मिल्या यांचे रंगीबेरंगी पान

परत पाठीमागे

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मूळ गझल : माझीच गझल पाठीमागे Happy

सरदाराचे ’हात’ बांधले पाठीमागे
स्वत:च डावे उलटे पडले पाठीमागे

जरा कुठे तो शाहिद विद्येसोबत दिसला
पेव कसे अफवांचे फुटले पाठीमागे

पाठ फिरविली तिने जरी माधुरी प्रमाणे

विषय: 
प्रकार: 

तुझ्या कथेला लागलं नाट

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

चाल : तुझ्या उसाला लागंल कोल्हा

बघ सांभाळ लिखाणास नीट
तुझ्या कथेला लावंल नाट गं
तुझ्या कथेला लावंल नाट ॥

मूळ लिखाण साधं सोपं
वर प्रतिसाद मिळती मोपं
हे कुणाच्या डोळ्यात खुपं

विषय: 
प्रकार: 

अंदाज ढापण्याचा

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मूळ गझल : इलाही जमादारांची सुरेख गझल अंदाज आरश्याचा

अंदाज ढापण्याचा, वाटे खरा असावा
बहुतेक सुंदरीचा, तो चेहरा असावा

जखमा कश्या हजारो झाल्यात थोबड्याला
केलेत वार ज्याने तो वस्तरा असावा

विषय: 
प्रकार: 

तू

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आपल्या धर्माप्रमाणे वाग तू
जीवना नाहीस पाणी! आग तू

उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू

भेटण्याचे वचन जे होते दिले
येउनी स्वप्नात त्याला जाग तू

सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग तू

विषय: 
प्रकार: 

तुमको देखा तो ये खयाल आया

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

तुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद

तुला पाहुनी वाटले त्या क्षणाला
तुझी सावली तप्त ह्या जीवनाला

मनी आज जागे नवी एक आशा
पुन्हा मीच खुडले नव्या अंकुराला

उमजले तुझी पावले दूर जाता

प्रकार: 

जवा खडूस पाँटींग हा...

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मूळ गाणे

आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं
शेजारची ही काळी मैना लागली डोलायला
तवा लागली डोलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला

काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट

विषय: 
प्रकार: 

श्री गणेशाय नमः

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

रंगीबेरंगी चे पान मिळून खरे तर एक वर्ष होउन गेले पण त्यात कसे रंग भरावे कळत नव्हते आणि अजूनही कळत नाहीये. Sad

विडंबने इकडे टाकली तर गुलमोहर सोडून लोक इकडे येउन वाचतील ह्याची खात्री नाही ... मग काय लिहावे बरे?

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मिल्या यांचे रंगीबेरंगी पान