भक्ती

Submitted by अश्विनी के on 6 June, 2008 - 01:40

viththal rakhumai.jpg

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर |
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर ||

भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणार्‍या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा.

saint tukaram.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्तोत्रांच्या बाफवरील काही पोस्ट्स इथे कॉपी करत आहे :

अश्विनी के | 7 August, 2010 - 15:06
अमा, माझी खिचाई करत्येस किकॉय? करत असलीस तरी मी तुला सिरियसलीच उत्तर देणारे

नृसिंहसरस्वतींची स्तोत्रं म्हणजे एकाअर्थी श्रीगुरु दत्तात्रेयांचीच उपासना. तुला ती नीट मिळाली नसतील किंवा कळली नसतील तर दत्तबाप्पाची उपासना कर.

आपण दिवसातल्या २४ तासांतील निदान २४ मिनिटं तरी बाप्पासाठी द्यावीत. खरंतर ती त्याच्यासाठी नसून स्वतःसाठीच असतात. बाकी सगळं विकत घेता येतं, मनःशांती विकत घेता येत नाही. तीचा स्त्रोत हा दैवी असतो. एखादा अश्रद्ध माणूस असेल आणि त्याने परमात्म्याला मानलं नाही तरी परमात्म्याचं त्याच्याकडे पुर्ण लक्ष असतंच. त्याची सत्कर्मं परमात्म्याला सुखावून जातात व त्याच्या बदल्यात कित्येक पटीने जे दान द्यायचं ते त्याच्या पदरात तो टाकतोच.

अमा, रोजच्या पठणात रामरक्षा (५ मिनिटं), मारुती स्तोत्र (३ मिनिटं)/हनुमानचलिसा (४ मिनिटं), सद्गुरुंचा / दत्तबाप्पाचा जप (जमेल तितका)/ श्रीगुरुचरित्र १४ वा अध्याय (इथे khapre.org लिंक आहे तिथे उपलब्ध आहे) असलेलं बरं असतं. जितकं जास्त नामस्मरण करावं तितकं चांगलं असतं. पण हे सगळं आपापली नित्यकर्म, कर्तव्य पार पाडूनच करावं.

नाम हे नामीपेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं आहे. एक बघ ना, वाल्मिकींनी रामनाम जपण/रामायण लिहिणं हे प्रत्यक्ष रामाच्या अवतरणाच्या कितीतरी आधी केलेलं आहे. सत्ययुगात ऋषीमुनींचे आचार विचारच एवढे पवित्र होते, निसर्गाचा सांभाळ त्यांनी एवढा सुंदर रित्या केला की निर्गुण निराकारत्व देखिल त्यांना सहज सोपं पडत होतं. त्रेतायुगात हा बॅलन्स ढळू लागला होता तेव्हा परमेश्वराला निर्गुण निराकारातून सगुण निराकार व्हावं लागलं. हे सगुण (with qualities) निराकारत्व 'नाम' रुपाने अवतरलं. नंतर जसजसं पावित्र्य, आचार विचार अजून खाली जाऊ लागले तस तसं 'त्याला' सगुण साकार रुपात यावं लागलं.

आपले कुठलेच सद्गुरु नसतील, आपण सद्गुरुच मानत नसू तर सरळ "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः| गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||" हा जप करावा.

एखाद्या अचानक घडलेल्या घटनेने तात्पुरतं हादरुन जाणं साहजिक आहे पण नित्याची शांतता व मनःसामर्थ्य, उपासना देतात. अचानक घडलेल्या घटनेला तुमचा रिस्पॉन्सही योग्य तोच दिला जातो.

किरण | 7 August, 2010 - 22:47
अश्विनी खरंच आवडतंय वाचायला.

तसा मी आस्तिक म्हणवून घेण्याइतका श्रद्धाळू नाही पण नास्तिक नक्कीच नाही, पण त्यामुळे बराचसा confused आहे. एकीकडे विज्ञानाचे सिद्धांत पटतात पण विज्ञानाला न सोडवता आलेली कोडी सोडवायला अध्यात्माची जोड असणे पटते मात्र नेमके काय करायला पाहिजे ते कळत नाही. (माझे तेवढे वाचन नाही हे कबूल करावेच लागेल)

विज्ञान हे बुद्धिचे function आहे आणि
अध्यात्म हे मनाचे function आहे इतक्याच निष्कर्शाप्रत मी आलेलो आहे.

> तसं 'त्याला' सगुण साकार रुपात यावं लागलं.
म्हणजे कोणते रुप?

आणखी एक शंका, मी अथर्वशीर्ष पाठ असल्याने रोज म्हणतो आणि ते म्हणत असताना यांत्रिकपणे म्हटले जाते म्हणजेच ते म्हणत असतानाही मी मनात कामाचा किंवा अन्य विचार सहजपणे करत असतो, पण ह्याचाच अर्थ मला असा वाटतो की मग माझे अथर्वशीर्ष म्हणण्याकडे लक्ष नाहीये. मग त्याचा मला फायदा होईल का?

प्रतिसाद अश्विनी के | 7 August, 2010 - 23:16
किरण,

<<<<एकीकडे विज्ञानाचे सिद्धांत पटतात पण विज्ञानाला न सोडवता आलेली कोडी सोडवायला अध्यात्माची जोड असणे पटते मात्र नेमके काय करायला पाहिजे ते कळत नाही.

विज्ञान हे बुद्धिचे function आहे आणि
अध्यात्म हे मनाचे function आहे इतक्याच निष्कर्शाप्रत मी आलेलो आहे.

>>>>

विज्ञानाची कोडी आज असतील तर उद्या संशोधनाने ती काही सुटतील तर काही परत कोडी म्हणूनच पुढल्या पिढीला माहित होतील. आजचं कोडं हे उद्या सप्रमाण सिद्धांत बनेल. पण तरीही वर काहितरी उरेलच जे आपल्याला माहित आहे की पलिकडेही काहितरी आहे जे अथांग आहे. तेच एक कोडं बनुन राहील. मग ते काय आहे? जे काही आज विज्ञानाच्या सहाय्याने उघड केलं जातंय तेच ज्ञान आहे, जे ऑलरेडी होतंच फक्त आपल्यापुरता त्याच्यावर अज्ञानाचा पडदा पडला होता. ते सगळ्याच्या पलिकडेही पुरुन उरतंच आहे ते देखिल ज्ञान आहे, फक्त आपल्यापुरता त्याच्यावरचा पडदा दूर व्हायचाय. एवढं मात्र आपल्याला कळत असतं की असं काहितरी आहे जे चराचरात भरलंय आणि त्यामुळेच या विश्वाची स्थिती व गती चालू आहे.

मग अशा 'त्या'चा शोध घेणं हे बुद्धीचं काम नाही का? फक्त मनाने जे चालतं ते केवळ कल्पना असते व ती चुकीचीही असते. इथे तर आपली इच्छा असेल तर, चिंतन करण्याच्या प्रयास केला तर नक्की जाणवतं की कितीही बुद्धीच्या कसावर पलिकडल्या गोष्टी तासून पाहिल्या तरी बुद्धीलाही अवाक करेल असं काहीतरी आहेच. प्रत्येक जिवंत वा निर्जिव गोष्टीची जीन्स्/अणू-रेणू रचना विज्ञानाच्या सहाय्याने अभ्यासणं आवश्यकच आहे, परंतु हे बनवलं कुणी? ज्याने विविध फोर्सेस निर्माण करुन विश्वाची गती नियंत्रित केली आहे त्यानेच शरिरात वेगळी रचना करुन हृदय, आतडं, फुफ्फुसं यांची गती नियंत्रित केली आहे.

> तसं 'त्याला' सगुण साकार रुपात यावं लागलं.
म्हणजे कोणते रुप?
>>>> ज्याला क्वालिटीजही आहेत आणि आकारही आहे. अर्थात नुसत्या 'नामा'ची पुढची सोपी पायरी, अवतरण ! जसजसं माणसाची कुवत (आचार विचार आहार विहारांच्या दृष्टीने) कमी कमी होत गेली तशी त्या परमकृपाळू परमात्म्याने 'ढ' मुलाला पास होण्यासाठी सोपं गणित सोडवायला द्यावं तसं आकलनाला सोपं जाईल, चर्मचक्षूंना दिसेल असं रुप घेतलं.

तसेच इतर युगांच्या दृष्टीने तपश्चर्याही रानावनात हजारो वर्षे घालवून कलीयुगाच्या या चरणातील मानव करुच शकत नाही, एकाग्रता पावूच शकत नाही यासाठी सगळी व्यवधानं सांभाळून त्याला मारलेली मनापासूनची एक हाकही त्याला भुलवून जाते. यांत्रिकता तर आजच्या आयुष्यात अपरिहार्य आहेच. त्यामुळे तोंडाने एक स्तोत्र म्हणत असता असता मनात असंख्य विचार येणं साहजिकच आहे. तरिही, सातत्य आणि अनन्यता राखली तर आपल्या नकळतच एकाग्रतेचा काळ हळूहळू वाढत जातो.

तू म्हणत रहा अथर्वशिर्ष. तो गणपती बाप्पा मूलाधाराचा राखणदार आहे. मूलाधाराच्या चार पाकळ्या म्हणजे आहार विहार आचार विचार आहेत. त्यांच्यामधे अशुद्धी येण्याला तो अटकाव करतो. मूलाधारात अशुद्दी जितकी जास्त तितकी आयुष्यात विघ्न जास्त. त्या विघ्नांना अटकाव करणारा तो विघ्नहर्ता

संपादन प्रतिसाद अश्विनीमामी | 8 August, 2010 - 19:26
के अश्विनी आजिबात खिंचाई नाही. खरेच मार्गदर्शन हवेच आहे तू चांगली सुरुवात करून दिली आहेस.
माझे देवाचे नामस्मरण कायमच चालू असते तरीही एक मॅच्युरिटी यावी म्हणून तू सांगितल्या प्रमाणे नेमधर्म चालू करीन. सकाळी घरून निघताना, हपिसात पोहोचल्यावर लक्श्मी व गणेशाला वंदन. झोपताना सर्वांसाठी प्रारथना त्यात टॉपिकल जास्त हे आहे सध्या पण अधिक शिस्तीने सर्व केले पाहिजे.
भौतिक जबाबदार्‍या पार पाडेपरेन्त सर्व नीट चालू राहावे ते राहील कि नाही याने मन फार घाबरून जाते
त्याला काहीतरी शिस्त यावी. सकारात्म्क विचारसरणी कायम राहावी म्हणून मेहनत करायचीच. इथून स्तोत्रे लिहून घेइन व पाठ करेन. अतिशय धन्यवाद.

प्रतिसाद अश्विनी के | 8 August, 2010 - 21:12
भौतिक जबाबदार्‍या पार पाडेपरेन्त सर्व नीट चालू राहावे ते राहील कि नाही याने मन फार घाबरून जाते
>>>> सगळं व्यवस्थित होईल गं. तू काळजीच करु नकोस. तुझ्यात बाकी बाबतीत कॉन्फिडन्स आहेच, या बाबतीतही नक्की येईल.

संपादन प्रतिसाद माधव | 9 August, 2010 - 09:45
अश्विनी, किरण चर्चा छान चालू आहे, पण या बाफवर शक्यतो बाफच्या विषयाला धरूनच राहूयात का? सुंदर संग्रह होतोय इथे!

अश्विनी के | 9 August, 2010 - 09:49
मान्य विषयाच्या ओघात लिहिलं गेलं ते.

संपादन प्रतिसाद हसरी | 9 August, 2010 - 09:51
अश्विनी तुझ्या भक्तीच्या बाफवर ह्या पोस्ट टाक म्हणजे विषयाला धरूनच होईल आणि हो तु सुंदर सांगितलस आता अजुन लिही

प्रतिसाद अश्विनीमामी | 9 August, 2010 - 12:29
अगदी मान्य. मीपण इथून श्लोक्स उतरवून घेइन व नवीन एंट्री वाचेन. लगे रहो.

विज्ञान हे बुद्धिचे function आहे आणि
अध्यात्म हे मनाचे function आहे >> दुसरे वाक्य तितकेसे बरोबर नाही. अध्यात्मातही बुध्दीची तेवढीच (किंवा जास्तच) गरज असते. अध्यात्मात अत्यंत महत्वाचा अस्तो तो विवेक आणि तो फक्त बुध्दीनेच साधता येतो, मनाने नाही. म्हणूनच अध्यात्मात मनाला घोड्यांची तर बुध्दीला सारथ्याची उपमा दिली जाते.

मनाचं चित्तात रुपांतर तेव्हा होतं जेव्हा ते बुद्धीच्या अधिपत्याखाली येतं. आणि असं मनच विवेकाने वागू शकतं.

मोक्षाचे कारण त्यागता:

त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जाणतो. आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेचा त्याग केल्याशिवाय आपल्याला शांत झोप लागत नाही आणि निद्रेतील विश्रांतीचा त्याग केल्याशिवाय आपण काम करण्यास सज्ज होऊ शकत नाही. मोठमोठे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, संगीतकार, कलाकार अथक प्रयत्नाने मानवी जीवन समृद्ध करतात. त्यासाठी त्यांनी सामान्य जीवनप्रणालीचा त्याग केलेला असतो. भगवद्गीतेतील भगवंताने ठिकठिकाणी त्यागाचे महत्त्व वर्णन केले आहे. त्यागातच सर्वोच्च समाधान आहे हे पटवून दिले आहे.

मग प्रश्न निर्माण होतो, की आपण नक्की कशाचा त्याग करायला हवा? घरादाराचा, कामधंद्याचा, पैशाचा, नात्यांचा कशाचा त्याग अपेक्षित आहे? सांख्यांच्या मते, 'त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहूर्मनीकणिषः।' म्हणजे प्रत्येक कर्मच दोषवत आहे. कारण कर्म नेहमीच कर्मफल निर्माण करते आणि मग ते भोगण्यासाठी आपल्याला एका जन्मातून दुसर्‍या जन्मात जावे लागते. म्हणूनच त्यांचा त्याग करावा. परंतु कर्माचा त्याग आपण करूच शकत नाही. कारण भगवान स्वतः अठराव्या अध्यायात सांगतात,
'न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माष्यशेषतः ।'
म्हणजे जो शरीरधारी आहे तो कर्म सोडूच शकत नाही. कारण पातंजल योगसूत्रानुसार श्वासोश्वास करणे हे देखील कर्म आहे. मग देहधारण करणारा कोणीच कर्माशिवाय राहूच शकत नाही. मग आपल्याला कर्मबंधनात तर अडकायचे नाही; परंतु कर्म सोडता येत नाही. मग त्याग करायचा तो कशाचा? त्यावर स्वतः भगवान उत्तर देतात, ''यस्तु कर्म फल त्यागी स त्यागीत्यभियते।''
म्हणजेच कर्मफलाचा जो त्याग करतो तो करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? कारण मला फल नको असे म्हटले तरी कर्म झाल्यावर फल तयारच होणार. मग ते त्यागायचे कसे? तर भगवान सांगतात, की कर्म फल त्यागायचे म्हणजे प्रत्येक कर्मामागे आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायचा. म्हणजे आपण रोज जी कर्मे करतो तीच, परंतु वेगळ्या दृष्टिकोनातून करायची. तो वेगळा दृष्टिकोन कोणता? तर ''यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिती चापरे॥ किंवा ''यज्ञो दानं तपश्चैव पावननि मनीषिणाम्‌ ॥

म्हणजेच प्रत्येक कर्म, यज्ञ, दान, तप या दृष्टिकोनाने करावे. येथे या शब्दांचे सांकेतिक मूल्य आहे. ज्याप्रमाणे संगणक तज्ज्ञाच्या दृष्टिकोनाने माऊस या शब्दाचा अर्थ मूळ अर्थापेक्षा भिन्न असतो तसेच काहीसे येथे आहे. यज्ञ म्हणजे आपली अशी जीवनपद्धती की ज्यामुळे आपल्याला समाजाकडून आजवर जे मिळाले तो पैसा, ज्ञान, मानमरातब, आदर ते व्दिगुणित करून आपण समाजाला अर्पण केले पाहिजे. त्यावर आपला वैयक्तिक मालकी हक्क नाही. त्यामुळे त्याचा वापर आपण बहुजन हितासाठी केला पाहिजे. ते आपले कर्तव्यच आहे, असे समजले नाही तर प्रत्येक कृती करताना त्याचे रुपांतर अहंकारात होते व कर्मबंधन तयार होते. म्हणून कर्ता आहोत या भूमिकेची आहुती म्हणजे यज्ञ. त्याचप्रमाणे आपण काहीतरी देऊ शकतो अशी भूमिका मनात असते, तोपर्यंत देणारा व घेणारा अस्तित्वात असतो म्हणून त्याला व्यवहार म्हणतात. ज्यात देणार्‍याला हे आपले कर्तव्य आहे याची जाण असते ते दान आहे. म्हणूनच माता आपल्याला जन्म देते. त्याचे लालनपालन करते याला आजही मानाचे स्थान आहे, कारण मागच्या पिढीने तेच केले पुढेही ही परंपरा चालूच राहणार आहे, हे आपले कर्तव्यच आहे, हे प्रत्येक माता जाणते.

म्हणूनच आपल्याजवळ जे आहे ते संग्रहित न करता कर्तव्य भावनेने ते गरजवंतांना उपलब्ध करून देणे हेच आपले उद्दिष्ट आहे आणि त्याची मार्गाᆬमणाच तप आहे. त्यामुळे 'पावनानि मनीषिणाम्‌ ॥' म्हणजे मन पूर्ण पवित्र होईल आणि पवित्र मन हेच परमेश्वराचे प्रकटीकरण, मग येथे कोणतेच बंधन नाही आणि हाच खरा मोक्ष आहे.

या आधी षड्रिपुंवर एक पोस्ट लिहिली होती. लोभ या शत्रुसंबंधाने काही अजून वाचनात आलं ते इथे सांगतेय.

लोभी माणसाचे गुणधर्म -

१. दुसर्‍या कुठे / कुणाकडे जे काही त्याच्याजवळील गोष्टींपेक्षा संख्येने, वजनाने, प्रभावाने जास्त असेल ते ते स्वतःला वापरायला हवे असते.

२. स्वतःची कुठलीही गोष्ट इतरांना भेट देणे/दान देणे हे शक्यच नसते. क्षणभर वापरायला देण्यासही तयार नसतो. म्हणजेच कंजूषपणा.

३. आपल्याकडे नसलेले मिळवण्यासाठी नीतियुक्त पुरुषार्थ करण्याची / नैतिकता पाळण्याची इच्छा नसते.

४. जराही सबुरी नसते.

५. हमखास चोरीचा मार्ग अवलंबिला जातो. मग ते दुसर्‍याचे धन, वस्तू, सत्ता, सन्मान किंवा किर्तीही असू शकते. लोभी माणसाची प्रत्येक हालचाल दुसर्‍यांच्या नकळत केली जात असल्याने प्रत्येक कृती चोरीचीच असते.

६. अवैध मार्गाने जे त्याने मिळवले असते ते राखण्यासाठी सदैव अ‍ॅलर्ट असावे लागते त्यामुळे संशयी स्वभाव बनतो.

७. स्वतःची व स्वतःकडील सामग्रीची आजूबाजूच्या लोकांशी कंपॅरिझन.

८. मन सदैव संशय व मत्सर यांनी ग्रस्त असल्याने मन-बुद्धीला कुठल्याही विषयावर एकाग्र चित्ताने काम करणे जमत नाही. मन, बुद्धी व शरीर नेहमी चंचल रहाते.

९. साहजिकच न्युनगंड बाळगत राहतो.

या विरुद्ध वैराग्य असते. वैराग्याचे गुणधर्म -

१. बौद्धिक व शारीरिक परिश्रमांनी स्वतःला पाहिजे ते जरुर मिळवावे पण अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत, ही वैराग्याची अगदी प्राथमिक पायरी.

२. दुसर्‍याची गोष्ट चोरू नये.

३. हवे ते मिळवताना नैतिकता पुर्णपणे पाळणे.

४. प्रयासास अपेक्षित फळ मिळत नसेल तर सबुरी धरणे.

५. स्वतःकडे जे जास्त असेल ते गरजूंना दान करणे किंवा निदान गरजेपुरते वापरण्यास तरी देणे.

६. दुसर्‍यांशी आपली तुलना न करणे व दुसर्‍यांच्या प्रगतीबद्दल मत्सर न वाटणे.

७. मन व बुद्धी स्थिर असणे.

(वरिल १ ते ७ ही फक्त वैराग्य ह्या स्थितीची पूर्वतयारी आहे. खरेखुरे वैराग्य पुढील पाच पायर्‍यांनी प्राप्त होते.

१) प्रत्येक कर्म भगवंतासाठी करणे व करताना तर्ककुतर्काला जराही जागा न देणे.

२) प्रत्येक कर्म करताना त्याच्या फलाविषयी जराही विचार न करणे अर्थात निष्काम कर्मयोग.

३) कर्मफलही भगवंतच देतो व कर्मशक्तीही भगवंतच देतो. त्यामुळे सर्वोच्च कर्ता परमात्माच आहे, याचे नेहमी भान असणे. या सर्वकाळ असणार्‍या भानालाच अध्यात्मज्ञान असे म्हणतात व ह्यायोगेच वैराग्य पुर्णत्वास जाऊ लागते.

४) लौकिक सत्ता व सामग्री याऐवजी भक्ती व साक्षात्कार ह्यामुळे तृप्ती मिळवत राहणे व कायम ठेवणे.

५) शाश्वत शांती, समाधान व प्रसन्नता ह्यांचे सर्वोच्च पद म्हणजे वैराग्य.

बाकीचे पाच षड् रिपु लोभाचा नायनाट झाल्यावरच क्षीण होऊ लागतात.

श्री साईसच्चरितात म्हटल्याप्रमाणे -

लोभा ठायीं नसे शांति | ना समाधान ना निश्चिंती |
एक लोभ वसतां चित्तीं | जाती मातींत साधने ||
लोभाशी ब्रह्माचें अखंड वैर | तेथें ध्याना नाहीं अवसर |
कैंची मुक्ति विरक्ती साचार | आचारभ्रष्ट लोभिष्ट ||

अश्विनी के...मला तुम्हाला विचारयचे आहे की...माणसाला देव धर्म करून सुध्दा समाधान मीळत नाही....बर आणि ज्यांचा जवळ अफाट पैसा आहे, सगळ्या अपेक्षापुर्ण झालेल्या आहे ते सुध्दा सुखी दीसत नाहित, वरवर दाखवतात.

म्हणजे काय्...हव काय असते आपल्याला?

काही शोध लागल्यास अथवा आपले मत कळवा.

सगळ्यांचंच असं होतं असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर ते अवलंबून आहे. तरीही, जे भौतिक सुखांनाच खरं सुख मानून बसतात ते कधीच पुर्णपणे समाधानी असत नाहीत कारण भौतिकाचा लोभ कधी सुटतच नसतो. आणि जे जे भौतिक आहे ते ते नश्वर आहे, मग त्यापासून मिळणारे सुखही नश्वरच असणार ना? जेव्हा भौतिकाच्या पलिकडे जाऊन माणून "ठेविले अनंत तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान" याचा खरा अर्थ जाणतो तेव्हा असेल त्या परिस्थितीत त्याच्या मनाची प्रसन्नता कधीच ढळत नाही. इथेच संत आणि आपल्यासारखे सामान्य यांच्यात फरक पडतो Happy

अश्विनी के ...
आण़खि एक प्रश्न आहे : प्रेम आणि भक्ती यात फरक आहे का नाही... असल्यास काय आहे?

आपल्या मागच्या अपेक्षित उत्तरावर समाधानि
आपला आभारी,
चातक

Delete

अश्विनी के , आज हा बाफ वाचुन काढला. तुझ्या सगळ्याच पोस्ट्स खूप आवडल्या. काही काही प्रश्न मनात येतात ते असे कि, रोजची उपासना नेमकी काय आणी कशी असावी? तू अमा ला दिलेल्या उत्तरात आहेच तरी ही तुला त्यावर एक डीटेल पोस्ट लिहिता येइल का? काही जणं असं म्हणतात कि उपासनेची ठराविक वेळ पाळावी, कारण त्या वेळेस त्या देवता तिथे येऊन हजर असतात. काही ठिकाणी असं वाचलयं कि जितक्या डीटेल मधे पूजा करता येते तितकी चांगली उदा. सगळं पाहिजे, फुलं, उदबत्ती, निरंजन, चन्दन अक्षता etc. काही ठिकाणी वाचलं नुस्ती उदबत्ती पण पुरे, मनाचा भाव पाहिजे.

काही म्हणतात कि गुरु हवा, काही म्हणतात कि तयारी झाली कि गुरु आपोआप मिळतो.

काही ठिकाणी वाचलं कि जेन्व्हा स्तोत्रं म्हणतो its a part of the ritual त्यामुळे एक यांत्रिक पणा त्यात असतो त्या पेक्षा मानस पूजा चांगली, काही म्हणतात कि मंत्रात शक्ती असते, त्यांच्या उच्चारामुळे पण आजूबाजूचं वातावरण पवित्र होत व नेगेटिव्हिटी दूर होते.

साडेसाती साठी, भीमरूपी वाचावं का शनिमहातम्य? रोज कुलदैवतेच नामस्मरण करूनच मग रोजची उपासना करावी ? असे सारे सारे प्रश्न.

काही काही जण काहीही न करता सुध्दा किती आनंदी असतात. काही काही जण सतत देवा चे करून सुध्दा त्यांच्या आयुष्यात सतत त्रास असतात. अस का? काल एके ठिकाणी वाचलं कि कारण देवाला तुम्हाला सतत भक्ती मार्गावर ठेवयचं असत, आणी तुम्हाला प्रॉब्लेम्स आले कि तुम्ही सततं त्याचं नाव घ्याल.
(हे पटतं नाही ) कारण देवाला पण आपण आनंदी असलेलच बघायचं असत ना?

तु एके ठिकाणी लिहिलयस की भीमरूपी आणी हनुमान चालीसा दोन्ही रोज म्हणाव ? दोन्हीत काय फरक आहे?

भीमरुपी किंवा हनुमान चलिसा, असं वाच ते Happy

ट्यागोने काय पुसून टाकलं? मी वाचलंच नाही.

काही जणं असं म्हणतात कि उपासनेची ठराविक वेळ पाळावी, कारण त्या वेळेस त्या देवता तिथे येऊन हजर असतात. काही ठिकाणी असं वाचलयं कि जितक्या डीटेल मधे पूजा करता येते तितकी चांगली उदा. सगळं पाहिजे, फुलं, उदबत्ती, निरंजन, चन्दन अक्षता etc. काही ठिकाणी वाचलं नुस्ती उदबत्ती पण पुरे, मनाचा भाव पाहिजे. >>>>
ठराविक वेळ पाळण्याने आपल्यालाच शिस्त लागते आणि उपासना करण्याचा उत्साह / ओढ रहाते. परंतु, काही कारणाने वेळ पाळली गेली नाही तरी वाईट वाटून घेऊ नये किंवा स्वतःला दोषी समजू नये कारण आपण संसारी आहोत, आपल्याला इतर कर्तव्ये (जी देवानेच आपल्याला कामं म्हणून दिल्येत, असे समजावे) पार पाडूनच एकीकडे परमार्थ साधायचा असतो.
पुजेच्या साहित्याबद्दल बोलायचं तर कुणाला सगळं साग्रसंगीत उपलब्ध असेल तर जास्त प्रसन्नतेने पुजा करता येते, तर कुणाला साहित्याच्या उपलब्धतेची गरज भासत नाही. उदबत्तीही न लावता, समोर कुठला फोटो, मुर्ती नसतानाही मनोमन नमस्कार करता येतो व तो तेवढाच उत्कट असू शकतो. नवविधा भक्तींपैकी कुठलीही भक्ती पुर्ण शारण्यभावाने जमली तरी चालते.

काही म्हणतात कि गुरु हवा, काही म्हणतात कि तयारी झाली कि गुरु आपोआप मिळतो.
>>>> मला ही दोन्ही विधानं पटतात. मार्ग दाखवण्यासाठी गुरु लागतो. आता बघ, एखाद्या व्यक्तीला फ्रॅक्चर झालं आणि तो म्हणाला डॉक्टरकडे कशाला जायचं? मी पुस्तकं वाचेन आणि माझे मीच उपचार करेन. चालेल का? नक्कीच नाही. त्यासाठी योग्य तो डॉक्टरच पाहिजे. तसेच मन, प्राण आणि प्रज्ञेचे रोग निस्तरायला गुरु हवा, मग तो पोथीरुपाने तुम्हाला माहिती होवो किंवा सगुणात माहिती होवो.
तुम्हाला मनात गुरु हवा अशी इच्छा निर्माण झाली की तुमची जमिन तयार करण्याची तुमची मानसिक तयारी झाली. परंतु नापिक जमिन सुपिक करण्यासाठी, त्यावर पडलेले बीज रुजण्यासाठी, पुढे त्याचा वटवृक्ष होण्यासाठी, पारंब्या पुन्हा रुजून अजून वृक्ष तयार होण्यासाठी ती तयार होणं आवश्यक आहे. हाच तो प्रतिक्षेचा काळ. इथेच श्रद्धा आणि सबुरीची कसोटी लागते. जमिन तयार झाली की बीज रुजणं, सद्गुरु भेटणं आलंच Happy

काही ठिकाणी वाचलं कि जेन्व्हा स्तोत्रं म्हणतो its a part of the ritual त्यामुळे एक यांत्रिक पणा त्यात असतो त्या पेक्षा मानस पूजा चांगली, काही म्हणतात कि मंत्रात शक्ती असते, त्यांच्या उच्चारामुळे पण आजूबाजूचं वातावरण पवित्र होत व नेगेटिव्हिटी दूर होते.>>>>>> मानवी मनाला एखादी गोष्ट नित्याची झाली की कंटाळा, तोच तो पणा येणं साहजिकच आहे. पण मानसपूजाही तेवढी सहजतेने जमते का? की मन दाही दिशांनी चौखूर उधळतं? त्यामुळे मुळात तुमचे या मार्गात पुढे जाण्याचे प्रयास करणे हे तुमचे कर्म, त्याला योग्य ते आणि योग्य तेव्हा फळ देणे हा त्या भगवंताचा हेडएक.

शुद्ध मंत्र हे पवित्रतेसाठी बनलेले असतात तर तमाचारतंत्रातील मंत्र (?) हे अपवित्र कारण आणि कार्यासाठी बनलेले असतात.

साडेसाती साठी, भीमरूपी वाचावं का शनिमहातम्य? रोज कुलदैवतेच नामस्मरण करूनच मग रोजची उपासना करावी ? >>> कुठलीही हनुमंतांची उपासना चालते. कुलदेवतेचं नामस्मरण करुन मग उपासना केलेली चांगलीच कारण कुलदैवत म्हणजे आपली वैखरी वाणी (परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी वाणीपैकी). ती शुद्ध असणं चांगलंच.

काही काही जण काहीही न करता सुध्दा किती आनंदी असतात. काही काही जण सतत देवा चे करून सुध्दा त्यांच्या आयुष्यात सतत त्रास असतात. अस का? काल एके ठिकाणी वाचलं कि कारण देवाला तुम्हाला सतत भक्ती मार्गावर ठेवयचं असत, आणी तुम्हाला प्रॉब्लेम्स आले कि तुम्ही सततं त्याचं नाव घ्याल.
(हे पटतं नाही ) कारण देवाला पण आपण आनंदी असलेलच बघायचं असत ना? >>>> याबद्दल आपण चिंता करायची नाही. जर त्याच्याकडे अन्याय नाही हा विश्वास असेल तर इतरांकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही हे बघत बसणे आपलं काम नाही. मुळात आपण काय डिझर्व करतो हेच आपल्याला माहित नसते कारण आपण स्वतःच्या बाबतीत बायस्ड असतोच असतो. त्यामुळे सगळं बुक किपिंग त्याच्याकडे आहे आणि त्याचं ऑडिट वगैरेचे अधिकारही त्याच्याचकडे आहेत हे मान्य करुन मोकळे व्हावे आणि जे जे वाट्याला येईल ते ते त्याचंच बोट घट्ट पकडून ठेवून स्विकारावे.
-----------
प्रेम आणि भक्ती यात फरक आहे का नाही... असल्यास काय आहे?
>>> सॉरी चातक, मी खूप दिवसांनी हा बाफ पाहिला. म्हटलं तर प्रेम आणि भक्ती या दोन शब्दांचा भरपूर किस पाडता येईल, अगदी चांगल्या व वाईट अशा दोन्ही कोनांतून. सद्ध्या या बाफच्या वातावरणाला मिळता जुळता अर्थ घेऊया. प्रेम ही गोष्ट आपल्याला भगवंताकडून त्याच्या अष्टबीज / नवअंकुर ऐश्वर्यांपासून मिळते. त्यामुळे आपल्या मनात एकंदरच उत्पन्न होणारे प्रेम हे आपल्यातील त्याच्या अंशाचं द्योतक असते. तेच प्रेम जेव्हा आपण त्याच्याप्रती बाळगतो तेव्हा ती भक्ती असते.

मी मोडकं तोडकं काहीतरी लिहिलंय आणि मला जे उमगतंय ते सांगण्याचा प्रयास केलाय. व्यक्ती व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे मतप्रवाह असतीलच आणि त्या सगळ्यांचा मला आदर आहे Happy

किती छान लिहितेस आणी लिहिलेलं सगळं सगळं पटतं.

तसेच मन, प्राण आणि प्रज्ञेचे रोग निस्तरायला गुरु हवा, मग तो पोथीरुपाने तुम्हाला माहिती होवो किंवा सगुणात माहिती होवो>>>> हे फार आवडलं

अश्विनी आज इथे काही लिहिलं नाहिस आमच्या करता? रोज तुझी काही तरी पोस्ट असली कि दिवस छान जातो.
माणसानी जीवन कसं व्यतीत करावं, साधं सिंपल, ऑनेस्ट लिविंग ह्या वर काही तरी लिहि.
रोजच्या जीवनात काय असावं , काय असू नये, वर तु लिहिलेस आहार, विहार आचार विचार, हे कसे असावेत, etc. तुझी स्वताची उपासना रोजची काय असते?

अगं मी काय सांगणार? Happy मी अधिकारी नाही गं. कधीतरी एखादा टॉपिक दिसला आणि सद्गुरुंची शिकवण आठवली तर जेवढं आठवेल तेवढं लिहिते बस्स ! मी देखिल पालथा घडाच आहे. ४ पावलं पुढे तर ३ पावलं मागे.

माझी रोजची उपासना :- आन्हिक, सद्गुरुंनी मार्गशिर्ष महिनाभर करायला सांगितलेलं परंतु एक शिस्त लागते म्हणून मी वर्षभर कंटिन्यु करायचा प्रयास करत असलेलं वर्धमान व्रत, ट्रेनमध्ये उभ्या उभ्या अमोज जपलेला गुरुमंत्र (ज्यात "ॐ ऐ र्‍हिं क्लिं चामुण्डायै विच्चे" हा आदिमातेचा आवाहन मंत्र समाविष्ट आहे), घोरकष्टोद्धरण स्तोत्र अमोज, रामरक्षा अमोज, दत्तबावनी एकदा, हनुमान चलिसा अमोज, आदिमातेच्या गायत्री, महिषासुरमर्दिनी व अनसुया रुपांची आख्यानं असलेल्या "मातृवात्सल्यविन्दानम्" चा एक अध्याय, जमेल तेव्हा गुरुचरित्र १४वा अध्याय आणि श्रीसाईसच्चरित ११वा अध्याय (हे दोन अध्याय रोज वाचायला सांगितले आहेत पण मी पालथा घडा असल्याने अधनं मधनं वाचून सद्गुरुंना त्रास देते), जमेल तेवढी रामनाम वही.

ॐ नमःशिवाय रोज १००८ वेळा सुरु केलेलं बंद पडलं.
"ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नमः" रोज १०८ वेळा बंद पडलं.
"ॐ अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः" रोज १०८ वेळा बंद पडलं.
"ॐ मनःसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः" रोज १०८ वेळा बंद पडलं.

सद्गुरुंनी श्रीसाईसच्चरित परीक्षा परत परत देत रहायला सांगितल्यामुळे श्रीसाईसच्चरिताचा झेपवेल एवढाच अभ्यास परीक्षेचा पेपर डिक्लेअर व्हायला आला आणि झाला की.

हे सगळं उघडपणे मी सांगू शकते कारण आमच्या उपासनांमध्ये गुपितं काहीच नाहीत Happy

छानचं सांगतेस ग तू.:)सद्गुगुरु कोण तुझे? अमोज म्हणजे न मोजता का?

माझे आजोबा पण रोज राम नामाचा जप लिहायचे. अग्निहोत्र पण सकाळ संध्याकाळ करायचे. पण आम्हाला कुठ्ल्याच गोष्टींची कधी ही सक्ती केली नाही.
पण ते त्यांच्या मोठ्या देवघरात, मन लाऊन पूजा करत असले कि त्यांना पहात बसावसं वाटायचं मला. अगदी तल्लीन होउन जायचे.

हिंदुंचे देव का कोपतात ? एखाद्याने देवाचेकाही न वाचले/केले तरीही त्याचे कल्याणच देवाने करायला हवे ना? येशु ख्रिस्त, बुद्ध, महावीर, अल्ला वगैरे कोपताना कधी ऐकले नाही. ( हा प्रश्न वाचून कुणी कृपया कोपू नये.) Happy

खुप ज्ञान आहे तुझ्याकडे. >>>> नाही गं. ज्ञान वगैरे मला काही माहित नाही. भक्ती अजून अजून वाढत जावी एवढी इच्छा आहे माझी Happy

निराली, अगं मी रेग्युलर लिहिण्याजोगं माझ्याकडे काही नाही. ना जास्त वाचन, ना जास्त चिंतन. वर म्हटल्याप्रमाणे एखादवेळेस चावी बसली की भावलं थोडं हलतं Proud
अमोज म्हणजे न मोजताच. रामरक्षा म्हणून कंटाळा आला की हनुमान चलिसा, त्याचा कंटाळा आला की अजून कुठलं नित्याचं स्तोत्र. मूळ बीज श्रीस्वामीभक्तीचं, तिथूनच पुढे त्यांच्याच इच्छेने (ह्याचे ठोस संकेत मिळाल्यावर) श्री अनिरुद्ध बापूंना सद्गुरु मानलं आणि भक्ती ह्या विषयात खरी वाटचाल सुरु झाली. प्रवचनं, पंचशील परिक्षा, (ह्या परिक्षांच्या निमित्ताने श्री साईसच्चरिताचा खरा अभ्यास सुरु झाला). श्री गजानन विजय, श्री स्वामीचरित्रसारामृत आधी अनेकवेळा वाचले होतेच पण श्रीसाईंच्या चरित्राच्या अभ्यासाला सुरुवात झाल्यावर श्री गुरुचरित्र, व श्री गजानन महाराज, श्री स्वामीसमर्थांच्या पोथ्यांमधून वाचण्यात आलेल्या लीलांचाही खरा अर्थ उमगू लागला. सद्गुरुतत्वाचं आकलन कधीच कुणाला पुर्णपणे झालं नाही पण कुठेतरी आतून ते अजून कसं आहे, अजून कसं आहे, ते आपल्या आयुष्यात कसं कसं कार्यरत असतं त्याचा शोध घेतला जाऊ लागला. जसजसा शोध घेतला जाऊ लागला तसतसं ते फार सुंदर रुपात समोर येऊ लागलं. बर्‍याचशा अध्यात्मातल्या गोष्टिंचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाशी कसा अतूट संबंध आहे ते जाणवू लागलं.

पण खरंच, सद्गुरु ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ज्याने त्याने आपआपल्या सद्गुरुंचा मार्ग तंतोतंत पाळायचा प्रयास करावा, त्यातच भलं असतं. फक्त आपल्याला जेवढं आवडतं तेवढंच घेतलं आणि बाकीचं सोयिस्कररित्या वळवून वाकवून घेतल किंवा नाकारलं असं करायचं असेल तर हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपले जन्मदाते आणि सद्गुरु यांच्या खिडक्या असतो (यात अध्यात्मिक तोटा असतो तो वेगळाच). सगळ्यांना हे जरी मान्य असलं की आईवडिल किंवा सद्गुरु आपल्यावर चुकीचे संस्कार करत नसतात तरी आपल्या वागणुकीवरुन जग आपल्या आईवडिलांची आणि सद्गुरुंची परिक्षा करायला बघतं. याहीपुढे जाऊन म्हणेन की एकवेळ एक मानव म्हणून सामान्य असलेले आपले आईवडील कधीतरी चुकीची शिकवण देऊ शकतात पण सद्गुरु कधीच आपल्याला आपल्या जीवाच्या उन्नतीच्या आड येणारी गोष्ट शिकवत नाहीत. ते नेहमीच आपलं सामान्यपण लक्षात घेऊन, आपल्या व्यवहारातल्या अडचणी लक्षात घेऊन कसं सन्मार्गावर राहता येईल ते शिकवतात.

श्री साईसच्चरितातील काही ओव्या गुरुच्या शाळेचं वर्णन करतात, त्यातली एक माझी अत्यंत आवडती -

लागता ह्या शाळेस पाय | कोण हतभागी माघारा जाय |
माझे घरदार बापमाय | सर्वची गुरुराय जाहले ||

किती सुंदर विचार उतरवतेस गं. आणी तुझेच विचार आम्हाला ऐकायचे असतात, त्यामुळे <<<निराली, अगं मी रेग्युलर लिहिण्याजोगं माझ्याकडे काही नाही. ना जास्त वाचन, ना जास्त चिंतन. वर म्हटल्याप्रमाणे एखादवेळेस चावी बसली की भावलं थोडं हलतं>> तु जे काय लिहितेस ते इतकं मनापासून असतं, इतके honest विचार असतात कि सारखं वाचावसं वाटतं.

म्हणून तु रोज इथे लिहायचं मनावर घेच अश्विनी के.

<<<सद्गुरु कधीच आपल्याला आपल्या जीवाच्या उन्नतीच्या आड येणारी गोष्ट शिकवत नाहीत. ते नेहमीच आपलं सामान्यपण लक्षात घेऊन, आपल्या व्यवहारातल्या अडचणी लक्षात घेऊन कसं सन्मार्गावर राहता येईल ते शिकवतात. >>> खूप आवडलं

छान

स्तोत्रान्चे धाग्यावर हा विषय त्या धाग्याचे निमित्ते चर्चिला गेला, इथे देतोय.
स्तोत्रान्चे धाग्यावर महालक्ष्मी माहात्म्य दिल्यावर, त्याबाबत अजुनही एक कहाणी आहे जी समुद्रमंथन/लक्ष्मीची उत्पत्ती व लक्ष्मीविवाह याशी संबन्धित आहे. ती देईन असे सांगितल्यावर मजसमोर एक प्रश्न आला तो म्हणजे, "पण मग ऑथेंटिक कहाणी कोणती ? म्हण्जे लक्ष्मीला कोणती जास्त आवडते?"
या प्रश्नास दिलेले उत्तर व या महत्वाच्या प्रश्नानिमित्ताने मनात जे उद्भवले ते मांडलेले इथे पुढे पुन्हा उधृत करतोय.

*******************
>>>> पण मग ऑथेंटिक कहाणी कोणती ? = दोन्ही. त्यातुनही, दुसरी जी टाईप करु पहातोय, ती जास्त चांगली.

अवांतरः
भक्तिमार्गात, "ऑथेन्टिक" म्हणजे ते ते सर्व, ज्यामुळे तुमच्या मनात भक्तिभाव जागृत होईल.
इश्वरीशक्ति मूळातच निर्गुण/निराकारच मानली आहे, इश्वराद्वारे निर्मित सृष्टीला आकार-उकार आहे.
पण भक्ताचे आकलनाचे दृष्टीने सहज समजुती-सोईकरता इश्वराचे सगुणरुप, अन अर्थातच ते (भक्त मानव असल्याने) "मानवी देहाच्या जाणिवान्मधे" बान्धुन त्याला भजले जाते. हे होत असता, जे जे मला आवडते, ते ते मी देवाला वहातो, वहात रहातो. त्याच्यातील जे जे चांगले त्या स्तुतिद्वारे, ते ते चांगले माझ्याही मनात भिनत जाते.
एकवेळ अशी येते, (मी नुकताच क्षणिक का होईना तसा अनुभव घेतला आहे) की मी जे देवाला वहातो, देव "द्वैत" रुपात पाहून मी वेगळा अन तो वेगळा असे समजुन कृती करत असतो, तो भेद नष्ट होऊन, देवाकरता केलेली कृती भक्ताला स्वतःलाच "आन्तरिकरित्या" जाणवू लागते. ही जाणिव समजावी तर , तिची तुलना एखाद्या आईला, आपल्या बाळाला लागलेल्या ठेचेस पाहून तिच्याच अंतकरणात ज्या वेदना होतिल, (व्हाईसवर्सा अपत्याचे यश पाहून आनन्दही होईल, पण आनन्दापेक्षा वेदना तीव्र व जास्त काळ टिकणारी असते म्हणून प्रामुख्याने ते उदाहरण) त्या वेदनेच्या "जाणिवेशी" बर्‍याच अंशी करता येईल.
सध्या थन्डी पडू लागली आहे. माझ्या कम्पाऊण्डच्या भिन्तीमधे स्थापन केलेल्या मारुतीची पुजा करण्याचा योग येतो, तेव्हा थण्डीमधे मी (जर मला लागते तर देवाला का नको? या विचाराने) गरम पाणी आवर्जुन घेण्यास सुरुवात केली. एक वेळ अशी होती की देवाची सगुण-साकार मूर्तिस स्नान घालताना, हातपाय, तोण्ड डोळे इत्यादिक अवयव धुवुन काढताना अशी काही एक एकाग्रता साधली गेली की, ते ते संस्कार/ त्या गरम पाण्याचा स्पर्ष-जाणिव, मूर्तिच्या ज्या ज्या अवयवान्ना मी वहात होतो, ते ते मला माझ्या शरिरावर जाणवत होते, व जाणवते आहे असे कळल्यावर शरिर शहारले/थरारले होते व मी वास्तविक भानावर आलो होतो. पुन्हा पुन्हा दरवेळेस तसेच हुकमी साधता येईलच असे नाही. पण, मूर्तिपूजनामागिल महत्वाचे "रहस्य" समजल्यागत मला आनंद झाला.
मजसारख्या सामान्य माणसाचे आयुष्यात, एकाग्रता साधणे मुश्किल, साधावी म्हणून मूर्तिपूजा, अन ती एकाग्रता साधून द्वैतातुन अद्वैत जाणण्याकडे प्रवास (जर) पूर्ण झाला, तर, अन तरच मग, "मूर्तिपूजेची/मन्दिरात वगैरे जाण्याची" आवश्यकता उरत नाही. मात्र असे काहीही न होता, केवळ पुस्तकी पान्डित्याद्वारे/बुद्धिवाद व तर्काच्या जोरावरच जर कोणी म्हणत असेल की "मनी भाव असेल तर देवाची मूर्ति तरी का पूजावी वा देवळात तरी कशाला जायला हवे वा देवाला काही एक वहाणे वगैरे उपचार/कर्मकाण्डे तरी कशाला हवित" तर तो केवळ शब्दच्छल ठरतो. (अन दुर्दैवाने बर्‍याच जणान्चे बाबतीत "कर्मकाण्डे व त्यामागचे कष्ट/शिस्त" टाळण्याकरताची सोईस्कर बौद्धिक/तार्किक सबब ठरते)
असो.
मी तुम्हाला जास्त बोअर करत नाही. विषय निघाला, अनुभव/विचार शेअर करावा वाटला म्हणून सांगितले.
***************
जाणकार याबाबत अधिक मार्गदर्शन करू शकतील.

लिंबूटिंबू, आपण छानच एक्स्पेन केलंत,
मी तशी रूढार्थानं आस्तिक आहे, श्रध्दाही आहे पण माझी श्रद्धा अगदीच निस्वार्थी नाहीये. नेहमी काहीतरी मागतच असते देवाकडे. एकाग्रता तर आजिबातच नाहीये, कितीही वातावरण निर्मिती ( समई, उदबत्ती, फूलं इ. ) वगैरे केली तरी मनात असंख्य विचार असतात. देवळात गेलं की प्रचंड रडायला येतं अगदी कंट्रोल न करण्याइतपत, त्यामुळे फारच कमी वेळेस देवळात वगैरे जाते.
माझं नक्कीच काहीतरी चुकत असणार, त्याचाच शोध चालू आहे.

>>देवळात गेलं की प्रचंड रडायला येतं अगदी कंट्रोल न करण्याइतपत
म्हणजे जायचं नसतं आणि तरी जायला लागतं म्हणुन का ? Uhoh

Pages