Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36
मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परत
परत कुठेतरी स्फोट झालाय, पण नक्की कुठे हे त्या पत्रकारालाच कळत नाहीये..
>>सगळ्या
>>सगळ्या पोलीसांना कधी सगळ्या सुविधा आणि चांगली सामग्री मिळणार?
रुनी, खरंच. त्यांच्या हातातल्या बंदुका कोणत्या जमान्यातल्या आहेत देव जाणे.
त्या अधिकार्यांचे जीव गेले त्याचे खूप वाईट वाटले.
इकडे ग्वांटानामोमध्ये डांबून ठेवलेत ते फारसे चूक नाही.
<<<इकडे
<<<इकडे ग्वांटानामोमध्ये डांबून ठेवलेत ते फारसे चूक नाही.>>>
म्हणजे काय लालु? निट कळल नाहि.
BBC News- The motive is far
BBC News- The motive is far from clear - but the attacks come amid elections in several Indian states, including in disputed Kashmir.
(No subject)
रश्मी,
रश्मी, ग्वांटानामो बे मध्ये एक जेल आहे तिथे मिडल इस्टर्न अतिरेक्यांना कैद करुन ठेवले आहे. व त्यांचाकडून माहीती मिळवन्यासाठी योग्य ते उपाय ही करतात. काही मानवाधिकार वाल्यांनी बोंबांबोंब केली की तिथे खुप त्रास देतात, तो जेल बंद करा वैगरे वैगरे.
हो. मिडल
हो. मिडल इस्टर्नच नाही, सगळीकडचे आहेत. टॉर्चर करु नये, पण संशयित असतील तर पकडून ठेवा. आता त्यातले काही निर्दोष आहेत, पुरावे नाहीत, खटले चालवत नाहीत इ. इ. लोक बोलतात.
आता बराच वेळ झाला काही नवीन अपडेट नाही कुठेच.
लालू, Oberai hotel
लालू,
Oberai hotel मधे ४ अतिरेक्यांनी ६ परदेशी लोकांना ओलिस ठेवलं आहे कमांडोज ओबेरायला पोचले आहेत. पोझिशन्स घेतल्या आहेत..छाब्रा हाउस म्हणून आहे तिथे इस्त्राइली कुटुंबास ओलीस ठेवले आहे
संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली high alert
cama
cama हॉस्पीटल मध्ये ज्या लोकांना ओलीस ठेवलय त्याबद्दल काहीच अपडेट दाखवत नाहीयेत टीव्हीवर.
रुनी, कामा
रुनी,
कामा हॉस्पिटल मधून अतिरेक्यांना हुसकावण्यात आलं आहे. तिथून पळून जाताना त्यांनी पोलीसांची गाडी पळवली आणि गोळीबार करत गेले. गाडीचे टायर फुटल्यानंतर खासगी गाडी पळवली, शेवटी पोलीसांनी दोन अतिरेक्यांपैकी एकाला मारले आणि दुसरा जखमी झाला आहे..
धन्यवाद
धन्यवाद लालु आणि केदार,
नुकतिच सी एन एन वर दीपक चोप्रा आणि ख्रिस्तिआना आमान्पुर यांचि अ. आणि अ. वक्तव्ये ऐकलि.
दोघांनिहि ह्याच श्रेय भारत पाकिस्तान मध्ये असलेल्या तेढिला आणि भारतात असलेल्या अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या आक्रोशाला आणि काश्मिर मधल्या स्वातंत्र्य युद्धाला दिल!
मग अतिरेक्यांनि पासपोर्ट बघुन निवडुन वेचुन अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांना ओलिस का ठेवण्यात आल ह्याच कारणमीमांसा हे महाभाग कशि करताहेत देव जाणे. संतापाचि गोष्ट म्हणजे वारंवार तोच काश्मिर वगळुन दिलेला भारताचा नकाशा सतत दाखवतात. अर्धवट माहितिच्या जोरावर वाटेल तस विष्लेशण करणार बक्कळ आहेत इथे.
ताजमधे 'major
ताजमधे 'major operation' साठी लष्कर तयार. परीसर मोकळा केला..
पोलीस वॅन
पोलीस वॅन मधुन फायरिंग करत गेले अतिरेकी... विडीयो शुट करणार्यालाच बहुतेक गोळी बसली असावी... अंगावर शहारा आला बघताना!
आत्ता परत
आत्ता परत फायरींग चालू आहे. सीएनएन वर दाखवलं.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
ताज आणि
ताज आणि ओवेरॉय दिन्ही कडे फायरींग चालू झालय परत.. !
मानवी हक्क
मानवी हक्क आयोगाला दिल्ली वरुन खास विमानाने आणा हा सर्व खेळ बघायला म्हणजे त्यांना कळेल त्यांचा टाहो नेहेमीच योग्य असतो असे नाही, किंबहुना तो टाहो अशा हल्ल्यात बळी गेलेल्या मानवांवर अन्यायकारक असतो.
काय ही
काय ही परीस्थिती.. मुंबईचे अगदी हाल चालल्येत... दर ६ महिन्यानी काही ना काही आपत्ती येतेच... पण तुम्हा मुंबई करांना सलाम. अश्या वातावरणात ही तुम्ही जख्मींना मदतीला धावता... सगळ सांभाळून घेता...
मला एक कळत नाही, प्रत्येक हल्ल्याच्या नंतर पोलिस सेक्युरिटी टाईट करतात म्हणे... पण मुंबई सारख्या महत्वाच्या शहरात इतर वेळेला सेक्युरीटी असते कुठे? मुंबई ही नेहमीच टार्गेट बनते...
इथे बसून काय करावे हे ही सुचत नाहिये... आज कामात लक्षच लागत नहिये... घरी-सासरी फोन चालू आहेत...
मटा मधे
मटा मधे दाखवतायत की २ अतिरेकी ठार झाले ताज मधे.. पण बाकी कुठे दाखवत नाहियेत ते..
मानवी हक्क
मानवी हक्क आयोग हा विनोदच आहे मोठ्ठा.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
विधानभवना
विधानभवनाजवळ हातबॉम्ब सापडला. डेक्कन मुजाहिदीन नमक संस्थेने जबाबदारी स्विकारली. एका दहशतवाद्याने इंडिया टीव्हीला फोन केला... आता ते लाईव्ह दाखवत आहेत.
***
:(:राग:
काय चाल्लय
काय चाल्लय काय ... न कळे

इंडिया
इंडिया टिव्ही बकवास आहे. काल रात्री २ वाजता त्यांना इमेल होता अतिरेक्यांचा.
काहीही थापा मारतात ते.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
फार वाईट
फार वाईट झालं... करकरे, साळसकर, काम्टे यांसारखे अतीशय पराक्रमी पोलिस दलातील लोक शहीद झाले. त्यांना त्रिवार प्रणाम!
इतरही अनेक निष्पाप लोक अन पोलिस लोक जखमी वा मृत झाले आहेत...
अजून किती दिवस हिन्दुस्तान हा असला तमाशा बघत बसणार आहे..? राजकीय फायदा तोटा च्या गणितात पुन्हा किती वेळा सर्वसामान्य बळी पडणार आहेत देव जाणे... अजून काय बघायचे बाकी आहे?
आता तरी सुधरा म्हणाव्..देशहीताचा विचार करून या अतीरेकी प्रवृत्तींन्ना (मग कुठलाही धर्म जात पात असो..) ठेचून काढा.
आंतरराष्ट्रीय स्तरवार या घटनेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत... ९११ नंतर अमेरिकेत कुठलाही मोठा अतीरेकी हमला झालेला नाही अन भारतात रोज एक होतोय... "महासत्ता" होवू पहाणार्या भारताला अजून बराच घरचा कचरा साफ कराय्चा आहे..
असो.
(पुन्हा पोटा, टाडा चे नारे दिले जातील, राजकीय वादंग माजेल, चर्चा होतील, जखमी अन मृत याना चार पैसे मदत काहिर केली जाईल, चौकशीची आश्वासने दिली जातील.. उद्वीग्नता, हतबलता, चीड, संताप, दुख्ख, यात सामान्य मनुष्य भरकटत राहील आणि षंढ संवेदनांच्या मार्गावर मुम्बई धावत राहील.... ज्या देशाचा राजाच नपुंसक त्याची प्रजा काय निपजणार?)
ओह ओके. पण
ओह ओके. पण आता त्यांनी ते संभाषण लाईव्ह ऐकवले. शाहत उल्लाह असे नाव सांगितले त्या माणसाने.
***
:(:राग:
अल्पसंख्य
अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या आक्रोश अशी पुंगी का वाजविली जातीय हे कळत नाही. मग ते सर्वच अल्पसंख्यांक १५ कोटी मुस्लीम अतीरेकी मार्गानेच प्रश्न सोडवू आहेत असाच ध्वनीत अर्थ होतो. असे काय आहेत त्यांचे प्रश्न जे इतर भारतीयांपेक्षा वेगळे आहेत हे मज पामराला काही कळत नाही. बिच्चारे मुस्लीम ही पुंगी परत सुरु झाली.
त्या दिपक चोप्रा ने तर पुंगी बरोबरच गुजरातला मध्ये आणले. पुस्तकं कोणी विकत घेत नसल्यामूळे तो न्यूज मध्ये शिरला वाटतं. बाय द वे गुजरातची जितकी प्रगती मोदीने केली त्याचा शतांशपण इतर राज्यकर्त्यांनी केली नाही हे दिपक चोप्राला कोणी तरी सांगायला पाहीजे.
उद्या मग दलित, शिख, झालेच तर मराठा, यादव, ब्राम्हण मग परत त्यात कोब्रे आणी देब्रे यांनी स्फोट घडवून आणावेत काय? हे लोक अ आणी आ वक्तव्य करत आहेत हेच खरे.
you lost the bus over the years, your PM should have been like George Bush, who stopped the terrorist activities ON SHORE of america. Your President should have done that long ago.
हे मला माझ्या अमेरिकन मित्राने फोन करुन आत्ताच सांगीतले. डुब्याने निदान अमेरिकेत परत टेररिस्ट लोकांना उभे राहु दिले नाही, हे मान्य करावेच लागेल. त्या कलिगला मला काही उत्तर देता आले नाही.
तटी - मी देशद्रोही मुस्लीमांचा विरोधात आहे, इतरांचा नाही.ाही.
ओबेरॉय ताज
ओबेरॉय ताज आणि नरिमन हाऊस मधे गोलीबार सुरु आहे आनि ओबेरॉय च्या बाहेर जिवंत बॉब सापडला.........
तो इ मेल
तो इ मेल रशियातून आला आहे असे कळाले.
ताज मधील ऑपरेशन संपले असे ही cnn सांगतय. ओबेरॉय अजुन चालू आहे. पण आय बि यन मराठी वर तशी न्यूज नाही.
उलट मला
उलट मला आवडलं दिपक चोप्रा बोलला ते. तथ्य होतं त्यात काहीतरी. नंतर सीएनएन वर कोण तो जॉन आला होता, एक लावावीशी वाटली त्याच्या श्रीमुखात. भारताने म्हणे आत्ताच टेररिझमचा क्लब जॉईन केलाय. बाकीचे देश म्हणे खूप आधीपासून याचे परिणाम भोगत आहेत. होमवर्क करुन ये म्हणावं बोलण्यापुर्वी.
अँडरसन कूपरमध्ये तरी दाखवताहेत की ताजमध्ये सगळ्यांना रेसक्यू केलंय,हॉस्टेज धरून.
नाही.
नाही. ताजमध्ये अजून ओलीस आहेत. आणि माझी मैत्रिण अजूनही बेपत्ताच.
दिपक
दिपक चोप्रा एवढा कोण आहे इतकं अधिकाराने बोलणारा? काय ते योगा बिगा करत बस ना.
बाकी अभ्यास न करता इकडच्या देशांविषयी बोलायचं ही तर अमेरीकन राजकारण्यांची खासियत.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
Pages