केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे केस अमेरीकेत आल्यापासुन खुप गळतात. सुलेखा ते तु सांगीतलेले ट्रेडर जोस मधले अलोवेरा जेल रोज वापरायचे का? अजुन काही इकडे करता येण्यासारखा उपाय आहे का?
मला इथे शॅम्पु पण कुठला वापरावा कळत नाही.

अनुजय
डायरेक्ट शॉवर खाली उभे राहुन केस धुता का, असे केल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते, शक्य असेल तर भारतातल्या सारखे बादलीत पाणी घेवून मगाने डोक्यावर पाणी ओतून केस धुऊन बघा काही फरक पडतो का ते.

हो मी डायरेक्ट शॉवर खाली उभे राहुन केस धुते बर झाल सांगीतलत आता मगाने डोक्यावर पाणी ओतून केस धुऊन बघेन. फरक पडला तर फारच बरे होइल. खुप गळण्यामुळे लांबसडक केस कापुन कमी केले आहेत. Sad

maze kes balanpana nantar khoop galat ahet please kahi tips......
sorry maayboli war navin ahe ajun marathi typing chi savay nahi.... maaf kara

अगो, माझ्या मुलीलाही मध्ये २-३ महिने सारखा कोंडा होत होता. मी जॉन्सन बेबीशॅम्पू वापरून पाहिला, त्याने कमी झाला नाही. तिच्या डॉ ने हेड अ‍ॅण्ड शोल्डर वापरायला सांगितला, तोही लावला. त्यानेही कोंडा कमी झाला नाही. नियमित कोमट खोबरेल तेल लावले. केस धुताना जॉन्सन शॅम्पु अगदी थोडासा (कमीत कमी) लावला. तेव्हा महिन्याभराने कमी झाला. कोंडा गेल्यावर रोज सकाळी खोबरेल तेल्/माक्याचे तेल लावतेच.
उन्हाळा होता तेव्हा तिला जास्वंद आणि कोरफड जेलही लावून पाहिले होते. काही उपयोग झाला नव्हता.
माझ्या अनुभवाने (माझ्या आणि लेकीच्या बाबतीत) नियमित तेल लावणे एवढा एकच खात्रीचा उपाय दिसतोय.

माझ्या अनुभवाने (माझ्या आणि लेकीच्या बाबतीत) नियमित तेल लावणे एवढा एकच खात्रीचा उपाय दिसतोय >>> अनुमोदन. बेसिकली स्काल्प कोरडी राहिली नाही पाहिजे पण त्यात तेल पण नाही राहिले पाहिजे.

मला अमेरिकेत आल्यापासून एअचिन्ग सcअल्प आणि केसगळतीचा त्रास सुरु झाला होता शेवटी देर्मतोलोगिस्त कडे गेले.

त्यांनी मला Nizoral शाम्पू वापरण्यास सांगितला आणि केसगळती बंद होण्यासाठी Biotin ह्या tab दिल्या आहेत. मला १५ दिवसांतच बराच फरक जाणवलाय.

हा एक उपाय म्हणून लिहित आहे पण प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते सो तो सगळ्यांना लागू होईलच असे नाही.

मयुरी, स्टेपकट करून टाक ना मस्तपैकी, कशाला झंझट हेअर स्टाईलचं ???
गंमत केली... Happy

रफ केसांसाठी नीधप ने सुचवलेला उपाय, अर्धी वाटी नारळाचं दूध केसांच्या मुळांना मालिश करून लावायचं केसांच्या टोकांना (फाटे फुटतात तिथेही) लावायचं अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवून टाकायचं. नेहमीप्रमाणे माईल्ड शाम्पूने धू. हे १५ दिवसांनी केलं तर चालतं

केस धुवायच्या आदल्या रात्री नेहमी कोमट खोबरेल तेलाने मालीश करत जा...

केस धुतल्यानंतर चांगल्या कंपनीचं कंडीशनर अर्धा तास कानांपासून खालच्या केसांना लावून ठेवायचं(स्काल्पला लावू नको)
नंतर फक्त पाण्याने धुवून टाक.

नारळाचे दूध दर आठवड्याला लावले तर चालेल का? माझे केस कुरळे आहेत्,पण ह्या उपायाने मस्त मऊ होतायत.

हसरी Happy कधी वापरले नाहीस का नारळाचे दुध???

ओला नारळ खवुन घ्यायचा, मिक्सरमध्ये खोबरे टाकुन चांगले चटणीसारखे फिरवायचे. फिरवताना गरम पाणी (उकळते नाही) वापरले की दुध चांगले निघते. चटणी सारखे बारिक झाले की भांड्यात रुमाल ठेऊन त्यात ती चटणी ओतायची आणि चांगले पिळायचे. की झाले दुध तयार. परत एकदा उरलेला किस मिक्सरमध्ये फिरवला तर थोडे पातळ दुध निघते. पहिले चांगले दाट असते. (मी चटणी म्हटलेय म्हणुन लगेच लसुन, दाणे टाकुन चटणी करु नकोस. फक्त खोबरेच वापर Happy )

मला वाटतं या बीबी च्या डोक्यावरच नारळाचे दूध कसे बनवायचे आणि तो उपाय कसा करायचा हे लावून टाकावे इतक्या वेळा या गोष्टी परत परत विचारल्या आणि सांगितल्या जातायत. Happy

हो ना.. Lol
नी, तुझी सुरुवातीची पोस्ट हेडरला टाकते. नारळाचं दूध कसं काढायचं हेही लिहिते Wink
शिवाय एरंडेल तेलाचं लिहिते, तोही उपाय इथे लोकप्रिय झाला होता.

मला वाटतं या बीबी च्या डोक्यावरच नारळाचे दूध कसे बनवायचे आणि तो उपाय कसा करायचा हे लावून टाकावे इतक्या वेळा या गोष्टी परत परत विचारल्या आणि सांगितल्या जातायत

काय काय लावणारेस या बीबीच्या डोक्यावर????????????? केसांचा प्रश्न इतका जिव्हाळ्याचा आहे की लोकांना मागची पाने उघडुन वाचायचाही धीर नसतो.......

बाईमाणूस तु केसान्साठी Derma कडे जायच कस ठरवलस? हे मला न्हवत सुचल. मी hair restoration etc वगेरे मधे कोणि मिळतय का हेच शोधत होते. treatment suru kelya var nakki kai farak padla hey please sangshil ka?

नम्स्कार सखी, मला कोंडयाचा खुप त्रास आहे. तसेच त्यामुळ केस खुप गलतात. काहि घरगुति उपाय सागाल का? केस खुप आनि लवकर तेलकत् होतात.

माझे केस अचानक खुप गळत आहेत अन पातळ झाले आहेत्,प्लिज मला सांगाना काय करु म्हनजे ते जरा सुधारतिल.............

नमस्कार लोक्स,
माझे केस कुरळे आहेत्..मी रोज शाम्पू करते कारण रात्री झोपायला जाण्या आधी सुळसुळीत असणारे केस सकाळी मात्र एकदम कोरडे वाटतात.
मात्र्,रोज शाम्पू केल्याने केस खुप गळत आहेत.मी डव चे डेली शाइन वापरते.कुणी उपाय सान्गु शकेल का..शाम्पू रोज न करता देखील केस चमकदार दीसण्या करीता.

धन्यावाद.

रोज शाम्पू??!!! बापरे! नका हो!! आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदाच वापरा शाम्पू. तेही भरपूर तेल चोपडून. चमकदार दिसायला केस तर शिल्लक हवेत ना? आयुर्वेदिक, माईल्ड शाम्पू वापरा. तेलाशिवाय केसाला पाणी लावायचं नाही असं ठरवा. हेड मसाज करत चला. तेलकट, मसालेदार खाऊ नका. कमीत कमी केमिकल्स केसांना लागतील असे बघा. शुभेच्छा.

Pages