"स्वदेशी" खरा जनक कोण?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे जनक म्हणून महात्मा गांधीना पाहीले जाते. ते खरोखरच ह्या विचाराचे जनक आहेत का? की ह्या विचाराचा जनक दुसराच कोणीतरी आहे ह्या बाबत मी शोध घेत होतो. आणि अहो आश्चर्यम. मला बहुदा ह्या विचाराचा जनक सापडला.

वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी "स्वदेशी" वापर करा हा विचार मांडनारा फटका लिहनारा बालक होता विनायक दामोदर सावरकर. त्याने हे पत्र प्रसिध्द ही केले होते. ह्या पत्राअंतर्गत त्याने लोकांना स्वदेशी वापरन्याची महती सांगीतली व विदेशी गोष्टी सोडून स्वदेशी आग्रह केला. ह्या फटक्यात लेखकाने जनमाणसांतील विर वृत्तीला जूने वैभव सांगून जागृत करन्याचा प्रयत्न देखील केला.

लिखान साल १८९३.
गांधीजी सन १८९३ ते १९१४ अफ्रिकेत असल्यामूळे भारतातील घडामोडींचा अंदाज त्यांना न्हवता तसेच तेंव्हा त्यांनी समाजकारनासाठी जिवन व्यतीत करायचे का नाही हे ही ठरविले न्हवते. शिवाय १९०५ मध्ये ही बंगालात, बंगाल फाळनी झाल्यावर मोठ्या प्रमानावर विदेशी वस्त्रांची होळी झाली होती. त्या काळी पंजाब, महाराष्ट्र व बंगालच्या मातीतून क्रांतीकारक जन्मले व समान विचारांच्या युवकांनी ह्या तिन्ही राज्यात धूम केली होती. सावरकरांनी इंग्लडात शिकत होते तेंव्हा भिकाजी कामा, वर्मा, बापट व इतरांसोबत स्वदेशीची पत्रके गुप्तरितीने भारतात पाठवीली होतीच, त्यामूळे नायरांसारखे इतिहासकार असे मानतात की सावरकरांच्या अश्या पत्रंकामूळेच दक्षिन भारतात स्टूंडट अनरेस्ट सुरु झाली.

१९०५ मध्ये तर गांधी भारताच्या राजकिय पटलावरही न्हवते पण स्वदेशी चळवळीचे श्रेय त्यांनाच दिले जाते. का बरें? महात्मा गांधीनी तूकारामाचे विचार लोकांना सांगीतले हे आपणाला माहीत असेलच, त्यांचा वैचारिक विरोध करनार्‍या स्वातंत्र्यविराचा विचार ही त्यांनी पुढे नेला, पण योग्य ते श्रेय त्यांना दिले नाही.
गांधी ग्रेट की सावरकर ह्या या लेखाचा मुद्दा नाही. दोघेही ग्रेटच आहेत.

पण मग गांधीनी ही गोष्ट आम जनतेला का नाही सांगीतली हा आमचा सवाल?

ह्यावर अजुन संशोधन करुन इतिहासकारांनी योग्य ती दखल घ्यावी व योग्य तिथे इतिहास निट लिहीला जावा असे मनापासून वाटते.

हा घ्या पुरावा.

"देशी फटका'
लिखान साल १८९३.

आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा ।
हटा सोडनी कटा करुया म्लेंच्छ पटां ना धरु कदा ।।१।।

काश्मीरच्या शाला सोडिनु अल्पाकाला कां भुलतां?।।
मलमल त्यजूनि वलवल चित्ती हलहलके पट कां वरितां?।।२।।

राजमंहेद्री चिटा त्यजुनि विटके चिट हे कां घेतां?।।
दैवे मिळता वाटि, इच्छितो नरोटि नाही कां होता! ।।३।।

येविल सोडिनु पितांबरांना विजार करिन्यांसाठि महा ।।
बेजारचि तुम्ही नटावयामधि विचार करितो कोणि न हा ।।४।।

केलि अनास्था तुम्हिच स्वत: मग अर्थातच ती कला बुडे ||
गेले दिन हे नेले हिरूनी मेले तुम्हि तरि कोण रडे? ।।५।।

अरे आपणच होतो पूर्वी सर्व कलांची खाण अहा ।।
भरतभूमिच्या कुशीं दिप ते कलंक आतां आम्ही पहा ।।६।।

जगभर भरुनी उरला होता नुरला आतां यापार ।।
सकलहि कलाभिज्ञ तेघवां अज्ञ अतां अरिही थोर ।।७।।

निर्मीयली मयसभा आम्हिच ना? पांडव किरीटी आठवारे ।।
मठ्ठ लोकहो! लाज कांहितरी? लठ्ठ असुनि शठ बनलोरे ।।८।।

आम्रफलाच्या कोयीमध्ये धोतरजोडा वसे सदा ।।
होते जेथे प्रतिब्रम्हेंची धिक मी जन्मुनि अपवादा ।।९।।

हे परके हरकामीं खुलविती भुलविती वरवर वाचेने।।
यवहार रीती ऐशि बरोबर सदा हरामी वृत्तीने ।।१०।।

कामधेनुका भरतभूमिका असूनि मग कां ही भिक्षा ||
सहस्त्र कोसांवरुनि खासा पैका हरतो प्रभूदिक्षा ।।११।।

नेती कच्चा माल आमुचा देती साचा पक्व रुपे ।।
आमुच्या वरतीं पोट भरीति परो थोरि कशाची तरी खपे ।।१२।।

पहा तयांची हिच रित हो! भिती नसे त्या लबाडिला ।।
नाना कर्मे नाना वर्मे देश आमुचा लुबाडिला ।।१३।।

निमुली हातामधलीं फडकीं फडकत नाना ध्वज वरतीं ।।
हडलहप्पसे करुनि शिपाई निघत स्वारी जगभर ती ।।१४।।

नाना परिचे रंग भरीती रंग पुंप ते दंग करी ।।
मोर, कावळे, ससे, पारवे, श्वापद विचरती तीं बकरीं ।।१५।।

राजगृहीं गोपुरी झळकती मजले सजले त्यामधुनी ।।
सुंदर नारी दु:ख हर्ष भरि त्या बघित शोभा तरुणी ।।१६।।

नाना जाती पिकली शेती गार हिरवे वस्त्र धरी ।।
भात बाजरी गहूं गाजरी आच्छादली हि भूमि बरी ।।१७।।

अगनग गेले गगन चुंबिण्या सर्व थोरबहु कोराकि ।।
भास पुरुषची निजांकि बसवी स्वानंदाने पोरां की ।।१८।।

चित्र ऐशीं दाविति छत्रे विचीत्र तूम्हा भुल धंदा ।।
तुम्हिंहि भुलतां पहातां घेतां क्षणांत स्वपटाला निंदा ।।१९।।

याला आतां उपाय बरवा एकी करवा मन भरवा ।।
ओतप्रोते अभिंमाने हरवा देशी धंदे पट करवा ।।२०।।

परके वरवर कितीहि बोलती गोड गोड तरि मिनं समजा ।।
सुंदर म्यानीं असे असिलता घातिच होइल झट उमजा ।।२१।।

रावबाजि तरि गाजि जाहले राज्य बुडालें तरि मुख्य ।।
सख्य असे परि परकीयांचें गोष्ट ऋदयिं ही धरु लख्ख ।।२२।।

वैर टाकुं या यास्वत लौकर खैर करो परमेश्वर ती ।।
निश्चय झाला मागें अपुला परदेशी पट ना धरती ।।२३।।

चला चला जाउं या घेउं या देशि पटांना पटापटा ।।
जाडे भरडे गडे कसेही असो सेवुं परि झटाझटा ।।२४।।

ना स्पर्शू त्या पशूपटाला मउ वरि विखार तर भावूं ।।
घेऊं खडतर अंतीं सुखकर धर्मचि मानुनियां राहूं ।।२५।।

द्रव्य खाणि हि खोरे घेउनि परकीपोरें खणतिरें ।।
एकचिंत करुनियां गड्यांनो! वित्त जिंकूया पुररपिरे ।।२६।।

विश्चेश्वरि ती नारायणि ही यमहरि हर अदि सुरवरिणीं ।।
कर्म सिध्दीसी दावो नेउनि मोद देति निज भक्त जनीं ।।२७।।

दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रविज्ञान ।।
वरावयाला रत्न पटांनां करो आर्य ते रणदान ।।२८।।

कवितारूपी माला अर्पी आर्यं बंधुसीं सार्थक हो ।।
भक्तांकरवी मन देवांसी सेवा त्याशीं अर्पण हो ।।२९।।

स्वांतत्र्यविर सावरकर.

विषय: 
प्रकार: 

केदार, आणखी वाचायला आवडेल सावरकरांबद्दल.
एक शंका, सावरकरांच्याही आधी टिळकांनी केला होता ना स्वदेशीचा पुरस्कार?
त्याचाच भाग म्हणून एतद्देशीय शाळा आणि वृत्तपत्रं सुरू केली ना त्यांनी? (विकीपीडिआनुसार १८८१ साली)

स्वातीला अनुमोदन.
तुम्ही म्हणता तसे म्हणजे 'स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे जनक म्हणून महात्मा गांधीना पाहीले जाते' हे मी तरी या आधी कुठेही वाचलेले नाही त्यामुळे गांधींना त्याचे श्रेय द्यावे की नाही हा प्रश्नच येत नाही.
>>>पण मग गांधीनी ही गोष्ट आम जनतेला का नाही सांगीतली हा आमचा सवाल?>>> हे मला उगीच खुसपट काढल्यासारखे वाटते आहे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

छान माहिती केदार. अजून डीटेल्स मधे लिही.

स्वाती लोकमान्य टिळकांच्या बद्दल पण एक पॅरा मी आधी लिहीला होता. तो काढला नंतर तो थोडक्यात असा होता.

लोकमान्यानी १८९८ नंतर स्वदेशीचा पुकारा करुन चळवळ निर्मान करन्या बाबतीत पाउल उचलले. त्यांनी पूण्यात एक स्वदेशी वस्तू विकनारे दुकानं काढले व त्यातून स्वदेशी वस्तू विकावयास सुरु केल्या.
लोकमान्यांनी १८९८ नंतर हे केल्यामूळे व सावरकरांचे पत्रक १८९३ मधील असल्यामूळे मी तो प्यारा टाकला नाही.
लोकमान्यांचा खुप प्रभाव सावरकरांवर होता हे निर्वीवाद त्यामूळे कदाचित कुठल्यातरी भाषनात सावरकरांनी ते ऐकले असन्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ते त्या काळी दहा वर्षाचेच होते त्यामूळे किती वेळेस त्यांच्या भेटीचा योग आला हे ही माहीत नाही.
जनक कोण ह्या पुढे अजूनही ? आहेच. आणी मी तो शोध अजुनही चालू ठेवनारच आहे.

हे मी तरी या आधी कुठेही वाचलेले नाही. हे मला उगीच खुसपट काढल्यासारखे वाटते आहे. >>
इतिहासाची पुस्तकं जाऊ द्या फक्त swadeshi movement हा सर्च गुगल मध्ये मारा, य हिट्स मध्ये महात्मांचे नाव आहे. तूम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की मी महात्मा गांधी बद्दल खुसपट ह्या लेखात काढत आहे. तसे काहीही नाही. इतिहास जेंव्हा मांडला जातो तो निट असावा ह्याची अपेक्षा असते.

अवांतर -मग जर तूम्ही वाचलेच नाही तर तूम्हाला ह्या बद्दल मत का मांडावे वाटले हा देखील प्रश्न पडतोच.

<<लोकमान्यानी १८९८ नंतर स्वदेशीचा पुकारा करुन चळवळ निर्मान करन्या बाबतीत पाउल उचलले. त्यांनी पूण्यात एक स्वदेशी वस्तू विकनारे दुकानं काढले व त्यातून स्वदेशी वस्तू विकावयास सुरु केल्या<<>>

टिळकांनी सुरू केलेलं हे दुकान कँपात आहे. बाँबे स्टोर्स असं त्याचं नाव आहे.

केदारा, चांगल्या मुद्द्याला हात घातलास! मला माहीत असलेल्या अजून काही मुद्द्यांची भर घालतो. सावरकरांनी इ.स. १९०२ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या वेळेस पुण्यात/महाराष्ट्रात आणि भारतात स्वराज्याकांक्षी राजकारणावर टिळकांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. ब्रिटिश सत्तेच्या प्रसारात व्यापाराचा-अर्थकारणाचा मोठा वाटा होता ही गोष्ट टिळकांच्या समकालीन भारतीय विचारवंतांना प्रकर्षाने जाणवू लागली होती (नेमके संदर्भ हवे असतील, तर मला थोडं शोधून सांगावं लागेल.) आणि त्यावर तोडगा शोधण्याची खटपटही चालली होती. या तोडग्यात ब्रिटिश मालाला - म्हणजे ब्रिटनात बनवलेल्या, तिकडून आणलेल्या किंवा ब्रिटिश व्यापारी कंपन्यांनी वितरलेल्या - नाकारून त्याऐवजी इथल्या लोकांनी बनवलेल्या मालाला प्राधान्य देण्याचं ढोबळ धोरण मुख्य होतं. या कालखंडात स्वदेशी या संकल्पनेला बाळसं धरू लागलं. पण बंगालाच्या इ.स. १९०५ मधील फाळणीनंतर ब्रिटिशांच्या वसाहती सत्तेला विरोध करण्याकरता लोकांकडून स्वदेशीच्या हत्याराचा - त्यातही ब्रिटिश/परदेशी मालाच्या होळीचा - वापर प्रतीकात्मक आणि दृश्य परिणाम घडवून आणण्याकरता वाढू लागला. खुद्द फर्ग्युसन महाविद्यालयात असताना सावरकरांनी आणि त्यांच्या कॉलेजमित्रांनी पुण्यातल्या डेक्कन परिसरात मुठेकाठी (सध्याच्या विमलाबाई गरवारे प्रशालेसमोरच्या नदीतीरापाशी) १९०५ च्या दसर्‍याला ब्रिटिश/परदेशी मालाची होळी योजली. त्या प्रसंगी त्यांनी टिळकांना आणि 'काळ'कर्ते शिवराम महादेव परांजप्यांना विचार मांडण्याकरता बोलावले होते. याचा अर्थ टिळकांचा, शि.म. परांजप्यांचा व समकालीन विचारवंतांच्या स्वदेशीवरच्या विचारांचा दृश्य आविष्कार होता असा तर्क बांधता येतो. 'काळा'तली पराजप्यांची संपादकीये याबद्दल लक्षणीय प्रकाश टाकू शकतील (या व अश्या संदर्भांचा उत्कृष्ट धांडोळा सदानंद मोर्‍यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या द्विखंडात्मक पुस्तकात घेतला आहे असं स्मरतंय.. माझ्याकडे सध्या ते पुस्तक हाताशी नाहीये; कोणाला ते संदर्भ मांडता आले तर उत्तम होईल!).

स्वदेशीची ही चळवळ आरंभी अशी परक्या मालाच्या होळ्यांच्या स्वरूपात दृश्य स्वरूपात अवतरली. हळूहळू स्वदेशीचं तत्त्व अर्थकारणाच्या इतर पैलूंमध्ये .. विशेषकरून उत्पादन/वितरणाच्या सकारात्मक मार्गाने (परक्या मालाची होळी हा मार्ग काहीसा नकारात्मक प्रतिक्रियावादी आणि मर्यादित परिणामकारकतेचा असतो.) कसं वापरावं याबद्दल विचार घुसळले जाऊ लागले. परक्या मालावर बहिष्कार/त्यांची होळी ही स्वदेशीच्या नाण्याची एक बाजू झाली; पण त्या मालाला पर्याय देशातून कसा उभारायचा या स्वदेशीच्या नाण्याच्या दुसर्‍या बाजूवरही लोकांनी लक्ष पुरवायला सुरुवात केली. कालरेषा पाहिल्यास यासुमारास टिळकयुगाची अखेर आणि गांधीयुगाची सुरुवात होते असं दिसतं. गांधींनी चरखा/स्वदेशी खादी कपडे वगैरे अंगांनी स्वदेशीच्या उत्पादन-वितरणाच्या बाबत सामान्य लोकांना साध्य अशा स्पेसिफिक उपक्रमांचा प्रसार केला.. ज्याला लक्षणीय यश लाभलं. स्वदेशीचं तत्त्व 'पॉप' मार्गांनी लोकांमध्ये पसरवण्याची कामगिरी गांधीमार्गाने साधली. पण स्वातंत्र्योत्तर भारतात लोकांमध्ये 'पॉप'-इतिहास मांडताना नेहरू/काँग्रेसी राजकारण्यांनी, त्यांनी नेमलेल्या पाठ्यपुस्तक मंडळांनी, पत्रकारादी माध्यमघटकांनीही स्वदेशीची ही अख्खी वंशावळ पुरेशी आणि न्याय्य पद्धतीने मांडली नाही असं दिसतं. गोष्टी आणि इतिहास सोपा करून सांगताना काही चुकीची समीकरणे पडून जातात; अख्खं चित्र जगापुढे येत नाही.. काहीसा असा प्रकार आपल्याकडे घडल्याने 'स्वदेशी=गांधी' असं समीकरण बळावलं.

>>टिळकांनी सुरू केलेलं हे दुकान कँपात आहे. बाँबे स्टोर्स असं त्याचं नाव आहे.
हो. कँपातल्या महात्मा गांधी रोडावर (योगायोगानं गांधींच्या नावाच्या रस्त्यावरच) हे दुकान आहे. Happy दुकानात टिळकांचा फोटो लावलेलं हे दुर्मिळ दुकान आहे!

बाकी, केदारा, ते सदानंद मोर्‍यांचं 'लोकमान्य ते महात्मा' (राजहंस प्रकाशनाने प्रकाशलंय) पुस्तक जरूर वाच.. विकतच घे. पुण्यात/मुंबईत गेलास तर तुला शि.म. परांजप्यांनी 'काळा'त लिहिलेली संपादकीयेही मिळतील... त्या पुस्तकाचं नाव मात्र मी विसरलो.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

लोकमान्य ते महात्मा अशी एक सिरीज साप्ताहिक सकाळ मध्ये प्रकाशित झाली होती.... ती हीच का? मी वाचले आहेत काहीकाही लेख कारण...

का़ळ कर्त्यांना विसरून कसे चालेल? Happy ती संपादकीय एकदा ह्याची डोळा पाहिली आहेत. तेंव्हा विकत न्हवती घेतली. आता मिळत नाहीत. ते पुस्तक वाचेन.

सावरकरांबद्दल एक गोष्ट जाणवते, त्यांनी वयाच्या ११-१२ व्या आधीच पुढे काय करायचे आहे ह्याचा खोलवर अभ्यास केला होता. मग ते स्वदेशी बद्दल असो, म्लेच्छांबद्दल असो , भेकड गाय मारून खाण्याबद्दल असो वा सशस्त्र क्रांती बद्दल. इथे एक घटना लिहीनार होतो पण सावरकरां बद्दल एक लेख पुढे लिहीन त्यात ती घटना टाकतो.

गोष्टी आणि इतिहास सोपा करून सांगताना काही चुकीची समीकरणे पडून जातात; अख्खं चित्र जगापुढे येत नाही.. काहीसा असा प्रकार आपल्याकडे घडल्याने 'स्वदेशी=गांधी' असं समीकरण बळावलं. >>>>

अगदी बरोबर. त्यामूळेच अश्या वेगळ्या काही गोष्टींचा मी शोध घेनार आहे व त्या मांडनार आहे. आत्त्ता भाष्य करने योग्य राहनार नाही पण निदान ३ विषय माझ्याकडे तसे आहेत ज्यावर येत्या काळात लिहीनार आहे Happy . इतिहासाचा विपर्यास करुन मांडला गेला आहे. इतिहास सोपा करने की वेगळाच सांगने हा उद्देश आहे हे अजुनही मला कळाले नाही पण काही गोष्टी पाहता तो, कोणालाही न दुखावता (खास करुन अल्पसंख्य लोक) मांडने हेच आपल्या लोकांनी पाहीले असे जाणवते.
इतर देशांचा इतिहासाचा अभ्यास करता हे जाणवते की त्यांनी 'जे आहे ते असच आहे' असा दॄष्टीकोण ठेवून मांडल्यामूळे कोणाला काही त्रास होत नाही. जे काही होत ते असच होत ही भावना आपोआप येते.

ऑफकोर्स इतिहास कसा मांडावा ह्यावर खुप मोठी चर्चा होऊ शकते.

केदार, एकतर गांधींना सावरकरांनी १८९३ म्ध्ये काय लिहिले होते हे माहिती होते का हा एक मुद्दा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गांधींनी स्वतः मी स्वदेशीचा जनक आहे असा वा या अर्थाच उल्लेख केला आहे का ? तसे असेल तर तुझ्या सवालाला अर्थ राहतो. तू जे दाखले देत आहेस, त्यात इतरांनी त्यांना श्रेय दिलेले दिसते.
तिसरे म्हणजे, जर ते स्वतः 'मीच अमुक एक गोष्ट सुरू केली' असे विधान करत नसतील तर सावरकर अथवा इतर कोणत्याही नेत्याने त्यांच्या आधी ती गोष्ट केली होती हे जाहिररित्या मान्य करणे त्यांना बंधनकारक नाही.
म्हणजे, 'गांधींनी सावरकरांचे कर्तृत्व मान्य केले की नाही' या वादांतर्गत 'स्वदेशी' हा एक मुद्दा येऊ शकतो व हाच वाद 'सावरकरांनी गांधींचे कर्तृत्व मान्य केले की नाही' असाही होऊ शकतो. शेवटी, मान्य केले म्हणजे तरी काय करणे अपेक्षित होते ?
.
आपल्याला आता 'ऐतिहासिक दृष्टी' आहे, म्हणजे आपण आता सर्व तत्कालीन घटनांचा पट डोळ्यांसमोर ठेवू शकतो व त्या घटनांचा एकमेकांशी असलेला संबंध पाहू शकतो. इतक्या विस्तृत पातळीवरचे 'विहंगमावलोकन' वर्तमानात वर्तमानातीलच घटनांबद्दल शक्य नसते, ते ऐतिहासिक घटनांबद्दलच होऊ शकते. तेव्हा 'अमुकाने तमुकाला श्रेय दिले नाही' हे सत्य आता दिसत असले तरी ते सत्य तेव्हा अमुकालासुद्धा माहिती असेल हे कशावरून ?
'अमुकाने हे सत्य स्वीकारले पाहिजेच होते' असे आपल्याला आता वाटते, कारण आपल्याला त्याचे फार महत्त्व आहे. तसेच महत्त्व त्या काळी त्या अमुकालाही वाटायला पाहिजे हे गृहितक धरणे मला चूक वाटते. यावरून दोन गोष्टी दिसतात, एक म्हणजे आपण त्या वेळची परिस्थिती लक्षात घेत नाही आहोत आणि दुसरे म्हणजे आपण आपली 'आता'ची दृष्टी त्यावेळच्या घटनांवर/माणसांवर लादत आहोत... हे तर मला सर्वात धोकादायक वाटते.
.
खुद्द गांधी हा देव नाही हे फक्त गांधीला आणि त्याच्या फारच थोड्या अनुयायांना माहिती होते. त्यामुळे, जरी गांधींनी हे श्रेय माहिती असूनही सावरकरांना दिले नाही हे जरी सत्य असले, तरी ती चूक अक्षम्य असावी का ? गांधी हा देव नाही हे ठासून सांगून मग मात्र त्यांच्या चुकांचे 'बघा-बघा-तुमच्या-देवाने-केलेल्या-चुका' छापाचे 'उदात्तीकरण' करणारे त्यांचे विरोधक आणि गांधीवाक्य प्रमाणम् हे मानून चालणारे त्यांचे तथाकथित अनुयायी यांच्यात फरक नाही. (यातले तू काही करतोस असे नाही, पण या निमित्ताने हे डोक्यात आले खरे.)
.
मला नेहमीच एक वाटते की ऐतिहासिक घटनांचे असे उंचावरून अवलोकन करताना आपली त्या घटनांशी असलेली काळाच्या संदर्भांची नाळ मात्र कुठेतरी तुटते. तसे बघणे आवश्यक आहेच हे नि:संशय. अर्थात, 'उंचावरून दिसणार्‍या महान दृष्याच्या' नादात अशी नाळ तुटू न देणे हे फार अवघड असेल असेही वाटते.

    ***
    उसके दुश्मन हैं बहुत
    आदमी अच्छा होगा

    तळेगावचा पैसाफण्ड काचकारखाना याच घडामोडीतून उदयास आला असे वाचनात आहे
    पुण्यातील "सार्वजनिक काका" या नावाने प्रसिद्ध असलेल्या (नेमके नाव सान्गा बर कुणीतरी! आठवत नाहीये Sad ) व्यक्तिच्या पुढाकाराने पै पै गोळा करुन हा कारखाना उभारला गेला! (कालौघात तो नाहिसा झाला पण १९८२-८३ पर्यन्त तरी तेथे उत्पादन सुरू असल्याचे आठवते)
    याचबरोबर किर्लोस्कर, गरवारे, कल्याणी इत्यादी मोजक्या मराठी माणसान्कडून स्वातंत्रपूर्व व स्वातंत्रोत्तर काळात जे उद्योग उभारले गेले ते व्यवसायाबरोबर याच स्वदेशीच्या भावनेने उभारले गेले असे मानण्यास बराच वाव हे! Happy
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    स्लार्टी पुढे लक्षात ठेवेन.

    >>> त्यांनी 'जे आहे ते असच आहे' असा दॄष्टीकोण ठेवून मांडल्यामूळे कोणाला काही त्रास होत नाही....
    जरी असा त्रास झाला तरी तोच दृष्टीकोन ठेवला जावा. वस्तुनिष्ठतेचा बळी देण्याइतपत महत्त्वाचा कुठलाही 'नवस' नसतो.
    बाकी 'इतिहास कसा मांडावा' याविषयी तुझ्याशी चर्चा नक्कीच बोधप्रद असेल याची खात्री आहे.

      ***
      उसके दुश्मन हैं बहुत
      आदमी अच्छा होगा

      स्लार्टीला पुर्ण अनुमोदन,विषेशतः-
      >>गांधींनी स्वतः मी स्वदेशीचा जनक आहे असा वा या अर्थाच उल्लेख केला आहे का ? तसे असेल तर तुझ्या सवालाला अर्थ राहतो.>>
      >>आपली 'आता'ची दृष्टी त्यावेळच्या घटनांवर/माणसांवर लादत आहोत..>>

      मी असे कुठेही वाचलेले नाही की गांधींनी स्वदेशीची चळवळ सुरु केली,त्यांनी केवळ त्या चळवळीला जास्त लोकाभिमुख केले.त्यांचा उदोउदो करण्यापलिकडे फारसे कर्तुृत्व नसणार्यांनी ही सांगड घातली आहे.ती दुर करुन योग्य इतिहास समोर आणण्यास कोणाचाच विरोध नाही,पण गांधींबाबत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा दोष त्यांनाच देण्यात काय हशील?
      *************************************************************
      द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

      स्लार्टीचे मुद्दे ग्राह्य आहेत. तरीही ऐतिहासिक घटनांचं आणि व्यक्तींचं विश्लेषण, मूल्यमापन करणं वर्तमानाकरता उपकारकच ठरतं; तेव्हा त्या दृष्टिकोनातून स्वदेशीचा इतिहास तपासायला हवा.
      >>भेकड गाय मारून खाण्याबद्दल असो वा सशस्त्र क्रांती बद्दल.
      केदारा, 'भाकड गाय' रे. Happy
      संतिनो, तीच सदरमालिका नंतर पुस्तकरूपाने प्रकाशली गेलीये.
      लिंबूटिंबू, बरोबर पैसा फंड काचकारखान्यातून तंत्र शिकलेल्या ओगल्यांनी नंतर ओगलेवाडीला काच कारखाना घातला. या पैसा फंडाच्या उभारणीकरता 'सार्वजनिक काकांनी' मोठं कार्य केलं. सार्वजनिक काका म्हणजे 'वासुकाका जोशी'. ते चित्रशाळा मुद्रणालयाचे अन् 'चित्रमयजगत्' नियतकालिकाचे मालक होते. उद्योगातला पैसा सार्वजनिक उपक्रमाकरता उदार हातानं देणार्‍या वासुकाकांना पुणेकर आपल्या खाश्या पद्धतीने 'सार्वजनिक काका' संबोधत. Proud

      -------------------------------------------
      हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

      तो भेकड शब्द इतक्यांदामी वापरलाय आजकाल की, भाकड लिहीताना देखील भेकडच लिहीले गेल. Happy

      स्लार्टी तू म्हणतोस हे तत्वतः मान्य होत असले (की घटना एकत्र इतिहासकार लावू शकतात वैगरे) तरी स्वदेशी घटना जरा वेगळी आहे. मी व फ ने उदा दिल्याप्रमाने १९०२, १९०५ त्याआधी १८९८ वैगरेला स्वदेशी साठी उठाव झाले.
      गांधी भक्ताच्या काही पुस्तकात गांधीने हे सर्व सुरु केले असे बरेचदा वाचले. गांधीना कमी लेखायचे नाहीच पण त्यांना ह्या घटना निश्चीतच माहीती होत्या कारण बंगालची फाळनी ही त्या काळात सर्वात मोठी गोष्ट होती, त्यामूळे स्वदेशीचा मुद्दा ऐरनीवर आणताना, त्यांनी योग्य ते क्रेडीट द्यायला हवे होते असे मला आजही वाटते. दोन्ही नेत्यात तूलना होउ शकत नाही कारण ते वेगळे आहेत. ही चूक अक्षम्य नाही पण मला जे म्हणायचे आहे ते फ ने निट मांडले की, "ऐतिहासिक घटनांचं आणि व्यक्तींचं विश्लेषण, मूल्यमापन करणं वर्तमानाकरता उपकारकच ठरतं; तेव्हा त्या दृष्टिकोनातून इतिहास तपासायला हवा". त्यातले स्वदेशी मी काढले कारण मुद्दा फक्त स्वदेशीचा नाही. अनेक गोष्टींचा आहे.

      उदा द्यायचे झाले तर आगावूच्याच बीबी वर मी आंबेडकरांचे वाक्य टाकले आहे. तो देखील खूप मोठा मुद्दा आहे.

      माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी, घटना जश्या घडल्या तश्या वाचायचा प्रयत्न करुन त्यांची सांगड घालायचा प्रयत्न करतो. आज गांधीबद्दल एक वाक्य लिहीले तर उद्या कदाचीत नेताजी बद्दल पण लिहीन. Happy ( फक्त चांगलच Happy )

      फ, मराठवाडा आणि विदर्भात घाबरट शब्दाला भेकड असेही म्हणतात. मला वाटतं भाकड (भाकड कथा मधील भाकड) आणि भेकड या दोन शब्दांमधे फरक आहे.

      मी ९६ मधे बॉम्बे स्टोअर मधून एक शर्ट विकत घेतला होता तो अजून माझ्याकडे आहे. मला नव्हतं माहितं की हे दुकान टिळकांनी सुरू केलेले आहे.

      अरे बी, भाकड गाय म्हणजे जि दुध देन, वा इतर कूठल्याही कामाकरता उपयोगी नाही अशी.

      बाँबे स्टोअर्स म्हणजे जे बर्‍याच पूर्वी बाँबे स्वदेशी नावाने ओळखले जायचे तेच का? आता ( पाच -दहा वर्षांपूर्वी ) त्याचं बॉम्बे स्टोअर्स असं पुनःनामकरण झालंय तेच ना ?

      स्ट्रॅन्ड बूक स्टॉल, महेश लंच होम अन हे स्टोअर्स अशी त्रिस्थळी यात्रा असायची माझी.

      शोनू, मी ९५ ते ९७ पुण्यात असताना, माझी कंपनी, कोंढव्याला होती. मी तिथल्या बोम्बे कॅफे मधे मस्का पाव आणि चहा घेत असे. वेस्ट ऐन्ड आणि परिसर माझा आवडीचा असायचा. फक्त तिथल्या वस्तू पहायच्या आणि समाधान मानायचे असे दिवस होते ते. फ्रेन्च फ्राईज मी पहिल्यांदा तिथेच पाहिले पण घेतले नव्हते. तिथे दिसणारा यंग क्राऊड बघणे हाही एक त्यावेळी धंदा होता. अर्थात त्यावेळी मीही अगदी नवतरुणच होतो.

      असो... केदारच्या बीबीची जागा व्यापल्याबद्दल केदार क्षमस्व. सावरकरांची कविता छान आहे रे.. कुठे मिळाली तुला ही कविता. भाकड गाय बद्दल धन्यवाद. म्हणजे आता भाकडकथा म्हणजे ज्या कथांपासून काहीच घेता येत नाही अशा कथा का?

      केदार,
      माहिती चांगली आहे... पण प्रयोजन काय...? म्हणजे सावरकर स्वदेशीचे जनक होते असे सिध्ध करता आले तरी त्यातून पुढे काय..?
      >ह्यावर अजुन संशोधन करुन इतिहासकारांनी योग्य ती दखल घ्यावी व योग्य तिथे इतिहास निट लिहीला जावा असे मनापासून वाटते.
      इतीहासाची सुधारीत आवृत्ती काढा अशी मागणि असणार आहे काय...? Happy

      फ,
      >>तरीही ऐतिहासिक घटनांचं आणि व्यक्तींचं विश्लेषण, मूल्यमापन करणं वर्तमानाकरता उपकारकच ठरतं;
      ते कस काय...? ए़कूण हे विधान वस्तुनिष्ठ कमी भावनिक अधिक वाटत.

      सावरकरांची कविता महान रे बाबा... हे अस तेच लिहू जाणे, एकदम "जळजळीत" म्हणजे एकतर जाळणार किव्वा उजळणार...अधे मधे काही स्कोप नाही. लोकमान्यांची लेखणी ही एकंदरीत अशाच धाटणीची होती म्हणे. मला आजकाल प्रश्ण पडतो, या वेळी हे लोक असते तर सद्द्य परिस्थिती, सरकार, अंतुले सारखे नग, यांवर यान्नी काय लिहीले असते?

      मित्रा तू काय छान लिहीले आहेस रे. तुझ तर फारच कौतुक करावस् वाटतय रे मला.
      एवढी एनर्जी आणतोस तरी कुठून.
      तुझा अभ्यास ही खुपच चांगला आहे. कीप इत अप,
      अमोल

      योगेश परक्या मालाच्या होळ्यांच्या स्वरूपात दृश्य स्वरूपात अवतरली. हळूहळू स्वदेशीचं तत्त्व अर्थकारणाच्या इतर पैलूंमध्ये .. विशेषकरून उत्पादन/वितरणाच्या सकारात्मक मार्गाने (परक्या मालाची होळी हा मार्ग काहीसा नकारात्मक प्रतिक्रियावादी आणि मर्यादित परिणामकारकतेचा असतो.) कसं वापरावं याबद्दल विचार घुसळले जाऊ लागले. परक्या मालावर बहिष्कार/त्यांची होळी ही स्वदेशीच्या नाण्याची एक बाजू झाली; पण त्या मालाला पर्याय देशातून कसा उभारायचा या स्वदेशीच्या नाण्याच्या दुसर्‍या बाजूवरही लोकांनी लक्ष पुरवायला सुरुवात केली. कालरेषा पाहिल्यास यासुमारास टिळकयुगाची अखेर आणि गांधीयुगाची सुरुवात होते असं दिसतं. गांधींनी चरखा/स्वदेशी खादी कपडे वगैरे अंगांनी स्वदेशीच्या उत्पादन-वितरणाच्या बाबत सामान्य लोकांना साध्य अशा स्पेसिफिक उपक्रमांचा प्रसार केला.. ज्याला लक्षणीय यश लाभलं. स्वदेशीचं तत्त्व 'पॉप' मार्गांनी लोकांमध्ये पसरवण्याची कामगिरी गांधीमार्गाने साधली. पण स्वातंत्र्योत्तर भारतात लोकांमध्ये 'पॉप'-इतिहास मांडताना नेहरू/काँग्रेसी राजकारण्यांनी, त्यांनी नेमलेल्या पाठ्यपुस्तक मंडळांनी, पत्रकारादी माध्यमघटकांनीही स्वदेशीची ही अख्खी वंशावळ पुरेशी आणि न्याय्य पद्धतीने मांडली नाही असं दिसतं. गोष्टी आणि इतिहास सोपा करून सांगताना काही चुकीची समीकरणे पडून जातात; अख्खं चित्र जगापुढे येत नाही.. काहीसा असा प्रकार आपल्याकडे घडल्याने 'स्वदेशी=गांधी' असं समीकरण बळावलं.

      काही तपशील असे,
      १. सार्वजनिक काका - गणेश वासुदेव जोशी (१८२८-१८८०)
      जन्म - सातारा. शिक्षण - पुणे. सार्वजनिक सभेची स्थापना - १८७०.
      २.स्वदेशीचा विचार अनेकांनी मांडला, जसे
      - दादाभाई नौरोजी, न्या. म.गो. रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लो. बा. गं. टिळक, म. मो. क. गांधी आणि कितीतरी.
      ३. दादाभाई नौरोजी यांनी हा विचार १८८० मध्ये मांडला. ही सर्वात जुनी नोंद आहे असे वाटते. याबाबत अजून शोध घ्यायला हवा.
      ४. भारतीय इतिहासाप्रमाणे एक नक्की. स्वदेशी चे जनकत्व अगदी द्यायचेच झाले तर ते लो. टिळकांना देता येईल, कारण त्यांनी हा विचार एक चळवळ म्हणून लोकांपर्यंत पोहचवला, म. गांधी त्या नंतर येतात हे नक्की !

      ५. अर्थात या चळवळीसाठीचे जे साधन म. गांधींनी दिले- चरखा आणि सूत कताई या मुळे ही चळवळ जनसामान्यांच्या आवाक्यात आली.

      मला वाटतं १९ वे शतक हे असे एक रसायन होते की ज्या रसायनात जे जे घुसळले गेले त्या सर्वांनी अनेक नवे विचार मांडले, कधी कधी ते अगदी सारखे ही होते. त्यामुळे त्यांचे जनकत्व सिध्द करणे जरा अवघडच जाईल. त्यामुळे "अमुक एक विचार यांनी ही केला होता बर का!" ही भूमिका जास्त सोईची जाईल असे वाटत मला.

      आरती खोपकर यांचे म्हणने बरोबर आहे.दादाभाई नौरोजींनी सर्वप्रथम अर्थशास्त्राचा अभ्यास करुन ब्रिटीश सरकार कसे भारताला दरीद्री करत आहे ते मांडले.त्यानंतर लोकमान्यांनी स्वदेशीची चळवळ सुरु केली आणि नंतर सावरकरांनी पण त्यात भाग घेतला.अशा होळीत भाग घेतल्याने सावरकरांवर फर्गुसन कॉलेजने दंडात्मक कारवाई केली होती.

      ----------------------
      यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
      क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
      दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
      होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
      दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

      सावरकरांच्याही आधी टिळकांनी केला होता ना स्वदेशीचा पुरस्कार?
      >>
      माझे काही प्रश्नः
      जर टिळक एवढेच स्वदेशीचे पुरस्कर्ते होते.
      १) तर त्यांच्या संस्थेच्या महाविद्यालयाचे नाव Fergusson College का होते.
      २) भारतात प्रिंटींग मशीनरीज उपलब्ध असताना, युरोपातुन मशिन का विकत घेतली.

      ----------------------------------------------------------

      आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा ।
      >> देश भक्ति पेक्षा आर्य भक्ति जास्त दिसते.

      vds.jpg

      हा स्वदेशी पोशाख आहे, हे मला आजच कळलं.

      .

      Pages