भक्ती

Submitted by अश्विनी के on 6 June, 2008 - 01:40

viththal rakhumai.jpg

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर |
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर ||

भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणार्‍या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा.

saint tukaram.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय,

तुमच्या लिखानातून घेतलेली काही 'निर्विवाद' सत्ये!

1) त्यासाठी किर्तन्,नामस्मरण फार उपयोगाचे आहे. जशी जशी आपली आध्यात्मिक प्रगती होईल्,तशी तशी भगवद् नामातील गोडी आपल्याला उमगू लागेल व मग आपोआपच मन देवावर केंद्रीत होईल.म्हणजे कृष्णाचे,रामाचे नाव आपण घेतो तेंव्हा आपण कृष्णाशी associate होत असतो.पण जेंव्हा भक्ती खर्‍या अर्थाने होते तेंव्हा त्या नामाची intensity जास्त वाढते.
2) जशी जशी भगवद नामातील गोडी समजायला लागेल तसे तसे मन आपोआप नामस्मरणावर केंद्रीत होईल,मग प्रयत्न करायचीही गरज रहाणार नाही'
3)प्रह्लाद उवाच
श्रवणम किर्तनम विष्णो: स्मरणम पाद सेवनम्|
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||
इति पुंर्सार्पिता विष्णौ भक्तीश्चेण्णवलक्षणा |
क्रियेत भगवत्यध्दा तन्मन्येSधीतमुत्तमम् ||
अनुवाद-प्रह्लाद महाराज म्हणतात श्रवण्,किर्तन,विष्णुचे स्मरण,भगवद्चरणाची सेवा,षोडपशोपचार,प्रार्थना,वंदना,विष्णुचे दास्य,विष्णुला स्वतःचा सखा समजणे,सर्व काही त्याला अर्पण करणे(दुसर्‍या शब्दात तन्,मन्,शब्दांनी त्याची सेवा करणे)-या ९ पध्दती निस्सिम भक्तीच्या दर्शक आहेत.ज्या माणसाने या ९ पध्दती अनुसरुन आपले जीवन विष्णुला अर्पण केले आहे त्याला सर्वोत्तम मानण्यात यावे कारण त्याने सर्व ज्ञान मिळवलेले आहे.
4) आता नवविधा भक्तीबद्दल. याबद्दल खुपकाही लिहिण्यासारख आहे.
प्रभुपाद म्हणतात की या नऊ पैकी कुठलाही एक मार्ग घेतला की इतर आपोआप येतातच.
5) कलीयुगासाठी भागवत पध्दती आहे.
6) श्रवणम मधे 'श्रीमद भागवतम' चे श्रवण सर्वोत्तम
7) कलियुगात हरीचे नाव्,हरीचे नाव्,हरीचे नाव सोडून दुसर्‍या मार्गांना गती नाही,गती नाही ,गती नाही.
8) 'जो स्वतःला गवतापेक्षाही कमी समजतो,जो वृक्षाप्रमाणे सहनशील असतो,जो इतर सर्वांना मान देतो आणि पुन्हा मान मिळण्याची अपेक्षा ठेवत नाही असा मनुष्य खुप सहजतेने भक्तीभावाने हरिनामस्मरण करु शकतो'.
9) 'देवाच्या नावामधे आणि देवामधे काहीच फरक नाहिये
10) भगवंताला शरण गेल्यावर इतर कशाचीही गरज नाही.
11) इथे काहीच शाश्वत नाही.बनलेली गोष्ट इथे मोडणारच आहे आणि जन्म घेतलेली गोष्ट इथे मरणारच आहे.

छान!
धन्यवाद. Happy

मला तरी सांख्ययोग, बुद्धियोग, नि कर्मयोग अनेकदा वाचून सुद्धा आचरणात आणणे फार कठीण वाटते. म्हणून मी नुसते नामस्मरण करत रहातो. जेंव्हा श्रद्धा आपोआप उपजेल, बाकी सगळे कळेल तेंव्हा कळेल. सध्या तरी एकच - नामस्मरण! निदान मन शांत व्हायला तरी उपयोग होतो. भलते सलते विचार डोक्यात येत नाहीत.

धन्यवाद सावट!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

सावट, अहो ते नामस्मरण करतायत ते चांगलंच आहे की हो ! कधी कधी, नव्हे बर्‍याचदा आपल्याला मोठे मोठे लिखाण समजत नाही तेव्हा नामस्मरण तर कुणीही कधीही करु शकतो ना ! हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद Happy आणि हृदयात सतत नामस्मरण चालू असेल तर "वादग्रस्त बना" असा आशिर्वाद सफल होत नाही कारण आपलं मनच शांत झालेलं असतं. अर्थात दुसरा आपल्या बाबतीत वाद घालू शकतो कारण तो त्याचा प्रश्न असतो पण आपल्यावर त्याचा काहिही परिणाम होत नाही आणि वाद होतील अशी कृती आपल्या हातून कमी होते Happy

ऑ, मी टायपेपर्यंत सावटची पोस्ट अंतर्धान पावली Uhoh

************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

नमस्कार अश्विनी,
तुमच पटल...

झक्की,

>>>आता मी म्हणतो, की ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या! भक्ति हे एकच कर्तव्य मला उरले आहे. पण दहा वर्षांपूर्वी मला तसे करता आले नसते!

"ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या", श्रीमद आद्यशंकराचार्यानी सांगितलेल परमार्थाच सार..
हे कळत नाही म्हणूनच बाकीचा प्रपंच... असो !

>>नामस्मरण तर कुणीही कधीही करु शकतो ना ! हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद आणि हृदयात सतत नामस्मरण चालू असेल .. >तर "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या"ही अवस्था अनुभवता येईल.. हेही तितकेच खरे Happy

विषयीं विरक्तपण इंद्रियेंनिग्रहण|
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || १ ||
चंचळपणें मन न करी विषयध्यान|
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || २ ||
बुध्दि बोधक जाण ब्रम्हानुभव पूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ३ ||
भक्ति ज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ४ ||
रामीरामदास म्हणे निर्गुण सुख लाधणें |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ५ ||

श्रीसद्गुरुकृपा नसेल तर कोणते लाभ होणार नाहीत, याच शास्त्रशुध्द,परखड, अनुभवानेयुक्त मत वरिल अभंगात समर्थ श्रीरामदास स्वामी महाराजांनी मांडल आहे... अंतरमुख होऊन विचार करायला लावणारा अभंग आहे..

भक्ति ज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ४ ||

अश्विनी, यावर तुमचे मत वाचायला निश्चित आवडेल..:)
धन्यवाद!

श्रीसमर्थ म्हणजे ..श्रीहनुमंतराय..

ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

यातील प्रत्येक शब्द एक एक न संपणारी खाण आहे. तुम्ही लुटायचे तेवढे लुटा, पुन्हा आहेच भरलेली विचारधन पुरवायला Happy पहिल्या ओळीतील प्रत्येक शब्द व त्यापाठचं भांडार गुरुकृपेशी कसे जोडलेले आहे, किंबहुना गुरुकृपा हीच त्या भांडाराची किल्ली आहे हे नीट मांडणे मला जमेल का? मला समजतायत या ओळी पण प्रभावीपणे मांडणे हे सोपे नाही हो Happy मी तरी काय, मला माझे गुरु जे दोन्ही हातांनी भरभरून देतायत त्यातले मी बरेचसे माझ्या दुबळ्या झोळीतून सांडून टाकते व इवलेसे कण मनबुद्धीच्या ओंजळीत पकडू शकते त्यावरुनच लिहिणार ! तरीही जरूर लिहीन. तुम्ही पण तुमचे विचार लिहा.

चिन्या, तुझी परिक्षा झाली की इथे अ‍ॅक्टीव्ह हो रे!

************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

अश्विनी..

तुमचे 'विचार' जरूर लिहा, कारण आपण 'सद्गुरुकृपांकीत' आहात, तेव्हा आपले विचार महत्त्वाचे..

अक्कलकोटनिवासी काय म्हणतोय? साष्टांग नमस्कार...

विचार ला इन्व्हर्टेड कॉमा का बरे? Happy अक्कलकोटनिवासी सारखे "भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असं म्हणतायत Happy
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

कारण तर पुढे लगेच सांगितल आहे ना! Happy
हा अभंग त्यालाच अनुभवता येइल, जो 'सद्गुरुकृपांकीत' आहे, म्हणूनच्...तुम्ही नक्की सांगू शकाल, हा प्रांतच मूळात अनुभवाचा आहे..

आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती जीथे जूळते, तोच फक्त अनूभव, तॄप्ततेचा....:)

होय होय. मी हे सगळं अनुभवलं आहे, त्यातलं समाधान अनुभवलं आहे.

कालच षडरिपुंबद्दल दुसर्‍या अँगलने वाचनात आलं. उद्या टाकते Happy

************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

आपण ज्यांना षडरिपु म्हणतो त्यांना त्यांच्या मूळ स्वरुपात 'हेतुगुण' म्हणतात, जे त्या आदिमायेने मानवाला सत्वगुणांच्या रुपात विकासकार्यासाठी दिलेले आहेत.

काम : वंशवृद्धीसाठी, ज्ञानाच्या व बलाच्या प्राप्तीसाठी.

क्रोध : अपवित्र व चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी. पण मानव, त्याचा अवास्तव वाढलेला 'काम' पूर्ण न झाल्यामुळे किंवा अहंकारामुळे क्रोधीत होतो.

लोभ : प्रेम वाढीस लागावे, मदत करणार्‍या व्यक्तींविषयी व वस्तूंविषयी कृतज्ञता वाटावी व स्वतःची साधने सुरक्षित ठेवता यावीत यासाठी. पण मानव ह्या सीमा ओलांडून स्वार्थ साधत रहातो व लोभ हा शत्रु बनतो.

मोह : पवित्र व सुंदर वस्तुंविषयी व तत्वांविषयी आकर्षण वाटावे म्हणून. पण मानवाला आकर्षण वाटते ते अपवित्र व अनुचित गोष्टींचेच.

मद : स्वतःकडे काय आहे व त्याचा उपयोग विकासासाठी कसा करता येईल, हे जाणण्यासाठी मद अर्थात स्वसामर्थ्याची जाणीव दिली गेली. पण या जाणिवेतून मानवाने इतरांवर वर्चस्व व त्यातून अनुचित 'सत्ता' निर्माण करण्यास सुरुवात केली.

मत्सर : प्रत्येकाला स्वतःकडे व स्वतःमध्ये काय कमी आहे हे जाणून उचित ध्येय ठरविता यावे म्हणून मत्सर म्हणजेच तुलनेची शक्ती दिलेली असते. पण या तुलनेतून मनुष्य इतरांचा द्वेष करण्यास शिकतो, शत्रुत्व घेतो व मग मत्सर रिपु बनतो.

हे मूळ सात्विक भाव प्रेरित व्हावेत म्हणून पापदाहक तेजाला, म्हणजेच सूर्याला (आकाशीचा तारा नव्हे), म्हणजेच भर्गाला श्रीसूक्तात विनंती केली गेली आहे.

'सूर्यवंशीय' असणारा राम हा सत्यसंकल्पप्रभु म्हणजेच वर सांगितलेले आदिमायेने दिलेले ६ मूळ गुण सदैव सात्विक रुपातच ठेवणारा व त्यांचे षडरिपुंमधे रुपांतर न होउ देणारा असतो व हे परमात्म्याचे कार्य म्हणजे सत्यसंकल्प. हे कार्य करणारे त्याचे तत्व म्हणजेच भर्ग. भर्गावर काळाची सत्ता चालत नाही.
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

तदेजति तन्नैजति तद् दूरे तद्वन्तिके |
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यत:|
श्री इशोपनिषद ,मंत्र ५

भाषांतर्-भगवंत चालतात आणि ते चालतही नाहीत.ते खुप दुर आहेत आणि ते सर्वात जवळही आहेत.ते प्रत्येक गोष्टीच्या आत आहेत आणि त्याचबरोबर ते प्रत्येक गोष्टीच्या बाहेरही आहेत.

वरील श्लोक मला फार आवडतो.भगवंत omnipresent आहेत हे हा श्लोक दर्शवतो.त्याचबरोबर भगवंताच्या स्वरुपाचे म्हणजे सगुण्-निर्गुण स्वरुपाचेही हा श्लोक वर्णन करतो.एकाच श्लोकात द्वैत आणि अद्वैताचे वर्णन आहे.भगवंत चालतात म्हणजेच त्यांचे स्वरुप सगुण आहे.पण ते चालतही नाहीत म्हणजे त्यांना आकार नाही.ते खुप दुर आहेत्,म्हणजेच ते गोलोक वृंदावनात आहेत्,जे सर्वात दुर आहे.पण त्याचबरोबर ते सर्वात जवळही आहेत.कारण ते प्रत्येकाच्या हृदयातही आहेत्.त्याचबरोबर ते प्रत्येक गोष्टीच्या आत आणि बाहेर आहेत्.हे वर्णन सर्वठिकाणि असलेल्या ब्रह्म स्वरुपाकडे (निराकार) दर्शवते.भगवंत विराट रुपात बाहेर असतात पण त्याचबरोबर अंतर्यामी रुपात ते प्रत्येक गोष्टीच्या आत असतात्.अंतर्यामी रुपात भगवंत प्रत्येकाच्या कर्मांना witness करतात आणि प्रत्येकाच्या कर्माची फळ देतात.

कोपोनियां पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥1॥
येरू ह्मणे काष्ठीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥ध्रु.॥
खांबावरी लात मारिली दुर्जनें । खांबीं नारायण ह्मणतां चि ॥2॥
तुका ह्मणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्मा दचकला सत्यलोकीं ॥3॥
तुकाराम गाथा ३०८५

~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

चिन्या, अप्रतिम लिहिलं आहेस. 'तो' सुक्ष्म आहे तसाच विराटही आहे. त्याने हे सर्व जग आच्छदले आहे. मला वाटतं चिन्या, त्याने सर्व जग आच्छादणे हे ईशावास्य उपनिषदात सुंदररित्या सांगितले आहे ना? सद्ध्या त्याच्यावरचे निरुपण वाचतेय ना म्हणून माहिती रे मला Happy
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

साधु अवग्या तुरत भवानी | कर कल्यान अखिल कै हानी ||

साधु म्हणजे कुठलाही अंशमात्र भौतिक स्वार्थापासून अलिप्त राहून कळकळीने पारमार्थिक किंवा प्रापंचिक सल्ला देणारा निर्मोही, पूर्ण नीतिमान, स्वच्छ चारित्र्याचा असा परमात्म्याच्या चरणी पूर्ण शरणागत असणारा मनुष्य. असे हे खरे साधु आपल्याला भारतीय संस्कृतीच्या इतिहासात वारंवार दिसतात. उदा.-

राजा जनक - स्वतः सम्राट असून राज्याच्या धनाचा किंचितही उपयोग स्वतःसाठी न करता स्वतः शेती करुन उपजिविका करणारा. याने याज्ञवल्क्यापासून ते आरुणीपर्यंत अनेक ऋषींनाही उपदेश करुन व सल्ले देवून त्यांच्या प्रगतीस हातभार लावला. हा खरा साधु.

वसिष्ठ ऋषी दशरथाच्या राजसभेत कुलगुरु म्हणून बसणारा वसिष्ठ ऋषी त्याच्याकडून कुठलेही धन स्वीकरत नाही. कुलगुरुपद धोक्यात येईल हे जाणूनही, दशरथ व कैकयीची रामवनवासाच्या बद्दल उघडपणे निर्भत्सना करतो. हा खरा साधु.

भीष्म पित्याचे दु:खहरण करण्यासाठी आजन्म ब्रह्मचर्य पाळणारा, स्वतःच्या हक्काच्या सिंहासनावर पाणी सोडणारा व जिच्यामुळे हे सर्व घडले, त्या सावत्र माता सत्यवतीचे व तिच्य पुत्रपौत्रांचे आयुष्यभर हितरक्षण करणारा आणि पूर्ण नीतिमान. हा खरा साधु.

रामशास्त्री कष्ट्पुर्वक सद्विद्या प्राप्त करुन घेवून पेशव्यांचे मुख्य न्यायाधिश झालेले, रघुनाथराव स्वतः पेशवे झाल्यावर सुद्धा रघुनाथरावांना व 'ध' चा 'मा' करणार्‍या आनंदीबाईंना मृत्युदंडाची सजा सुनावतात व ह्यामुळेच छत्रपति शिवरायांची नैतिक मूल्ये पुढे चालू राहतील ह्याची ग्वाही देतात. आपली हत्या होवू शकते हे पूर्णपणे माहीत असूनही हे कचरले नाहीत. हा खरा साधु.

आता यांच्या अवज्ञेमुळे काय घडले?

जनकराजाने दिलेला सल्ला धुडकावून राजा अंबरिषाला शाप देणार्‍या दुर्वास मुनीच्या मागे महाविष्णूंचे सुदर्शनचक्र लागले.

वसिष्ठांचा सल्ला व निर्भत्सना नाईलाजाने का होईना, स्वीकारु न शकणार्‍या दशरथाला धर्मद्रोह, राजधर्मद्रोह, पितृधर्मद्रोह, पतिधर्मद्रोह (कौसल्या व सुमित्रा साठी), कुलवधुपालनधर्मद्रोह (जानकी व उर्मिला) अशा अनेक पापांचे डोंगर डोक्यावर घेवून मरावे लागले. तोच वसिष्ठांचा सल्ला उद्दामपणे धुडकावून लावणार्‍या कैकयीला, ज्याच्यासाठी तिने हे सर्व केले त्या भरताकडून निर्भत्सना, द्वेष, जन्मभराचा अबोला स्वीकारावा लागतो आणि 'पतिव्रता', 'सुमाता', 'ज्ञानी व कर्तृत्ववान राज्ञी' या उपाधी तिला सोडून जातात.

भीष्माने दिलेले सल्ले व हितोपदेश सदैव तुच्छतेने धुडकावून लावणार्‍या दुर्योधनाची किंवा वरकरणी आदर ठेवून आतून मात्र विरुद्ध आचरण करणार्‍या धृतराष्ट्राची किती भीषण स्थिती झाली?

रामशास्त्र्यांचे न्यायनिर्णय ऐकले न गेल्यामुळेच रघुनाथरावासारखा विषयलंपट, स्वार्थी व बेदरकार वृत्तीचा शासक राज्यकारभार हातात ठेवू शकला व त्यातूनच संपूर्ण हिंदवी स्वराज्यासच ग्रहण लागले.
----

इदं न मम | इदं श्रीरामस्य |

************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

कृते यद द्यायति विष्णु त्रेतायाम यजतो मखाइ|
द्वापरे परीचर्यायाम कालायुइ तद धरी किर्तनाम ||
भागवतपुराण १२.३.५२

भाषांतर्-जे फळ सत्ययुगात विष्णुचे ध्यान केल्याने ,त्रेता युगात यज्ञयाग केल्याने आणि द्वापरयुगात भगवंताच्या चरणांची सेवा केल्याने मिळत असे तेच फळ कलियुगात फक्त भगवद्नामाचे किर्तन केल्याने मिळते.

भगवद्नामामुळे आध्यात्मिक प्रगती होणे सध्या सर्वात सोपे होते.मनोभावाने भगवद्किर्तन केल्यावर काही प्रकारचे अनुभव येउ शकतात उदा.अंगावरचे केस उभे रहाणे,थरथरणे,रडणे,trance मधे जाणे इत्यादी.भगवद्नामामधील गोडी इतकी असते की माणुस वेळेच भान विसरतो.तो एक प्रकारचा संसर्गच आहे.भगवान प्रत्येकाच्या हृदयात असल्याने जो मनोभावे आणि भक्तिभावाने त्यांचे नामस्मरण करतो त्याला ते स्वतःच्या रुपाचे दर्शन घडवतात्.भक्तीमार्गावर प्रगती झालेले भक्त भगवंतांना सर्व ठिकाणी बघु शकतात्.काही त्यांना प्रत्यक्ष बघतात तर काही त्यांना त्यांच्या विविध शक्तींच्या माध्यमातुन बघतात. sincere प्रयत्न केल्यास भगवद दर्शन होणे शक्य आहे.भागवतात एक कथा सांगितलेली आहे.एकदा एक लहान मुलगा होता.त्याला त्याच्या गुरुंनी एका कार्यक्रमासाठी काहीतरी घेउन यायला सांगितले.पण तो फार गरीब होता. त्याने त्याच्या आईला विचारले की 'आई कृष्ण म्हणजे देव कुठे आहे?' आईलाही त्याचे उत्तर माहीत नव्हते.आई म्हणाली 'मलाही माहीत नाही.पण बरेच साधु लोक त्याला शोधायला जंगलात जातात्.'तो लहान मुलगा दुसर्‍या दिवशीच जंगलात गेला.बर्‍याच वेळ तो कृष्णाला शोधत होता.त्याला हाका मारत होता.पण त्याला काही कृष्ण दिसेना.त्यातच तो वाट चुकला,संधाकाळ होउ लागली.आणि मग तो मुलगा कृष्णाला हाका मारता मारता रडु लागला.मग काही वेळानी कृष्ण तिकडे आला.मग तो मुलगा म्हणाला 'मला कळले आहे की तु गरीबांचा सखा आहहेस्.मला एका कार्यक्रमासाठी गुरुदेवांनी काहीतरी खाद्यपदार्थ आणायला सांगितले आहेत्.पण मी तर गरीब आहे.मी काहीच नेउ शकत नाही.'कृष्ण म्हणाला की 'तु गुरुदेवांना सांग की मी हव तितक दही घेउन येईल्.'त्या मुलाने तसे सांगितले.मग कार्यक्रमाच्या दिवशी मुलगा परत जंगलात आला.त्याला कृष्णाने एक वाटी दही दिले.तो मुलगा ती वाटी घेउन गुरुदेवांकडे गेला.त्याचे गुरु चिडले.म्हणाले 'अरे इथे शेकडो लोक जेवायला येणार आहेत आणि तु इतकेसे दही आणलेस्?'चिडुन त्यांनी वाटी फेकली.दही सांडले.पण वाटी उचलल्यावर परत ती भरलेली होती.मग परत गुरुंनी दही सांडले.पण परत ती वाटी भरलेली होती.त्यांना हे समजेना की ते दही आध्यात्मिक होते.

तात्पर्य हे की मनोभावे धावा केल्यास कृष्णदर्शन होउ शकते.

विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वगाअ नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥2॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥3॥
तुका ह्मणे नामापाशीं चारी मुिH । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥4॥
तुकाराम गाथा 2865

~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

चिन्या, तो श्लोक आहे ना, "पुर्णमिदं.... " तेच दर्शवणारी ही गोष्ट आहे.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

न धनं न जनं न सुंदरिम्
कवितां वा जगदीश कामये
मम जन्मनि जन्मनिश्वरे
भवताद भक्तिर अहैतुकी त्वयी
श्री श्री शिक्षाष्टक मंत्र ४
भाषांतर-हे जगदीशा(भगवंता) ,मला धनसंपत्ती जमवायची कुठलीही इच्छा नाही.मला विविध सुंदर्‍यांचीही आसक्ती नाही.नाही मला खुप शिष्यगण जमवायचे आहेत.मला फक्त जन्मानुजन्म कुठल्याही हेतुशिवाय तुझी भक्ती करायची आहे

चैतन्य महाप्रभु आपल्या शिक्षाष्टकातुन प्रत्येक भक्तीमार्गावरील साधकास आदर्श घालुन देतात्.ते म्हणतात की हे भगवंता,मला कुठलेही धन नको,मला सुंदर पत्नी नको,एव्हढेच काय तर मला भरपुर शिष्यगणही नकोत्.बहुतांश लोक भगवंताकडे काही ना काहीतरी मागत असतात्.कोणी पैसा मागतो,कोणी सुंदर बायको,कुणी यश्,कुणी प्रसिध्दी .पण चैतन्य महाप्रभु यातील काहीही मागत नाहीत्.वास्तविकतः भक्तीमार्गातील पहील्या पायर्‍यांवर भगवंताकडुन काहीतरी मागणे रास्त आहे.आपल्या आईवडीलांकडे आपण जर एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तर आपले आईवडील तो हट्ट पुरवतातच्.त्यामुळे आपण भगवंताकडे असे काही मागितले तर तोही आपल्याला ते देईलच.पण भक्तिमार्गावरील पुढील पायर्‍यांवर भगवंत जे काही देईल ते आपल्यासाठी चांगलेच असेल असा भाव निर्माण होतो.म्हणजे देवाने जे दिले तेच आनंदाने स्विकारले जाते.चैतन्य महाप्रभु आपल्याला तेच दाखवतात्.ते कुठल्याही ऐहिक गोष्टी मागत नाहीत्.एव्हढच काय तर ते भरपुर शिष्यगणही मागत नाहीत्.कारण तीही एक ऐहिक आसक्तीच आहे. हे सर्व चैतन्य महाप्रभु नाकारतात.एव्हढेच काय तर ते भगवंताकडे मुक्तीही मागत नाहीत्.अनेक योगी मुक्ती मिळवण्यासाठी आयुष्यभर योगसाधना करतात्.पण चैतन्य महाप्रभु मुक्तीही नाकारतात्.त्यांचे एकच मागणे आहे ते म्हणजे जन्मानुजन्म त्यांना भगवद्भक्ती हवी आहे.त्याशिवाय त्यांचे दुसरे कुठलेही मागणे नाही.

कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥1॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥
होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥2॥
तुका ह्मणे भक्तिभाव । हा चि देवाचा ही देव ॥3॥

~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .

अश्विनी, तुझे षडरिपु वरचं विवेचन खूप आवडल. आमच्या ग्रुप डिस्कशनमध्ये वापरलं. सगळ्यांनाच आवडलं आणि पटलं. माझ्या नवर्‍यानेही तुला थँक्स द्यायला सांगितले आहेत.

नारदास्तु तद-अर्पिताखिलाचारता तद-विस्मरणे परम-व्याकुलतेति
नारद भक्ती सुत्र १९

भाषांतर-पण नारद म्हणतो की भक्ती म्हणजे आपली प्रत्येक कृती परमेश्वराला अर्पित करणे आणि परमेश्वराच्या विस्मरणातुन आत्यंतीक व्याकुळ होणे.

याआधीच्या ३ श्लोकांमम्धे नारदमुनी विविध भक्तांनी दिलेल्या भक्तीच्या ३ व्याख्या देतात-१)वेगवेगळ्या पध्दतीने भगवंताची पुजाअर्चा करण्यात आनंद होणे २)भगवंताकडुन अथवा भगवंताबाबतच्या कथा ऐकण्यात आनंद मिळणे ३)आत्मानंदातील सर्व अडथळे दुर करणे.आणि त्यानंतर नारदमुनी स्वत:ची व्याख्या देतात जी या पहील्या व्याख्यांनाच एकत्र करते.पण हे सर्व महान भक्त जरी भगवंताच्या विरहामुळे व्याकुळ होत असतात तरीही खरे तर त्यांना भगवंताचे विस्मरण होतच नाही.पण तरीही या भक्तांचे असे बोलणे त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नाही हे स्पष्ट करते.गोकुळातील गोपी ह्या कृष्णाच्या सर्वात महत्वाच्या भक्त होत्या.त्या भगवद्भक्तीत इतक्या रममाण होत की त्या बयाचदा त्यांची कामे करायचीही विसरत.बयाचदा या गोपिका कृष्णाबद्दल विचार न करायचा निश्चय करत पण त्यांना ते शक्य होत नसे. वरील सुत्रातुन नारदमुनी हे ही स्पष्ट करतात की आपली प्रत्येक कृती भगवंताला अर्पित करणे ही पण भक्तीच आहे.भगवान भगवद्गीतेतही हेच सांगतात.अशा पध्दतीने भक्ताचे आयुष्य पुर्णपणे Krishnaised होते.

न लगती मज शब्दब्रह्मन । तुझिया दर्शनावांचूनियां॥1॥
ह्मणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥
काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥2॥
तुका ह्मणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥3॥
तुकाराम गाथा ३९२७

~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .

अश्विनी,
माफ करा! मी 'विचारपूस' आताच पाहील!!

भक्ति ज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ४ ||

समर्थांच्या वरिल पक्तिंच 'चिंतन-मनन-निदीध्यासन' करताना आपल्याला हा धागा उपयोगी पडेल....

'ज्ञानपूर्ण', 'सप्रेम' आणि 'संपूर्ण' अशा विशेषनांनी युक्त असणार्‍या 'भक्तिची' प्राप्ती ही सद्गुरुकृपेवाचूनी कदापी शक्य नाही! हे सुरुवातीलाच लक्षात घ्यायला हवे.

विषयीं विरक्तपण इंद्रियेंनिग्रहण|
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || १ ||
चंचळपणें मन न करी विषयध्यान|
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || २ ||
बुध्दि बोधक जाण ब्रम्हानुभव पूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ३ ||
भक्ति ज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ४ ||
रामीरामदास म्हणे निर्गुण सुख लाधणें |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ५ ||

समर्थांच्या मते,
इंद्रियनिग्रहापासून सुरू होणार्‍या,(हा निग्रह सदगुरुंचा आहे, आपला नाही! हे पक्के लक्षात घ्यावे)......जगातल्या यच्चयावत विषयाबद्द्ल 'विरक्ती-वैराग्य' आणणार्‍या 'परमार्थाची' सुरुवातच 'सद्गुरुकृपेवाचून' संभवत नाही!

'वैराग्य ते निर्गूण सुख ',अशा प्रवासामधे 'ज्ञानोत्तर' अशा, तृप्ती आणि परमशांतीनेयुक्त असणार्‍या, निखळ-निर्व्याज-त्रिगूणातीत, प्रेमास्वरूपा 'भक्ती' ची प्राप्ती ही कोठ्ल्या वळणावर होते, याच शास्रशुध्द, त्रिकाल सत्य अशा, श्रीसमर्थ-वचनाच,आपण आत्यंतिक आदराने -अनन्यशरणागतीने, चिंतन करायला हवे, हे मात्र निश्चित!:-)

धन्यवाद!

ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

अश्विनी, श्री प्रभू हनुमंतरायांना इथे 'महाप्राण' का म्हंटल आहे?:-)

सावट, धन्यवाद Happy

काय चावी लावून देता हो मला ! अर्थात त्यामुळे माझी देखिल उजळणी होते ! Happy

सावट, आपल्याला मारुतीस्तोत्रात देखिल हनुंमंतांना "महाबली प्राणदाता" म्हटलेले माहित असेलच.

या विश्वाचा प्राणबिंदू श्रीदत्तगुरु आहेत, घनप्राण श्री ब्रह्मणस्पति म्हणजेच गणपती आहेत व महाप्राण श्री हनुमंत आहेत.

महाप्रज्ञा सीता किंवा महालक्ष्मी किंवा ललिता हिचे कार्य मनुष्याच्या इंद्रियाचे कार्य चालू ठेवणे हे आहे. महाप्राण हनुमंत हे आपल्या सुषुम्ना नाडीत खेळत असतात व आपल्या भौतिक देहाला विकास शक्ती पुरवत असतात.

अस्पंद परब्रह्माची स्पंदनाची शक्ती म्हणजे "गायत्री".
या शक्तीने उत्पन्न झालेला प्रथम स्पंद म्हणजे ॐकार, परमात्मा, प्रणव (इथे श्रीराम)

परमात्म्याच्या दोन शक्ती :-
१) गती व दिशा निश्चित करणारी शक्ती म्हणजे महाप्रज्ञा (इथे सीतामाई)
२) सातत्य राखणारी शक्ती म्हणजे महाशेष (इथे श्री लक्ष्मण)

ह्या प्रथम स्पंदामुळे व गतीमुळे निर्माण होणारी शक्ती म्हणजे महाप्राण (इथे श्री हनुमंत).
महाप्राणरुपी विकासशक्तीची दोन कार्ये - अस्तित्व टिकवणे व त्याची संख्यात्मक व गुणात्मक वाढ करणे.

ज्या पदार्थांमध्ये महाप्राण स्थैर्य व वर्धन ही दोन्ही कार्ये करतो, तो पदार्थ सजीव असतो तर ज्यात महाप्राण फक्त अस्तित्व टिकवण्याचे कार्य करतो, तो पदार्थ निर्जीव असतो.

माझ्या गुरुंच्या शिकवणीप्रमाणे -

१. राम हाच परमात्मा

२. सीता हीच परमात्म्याची तृप्ती देणारी शक्ती

३. लक्ष्मण हाच त्याग.

४. भरत हा प्रतिकोपासक, सगुणभक्ती जी परमात्मा दिसत नसतानाही जीवात्म्यास त्याच्याशी बांधून ठेवते.

५. हनुमंत म्हणजे महाप्राण, विकासाची अंगभूत शक्ती, धैर्य, श्रद्धासहित सबुरी.

६. रावण हाच वाईट प्रारब्ध, विभक्ती व भय निर्माण करणारा तमोगुणी जीव. अहंकार याचा प्राण तर षडरिपु मनाचे मूलद्रव्य असलेला.

७. बिभीषण हाच लंकेत (म्हणजेच आपल्या कंठ्कूप/विशुद्ध चक्रात) रहाणारा सत्वगुणी जीवात्मा ज्याचे हे चक्र हनुमंताच्या कृपेने पुर्ण शुद्ध झाले आहे.

८. वानर म्हणजेच लंका व अयोध्या (तमोगुण व सत्वगुण) समान अंतरावर असूनही रामाची ओढ असल्याने सत्वगुणाकडे झुकणारा जीवात्मा (याचे कंठकूप चक्र मिश्र आहे).

९. कैकयी म्हणजे विभक्ती.

१०. मंथरा म्हणजे संशयी वृत्ती.

११. दशरथ म्हणजे माणसाचे मन, दशेंद्रियांचा सारथी.

१२. रामबाण म्हणजे पापदाहक तेज, भर्ग.

१३. लंका कंठ्कूप चक्र (अशुद्ध स्थितीतील)

१४. सेतू म्हणजे ओज, सात्विकता, जी रावणवधासाठी रामाला आयुष्यात आणण्याचा मार्ग ठरते.

१५. अयोध्या म्हणजे नरजन्माचे संपूर्णत्व.

१६. मंदोदरी म्हणजे मानवाची स्वसंरक्षणाची सहजप्रेरणा. (आपण जेव्हा जाणून बुजून एखादी चूक करतो तेव्हा ही आपल्याला एका बाजूने परावृत्त करायला बघत असते).

------
इदम न मम, इदम श्रीरामस्य |
हरि ॐ

***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

अश्विनी, छान!

'पिंडि ते ब्रम्हांडी' हे 'सत्य' आहे!

महाबली प्राणदाता...सकळा उठवी बळे!

ब्रम्हांडाचा 'महाप्राण' श्रीहनुमंत...गुप्तसरस्वतीरुप सुषुम्नेत स्थित असणारा असा हा, स्थिरता आणि वर्धन करणारा.. महाबली,महारूद्र!

मानवी शरीरातले, कार्यरुपाने अलग असणारे पंचप्राण आणि महाप्राण, जीवात्मा आणि परमात्मा यांचा आभासरुपी-स्वप्नवत-मायारुपी-वियोग दूर करणारी, महामाया-महाशक्ती-कुंडलीनी श्रीसीतामाई चे 'उर्ध्वागमन' कसे होते.. हा पुर्ण सद्गुरुकृपेचा-अनुभवाचा-अभ्यासाचा-नित्यनियमित साधनेचा भाग आहे!

कंठ्कूप स्थित असणार्‍या 'विशुध्द चक्राचे' क्रमभेदन जो पर्यंत होत नाही.. आणि शक्ती ,जीवात्मा आणि प्राणासहीत 'आज्ञाचक्राचे' भेदन करीत नाही, तोपर्यंत 'चंचल मन' हे 'स्थिर' होत नाही.. असे शास्रवचन आहे!

असो...
धन्यवाद!

धन्यवाद Happy

आणि मजा म्हणजे सहस्रार चक्राचा स्वामी सद्गुरु असतो व ते उच्च स्थानी असते. त्याचा प्रवाह वरुन खाली.
कुंडलिनी म्हणजेच अंजनी माता व तिने परमेश्वराकडे मागुन घेतलेला पुत्र हा मूलाधाराकडून वर जातो त्या सद्गुरुतत्वाकडे, त्या परमात्य्म्याकडे Happy

रुद्र हा पण रडवतो, रावण हा पण रडवतो. फक्त रुद्र आयुष्यातून गेल्यावर रडवतो आणि रावण आयुष्यात आल्यावर रडवतो.

***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सहवीर्यं करवावहै |
तेजस्विनावधीतमस्तु | मा विद्विषावहै ||
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ||

भगवंत आम्हां दोघांचा प्रतिपाळ करो व दोघांनाही एकाच वेळी सामर्थ्य प्राप्त होवो. आमच्या दोघांच्या अभ्यासाने आम्हां दोघांस दिव्य प्रकाश प्राप्त होवो व आमच्याकडून एकमेकांचा द्वेष वा घृणा न केली जावो. तसेच, आम्हां दोघांना दिव्य शांती प्राप्त होवो.

प्रत्येक माणसात सत्वगुणी जीवात्मा व रज-तमगुणांच्या वेगवेगळ्या proportion ने युक्त जीव हे एकत्रच रहात असतात. हे आपल्या आतले जीवात्मा अन जीव म्हणजे "आम्ही दोघे".

ज्याचा जीव, जीवात्म्याच्या साथीने देवयानपंथावरुन मार्ग क्रमतो, त्याची प्रत्येक प्रार्थना सफल होते कारण तो जीव जीवात्म्याबरोबर आता रामाच्या आश्रयाला आलेला असतो. तर ज्याचा जीव जीवात्म्याला सोडून षडरिपुंच्या अंमलाखाली वाहवत जातो, त्याची कुठलीही प्रार्थना सफल होत नाही कारण तो रावणाच्या आश्रयाला (?) गेलेला असतो.

हा शांतीपाठ म्हणजे विकार आणि पापबुद्धी असणार्‍या जीवाने जीवात्म्यात रुपांतर होण्यासाठी केलेली प्रार्थना होय. जेव्हा हा हेतू उत्कट होऊन मनापासून ही प्रार्थना केली जाऊ लागते तेव्हा आपोआपच सत्वगुण वाढवणारा भक्तिभावही वाढीस लागतो व आपल्या लंकेतील रावण मारला जाऊन रामाचे राज्य येते व जीवात्मारुपी बिभीषण सुखाने राज्य करतो.

जो पर्यंत जीवरुपी रावण आपले रुपांतर जीवात्म्यात होऊ शकेल असे आचरण करत नाही तोपर्यंत रावणाची लंका म्हणजे जीवन अशांती, अतृप्ती, असमाधानाच्या आगीत जळतच राहते. ज्याक्षणी ह्या प्रार्थनेचा अर्थ जाणून घेऊन परमात्म्यास शरण जाणे होते तेव्हा परमात्मा (राम) आपल्या हनुमंतास त्या भक्तापाशी पाठवून जीव व जीवात्म्याला प्रेमाने एकरुप व्हायला मदत करतो.

हा मंत्र प्रत्येक उपासनेच्या शेवटी म्हटल्यास, म्हणणार्‍या जीवास जीवात्म्यासारखंच बनवतो व त्यामुळे मानवास स्वतःस बदलण्याचे बळ प्राप्त होते. रावणास (जीव) बिभिषण (जीवात्मा) बनवणारे हे भगवंताचे नाम आहे व नामाचे प्रेम्/गोडी जीवास लागण्यासाठी करायची ही प्रार्थना आहे.

ही प्रार्थना जेव्हा काही लोक सांघिक साधना/उपासना करुन शेवटी म्हणतात (सामुहिकरित्या) तेव्हा त्या संघामध्ये अशांतता व कलह उत्पन्न होत नाहीत व झाल्यास त्याचे परिमार्जन लगेच होते.

पण भगवंतावरिल श्रद्धेशिवाय व उपासनेची जोड असल्याशिवाय या प्रार्थनेचे फळ मिळणार नाही.

आपण कितीतरी वेळा सहज बोलताना "इथे भेटलास वर नको भेटूस", "नको, नको, असं करुन नरकात नाही जायचंय मला" अशी वाक्यं बोलतो. पण इथे "वर" म्हणजे स्वर्गलोक, "नरक" म्हणजे पाताळलोक असं काहीसं आपण गृहीत धरलेलं असतं.

पण असे स्वर्गलोक (देवलोक), पृथ्वी (मनुष्यलोक) आणि नरक (पाताळ लोक) असं वेगळं ठिकाण असतं का? पाताळात नाग लोकही स्थित असतो असं आपण पौराणिक कथांमधे वाचलं ऐकलं असेलच.

पण प्राचिन ऋषी मुनींना खरंच अशी ढोबळ व्याख्या आपल्याला सांगायची होती का? नक्कीच नाही. त्रैलोक्याची खरीखुरी व्याख्या वेगवेगळ्या स्तरांवर काय आहे?....

१) स्वर्ग्/देवलोक म्हणजे अतिमानवी, पवित्र (सामर्थ्याने व शक्तीने) असणार्‍या महामानवांचा, योग्यांचा, सिद्धपुरुषांचा व शिवात्म्यांकडून प्रत्यक्षरित्या संचालित होणारा समुह.

मनुष्यलोक म्हणजे दैवी सामर्थ्य नसलेल्या आणि स्वार्थासाठी नानाविध भौतिक मार्गांनी, काम्य उपासनांनी स्वतःला बलवान करायचा आटापिटा करणार्‍या मानवांचा समुह.

पाताळलोक म्हणजे गुप्त रितीने तांत्रिक उपासना करुन अमानवी/अपवित्र सामर्थ्य मिळवून कटकारस्थाने व अनीतिचे कर्म करणार्‍या मानवांचा समुह. पाताळाचाच दुसरा भाग नागलोक ज्यात गूढविद्या चांगल्या मार्गाने वापरु इच्छिणारे लोक असतात.

२) धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांपैकी :- धर्म - स्वर्ग लोक, अर्थ - मनुष्यलोक आणि काम - पाताळ लोक.

३) अश्रद्धा - पाताळलोक, काम्यश्रद्धा - मनुष्यलोक आणि मोक्ष हेच ध्येय असणार्‍या भक्तीला स्वर्ग लोक मानलं आहे.

४) शारीरिक बल अर्थात प्राणबल - पाताळ लोक
मानसिक बल - मनुष्य लोक
बुद्धिबल - स्वर्ग लोक

कुठल्याही व्याख्येनुसार व्यक्तिगत व सांघिक अशा दोन्ही पातळीवर बलाचा र्‍हास करणारी गोष्ट म्हणजे 'भय'. जो पर्यंत एखाद्याची (पौराणिक व्याख्येनुसार राक्षस, मनुष आणि देव) साम्र्थ्ये कितीही प्रचंड असली तर जोपर्यंत त्याच्याकडे अणुमात्रसुद्धा भय आहे, तो पर्यंत त्याच्या बलाला अतुलनीय म्हणता येत नाही कारण सर्वप्रकारच्या सामर्थ्यांना एका क्षणात पांगळं करुन टाकण्याची ताकद ह्या भयामधे असते.

अपवित्र मार्गावर चालणार्‍याला तर सदैव प्रचंड भयाचं ओझं सोसावे लागते, कितीही शूरपणाचा आव आणला तरी.

पूर्णपणे अपवित्र नसणार्‍या व पवित्र मार्गावर चालायचा प्रयास करणार्‍या मनुष्यालाही भय असतेच, पण त्याला भगवंताचे अकारण कारुण्य सतत आधार देत रहाते व तो त्याच आधारावर मार्गक्रमणा करत रहातो.

ज्ञानमार्गाने जाऊ पहाणार्‍या योग्यांच्या यमनियमांच्या पालनात चूक झाली तर पतनाचे भय आहेच.

भय नसते फक्त श्रीरामकृपा (परमात्मकृपा) झालेल्या व्यक्तीसच कारण त्याची कृपा म्हणजेच जानकी हीच कालीरुपाने अभद्राचा नाश करते आणि ती जिची दृष्टी आहे ती महाकाली चण्डिका महिषासुरमर्दिनी ही अभद्राच्या कारणाचा नाश करते.

ही परमात्मकृपा केवळ श्रद्धा सबुरी, भक्ती आणि सेवाच आपल्यापर्यंत वाहून आणतात.
-----------

इदं न मम | इदम गुरुदत्तस्य |

Pages