळीवर म. पोलिसांनी हल्ल्यांच्या आरंभीच्या काळात त्यांच्या शक्तीनुसार आणि त्या वेळेच्या त्यांच्या तयारीनुसार उत्तर देण्याचे प्रयत्न केले. परिस्थिती गंभीर बनल्यावर राष्ट्रीय स्तराची मदत मागवली गेली.
या गंभीर घटनेला हाताळताना सर्व सरकारी यंत्रणा दिमतीला असतानाही सरकारातल्या घटकांची तारांबळ उडत होती, हे उघड झालंय. सरकारी यंत्रणा दिमतीला नसलेल्या मनसे व इतर राजकीय पक्षांच्या हातात रक्तदान, रुग्णवाहिका पुरवणं, कारवाईदरम्यान मुंबईतल्या इतर भागात परिस्थिती सुरळीत राहील याकरता कार्यकर्त्यांद्वारे सजग पुढाकार घेणं इत्यादी पूरक कामं करणं शिल्लक उरतं. यापेक्षा पुढे जाऊन कारवाईसंदर्भात काहीही करणे शक्य नसते, कारण तसे केल्यास तो लष्कर, सुरक्षाव्यवस्था वगैरे सरकारी कामकाजात हस्तक्षेप ठरू शकतो. याखेरीज एखादे अधिकृत सांत्वनपर जाहीर निवेदन माध्यमांद्वारे लोकांना कळवणे, पक्षाकडच्या निधीतून काही आर्थिक मदत गरजूंना करता आली तर ती करणे (पक्ष बाळसेदार असल्यासच ते शक्य) हे उपाय तर रूढच आहेत. मनसैनिकांनी त्यांच्याकडच्या उपलब्ध मनुष्यबळावर यातली काही पूरक कामे केली आहेत असं दिसतं. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोपांची पिंक टाकण्यात काही शहाणपणा नाही. तुम्ही-आम्हीही 'सामान्यत्वाच्या' पांघरूणाखाली दडून हळहळणं, शिव्या घालणं, आपापल्या विचारसरणीनुसार मतांच्या फैरी झाडणं, मृत सैनिकांना मुजरे घालणं अन दहशतवाद्यांच्या पाककृत्या सुचवण्याखेरीज वेगळं काही करत नाही आहोत. आपण सामान्य आहोत, बरेच जण मुंबईबाहेर आहोत, म्हणून आपण थेट मदतकार्यात सहभागी होऊ शकत नाही हे जसं समजून घेतो; तद्वतच मनसे आणि इतर सरकारात नसलेल्या राजकीय पक्षांच्या या प्रसंगी काय कार्यकक्षा/मर्यादा असतात ते समजून घेतलं पाहिजे.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

ही मटा मधली बातमी पहा..

गेल्या दोन दिवसांत सव्वादोनशे मनसैनिकांनी जेजे, जीटी व अन्य ठिकाणी रक्तदान केले. नरिमन हाऊससमोर दोनशे मनसैनिक कार्यर्कत्यांच्या भूमिकेत होते. पोलिस, मीडीया व सेवाभावी लोकांच्या खाण्यापिण्याची सोय केली.

समस पाठवून मराठी आणि मराठी भाषिकांची हेटाळणी सुरु आहे हे तर मी स्वतः अनुभवले गेल्या २ दिवसांत. केवळ समस नाही तर ऑफिसच्या मेलमधून हा समस आमच्या टीममधे सगळ्यांना एका सहकार्‍याने पाठवला होता, आणि माझ्या immediate boss पसून सगळे टिंगलीत सामील होते. ही मेल मी वरच्या व्यवस्थापनापर्यंत आणि एच आर कडे नेईन म्हटल्यावर मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले!

आयटीगर्ल,
तुझ्या सहकार्‍यांना म्हणावं त्या कमांडोंमध्ये दक्षिण/उत्तर भारतीयांबरोबरच पश्चिम भारतीय, मराठेदेखील होते (ही बातमी वाचः कमांडोमध्ये जळगावचे जितेंद्र पाटील). आणि त्या सडक्या डोक्यांना म्हणावं मराठी-अमराठी वाद हा तत्त्वत: योग्य असूनदेखील याप्रसंगी कुणी त्यादृष्टिकोनातून विचार करू नये.. कारण तो अंतर्गत मामला होता, आणि आताचा प्रसंग राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान असण्याचा आहे. हस्तिनापुरावर संकट यायचं, तेव्हा 'वयं पञ्चाधिकं शतम्‌' या उक्तीनुसार १०५ कौरव एकत्र उभे ठाकायचे; त्याच न्यायाने भारतीय म्हणून हा प्रसंग हाताळण्यात सर्वांचं हित आहे.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

आपण बोलून काय होणार? मराठी विरोधी लॉबी दुर्लक्ष करणारच आहे ना या गोष्टींकडे.
किमान हा मुद्दा तरी अमराठी संकेतस्थळावर जाउन त्यांच्या गळी उतरवला पाहिजे. इथे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

इथले पोस्ट ममोच्या रंगीबेरंगीवर लिहिणे जास्त संयुक्तिक वाटल्याने इथून काढले आहे.

    blackribbon1.jpg

    >>> धन्य हो तुझी, अरुण भाटियाबद्दल तुला काय माहीत आहे बाबा? पेपरमधल्या बातम्याच ना? आधी त्या इसमाची नीट माहिती घे त्याने नोकरीत काय काय केलेय हे संबंधिताना विचार. मिडिया मॅनेज करन्याचाही एक प्रकार असतो सरकारात. के. महाराज सिंग हे नाव घेतले तरी दरदरून घाम सुटेल तुझ्या त्या भाटियाला...

    श्रीयुत टोणगा,

    आपण कृपया श्री. अरूण भाटियांचे खरे स्वरूप उघड करून दाखवावे. त्यांनी मिडियाला कसे मॅनेज केले व के. महाराज सिंग हे नाव घेतल्यावर त्यांना का दरदरून घाम सुटेल हे कृपया विशद केल्यास आपले मज पामरावर बहुत उपकार होतील व माझे एक अनाठायी जाणारे मत वाचेल. आपण त्यांचा एकेरी उल्लेख २-३ वेळा केला आहे. ते आपले बहुतेक वर्गमित्र असावेत. आपल्याला त्यांची नक्कीच संपूर्ण माहिती असणार.

    आता अशि बातमि आलिय कि काहि अतिरेकि आधिच चार दिवस येवुन ताज मधे थांबले होते.
    ते विमानाने आले. तर काहि अतिरेकि समुद्र मर्गे आले.
    त्याना एका कुलाब्या च्या मुस्लिम उद्योग्पति ने मदत केलि हा दाउद चा निकटवर्ति आहे. हा मुम्बैत कस्टम क्लिअरिन्ग हाउस चालवतो तसेच.
    दाउद साठि डिझेल चि तस्करि करतो.
    अतिरेकि ससुन डॉक उतरले तेथुन प्रथम कफ परेड व त्यानंतर नावेने गेटवे ऑफ इन्डिया येथे नेण्याचि सोय या हस्तकानेच केलि होति.

    तसेच या सर्वाना गाजिया बाद व हैद्राबाद येथिल कॉलेजाचे ओळखपत्र हि मिळवुन दिले आहे. हे सर्व येथिल सिमि च्या व
    दाउद च्या लोकांनि त्याना मदत केलि आहे.
    बराच सा शस्त्रासाठा हा या कुलाब्याच्या उद्योगप्ति ने ते येथे आल्यावर त्याना दिला.
    व त्यानि तो हळु हळु ताज मधे ठेवला. या साठि काहि जण ताज मधे इन्टर्नि म्हणुन दोन महिन्या पासुन राहत होते.
    कारण ४ दिवस सतत गोळिबार करुन सुध्दा एटिएस ला बराच दारु गोळा शिल्लक सापडला.

    यामधे दावुद चे हस्तक असलेले पोलिस अधिकारि व कस्टम अधिकारि यानि पण मदत केलि अशि बातमि आहे.
    ( दोन वर्शा पुर्वि काहि अधिकार्‍याना दावुन बरोबर संबध ठेवल्या च्या आरोपा वरुन काढुन टाकले होते)

    सतिश
    भाटिया चांगला माणुस आहे.

    केन्द्रिय होम मिनिस्टर शिवराज पाटिल यांनी राजीनामा दिला, हे खुप दिवस आधिच व्हायाला पहिजे होते.

    मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यांनंतरच्या धुमश्चक्रीत चाकूरकर पाटलांचा पहिला बळी पडला. दिल्लीत, मुंबईत, सीमेवर गोपनीय हालचाली घडताहेत. वर्तमान परिस्थिती पाहता या गोष्टी घडू शकतीलः
    १. काँग्रेस पक्षाला निवडणुकांमध्ये जनतेला पटवून देण्याजोगी लक्षणीय कामगिरी करता आली नाहीये, आणि जी कामगिरी केलीये त्याचं महत्त्व जनतेला पटेलच याची खात्री नाहीये. २००७ सालातली आर्थिक घोडदौड, अमेरिकेशी अणुकरार या गोष्टींचं महत्त्व लोकांच्या मनात कितपत ठसेल याबद्दल शंकाच आहे. काही महिन्यांपूर्वी भडकलेला महागाईचा प्रश्न, निवडणुकांच्या आधीची वर्तमान आर्थिक मंदीची परिस्थिती आणि भरीस भर म्हणून हे अतिरेकी हल्ले यांमुळे केंद्र सरकाराची प्रतिमा डागाळली गेलीये. ती धुण्याचा पहिला (आणि अर्थातच सोपा) प्रयत्न म्हणजे चाकूरकरांचा बळी. आर्थिक मंदी केंद्र सरकाराच्या आवाक्यातली बाब राहिली नसल्याने, केंद्र सरकार मंदीची झळ कमी करण्याइतपत उपाययोजना करू शकेल.. पण हे प्रयत्न निवडणुकांकरता खपवता येणं मुश्कील आहे. मग आता काहीतरी शक्कल शोधणं भाग आहे. त्यादृष्टीने, दहशतवादाविरुद्ध भारत 'सॉफ्ट स्टेट' ठरत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना हाणून पाडण्यासाठी आणि जनतेतील प्रक्षोभाचं भान ठेवून कणखरपणा दाखवण्यासाठी केंद्र सरकार पाकिस्तान सीमेवर लष्कराची जमवाजमव करतंय.
    २. मुंबईतल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे जगासमोर येतंय, हे पाहताच पाकिस्तानातल्या लोकशाही सरकाराची अवघड अवस्था झालीये. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचं 'पाकिस्तानानेही दहशतवादविरोधी युद्धात बेनझीर भुट्टोंना गमावलंय. पाकिस्तानानेही दहशतवादाची झळ अनुभवलीये' इत्यर्थाचं वक्तव्य, अध्यक्ष झरदारींचं आयएसआय प्रमुख पाशांना भारतात पाठवण्याचे संकेत देणं हे पाकिस्तानावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्यामुळे घेतलेल्या बचावात्मक पवित्र्याचं लक्षण होतं. अफगाण दहशतवाद्यांना पाकिस्तानात बलोच सीमाभागांत आसरा मिळत राहण्याकरता आयएसआय जबाबदार असल्याचं ताडून अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी आयएसआयचा राजकारणातला हस्तक्षेप संपवण्यासाठी पाकिस्तान सरकारामार्फत संस्थांतर्गत बदल्या-नेमणुका अशी बरीच उलथापालथ करवली. यादरम्यान आयएसआयप्रमुखपदी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कयानींच्या विश्वासातल्या आणि पाश्चात्य राजवर्तुळात तालिबान/अल कायदाविरुद्ध अमेरिकाधार्जिणे मानले जाणार्‍या अहमद पाशांची नेमणूक झाली. आता मुंबईतल्या हल्ल्यांनंतर झरदारींकरवी पाशांना भारतात पाठवायला लावून अमेरिकेने भारत-पाक तणाव निवळायला लगोलग प्रयत्न आरंभले असं आपल्याला म्हणता येईल. पण नंतर झरदारींवर (आणि पाकिस्तानातल्या लोकशाही सरकारावर) इस्लामी मूलतत्त्ववाद्यांकडून उलटदबाव आला असणार.. ज्यामुळे पाशांऐवजी दुसरा कोणी प्रतिनिधी भारतात पाठवला जाणार असल्याची घोषणा झाली. बाहेरून अमेरिकेचा राजनैतिक दबाव, सीमेपलीकडून भारताद्वारे लष्करी जमवाजमव आणि देशांतर्गत इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा दबाव अशा तीन-तीन दबावांना तोंड देताना पाकिस्तानाचं लोकशाही सरकार बिकट परिस्थितीत सापडलं असणार. दरम्यान पाकिस्तानी लष्करप्रमुख जन. कयानींच्या सत्ताकांक्षा पालवायला ही स्थिती पोषक आहे. मुशर्रफानंतर लष्करप्रमुख बनलेल्या कयानींनी लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये व गुप्तचरसंस्था वगैरे पूरक दलांमध्ये पाशांसारखी आपली निष्ठावान माणसे उच्चपदांवर नेमून अगोदरच मोर्चेबांधणी करून ठेवलीये. त्यात सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या तोंडास पाणी सुटल्यास नवल नाही. पाकिस्तानातल्या लोकशाही सरकाराला सध्याच्या घटनाक्रमामुळे पुष्कळ धोका उद्भवतो. सरकार अंतर्गत दबावाला हाताळू शकले नाही, तर लष्कर/अन्य सत्ताकेंद्रांमार्फत उलथले जाण्याचा धोका आहे.
    ३. नेमका हाच धोका व्यूहरचनेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला सध्या नको असणार. त्यामुळे जरी पाकिस्तानाकडूनही अफगाण सीमेवरचे लाखभर सैन्य भारतसीमेकडे हलवले जाण्याचे स़ंकेत दिले जात असले तरीही, भारत-पाक उघड युद्ध होण्यापासून दोन्ही देशांना परावृत्त करायला अमेरिका जोरदार राजनैतिक ताकद लावेल अशी चिन्हं आहेत. कदाचित काही महिने दोन्ही सैन्ये सीमेवर अतिदक्षतेच्या स्थितीत मांडली जातील.. पण भिडतील असे काही वाटत नाही. दरम्यान अमेरिकेला कयानींच्या पाकिस्तानी लष्कराला वेसण घालता आली तर झरदारी-गिलानींचं लोकशाही सरकार वाचेल. समजा कयानींनी मुशर्रफांची पुनरावृत्ती करत सत्ता घशात घातली (ज्याची शक्यता खूप कमी वाटते.), तरीही अमेरिकेचा एक मनसुबा पुरा करण्याकरता लोकनियुक्त किंवा लष्करी कुठल्याही राजवटीला सहकार्य द्यावेच लागेल - पाकिस्तानाच्या अफगाण सीमाभागांतले तालिबानांचे आसरे उडवण्याचा. याचा फायदा घेऊन भारताने तापल्या तव्यावर पोळी भाजून घेतली तर आपली डोकेदुखी काही प्रमाणात कमी होईल. येत असलेल्या आयएसआय प्रतिनिंधींमार्फत आणि अमेरिकन राजनीतिज्ञांबरोबर पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. कदाचित हे प्रयत्न या वेळेस पाकिस्तानी सरकारयंत्रणेतर्फे आधीपेक्षा नेटाने आणि थोड्याबहुत गांभीर्याने होतील. पाकिस्तानातलं लोकशाही सरकार वाचलं तर पाकिस्तानात आणि अर्थातच भारतात अशा संयुक्त प्रयत्नांना प्रसिद्धी दिली जाऊन गोडवे गायले जातील.. जेणेकरून दोन्ही देशांतली सरकारे आपापल्या घरी सांगण्याजोग्या काही कामगिर्‍या मिरवू शकतील, आंतरराष्ट्रीय समुदायांत आपापल्या प्रतिमा उजळवून घेऊ शकतील. पाकिस्तानाच्या लोकशाही सरकाराने इमानदारपणे हे काम फत्ते केलं, तर ओबामा सरकार झरदारी-गिलानींना बक्षिशी म्हणून सोन्याचं कडं चढवेल. Proud
    ४. दरम्यान केंद्रातलं काँग्रेस सरकार युद्ध न झाल्यास आपल्या राजनैतिक प्रयत्नांना पाकिस्तानामार्फत कसा प्रतिसाद मिळतोय, दहशतवाद्यांची केंद्रे उडवण्यात हळूहळू कसं यश येतंय याचा पाढा वाचू पाहतील. पण निवडणुकींत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे.

    महाराष्ट्रातल्या निर्नायकी राजकारणात मात्र काही फरक पडेल असं दिसत नाही. पवारसाहेबांचं आणि कॉग्रेस पक्षाचं क्षत्रिय मराठा जातीला आरक्षण द्यायचं सध्या गर्दीत हरवलेलं राजकारण पुन्हा उचल खाईल अशी शक्यता असेल. पण त्याने महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही. लोडशेडिंग, अंतर्गत स्थलांतरांमुळे पायाभूत सुविधावर येणारा ताण, शहरी भागात स्थलांतरित परभाषिक भारतीयांमुळे मराठा आकसला जाणं, पावसाळ्यात रस्ते उखडले जाणं अन उघड्या सापडणार्‍या सर्व जागी नेत्यांच्या (आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यांच्या) बेढब छब्यांची होर्डिंगं झळकणं हे सर्व चालूच राहील.

    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

    मराठा आरक्षनातही गोची आहे.घटनेप्रमाणे आरक्षणाचे प्रमाण ५० ट्क्क्यांपुढे नेता येत नाही. त्यामुळे आहे त्याच आरक्षणात मराठ्याना टाकावे लागणार त्याला भुजबळ आणि इतर ओबीसींचा विरोध आहे.कारण त्यांच्या वाटणीचे आरक्षणात वाटे पडणार्.शेवटी मराठे कॉन्ग्रेसवाले कोणाला मते देणार.? सेना बी जेपीला तर नाही. गम्मत म्हनजे युतीचे सरकार असताना सगळ्यात जास्त प्रमाणात मराठा आमदार होते.(अन महार समाजाचा एकच होता!) त्यामुळे कॉन्ग्रेस म्हनजे मराठा अथवा राष्ट्रवादी हेही समीकरण बरोबर नाही. कॉन्ग्रेसमध्ये तिकीटे न मिळालेले मराठे चक्क भाजपच्या दारातही झोळ्या पसरून उभे राहिले. उद्या निवडणूकीच्या वेळी सेना भाजपने मराठा आरक्षणाचे गाजर धरले तर आश्चर्य वाटू नये...

    असो विषय तो नाही 'फ' ने उत्तमच लिहिले आहे. विष्लेषनात्मक लिहिण्याचा इथे कोणी त्रास घेत नाही. सगळा प्रतिक्रियावाद. तरी अजून सोनिया, मोहनचन्द करम्च॑न्द गान्धी,नेहरू, केतकर याना पुरेशा शिव्या झाल्या नाहेत. सध्या मंडळी टी व्ही पाहण्यात मग्न होती. आताच मोकळी झालीत आता सगळे जुने हिशेब चुकवायला प्रारम्भ होईल विश्लेषनाला अभ्यास करावा लागतो. मुख्य म्हनजे पूर्वग्रह दूर ठेवावे लागतात. उपाय सुचवावे लागतात.
    इथला एकच उपाय. अडवानीना पन्तप्रधान करा....

    ---------हितगुज दॅट इ़ज....
    पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
    गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....


    पण झरदारि ने काहि कारायचि वाट आपण आशाळभुता प्रमाणे का करायचि?
    आणि मुख्य म्हणजे हा झरदारि सुध्दा काहि नुसता पि.पि.पि. च्या पाठिब्या वर नाहि.
    त्यानि सुध्दा बर्‍याच पक्षाच कडबोळे सरकार बांधले आहे.
    त्याचि सत्ता काहि मुशरफ सारखि एकमुखि नाहि.

    हिन्दुस्थान ने सुध्दा असेच स्फोट पाकिस्तानात घदवुन आणले पाहिजेत.
    बुश ने केले तसे युध्द त्यांच्या दारात नेले पाहिजे.

    या साठि असे हिन्दुचे आत्मघाति दस्ते तयार केले पाहिजेत. व जो कोणि असे करत असेल त्याला आतुन मदत केलि पाहिजे.

    >>> तरी अजून सोनिया, मोहनचन्द करम्च॑न्द गान्धी,नेहरू, केतकर याना पुरेशा शिव्या झाल्या नाहेत.

    कितीही शिव्या दिल्या किंवा भारताची कितीही दुर्दशा झाली, तरी या गेंड्यांची किंवा त्यांच्या चाहत्यांची कातडी थरथरत सुद्धा नाही. "निर्लज्जम् सदा सुखी" ही म्हण त्यांनी अतिशय समर्पकपणे आचरणात आणलेली आहे.

    सोनिया वगळता इतरांचा तर मी निश्चितच चाहता आहे ..

    भाऊराव उर्फ सन्तु , हे दस्ते तुम्हीच का करत नाही. ही मंडळी आत्मघातकी दस्ते तयार करते कारण त्यांची त्यांच्या चुकीच्या का होईना तत्वांवर धगधगती निष्ठा असते. 'हिन्दु'स्तानने असे स्फोट घडवून आणले नाहीत कारण त्याना असे मरायला तयार तरुन मिळाले नाहीत ना. त्यांचे तरूण आपपली करीअरे साम्भाळीत, वेळ मिळेल तशी ब्लॉगवर चर्चा करत असतात. उपदेश करीत असतात. देशविदेशात व्यवसाय धंदे करीत सोई सोइने धर्मरक्षण करीत असतात....
    काहींचे कडवट सैनिक राडे करीत आपल्याच जातीबांधवांच्या मालमत्तेचे वाटोळे करीत असतात पन ती एनर्जी पाकिस्तानात जाऊन बॉम्बस्फोटात वापरावी असे त्यानाही आणि त्यांच्या नेत्यानाही वाटले नाही. आणि वाटणारही नाही.

    हिन्दुस्थान ने सुध्दा असेच स्फोट पाकिस्तानात घदवुन आणले पाहिजेत.
    बुश ने केले तसे युध्द त्यांच्या दारात नेले पाहिजे.

    या साठि असे हिन्दुचे आत्मघाति दस्ते तयार केले पाहिजेत. व जो कोणि असे करत असेल त्याला आतुन मदत केलि पाहिजे.

    हो ना भाऊ राव, हे सगळे दुसर्‍याने कोणीतरी केले पाहिजे. आपण नाही.
    'शेजारच्या मुलाने लष्करात गेले पाहिजे' हे आपण ठणकावून सांगतो. भाऊ राव उद्या पाकिस्तानात आउटसोअर्सिंगच्या,
    अन लठ्ठ पगारच्या संधी उपलब्ध झाल्यास आपण तिथेही जाउ आणि पाकिस्तानातल्या भारतियांच्या जीवाला धोका पोचू नये म्हणून अशा काही भानगडी करू नये म्हणून आवाहनही करू...
    ---------हितगुज दॅट इ़ज....
    पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
    गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

    सतिश
    भाटिया चांगला माणुस आहे.

    चला भाटीयाची दोन मते तर फिक्स झाली. मग अविनाश धर्माधिकारी अपक्ष उभे राहिले तर कोणाला मते देणार? पुन्हा अण्णा जोशीही आहेतच गुडघ्याला बाशिंग बांधून . म्हणजे नॉन करप्ट लोकात यादवी होणार म्हणायची Happy

    ---------हितगुज दॅट इ़ज....
    पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
    गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

    मला वाटत तुझ्या साठि आपण हर्शद मेहता किवा त्याच्या बापाला उभे करु
    म्हणजे तुला मत द्यायला अडचण होणार नाहि.
    (हर्शद तर वर गेलाय मग तेलगि किवा तसाच एखादा सुप्रसिध्द माणुस पाहु. भुजबळ चालेल का?)

    Pages