Submitted by विदेश on 9 November, 2010 - 09:06
चालता डौलात तू ग, मी असे न्याहाळले-
का कुणाला वाटले मी कैक प्याले रिचवले !
खरडुनी अपुला गळा तू गीत कोमल गाइले-
छान ! कळले नाहि तुज, मी कर्णयंत्रा काढले !
मिरवशी स्कूटीवरी तू ऐटिने रस्त्यावरी-
वाटते गजराज बसुनी मूषकावर चालले !
इकडुनी जातेस तिकडे- तू जरी हळु चंचले-
भासती भूकंप भारी भूतलावर जाहले !
चंद्र तुझिया चेह-यावर छान कोणा भासतो-
डाग मुखकमलावरी ते पाहुनीया मानले !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आवडली, पण काही बदल करण बाकी
आवडली, पण काही बदल करण बाकी आहे का ?
मिरवशी स्कूटीवरी तू ऐटिने
मिरवशी स्कूटीवरी तू ऐटिने रस्त्यावरी-
वाटते गजराज बसुनी मूषकावर चालले !
(No subject)
लय भारी... !
लय भारी... !
झक्कास!!
झक्कास!!