Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36
मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ताजमधे
ताजमधे अजून शंभरावर ओलीस आहेत असं इथे NDTV वर दाखवतायत.
चिनूक्स, hope your friend is ok.
http://indiatoday.digitaltoda
http://indiatoday.digitaltoday.in/index.php?option=com_content&issueid=7...
September 14, 2008 news
... has now threatened to carry out attacks in India's financial capital - Mumbai.
भयंकर आहे
भयंकर आहे सगळं.. खरंच आपण इकडे वांझोटी चर्चा करायची आणि जे होतं ते मुकाट पहायचं. कोणताही पक्ष सत्तेवर येवो, हे असंच चालू राहील जोवर जनता निवडणुकीवर बहिष्कार घालत नाही, प्रत्येक प्रश्नावर रस्त्यावर उतरत नाही (कोणत्याही राजकारणी लोकांच्या सहभागाशिवाय), सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाब विचारुन सळो की पळो करत नाही तोवर हे असेच चालायचे. आज कोणत्याही राजकीय पक्षाला जनता जाब विचारेल ह्याची भीती वाटत नाही, हीच शोकांतिका आहे..
अजूनही
अजूनही कारवाई सुरुच आहे का? इतका वेळ का लागतोय?
चिनूक्स, तुझी मैत्रीण सुरक्षित असो, ही सदिच्छा.
बापरे,
बापरे, कोणत्या बातम्या खर्या नी कोणत्या खोट्या? सीएनएनवर कधीपासून दाखवतायत की ताजमधून सगळ्यांना सोडवलंय.
चिनूक्स, तुझी मैत्रिण सुखरुप असेल अशी आशा करुया.
map of attacks and some
map of attacks and some description.
http://english.aljazeera.net/news/asia/2008/11/20081126211658764667.html
http://english.aljazeera.net/news/asia/2008/09/2008913161531128475.html
डोके बधीर
डोके बधीर झाले आहे...
अशोक कामटे सोलापुरात कमिशनर असताना त्यांची भेट झाली होती,जबरदस्त माणुस होता;
काय लिहावे कळत नाहीये.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
खरंच! बधीर
खरंच! बधीर झालेय डोके आणि प्रचंड धक्काही बसला. अतिशय निंदनीय कृत्य.
ताजमधे अजूनही १००वर लोक अडकले आहेत. आगही आटोक्यात नाही आली अजून. सगळीकडे ताजच्याच बातम्या आहेत. इतर ठीकाणी काय परिस्थिती आहे हे दाखवत/सांगतच नाहीयेत.
ताजवर हल्ला केलेल्या तरूणांचे फोटो दाखवले, कॉलेजमधे जाणारे साधे युवक कसे दिसतील तसे होते. तरूण, पाठीवर सॅक पण हातात गन्स!
इतक्या पोलिसांना मारणे म्हणजे फारच भयंकर गोष्ट. पोलिस त्यांच्यावर झालेले हल्ले खपवून घेत नाहीत. याचा बंदोबस्त नक्कीच करतील ते. ते नालायक राजकारणी मधे नाही पडले पाहिजेत, किंवा त्यांना जुमानले तरी नाही पाहिजे!
सीएनएनवर
सीएनएनवर कधीपासून दाखवतायत की ताजमधून सगळ्यांना सोडवलंय.
---- मी पण CNN हेच एकलय.
सीएनएनवर
सीएनएनवर कधीपासून दाखवतायत की ताजमधून सगळ्यांना सोडवलंय.
---- मी पण CNN हेच एकलय.
आत्ता
आत्ता मटावर ह्या अतिरेक्यांचे फोटो पाहिले, किती लहान वयाचे युवक दिसताहेत! कदाचित २२-२३ वगैरे.. पण किती भयानक कृत्य! किती ब्रेन वॉशिंग केलं असेल ह्यांच! काय आणि कसं, काहीच कळत नाहीये...
मुंबई हळूहळू मूळपदावर म्हणे... दुसरं काही ऑप्शन आहे का मुंबईकरांकडे?
ताजच्या
ताजच्या बाहेर बॉम्ब सापडला. ndtv, ibnच्या अनुसार आत अतिरेकी आहेत. १० ब्राझिलीयन नागरिक ओलीस ठेवले आहेत, आणि कमांडो कार्यवाही सुरू आहे.
.
माझी मैत्रिण बंगलोरहून एका परिषदेसाठी आली होती. काल रात्री ताजमध्ये पार्टी होती. एकूण २३ लोक होते त्यांच्या गटात. त्यांपैकी सातजणांचा अजून पत्ता लागलेला नाही.
तुमच्या
तुमच्या सर्वांशी मी अगदी सहमत आहे. हा हल्ल्याने मी स्वतः मुळापासून हादरुन गेले आहे. दहशतवाद अगदी दाराशी येउन ठेपल्याची जाणीव होत आहे. खूप अस्वस्थ वाटत आहे, ह्या लोकांना दुसर्या लोकांना ज्यांना त्यांनी कधी पाहीलही नाही त्यांना मारताना काहीच कस वाटत नाही.
भीषण आहे हे सगळ!!!!
अरे, इथली
अरे, इथली बरीच मंडळी अन त्यांचे बाहेरचे गॉड्फादर यांनी करकरेंच्या ए टी एसविरुद्ध काल रात्रीपर्यन्त गरळ ओकली होती ना? आता एकदम नक्राश्रू? ये बात हजम नही हुई.. परवा १ तारखेस ए टी एसच्या विरोधात महाराष्ट्र बन्द आहे. त्याला बीजेपी पाठिम्बा देत नाही. महाराज , बोम्बलनारे सत्तेत होते त्याना कोनत्याही सरकारच्या मर्यादा माहीत आहेत पण लोकांची दिशाभूल करायची संधी करायला काय जातेय? एटीएसच्या विरोधात मुसलमानानी अन एन जी ओनीही बोम्बलायचे अन हिन्दूनीही ! वा खासा न्याय... 'आमचे 'लोक सोडून एटीएसने नि:पक्षपाती असावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा....
इथे गळा काढणारानी एखादी ग्रामपंचायत तरी चालवून दाखवावी!
,---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
नुस्त्या
नुस्त्या बंदुका नाहीयेत त्यांच्या कडे, ग्रेनेड्शी आहेत आणी त्यात लोक "होस्टेज" आहेत.... त्या मुळे वेळ लागत असावा.. ताज पाशी तर मिलीटरी बेस तयार झालाय पार... पोलीस फक्त बंदोबस्ताला दिसतायत, बाकी सगळे आर्मी, नेवी वालेच ....
http://maayboli.com/node/4625
http://maayboli.com/node/4625
ताज आणि
ताज आणि ओबेरॉयमधील अतिरेकी सैन्य व NSGच्या हालचाली टिव्हीवर बघत आहेत, असं पोलीसांच्या लक्षात आलं आहे. टिव्हीवरील कव्हरेज बघून ग्रेनेड्सचे स्फोट घडवण्याचं काम सुरू आहे.
भीषण आहे
भीषण आहे हे सगळं...
काहीच न सुचण्याइतकी बधीरता आलीये... इतक्या मैलांवर आपली ही अवस्था, तिथे त्यातून भरडून निघणार्यांचं काय होत असेल!
देवा... सोसण्याचं बळ दे... आधी त्यांना मग उरलच तर आम्हाला.
आता ह्यातून दंगे नको उसळायला... निरपराधच मरणार रे....
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
मुंबईस्थि
मुंबईस्थित मायबोलीकर ... आशा आहे की तुम्ही सर्व सुखरूप आहात. जमेल तसे आम्हाला तुमची खुशाली कळवा...
================
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
टोणगा,
टोणगा, करकरेंविरुद्ध बोलत होते, म्हणजे त्यांचे काम, पद्धत मान्य नसेल, ते अश्या रीतीने शहीद झालेत याचे सर्वांनाच दु:ख आहे.
राजकारण्यांनी मात्र इथे आपल्या पोळ्या भाजणे बंद केले पाहिजे. काहीतरी ठोस कृति करून आपली निष्क्रियता झाडून, लोकांचा विश्वास थोडा तरी परत मिळवायला हवाय. एक चांगलं नेतृत्त्व हवंय या परिस्थितीत.
आता आपल्या
आता आपल्या देशाच्या नागरीकांची सुरक्षा विरूद्ध परदेशी नागरीकांची सुरक्षा असा प्रश्न निर्माण होऊ पहातोय.
सैन्य घुसवून अतिरेक्यांचा बीमोड करायचा तर परदेशी नागरीक ओलिस.
त्यां परदेशी नागरीकांना वाचवायचे तर अतिरेकी हल्ल्यात आपले अजून कैक नागरीक मरणार.
कोण महत्वाचं? आपले नागरीक की परदेशी? बाहेर देशाची प्रतिमा, पर्यटन इत्यादी कारणांसाठी परदेशी नागरीकाचे पारडे जड की आपला नागरीकाप्रति सरकारचे कर्तव्य पहिले आहे त्यामुळे आपले पारडे जड?
काय म्हणता लोकहो?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सैन्याने
सैन्याने दूरचित्रवाहिन्यांना live coverage दाखविण्यास बंदी घातली आहे. नरिमन हाऊसमध्ये अजून ओलीस आहेत. तिथून ३ ज्यू नागरिक पळून बाहेर पडले. आत अजून बरीच कुटुंबे अडकली आहेत.
मुंबईस्थि
मुंबईस्थित मायबोलीकर ... आशा आहे की तुम्ही सर्व सुखरूप आहात.
---- सर्व थिजलेले, गोठलेले आहेत...
आता ह्यातून दंगे नको उसळायला... निरपराधच मरणार रे....
---- जनता आता हुशार झाली आहे, अशा हल्ला करण्याच्या घटने मागे दंगे व्हावेत हा पण एक उद्देश असतोच, किमान त्या बाबतीत तरी त्यांना अपयश येते/ आलेले आहे.
कमाल आहे...
कमाल आहे... मिडीयावाल्यांना लाईव कवरेज दाखवु नका हे आधीच सांगितलेल नाही
बडे
बडे मियांच्या बाहेर बाँब सापडला..
बडे
बडे मियांच्या बाहेर बाँब सापडला.. ??
ते अतिरेकी
ते अतिरेकी स्पीडबोट ने मुंबईत दाखल झाले सर्व शस्त्रांनीशी...आणी त्यांना तिथल्या ४ स्थानिक कोळी बांधवांनी पैसे घेऊन मदत केल्याचे वृत्त आहे...कसले बांधव !!!!पैश्यांसाठी आपल्याच लोकांच्या प्रेतांच्या टाळुवरचे लोणी खायला लोकं कमी नाही पडत आहेत...१०० हुन अधिक लोकं मारली गेली आहेत...
आणी मुख्य म्हणजे हे जे कोणी so called टेररीस्ट्स आहेत...अर्ध्याहुन आधिकांना तर धड मिसरुड ही फुटलंय नाही...एवढ्या लहान वयात ही भावना कशी येते ह्यांच्यात ....:(
*****************
सुमेधा पुनकर
*****************
८ कि. आर डी
८ कि. आर डी एक्स सापडलय ताज माग्च्या होटेलात आणी भरमसाठ कॅश हिलटन मध्ये..
सकाळपर्यं
सकाळपर्यंत दाखवत होते लाइव्ह. रात्री तर मानसिक त्रास होऊ शकतो अशी सूचना पण देत होते.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
We want all Mujahideen
We want all Mujahideen released: Terrorist inside Oberoi -- Times of India
Pages