Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36
मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माफ करा पण
माफ करा पण आपण सगळेजण इथे वारंवार बातम्या follow करतोय, हळहळ व्यक्त करतोय, मृतात्म्यांना श्रध्दांजली देतोय आणि म्हणतोय की कृती करायची वेळ आली आहे ..
पण कृती करणार तरी कोण आणि कशी???????
मुंबईकर थोड्याच दिवसांत हे विसरून जातील .. अहो पण त्यांनाही त्यांच्या पोटापाण्याची काळजी करायलाच हवी ना?
काय कृती करायला हवी आणि ती कशी implement करता येईल आणि ती कोण implement करणार?
ह्याची उत्तरं सापडत नाहीत तोपर्यंत नुसतीच हळहळ व्यक्त करणारे आपणही भेकडच ना???
आर. आर.
आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ ताजच्या इथे आलेत म्हणे.. कोणीही काळजी करायची गरज नाही, असं सांगितल म्हणे...
सामान्य
सामान्य माणसाने कायदा अन (सु?)व्यवस्था हाती घ्यायची वेळ आलीये. त्याशिवाय काहीही खर नाही.
----- मुंबईवरील भेकड हल्ल्याचा निषेध -----
कृती? ती
कृती? ती काही भारताकडून या जन्मी शक्य दिसत नाही. गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या पायवाटेवर आपण चालणार. आपली माणसं मरतायत ना, मरेनात का? आपल्याला काय त्यांचं.भारतात दरवर्षी किती दहशतवादी हल्ले होतात त्याची काहीही मोजदाद नाही. उद्यापरवा पासून सगळं सुरळीत चालू होईल. झालं गेलं विसरुन मोठ्या मनाने दहशतवाद्यांना माफ करतील. पाकिस्तान विरुद्ध मोठ्या युद्धाची वेळ आता येऊन ठेपलेली आहे.खूप झाला भ्याडपणा.
गोठलेल्या
गोठलेल्या संवेदना खरच.
आपण फक्त श्रद्धांजल्या वहायच्या आणि आपल्या लोकांना काळजी घ्यायला सांगायचं, वांझोटा संताप आतल्याआत गिळून टाकायचा.
काय करायचं? कसं करायचं?
अर्रर त्या
अर्रर त्या आबा पाटलाची मुलाखत बघीतली. तो रडल्या सारखा बोलतोय. किती आतंकवादी विचारले तर कैसा पता चल सकता है म्हणे. अरे ५ तास झाले की येड्या. लगेच छगनने बोलायल सुरु केले निदान तो चांगला तरी बोलला. अशा कमकुवत मनाचा माणसाला गृहमंत्री पदावर राहायचा काही हक्क नाही.
हो. अर्र
हो. अर्र आबा तर रडायच्याच बेतात होते.
सामान्य
सामान्य माणसाने कायदा अन (सु?)व्यवस्था हाती घ्यायची वेळ आलीये. त्याशिवाय काहीही खर नाही. >>>> बघा आपणही असा विचार करतो. अगदी असाच विचार करुन कदाचित प्रज्ञा सिंग तो स्फोट घडवला असन्याची शक्यता आहे.
आपणही भेकडच ना >> बरोबर आहे. आपण ही जनते मध्येच येतो. पाय लावून पळनारे. चर्चा करुन काही साध्य नाही हे माहिती असुनही करतोय कारण नाहीतर त्या रागाचा, उद्वेगाचा निचरा कसा होनार?
ताजला
ताजला भयंकर आग लागली आहे..
मी बघत आहे
मी बघत आहे आत्ता मुलाखत.. खरच आबा पाटील अगदीच मुळूमुळू बोलत आहेत..
साशल, तुमचा मुद्दा एका परीने बरोबरच आहे, पण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाच्या हातात डायरेक्ट काही करण्यासारखे नसले म्हणून मी हळहळही व्यक्त करायची नाही का? तो भेकडपणा कसा? कोणत्याही देशाच्या कल्याणाला पोषक असे निर्णय घेण्याची जबाबदारी त्या देशाचा राज्यकारभार चालवणार्यांची नाही का? त्यासाठीच त्यांना त्या पदांवर तनखा देऊन नेमलेले असते ना?
आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सगळेच स्वतःची पोळी भाजणारे, आणि कणाहीन असे राज्यकर्ते आहेत आपले. जनमताचा आदर होतोच कुठे?
ताज मधे
ताज मधे स्फोट झाले.. खूप आग लागलेल दिसत्ये ५व्या मजल्यावर.. !!
आबांची मुलाखत . अरे अरे.. !
तरी अजून दुसरे पाटिल नाही आले..
दहशतवादाच
दहशतवादाचा इतका त्रास होऊनही इथे दहशतवादाचं समर्थन सुरूच. कठीण आहे.
ते जे
ते जे आत्तच ताज आणी ओबेरॉय मध्ये स्फोट झाले ते कदाचित पळून जाण्याची तयारी म्हणून लावन्यासाठी पण असेल.
अरे केवढे
अरे केवढे धुराचे लोट निघत आहेत ताजच्या घुमटाच्या बाजूने..
ताजमधे
ताजमधे फायरींग सुरुच
----- मुंबईवरील भेकड हल्ल्याचा निषेध -----
चिन्मय मी
चिन्मय मी समर्थक नाही. तूझा गैरसमज होतोय. तो तू करायला मोकळा आहेस. मी फक्त ऐवढे सांगीतले की लोक चिडलेत. त्यातून अशा घटना होत आहे. मी प्रज्ञा चा समर्थक अजिबात नाही. आणी कुठल्याही दहशत्वादाचा नाही. त्यापुर्वी कदाचित हा शब्द आहे तो देखील लक्षात घे. घटनेला फक्त अडंरस्कोअर केले. इतकेच.
केदार, point taken
केदार,
point taken
अतिरेक्यांनी त्या घुमटावर ग्रेनेड्स ठेवले आहेत म्हणे. केवढी प्रचंड आग लागली आहे..
IT अगदी हेच
IT अगदी हेच लिहायला आले होते. ताज तर पुर्ण धुरांनी वेढलय, म्हणजे पोलीसाना काम करणे अजुन कठीण जाणार.
सी एन एन अजुनही २०० जखमी असेच सांगतय, ९०० दुसरीकडे कुठे वाचले सॅन्टीनो तुम्ही?
ITgiril, माझा
ITgiril,
माझा हेतू इथे वादविवाद निर्माण करण्याचा अजिबात नव्हता .. पण मी ज्या हळहळ व्यक्त करणार्या लोकांना भेकड म्हणतेय त्यात मी ही आलेच ..
आणि जोपर्यंत आपण हळहळ च व्यक्त करतोय तोपर्यंत आपण भेकडच ..
माझी तळमळ ह्याचसाठी आहे की काय केल्याने ह्यापुढे असे हल्ले अजिबात होणार नाहीत हे मला तर अजिबातच ठाऊक नाही पण कोणा दुसर्याकडूनही काही कळत नाही ..
म्हणूनच तुझ्या माझ्यासारखा सामान्य माणूस फक्त हळहळ व्यक्त करतो .. पण नैसर्गिक नियमाप्रमाणे life has to go on .. कदाचित वर कोणीतरी मुंबईकरांना बोल लावलेत की ते विसरून जातील ही घटना लवकरच तेच लागलं असेल माझ्या मनाला आणि माझाही उद्वेग बाहेर पडला, इतकंच ..
times of india च्या
times of india च्या वेबसाईट वर...
दर २-३
दर २-३ मिनीटाला फायरींगचे आवाज येतायत म्हणे.
----- मुंबईवरील भेकड हल्ल्याचा निषेध -----
सरकार भेकड
सरकार भेकड तसेच हे सर्व सहन करनारी जनता भेकड.
केदार, तुमचा मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर आलेला उद्रेक मला चांगला समजला. माझेहि तसेच होते, मी सुद्धा तसेच लिहीले असते. पण जरा विचार केला नि थांबलो.
आता लोकांनी करावे तरी काय? पोलिसांनी तरी काय करावे? मला तर काहीच कळत नाही. तेंव्हा त्यांना दोष देण्याचा मला अधिकार नाही.
साशल,
साशल, तुमच्या म्हणण्यात काही चूक आहे असं नाही म्हणायचय मला..
ही बाई
ही बाई सारखी सारखी WTC शी काय compare करत्ये.. !!!
कामा
कामा हॉस्पिटलात पाच डॉक्टर्स मृत्युमुखी..
आणि ताजचा तो प्रसिद्ध घुमट जवळजवळ नष्ट झाला आहे.
मुंबईची शान होती ती..
<< आता
<< आता लोकांनी करावे तरी काय? हे हल्लेखोर कदाचित्, पाकीस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथून राजरोस आलेले असतील! >>
हो ना... मलाही असंच वाटतं.... आपल्या देशाची बॉर्डर चांगली सील्ड नाहिये... अगदी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसाठी आलेले बरेच (५०० वगैरे) प्रेक्षक परतच जात नाहीत...तिकडे बांग्लादेशातून लोक सरळसरळ आत येऊ शकतात... अशा वेळी पोलीस तरी काय करणार...
खरेच इतके
खरेच इतके कठीण, अशक्य आहे का अतिरेक्यांचे मूळ उखडणे? का त्यांचे मूळ उखडताना बर्याच संभावित राजकारण्यांचे मुखवटे गळून पडतील ही भीती असल्याने खरेखुरे प्रयत्नच होत नाहीत त्या दिशेने? नागरीकांच्या जीवाला काही किंम्मत आहे की नाही?
जबरदस्त
जबरदस्त धक्का दिला आहे. पोलीस, लष्कराच्या जवानांना लवकरात लवकर यश मिळो. युद्धात शत्रु तरी माहित असतो, हे तर त्या ही पेक्षा भयंकर आहे.
मुंबईत आज
मुंबईत आज सर्व शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर.
ऑफिसेसचं
ऑफिसेसचं काय? त्यांना नाही का सुट्टी?
Pages